जपानमध्ये एका अनोख्या निर्णयामुळे वर्किंग
विमेन आक्रमक झालेल्या आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांनी महिलांना चष्मा घालून ऑफिसमध्ये
येण्यास मनाई करणारा हुकूम काढला आहे. या निर्णयामुळे जपानच्या कॉर्पोरेट
कंपन्यामधील महिला कर्मचारी हवालदिल झालेल्या आहेत. परिणामी हा बंदीहुकूम झुगारून लावण्यासाठी
स्त्रियांनी देशपातळीवर मोहीम सुरू केलीय.
जपानी मीडियाच्या मते प्राइव्हेट कंपन्यांनी वेगवेगळ्या
कारणांसाठी महिला कर्मचाऱ्यांना चष्मा परिधान करण्यास बंदी केली आहे. हा आदेश
काढताना कंपन्यांनी हास्यास्पद कारणे दिली आहेत. महिला कर्मचाऱ्यांनी घातलेल्या
चष्म्यामुळे त्यांच्या सौंदर्याला बाधा पोहचते. याचा कंपन्यांच्या आर्थिक नफावाढीवर
थेट परिणाम होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. चष्मा घातलेल्या
महिला कुरुप दिसतात असंही कंपन्यांचं म्हणणं आहे.
स्त्रियांसाठी नवा ड्रेसकोड
या वादाचं मूळ जपानमधील निप्पॉन टीव्ही नेटवर्क आणि बिझिनेस इनसाइडर या दोन पीआर एजन्सीज आहेत. त्यांनी शॉपिंग मॉल, एअरलाइन्स, स्पा, ब्युटी पार्लर, आयटी सेक्टर, रेस्टॉरंट, कॉफी हाऊस इत्यादी ठिकाणी एक सर्वेक्षण करत चष्मा घातलेल्या महिला कर्मचाऱ्यामुळे संबंधित कंपन्याच्या उत्पन्नावर परिणाम होतो, असा निष्कर्ष काढला आहे. अहवालाचा मथितार्थ असा आहे की, चष्मा घातलेल्या महिला कर्मचारी क्लाइंटवर प्रभाव पाडू शकत नाहीत. परिणामी कंपन्यांचा बिझनेस प्रभावित होतो. याच रिपोर्टच्या आधारे काही कंपन्यांनी वर्कप्लेससाठी नवे नियम लागू केले आहेत. ज्यामुळे जपानमध्ये नवा वाद उद्भवला आहे.

चष्म्याशिवाय अन्य अटीमध्ये असं सांगण्यात आलं
आहे की, महिलांनी आपल्या सौंदर्याकडे लक्ष द्यावं.
मेकअप केल्याशिवाय त्यांनी ऑफिसमध्ये येऊ नये. आपलं वजन आटोक्यात ठेवावं, ते
वाढू देऊ नये, असे नियम यात आहेत. बीबीसीच्या मते या
सर्वेक्षणानंतर काही कॉर्पोरेट कंपन्या स्त्रियांसाठी नवा ड्रेसकोड लागू
करण्याच्या विचारात आहेत.
कॉर्पोरेट कंपन्यांच्या या अनोख्या आदेशामुळे
अर्थातच जपानच्या महिलांनी कर्मचाऱ्यांनी बंडाचं हत्यार उपसलं आहे. महिलांनी
आदेशाचं उल्लंघन करत जोरदार मोहीम सुरू केली आहे. महिलांकडून कामावर बहिष्कार
घालून या निर्णयाचा निषेध नोंदवला जात आहे. सोशल मीडियावर ही ठिणगी ज्वालाग्राही
स्वरूप घेऊन भडकली आहे. सोशल मीडियावर स्त्रीवादी चर्चेला उधाण आलंय. अनेक महिला
जपानच्या कॉर्पोरेट कंपन्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. ट्विटरवर #glassesdiscrimination, #glassesAreForbidden आणि #glasseforwoman असं
हॅशटैश वापरले जात आहेत.
