वाढता इस्लाम फोबिया आणि अमेरिकेत मुस्लिम देशांना बंदी या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात मुस्लिम महिला सिनेटर पदापर्यंत पोहचली आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या न्याय हक्कांना डावलल्याचा आरोप होत असताना ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. मेहरीन फारूकी असं या महिलेचं नाव असून ती मूळची पाकिस्तानी आहे. ग्रीन पक्षाच्या सदस्य असलेल्या मेहरीन या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या मुस्लिम सिनेटर ठरल्या आहेत. देशात मेहरीनच्या निवडीवर अनेकांनी नाराजी दर्शवली असून त्यांच्यांवर वर्णद्वेषाचे राजकीय हल्ले केले जात आहेत.
मेहरीन फारूकी १९९२ साली पाकिस्तानहून स्थलांतरित होऊन ऑस्ट्रेलियात आल्या. व्यवसायानं इंजिनिअर असलेल्या मेहरीन २००४ मध्ये ग्रीन पक्षात दाखल झाल्या. ५५ वर्षीय मेहरीन २०१३ साली साऊथ वेल्सच्या सदस्या म्हणून विधिमंडळात पक्षाचं प्रतिनिधीत्व करत होत्या. हा ५ वर्षांचा कार्यकाळ संपताच पक्षानं त्यांना सिनेटर (खासदार) म्हणून पार्लमेंटवर पाठवलं. २० ऑगस्टला त्यांनी सिनेट पदाची शपथ घेतली. निवडीनंतर त्यांनी 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'ला आपल्यावर झालेल्या वर्णभेदी हल्ल्याविरोधात प्रतिक्रिया दिलीय, त्यांच्या विरोधकांना चोख प्रतिउत्तर दिलं.
१४ ऑगस्टला दी गार्डियननं मेहरीन यांच्यावर एक विशेष स्टोरी प्रकाशित केलीय. यात मेहरीन फारूकीवर झालेल्या वर्णद्वेष व वांशिक भेदभावावर वृत्तपत्रानं भाष्य केलंय. एका सिनेटरवरही वांशिक भेदभावाचा हल्ला होतोय, असं म्हणत वृत्तपत्रानं वाढत्या वर्णभेदावर चिंता व्यक्त केलीय. या पत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत मेहरीन म्हणतात, 'गेल्या २६ वर्षांपासून देशात मुस्लिम प्रवासी व शरणार्थींना संशयानं पाहिलं जात आहे, युरोपातील वाढत्या इस्लाम फोबियानं ऑस्ट्रेलियादेखील ग्रस्त झालाय. ही वृत्ती बदलणे आव्हानात्मक काम आहे.'
त्यांनी स्थानिक राजकीय नेत्यावर ताशेऱे ओढत वांशिक भेदभावाला त्यांनी राजकीय नेत्याच्या कट्टर वृत्तीला जबाबदार धरलं आहे. राजकीय नेत्यांनीच वंशविद्वेष पोसून मुस्लिमांविरोधात सामाजिक भेदभाव पोसला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. विशेष म्हणजे महिला सिनेटर पाऊलेन हॅन्सनने गेल्या वर्षी सदनात बुरखा परिधान करून दाखल झाल्या होत्या. बुरखा बंदी का लागू करत नाही असा आरोप करत त्यांनी सरकारी धोरणाचा निषेध केला. या घटनेवरून विरोधक व सत्ताधारी पक्षात चांगलीच जुंपली होती. अशा घटना ऑस्ट्रेलियात वांशिक भेद व मुस्लिमविद्वेष वाढवण्याला कारणीभूत ठरत आहेत.
जगभरात वर्णभेदाच्या घटना वाढत आहेत. नॉन युरोपिय राष्ट्रात वर्णद्वेष पोसणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जगभरात वांशिक भेदभावाची चर्चा सुरू झालीय. असं असताना एकामागोमाग वांशिक भेदभावाच्या घटना घडणे दुर्देवी आहे.
मेहरीन यांच्या बाबतीत दोन्ही पातळीवर टीका होतेय. पहिली तर त्या मुस्लिम अल्पसंख्याक समुदायातील आणि दुसरं कारण म्हणजे त्या आशियाई आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे ही राष्ट्रे दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत. अशावेळी त्यावर कायमस्वरूपी उपायोजना करणे व शरणार्थी धोरण बनविण्याऐवजी धर्माच्या नावानं भय बाळगणं कदापी योग्य नाही. या वृत्तीवर अनेकदा मानवी हक्क संघटनांनी ताशेरे ओढले आहेत. मूठभर लोकांसाठी सहिष्णू समाजाची बदनामी होता कामा नये, असंही या संघटनांनी म्हटलंय.
मार्च महिन्यात जर्मनीच्या चान्सलर म्हणून अंजेला मर्कल यांनी शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी युरोपियन राष्ट्रात वाढणाऱ्या इस्लाम फोबियावर टीकात्मक भाष्य केलं होतं. 21 मार्चला पार्लमेंटला उद्देशून केलेल्या भाषणात इस्लाम जर्मनीचा अविभाज्य भाग असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. एकीकडे इस्लाम फोबिया संपवण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्पसारखे नेते शरणार्थी मु्स्लिम देश व इस्लामविरोधात वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे इस्लाम फोबियाचा भय कमी होण्याऐवजी तो वाढत आहे. इस्लाम फोबियाचा हा वाढणारा प्रवाह विश्व शांतीच्या मार्गात धोकादायक अडथडा मानला जातोय.
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 4 सप्टेंबर 2018ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com