महिला मंत्री असेलल्या सरकारमध्ये कमी प्रमाणात भ्रष्टाचार होतो, असा रिसर्च नुकताच ‘जर्नल ऑफ इकोनॉमिक बिहेवियर एंड ऑर्गनाइजेशन’ या पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. यात भारतासह 125 देशातील आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं आहे.
संशोधनातील वैज्ञानिकांचा दावा आहे की, सरकारमधील महिलांचा मोठा सहभाग भ्रष्टाचार रोखण्यास कारणीभूत ठरू शकतो. महिलांचे चांगले व्यवहार, नीतीमत्ता आणि नियमांमुळे सरकारमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखला जातो, कारण त्या पुरुषांपेक्षा वेगळ्या तत्त्वांची निवड करतात. रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलंय की, महिला राजनेता अशा तत्त्वांची निवड करतात ज्या महिला, बालके आणि कुटुंब कल्याणाच्या हिताची असतात.
हा रिसर्च प्रकाशित होणे आणि स्पेनची ‘फेमिनिस्ट कॅबिनेट’ निवडणे निव्वळ योगायोग म्हणावा लागेल.
गेल्या काही वर्षांपासून स्पेन वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. कधी ‘कॅटोलेनिया’ वेगळा देश व्हावा अशी मागणी, तर कधी भ्रष्टाचारी पीएमविरोधात आंदोलनं, तर कधी राजकीय अस्थिरता. नुकतंच स्पेनचे सत्ताधारी पंतप्रधान मारियानो रखाय यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात तब्बल 33 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
वाचा : अमेरिकेच्या सिनेटमध्ये महिला राज
वाचा :अमेरिकेची ही खासदार का बनली बारटेंडर?
या घटनेमुळे स्पेन पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर चर्चेस्थानी आला. ही चर्चा संपत नाही तोपर्यंत सत्तांतरानंतर कॅबिनेटमध्ये तब्बल 61 टक्के महिलांना स्थान देऊन स्पेननं जगाचं लक्ष आपल्याकडे वळविलं. एकूण 17 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 11 महिलांना महत्त्वाची पदे स्पेन कॅबिनेटनं दिली आहे. एक मोठा हेतू साध्य़ करणे आणि वेगळ्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी हे महिला मंत्रिमंडळ नियुक्त केल्याचं स्पेनचे पंतप्रधान पेंद्रो सांचेज म्हणतात.
2 जूनला पेंद्रो सांचेज यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी जगभरातील मीडियानं ‘धर्मग्रंथाशिवाय पदाची शपथ घेणारा स्पेनचा पहिला नास्तिक पंतप्रधान’ अशा बातम्या रंगवल्या. मात्र त्यांनी मंत्रिमंडळात 61 टक्के महिलांना स्थान दिलं ही बातमी याच मीडियानं दडविली. काही तुरळक प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान पेंद्रो सांजेच यांच्या धाडसी निर्णयाला बातमी म्हणून स्थान दिलं.
17 पैकी 11 महिलांना कॅबिनेट पदे दिल्याबद्दल पंतप्रधान पेंद्रे अभिनंदनास पात्र ठरले आहेत. स्पेन हे जगातील पहिलं ‘फेमिनिस्ट कॅबिनेट’ म्हणून गौरवास पात्र झालं आहे. याचं सर्व श्रेय पेंद्रो स्पेनच्या ‘फेमिनिस्ट स्ट्राईक’ला देतात.
चार महिन्यापूर्वी म्हणजे आठ मार्चला स्पेनमध्ये जगातील सर्वांत मोठं महिला आंदोलन झालं होतं. हे आंदोलन ‘फेमिनिस्ट स्ट्राईक’ म्हणून ओळखण्यात येते. तब्बल 5 मिलियन महिला कामगार या आंदोलनात सामील झाल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून पगारातील भेद, सत्तेत समान वाटा, महिलांविरोधात वाढते अत्याचार, लैंगिक भेदभाव, कौटुंबिक हिंसाचार अशा विविध कारणासाठी हा संप पुकारण्यात आला होता. 50 लाख महिला रस्त्यावर आल्यानं साहजिकच तिथलं कामकाज पूर्णत: ठप्प झालं होतं. वॉशिंग्टन टाईम्सनं या आंदोलनाला जगातील क्रांतिकारी महिला चळवळीत स्थान दिलं होतं.
स्पेनमध्ये झालेल्या ‘फेमिनिस्ट स्ट्राईक’नं कधी नव्हे ते पहिल्यांदा सरकारमध्ये महत्वाची पदे देऊन महिलांना सत्तेत मोठा वाटा दिला आहे. अर्थ, संरक्षण, न्याय, शिक्षण, आरोग्य, सास्कृतिक मंत्रिपदे या महिलांना देण्यात आली आहेत. पंतप्रधान पेंद्रो सांचेज यांनी आपल्या मंत्रिमंडळात उच्चशिक्षण आणि मोठा अनुभव असलेल्या महिलांना कॅबिनेट मंत्रीपदे देऊन सन्मान केला आहे.
वाचा : नागपूरच्या अमेरिकन सिनेटर गझाला हाशमी
वाचा : वर्णभेदविरोधात पहिली मुस्लिम खासदार महिला
स्पेनमध्ये जुलै 2017 मध्ये निवडणुका झाल्या. संसदेत पेंद्रो यांच्या सोशालिस्ट पक्षाकडे 350 जागांपैकी फक्त 84 सदस्य आहेत. मारियानो रखाय पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानं विरोधी पक्षनेते असलेले पेंद्रो सांचेज यांना सरकार स्थापनेची संधी देण्यात आली.
सर्वांत कमी जागा असल्या तरी त्यांनी सत्ताधारी पीपल्स पक्षातील सदस्यांना महत्वाची पदे देऊन ‘सोशालिस्ट सरकार’ स्थापन केलं आहे. दोन वर्षांपर्यंत निवडणुका न घेता योग्यरित्या कारभार चालवेन अशी ग्वाही त्यांनी दिलीय.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com