अनेकांनी कॉर्पोरेट सेक्टर स्त्रियांच्या मानवी
हक्कांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. पूर्व आशिया खंडातील स्त्रीवादी
संघटना व कार्यकर्त्यांनी जपानी कंपन्यांवर लैंगिक भेदभावाचा आरोप करत कारवाईची
धमकी दिली आहे. ही मोहीम जोर धरत असून कायदेशीर प्रवासाकडे ती कूच करत आहे.
वाचा : बंडखोर पॉप स्टार सुलीचा एकाकी अंत
वाचा : ‘अनवॉन्टेट टच’ विरोधात रशियाची एना रस्त्यावर
हास्यास्पद निर्णय
सोशल मीडियाच्या चर्चेमधून असं लक्षात येतं की रिसेप्शनिस्ट महिलांसाठी नवे नियम कंपन्यांनी लागू केलेले आहे. त्यात ती सडपातळ व आकर्षक दिसणे अशी अट नव्याने घालण्यात आलेली आहे. ज्यांचा निषेध जपानी लोकं करताना दिसत आहेत.

मारिको इवासा नावाची तरुणी म्हणते, "मला चष्मा परिधान करायला आवडतो. मी कधीही
कॉन्टॅक्ट लेन्स वापरत नाही. माझ्याजवळ जवळपास २० चष्मे आहेत आणि मी रोज
कपड्यांसारखे चष्मे बदलते. चष्मा म्हणजे माझी एक ओळख आहे. मला असे वाटते की चष्मा
घातलेल्या बर्याच लोकांकडे कारणे असते. उगाच कोणी चष्मा घालत
नसतो. महिलांसाठी चष्माबंदी म्हणजे
मूर्खपणा आहे."
क्रिस्टी लुईस म्हणते, "मी ऐकतेय की कामाच्या ठिकाणी जपानी महिलांसाठी
चष्मा प्रतिबंधित आहे. होय, जपानने १७व्या शतकात पाऊल टाकले आहे." फेरीमन्स
डॉटर नावाची एक तरुणी म्हणते,
"इतका हास्यास्पद निर्णय मी कधी ऐकला
नव्हता. मी चष्म्याशिवाय आंधळी आहे. त्याशिवाय मी कॉम्प्युटर स्क्रीनसुद्धा पाहू शकत
नाही. मग मी काम कसे करणार?"
काहीजण म्हणतात, कॉर्पोरेट
कंपन्या स्त्रियांना भोगाची वस्तू समजून त्यांचं प्रदर्शन भरवित आहे. अनेकांनी
कॉर्पोरेट कंपन्यांवर लैंगिक भेदभावाचे आरोप केले आहेत. बहुतेक सोशल मीडिया यूझर्सचं
म्हणणं आहे की जपानी महिलांचं वस्तूकरण करून कंपन्यांनी त्यांचा बाजार मांडलेला
आहे.
काही प्रतिक्रिया परस्पर विरोधी होत्या. क्योटो
युनिव्हर्सिटीच्या फोरेन स्टडीजमधील समाजशास्त्राच्या एका प्राध्यापकांची
प्रतिक्रिया बीबीसीने छापलीय. त्यात ते म्हणतात, "लोक
कालबाह्य धोरणावर प्रतिक्रिया देत आहेत. लोकांनी निरर्थक वादावर प्रतिक्रिया
देण्याची गरज नाही. स्त्रियांनी चष्मा घालावे का नको हा वाद निरर्थक आहे."
वेगवेगळ्या पद्धतीने लोकं या नियमाविरुद्ध
निषेध नोंदवण्याचा प्रयत्न आहेत. कॉलेजच्या मुली व घरकाम करणाऱ्या महिलांनी गॉगल व
चष्मे घालून सोशल मीडियावर फोटो अपलोड केले आहेत. इतकच नाही तर अनेकांनी गाढव, कुत्रा, मांजर, अशा
प्राण्यांना चष्मा घालून कॉर्पोरेट कंपन्यांचा निषेध केलाय.
