महिला कर्मचाऱ्यांसाठी राबविलेल्या ‘सेफ पिरियड’ धोरणामुळे जपानमधले एक डिपार्टमेंटल स्टोर चर्चेत आहे. मासिक पाळीच्या त्रासातून जाणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना स्टोरने विशिष्ट रंग व डिझाईनचे पिरियड बॅजेस (Period Badges) दिले होते. त्रास होईल त्या दिवसात महिलांना आपल्या शर्टावर तो बॅज चिकटवायचा होता. महिला स्टाफला त्या दिवसात विश्रांती मिळावी आणि सेवेतून सूट मिळावी हा उद्देश त्यामागे होता. परंतु या प्रयोगाला ‘दहशत माजविणारा’ आणि ‘वेडेपणाने ग्रस्त’ म्हटले गेले. टीकेला कंटाळून डिपार्टमेंटल स्टोरने तो निर्णय मागे घेतला आहे.
टोकिया शहरातले डैमारू स्टोर नावाचे हे बहुचर्चित स्टोर आहे. महिनाभरापूर्वी स्टोरने 500 महिला कर्मचाऱ्यांना बॅज देऊन हा प्रयोग राबविला होता. संबंधित बॅजेसवर ‘सीरी चान’ नामक लोकप्रिय मान्जा कॅरेक्टरचे कार्टून आहे. चित्रातून मासिक पाळीचा बोध होतो. जपानमध्ये या चित्राला ‘मिस पिरीयड’ म्हणून ओळखले जाते.
डैमारू स्टोरचे प्रवक्ता योको हिगुची यांचे म्हणणे आहे की, ‘आम्ही हा उपक्रम महिला कर्मचाऱ्यांबद्दल सहानूभुती व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होता. या बॅजेसचा हेतू ज्या महिला हा बॅज लावतील त्यांना दीर्घकाळापर्यंत ब्रेक घेण्याची सूट मिळावी. तिला काम करताना कुठलाही त्रास होऊ नये, तिच्या मदतीसाठी लोकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा.’
वाचा : फेमिनिस्ट चळवळीची स्टार सुलीचा एकाकी अंत
वाचा : दक्षिण कोरियाची 'एस्केप द कॉर्सेट' मोहीम
डिपार्टमेंट स्टोरचे म्हणणे आहे की, या बॅजेसची कुठलाही सक्ती करण्यात आलेली नव्हती. तसेच तो बॅज कामात मदतीची गरज भासल्यास परिधान करायचा होता. कंपनीचे म्हणणे आहे की, कामाचे ठिकाण आल्हाददायी व सुरक्षित रहावे यासाठी ही धोरणावली राबविण्यात आली होती. ग्राहकांना स्टोर कर्मचाऱ्यांच्या मासिक पाळीबद्दल माहिती असावी, जेणेकरून त्यांच्याबद्दलच्या ग्राहकांच्या वागणुकीत सहानूभूतीचे वातावरण तयार व्हावे.
स्टोरचे म्हणणे आहे की, सहकाऱ्याकडून पिरियड सुरू असलेल्या व्यक्तीला वजनदार वस्तू न उचलण्याचा किंवा ते काम स्वत: करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. मासिक पाळी सुरू असलेल्या व्यक्तिसंदर्भात सहकारी कर्मचारी सहानुभूती बाळगू शकतात, असेही कंपनीचे म्हणणे आहे. या प्रयोगातून स्टाफमध्ये परस्पर संमती व सहकार्याच्या भावनेमुळे क्रयशक्तीही वाढीस लागेल आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण आनंनदायी होईल असाही कंपनीचा दावा आहे.
या अनोख्या निर्णयावरून बऱ्या-वाईट आणि सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. काहींचे म्हणणे होते की, ही ट्रिटमेंट महिलांसाठी भेदभावाला बळकटी देणारी आहे. काहींनी म्हटले की, महिलांच्या पिरियडकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. याउलट सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक जागतिक मीडिया संस्थानी या बातमीकडे पॉझीटिव्ह दृष्टीने पाहत विषेश वृत्तलेख लिहिले.
जपान टाइम्स, न्यूयॉर्क पोस्ट, सीएनबीसी, हफिंग्टन पोस्ट आणि बीबीसीसारख्या प्रसिद्ध माध्यमांनी ही बाब सकारात्मक असल्याचे म्हटले. बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत डिपार्टमेंटल स्टोअरच्या मॅनेजरने म्हटले की, “काहीच दिवसात आम्हाला याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. बॅजेस लावलेल्या महिला स्टाफला ग्राहकांकडून चांगली वागणूक मिळाल्य़ाचे निरिक्षण होते. शिवाय सहकारी कर्मचारीदेखील परस्पर सहकार्याच्या भूमिकेत होते.”
टीकेला उत्तर देताना आमच्या चुकीच्या पद्धतीने अहवाल टीकेला न जुमानता आम्ही लवकरच या पॉलिसीवर पुनर्विचार करणार आहोत, असेही डिपार्टमेंटल स्टोरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
बीबीसीने एक प्रतिक्रिया प्रकाशित केलीय, ज्यातून हा वाद कशामुळे उद्भवला हे कळण्यास मदत होते. एका जुन्या प्रकरणात कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भातली छळाची तक्रार स्टोरला आली होती. ती बाहेर गेली आणि वादाला सुरुवात झाली. यावर डिपार्टमेंटल स्टोरच्या एका महिला कर्मचाऱ्याने प्रतिक्रियेत म्हटले की, “एका तक्रारीमुळे सकारात्मक प्रयोगाला वादाची किनार लाभली, जे चुकीचे होते. या धोरणामुळे अनेकांना फायदा होणार होता. यातून एक वेगळा पायंडा पडला असता व जगभरातील लाखो वर्किंग विमेनला दिलासा मिळाला असता. पण दुर्देव..”
वाचा : सन्मान #MeToo कॅम्पेनचा
वाचा : डेन्मार्कमध्ये बुरखा बंदीविरोधात आंदोलन
मासिक पाळीच्या दरम्यान महिला सेवेतून सूट मिळावी, पगारी रजा मिळावी, सेवेत सवलत मिळावी, हाफ डे लागू असावा, अशा विविध मागण्या जगभरातून होत आहेत. अनेक मानवी हक्क व महिला संघटनांनी या मागणीला व्यापक स्वरूप दिलेले आहे. काही देशाने सकारात्मक बदल केले आहेत. पण पूर्णपणे या मागणीला बळकटी देणारा बदल अजून घडलेला नाही. जपानमध्ये मासिक पाळी ही एक अशी गोष्ट होती ज्याबद्दल स्त्रिया उघडपणे क्वचितच बोलतात. हा विषय जपानी स्त्रियासाठी लज्जास्पद राहिलेला आहे, असे मीडिया रिपोर्ट्समधून दिसून येते. त्यामुळे टोकियोच्या डैमारू डिपार्टमेंटल स्टोरच्या या उपक्रमाकडे सकारात्मक प्रयोग म्हणून पाहिले जात आहे.
(सदरील लेख लोकमतच्या 12 डिसेंबर 2018च्या अंकात प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com