वर्ल्ड चॅम्पियन सेरेना विलियम्सला ब्लॅक कॅटसूट घालून टेनीस खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. या मुद्द्यावरून नेटीझन्सध्ये गेली दोन आठवडे उलटसुलट रंगलीय. तिच्या फॅन्सनी या निर्णयाला रेसिझमशी जोडलं तर अनकांनी याला सेक्सीझमशी जोडून पाहिलं आहे.
टेनीस फेडरेशननं ड्रेसकोडची चौकटीतले परिमाणं पुढे करून आगामी स्पर्धेत खेळण्यास मज्जाव केला आहे. तिच्यावर होणाऱ्या या वर्णभेदी हल्ल्यामुळे सेरेना पुरती व्यथित झाली आहे. मातृत्व काळानंतर जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत असलेली सेरेना अचानक एकाकी पडली आहे.
वाचा : लैंगिक छळाला समर्पित सिमोनचा ड्रेस
वाचा : व्हिनसचा पराभव करणारी १५ वर्षीय कोको
सेरेना एप्रिल 2017 पासून मैटर्निटी लीव्हवर होती. गेल्या सप्टेंबरमध्ये तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर तिला अतिशय गुंतागुंतीच्या अशा ‘ब्लड क्लॉट्स’ आजारानं घेरलं. फुफुसाचा या विकारामुळे तिच्या रक्तात गुठळ्या होत होत्या. डिलीवरीनंतर तिचे 4 ऑपरेशन झाले. तब्बल सहा आठवडे ती अंथरुणाला खिळली होती.
आठच महिन्यात रिकव्हर होत तिनं टेनीस कोर्ट गाठलं. इतक्या कमी कालावधीत पीचवर परतणे तिच्यासाठी एक मोठं आव्हान होतं. इतर कामात ठीक आहे, पण ताकदीच्या अशा मैदानी खेळात ते धोकादायक मानलं जातं. केवळ खेळाप्रती समर्पित भावनेतून तिनं अशा नाजूक अवस्थेत बॅट हातात घेतली. शारीरिकदृष्ट्या अनफीट असतानाही ती खेळाच्या मैदानात जिद्दीनं उतरली पण मातृत्व व आजारानं थकलेल्या शरीरानं तिला साथ दिली नाही, तिला ग्रँण्ड स्लॅममध्ये दारूण पराभव आला.
मॅटर्निटी लीव्हपूर्वी सेरेना एक नंबर वर्ल्ड रँकिंगवर होती, आता ती 26 क्रमांकावर घसरली आहे. इतक्या गुंतागुंतीच्या काळातही ती स्वतला सावरण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या प्रयत्नांना फ्रेंच टेनीस फेडरेशननं अचानक झटका दिला. टेनीस फेडरेशननं तिच्या कॅटसूटला टेनीस कोर्टमध्ये बंदी केली. आगामी फ्रेंच ओपनमध्ये तिला कॅटसूट घालून खेळता येणार नाही, असा आदेश काढला.
फेडरेशननं दी गार्डीयनला प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की, ‘कॅटसूटमध्ये खेळणे हा टेनीसचा अपमान आहे. खेळ आणि त्याच्या नियमांचा सर्वांनी सन्मान करावा.’ दुसरीकडे प्रतिस्पर्धी खेळाडूंनी तक्रार केलीय की सेरेनाचं शरीर बलदांड आहे, बॉडीसूटमुळे त्यांना दुखापत होऊ शकते.
वाचा : सोमालियाची पॅशनेट ब्रॉडकास्टर नलायाह
सेक्सिजम आणि रेसिझमविरोधात लढणारी सेरेना फेडरेशनच्या या निर्णयावर प्रचंड दुखी झाली आहे. नव्या बॉडीसूटमध्ये तिला सुपरहिरोचा फिल येत होता असं तिनं म्हटलं होतं. ‘ब्लड क्लॉट्स’ रोगावर इलाज म्हणून तिनं हा काळ्या रंगाचा टाईट बॉडीसूट परिधान केला होता.
स्कीन टाईट असलेल्या या ड्रेसमुळे सतत वेदना देणाऱ्या स्नायूंना आधार मिळत होता. या सूटमध्य़े ती कम्फर्टेबल फील करत होती. नाईके नावाच्या प्रतिष्ठित कंपनीनं हा सूट खास सेरेनासाठी डिजाईन केला होता. नाईकेच्या मते या पोशाखामुळे सेरेनाच्या स्नायूंत रक्तात गुठळ्या होणार नाही, कारण स्नायूंना ताणून धरणारे विशिष्ट प्रकारचा इलास्टिक यात वापरला होता.