गेल्या जून महिन्यात जपानमध्ये अशाच एका अमानूष
निर्णयाचा निषेध जपानी लोकांनी नोंदवला होता. हो निर्णय म्हणजे कॉर्पोरेट
कंपन्यांनी महिलांसाठी हाय हिल्सची सॅंडल कम्पलसरी केली होती. सर्व स्त्री
कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची अट लादली गेली होती. मीडिया रिपोर्टच्या मते काही
कंपन्यांनी नोकरीसाठी अर्ज करतानाच ही अट मंजूर करण्याची सक्ती केली होती. या
निर्णयाविरोधात #KuToo सारखी मोठी मोहिम सुरू झाली होती.
अभिनेता आणि लेखक युमी ईशिकवा याने ब्युटी
पार्लरमध्ये काम करणाऱ्यांना काम करणाऱ्या महिलांचा ड्रेस कोड व हाय हिलची सक्ती
संपुष्टात आणण्याची मागणी करणारी एक याचिका दाखल केली होती. कंपन्याच्या
निर्णयाविरोधात अनेकांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली होती. सोशल मीडियावर मोहिमा
चालवल्या. जनतेचा वाढता प्रक्षोभ लक्षात घेऊन सरकारच्या श्रम मंत्रालयाने
कंपन्याच्या मनमानी धोरणावर वचक बसवणारा नियम तयार केला होता. यावेळीदेखील अशी
मागणी केली जात आहे.
वाचा : इराणी महिलांचा स्टेडिअम प्रवेशाचा लढा
वाचा: मोरक्कोत गर्भपातबंदी शिथिलतेची मागणी
महिलांचे वस्तुकरण
समाजात महिलांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या दिसण्यावर त्यांचे मूल्यमापन करण्याची नवी प्रथा पडली आहे. सौदी अरेबिया व लेबनान सारख्या इस्लामी राष्ट्राने आधुनिकीकरणाच्या नावाखाली महिलाच्या वस्तुकरणाची स्पर्धा सुरू केली आहे. सौदीने आर्थिक हीत डोळ्यासमोर ठेवून ड्राईव्हिंग, एअरहोस्टेस, मॅल्टिनॅशनल कंपन्या अशा विविध क्षेत्रात महिलांची मेगाभरती सुरू केलीय. लेबनानच्या एका शहराने सार्वजनिक स्थळी ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलिसांसाठी शॉर्ट ड्रेस सक्तीचा केला आहे. पर्यटनाला चालना म्हणून हे धोरण स्वीकरल्याच्या लेबननच्या त्या स्थानिक सरकारकडून सांगण्यात आलं होतं.

नव्या भांडवलवादी बाजारपेठेने महिलांना शोभेची
वस्तू म्हणून प्रेझेंट केलं आहे. इतकेच नाही तर महिलांचं बाजारीकरणदेखील केलं.
त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असा प्रघात पडला आहे की महिलांच्या देखाव्यावर व
बाह्यांगावर ती काम करू शकेल की नाही, ती प्रगती करू शकेल का नाही, ती
आर्थिक लाभ मिळवून देऊ शकेल का? अशा मोजपट्ट्या लावल्या जात आहेत.
गेल्या काही दशकांपासून भांडवली बाजारपेठेच्या
या धोरणावर विरोधी व आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक स्त्रीवादी संघटनांनी विविध
कॉर्पोरेट कंपन्यांविरोधात आंदोलने सुरू केलेले आहेत. काहींवर खटलेदेखील भरले
आहेत. जपानचा नवा नियम धक्कादायक तर आहेच शिवाय लैंगिक भेदभावाचा पुरस्कार करणारा
आहे. स्त्री कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन तिच्या कर्तुत्वापेक्षा तिच्या बाह्य रूपावर
ठरविण्याचा हा प्रघात आहे. त्यामुळे जगभरातील सर्वच मानवतावादी संघटनांनी एकत्र
येऊन भांडवली बाजरपेठेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे.
(सदरील लेख आजच्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com