सोळा वर्षाची अहद
तिनं इस्रायली सैनिकाच्या कानशिलात लगावून दिली.
सध्या ती अटकेत आहे.
आणि तिच्यासाठी
आंदोलन तीव्र होतं आहे...
तिनं इस्रायली सैनिकाच्या कानशिलात लगावून दिली.
सध्या ती अटकेत आहे.
आणि तिच्यासाठी
आंदोलन तीव्र होतं आहे...
एक जानेवारीला जगभरात नवीन वर्षाचे स्वागत सुरु होतं, पण त्याचदिवशी इस्त्रायलमध्ये ‘अहद तमीमी’ या एका सोळा वर्षाच्या मुलीविरोधात तब्बल 12 खटले दाखल करुन तिला राष्ट्रद्रोही ठरवण्यात आलं. अहदचा दोष केवळ इतका होता की तिने इस्त्रायली सैनिकाला ‘चले जाव’ म्हणत कानफाडात लगावली होती. इस्त्रायल कोर्टाने अहदला जामीन नाकारत दोष निश्चिती केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण पॅलेस्टाईनमध्ये उमटले.
इस्त्रायल कोर्टाच्या निर्णयानंतर अल्पवयीन अहद जगभरात चर्चेचा विषय झाली. अहदच्या सुटकेसाठी जगभरातून सोशल मीडियावर मोहीम राबवण्यात आली. गेलr दोन आठवडे‘फ्री अहद’ हा हॅशटॅग ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये होता. इस्त्रायल व्याप्त जेरुसलेम ते वेस्ट बँक परिसरात ‘फ्री अहद’चे मोठ-मोठे पोस्टर्स झळकले आहेत. पॅलिस्टिनी स्वातंत्र्य योद्धा म्हणून सोळा वर्षाच्या अहदला जगभरात गौरवान्वित केलं जात आहे.
डिसेबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून घोषित केलं. या घटनेचे पडसाद पॅलेस्टाईनमध्ये उमटले. कारण पॅलेस्टिनींनी जेरुसलेमला आपल्या प्रस्तावित देशाची राजधानी घोषित केलं आहे. परिणामी पॅलिस्टीनी नागरिक इस्त्रायलविरोधात रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन झाले. तब्बल 2 आठवडे पॅलिस्टिनी नागरिकांनी अमेरिकेच्या निर्णयाचा विरोध दर्शवत आंदोलनं केली.15 डिसेंबरला वेस्ट बँक परिसरात झालेल्या एका निदर्शनात अहद तमीमी सामील होती.
अनाधिकृत ताबा असलेल्या वेस्ट बँक परिसरात इस्त्रायली सैनिक तैनात होते, यावेळी 16 वर्षाच्या अहदनेत्या यहुदी सैनिकांला ‘आमच्या देशातून चालते व्हा’ म्हणत धक्काबुक्की केली. त्या सैनिकाने अहदच्या नाजूक भागावर हात लावला, यावर अहदने भडकून त्या सैनिकाच्या गालावर थप्पड मारली. हा वाद सुरू असताना अहदची आई घटनेचाव्हिडिओ काढत होती, सोशल मीडियावर अपलोड झालेला हा व्हिडिओ बघता-बघता व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून पॅलेस्टिनी पंतप्रधान मेहमूद अब्बास यांनी अहदच्याधाडसाचे कौतुक केलं
घटनेच्या तीन दिवसानंतर ‘नबी सालेह’ या गावातून रात्री अहदला अटक करण्यात आली.अहदची चुलत बहिण नूर तमीमी व आई नरिमनलाहीअटक झाली. या अटकेनंतर नबी सालेह, वेस्ट बँक आणि जेरुलसेममध्ये इस्त्रायलविरोधात आंदोलन आणखीन तीव्र झाले. अहदच्या कुटुंबाच्या सुटकेच्या मागणीसाठी अनेकजण रस्त्यावर उतरले. देशभर इस्त्रायली सैनिकाविरोधात प्रक्षोभ वाढला. अहदच्या सुटकेसाठी पॅलिस्टिनी ‘फ्री अहद’ मोहीम राबवत होते.
तिकडे जेरुसलेम इस्त्रायलची राजधानी व्हावी या अमेरिकेच्या प्रस्तावावर 22 डिसेंबरला संयुक्त राष्ट्रात मतदान झाले. अमेरिकेचा प्रस्ताव 193 विरुद्ध 9 मताने धुडकावून लावण्यात आला. यानंतर पॅलेस्टाईनमधील निदर्शनं कमी झाली. पण फ्री पॅलेस्टाईन मोहीम अजूनही सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून पॅलेस्टाईनमध्ये संघर्षविरामाची स्थिती झाली होती. पण ट्रम्प यांच्या घोषणेने आगीत तेल ओतण्याचं काम केलं.
अहद तमीमी हिचं हे धाडस नवं नाही, यापूर्वीही तिने 2015 साली इस्त्रायली सैनिकांनी एक पॅलिस्टिनी मुलाला धरून ठेवलं होतं, त्या मुलाला सोडवण्यासाठी अहद त्या सैनिकांच्या अंगावर धावून गेली होती. अहद इस्त्रायली सैनिकांच्या हाताला चावा घेत असलेला हा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. अहदसारखे अनेकजण इस्त्रायली सैनिकाच्या अंगावर धावून गेले आहेत.
युद्ध, बंदुकांचे आवाज, गोळ्या, बुलेट्स, रक्ताचे सडे पॅलिस्टिनी नागरिकांना आता नवे नाहीत. बंदुकांच्या आवाजाने पॅलेस्टिनीयनचा दिवस सुरु होतो, तर धुरांच्या लोटात त्यांचा दिवस संपतो. गेल्या 70 वर्षात पॅलेस्टिनी फक्त बंदुकांचे आवाज व युद्ध पाहात आलेले आहेत. अशा वातावरणात जन्म घेणारी पिढी विद्रोही असणे साहजिकच आहे. काही दिवसापूर्वी एक लहानगा मुलगा इस्त्रायली सैनिकांवर दगड भिरकावतानाचा फोटो व्हायरल झाला होता. असे कितीतरी लहान व तरुण मुलं आक्रमणकारी इस्त्रायलाचा विरोध करत असतात.
इस्त्रायली सैन्याचा विरोध केल्याने अहदच्या वडिलांनी तिला स्वातंत्र्य योद्धा घोषित केलं आहे, ‘दी गार्डीयन’ला दिलेल्या मुलाखतीत अहदचे वडिल बासिम अल तमीमी म्हणाले की ‘मुलीच्या सुटकेसाठी इस्त्रायलजवळ नाक कदापि घासणार नाही, तिच्यावर पॅलेस्टाईनच्या भूमीचे संस्कार आहेत, आम्ही तिच्या मनात भिती निर्माण करू शकत नाही, आमच्या मुलांमध्ये इस्त्रायल विरोधाचा दिवा पेटत ठेवणे, हे आमचे कर्तव्य आहे.’
‘अमनेस्टी इंटरनॅशल’ या जागतिक मानवी अधिकार संघटनेनं अहदला चांगला वकील देऊ अशी घोषणा केली आहे. तर दुसरीकडे जगभरात अहद समर्थक वाढत असल्याने इस्त्रायल सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 21 ऑगस्ट 2018ला प्रकाशित झालेला आहे.)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com