23 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारी सेरेना येणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये आपला प्रिय काळा सूट परिधान करू शकणार नाही. हा ड्रेस तिनं तमाम मातांना समर्पित केला होता. अनेकांनी या ड्रेसला अश्लिल व शरीराचं विभत्स प्रदर्शन करणारं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तरी अनेकांनी या ड्रेसवर तिला ट्रोल करत गलिच्छ भाषेत टीका केली आहे.
सेरेनाच्या या मुस्कटदाबीवर अनेक फेमिनिस्ट विश्लेषकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिलांचे भाव विश्व टिपणाऱ्या स्कॅरी मॉमी (scary mommy) या वेबसाईटनं सेरेनाच्या नव्या ड्रेसला सेक्जिझमशी जोडून विश्लेषण केलं आहे. या ड्रेसमध्ये सेरेनाचे क्लीवेज व वक्षस्थळे दिसत नाहीत, त्यामुळे तिच्या खेळाला ग्लॅमर मिळू शकणार नाही, यामुळे तिच्या बॉडीसूटला विरोध होत असावा असं भाष्य या वेबसाईटनं केलंय. तर काहींची म्हणने आहे की कॅटसूटच विभत्स आहे.
दी गार्डियनमध्ये चित्रा रामास्वामी यांनी सेरेनावर एक छोटासा लेख लिहला आहे, यात त्यांनी एका अमेरिकन रेडिओ जॉकीचा कोट दिलाय, तो म्हणतो, “त्या दोघी (विल्यम्स भगिनी) खेळताना खूपच किळसवाण्या दिसतात, जास्त वेळ मी त्यांना कोर्टवर पाऊ शकत नाही.”
दुसरा उल्लेख अजून धक्कादायक आहे, Afua Hirsch या ब्रिटिश लेखिकेनं आपल्या पुस्तकात मारीया शारापोवा व सेरेनाची तुलना करत म्हटलंय की, "पीचवर खेळणाऱ्या गोऱ्या स्त्रीची लैंगिकता मनोरंजन आणि चवदार असते, याउलट एका काळ्या महिलेची तेवढीच आक्षेपार्ह, निष्काळजी आणि अश्लील असते." रामास्वामी यांनी गोऱ्या मानसिकतेच्या वर्णद्वेषाची लाज काढली आहे. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तिंनी जाहिररीत्या विल्यम्स बहिनींची बदनामी केली होती.
कॅटसूट एक प्रकारचा बॉडीसूट आहे त्याला जिमनास्ट परिधान करतात. याला एक वेगळं ग्लॅमर आहे, फॅशन जगतात या पोशाखाला 'फॅटिश' म्हणजे कामुकता वाढवणाऱ्या वस्त्रात गणले जातं. पण टेनीसमध्ये फ्रॉक किंवा स्कर्ट महिलांसाठी स्टँण्डर्ड मानला गेला आहे. फ्रेंच ओपनमध्ये याच वस्त्रांना स्टँण्डर्ड मानण्यात आलं आहे.
1885 साली अशा प्रकारचा ड्रेस कृष्णवर्णीय खेळाडू ऐन वाइट याने विम्बलडनमध्ये परिधान केला होता. 2016 साली झालेल्या रिओ ऑलंम्पिकमध्ये इजिप्तची एक मुस्लिम महिला व्हॉलीबॉल खेळाडूं कैटसूट सारखाच बुर्किनीसूट घालून खेळली होती. रिओत दुसऱ्याही अरब राष्ट्रातील महिला खेळाडू बुर्किनी घालून खेळल्या होत्या, अरब राष्ट्रात महिलांचं शरीरावर कमी कपडे असणे निशिद्ध मानलं जातं.
अशा कंझरवेटीव्ह वातावरणातही त्या महिलांनी संधीची दारे खुली करून रिओत खेळल्या. या बुर्किनीवरून स्वतला सुधारणावादी म्हणवणाऱ्यांनी या महिला खेळाडूंवर तोंडसुख घेतलं. आता याच वर्गानं सेरेनाच्या बॉडीसूटवर आपल्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन मांडलं आहे. टेनीस फेडरेशननंदेखील बाजारू वृत्तीच्या आहारी जाऊन यूएसपीचा असा विकृत पायंडा पाडावा त्याहून अधिक दुर्देवी आहे.
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 11 सप्टेंबर 2018ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com