नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा अमेरिकेतील महिलांसाठी सुखद क्षण घेऊन आला. सीनेट, हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स आणि राज्यपालांसाठी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत तब्बल ११७ महिला प्रतिनिधी निवडून आलेल्या आहेत. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षातील १७ तर विरोधी डेमोक्रेटिक पक्षातील १०० महिला रेकॉर्ड मतांनी निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारीदेखील रेकॉर्ड ब्रेक झाली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते गेल्या ५० वर्षांत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बीबीसीच्या मते राष्ट्राध्यक्ष ट्रम्पंच्या धोरणामुळे त्रस्त होऊन लोकांनी ट्रम्पविरोधी नीतीला भरघोस मते दिली आहेत.
वाचा : नागपूरच्या अमेरिकन सिनेटर गझाला हाशमी
वाचा : वर्णभेदविरोधात पहिली मुस्लिम खासदार महिला
बीबीसीसारखेच मत बहुतेक वृत्तपत्रांनी नोंदवलं आहे. थोडक्यात काय तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना खालच्या सभागृहात मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. आठ वर्षानंतर डेमोक्रेटिक पक्ष लोअर हाऊसमध्ये बहुमतात आला आहे. सीनेटचे (वरचे सभागृह) काही उमेदवार व गव्हर्नर (राज्यपाल) पदाच्या निवडणुकीचे निकाल हाती आले नसले तरी येणारा काळ हा ट्रम्प नीतीसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. गेल्या दोन वर्षातील कालावधीत डोनाल्ड ट्रम्पनी घेतलेल्या निर्वासित, व्यापार, परराष्ट्र संबध, अल्पसंख्याक इत्यादी क्षेत्रात घेतलेल्या कडव्या भूमिकेविरोधात ही मते मानली जात आहेत.
राष्ट्राध्यक्षांचा आर्धा कार्यकाळ सरला की, हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्ससाठी मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात. एका अर्थानं या निवडणुका सत्ताधारी पक्षाचे मूल्यमापन करणाऱ्या असतात. रिपब्लिकन पक्षाचा पराभव पाहता न्यूयॉर्क टाइम्सच्या मते येणारी दोन वर्षे ट्रम्पसाठी परीक्षेची असणार आहेत.
या मध्यावधी निवडणुकात ११७ महिला निवडून आल्या आहेत. सध्याचा रेकॉर्ड ८४ महिलांचा होता. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते कधी नव्हे ते प्रथमच अमेरिकेत महिलांना राजकारणात समान संधी मिळाली आहे. महिला यशाचा हाच रेशो कायम राहिला तर पुढच्या निवडणुकीपर्यंत अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या सरासरी ५० टक्के महिला प्रतिनिधी सीनेटमध्ये असतील. म्हणजे पाच सभासदापैकी प्रत्येकी एक महिला सिनेटर असेल.
या निवडणुकीत सीनेटमध्ये जाण्याची १२ महिलांना संधी मिळाली आहे. आता सीनेटमध्ये एकूण महिलांची संख्या २२ झाली आहे. तर एकूण ५० पैकी ९ महिला गर्वनर (राज्यपाल)म्हणून निवडून आल्या आहेत. यापूर्वी ही संख्या सहावर होती.
वाचा : पाकिस्तानची कृष्णकुमारी : बंधक मजूर ते सिनेटर
वाचा : सेरेनाच्या कॅटसूटमुळे का निर्माण झाला वाद
यापूर्वी १९९२ हे वर्षे सीनेटसाठी 'विमेन एरा' ठरला होता. १९९२ साली प्रथमच ५४ स्त्रिया सीनेटसाठी निवडल्या गेल्या होत्या. यंदा हाउस ऑफ़ रिप्रेजेंटेटिव्सच्या सर्व ४३५, सीनेटच्या १०० पैकी ३५ जागा आणि ५० राज्यांच्या गवर्नर पैकी ३६ जागासाठी या निवडणुका झाल्या. यात तब्बल २७३ महिला मतपत्रिकेवर होत्या. त्यातून सिनेट, हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स आणि राज्यपाल पदासाठीसाठी एकूण ११७ महिलांना यश मिळालं. अजून बरेच निकाल हाती येणे बाकी आहेत.
निवडून आलेल्या एकूण महिलामध्ये २ मुस्लिम महिला आहेत. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम महिलांना सीनेटमध्ये प्रतिनिधीत्व मिळालेलं आहे. यापूर्वी दोन पुरुष उमेदवार निवडून आलेले आहेत. सिनेटर म्हणून निवडून आलेल्या या महिला निर्वासित समुदायातील आहेत.
निवडणुकीत तब्बल ४२ कृष्णवर्णीय महिलांना राजकीय संधी मिळाली आहे. हेदेखील रेकॉर्ड मानलं जात आहे. तीन जागा एलजीबीटी समुदायाला मिळाल्या आहेत. तर चार जागांवर भारतीयांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाला मोठे यश लाभलं आहे. यामागे देखील एक भारतवंशी महिलेची स्टॅटर्जी होती. जुलै महिन्यात सीमा नंदा या भारतीय महिलेला डेमोक्रेटिक पक्षाच्या नव्या सीईओ म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी देशातील प्रत्येक कोपऱ्यातून डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारांना जिंकून आणण्याचा संकल्प केला होता. एका अर्थानं सर्व डेमोक्रेटींच्या यशाचं श्रेय सीमा नंदाला जातं.
(सदरील लेख २० नोव्हेंबर २०१८च्या लोकमतच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे)
जाता जाता

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com