गेल्या महिन्यात न्यूजीलँडच्या पंतप्रधान ‘जैसिंडा आर्डर्न’ गरोदर असल्याची बातमी मीडियात टॉप ट्रैंड ठरली. पंतप्रधान सारख्या महत्त्वाच्या पदावर असताना मातृत्व स्वीकारणे धाडसी निर्णय होता. जैसिंडा आर्डर्न यांनी सहजतेनं मातृत्व स्वीकारलं आहे. त्यांच्या निर्णयाचं जगभरातून स्वागत करण्यात येत आहे.
पंतप्रधानपदी असताना बाळाला जन्म देणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला ठरतील. याआधी 1988 साली बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना मुलाला जन्म दिला होता. जैसिंडा आर्डर्न जोडप्यानं इंन्स्ट्राग्रामवर एक फोटो शेअर करत ही माहिती जगजाहीर केली आहे.
जगभरातील मीडियाने या बातमीला महत्व दिलं आहे. ‘दी गार्डीयन’ व ‘बीबीसी’नं पंतप्रधान जैसिंडा आर्डर्न यांचा निर्णय आश्चर्याचा धक्का देणाऱ्या असल्याचं म्हटलंय तर पाकिस्तानच्या ‘डॉन’ वृत्तपत्रानं ‘जैसिंडा आर्डर्न’ यांची तुलना बेनझीर भुट्टोशी करत टीकाकारांबद्दल रोष व्यक्त केला आहे.
वाचा : पाकिस्तानच्या दोन महिला वेटलिफ्टर
जैसिंडा आर्डर्न या न्यूझींलँडच्या इतिहासातील सर्वात कमी म्हणजे 37 वर्ष वयाच्या पंतप्रधान आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये त्या निवडणूक जिंकून पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. शपथविधीच्या अवघ्या सहा दिवस आधी त्यांना प्रेग्नेंसीची बातमी कळाली. ‘न्यूजीलँड हेरॉल्ड’ने वृतपत्रात जैसिंडा आर्डर्न यांनी प्रेगनंसीबद्दल सविस्तर मुलाखत दिलीय. याच दैनिकात मातृत्वासारखा सुखद क्षण अनुभवण्यासाठी सहा आठवड्याची सुट्टी घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु असताना टीका करणाऱ्यांचीही कमतरता नव्हती. जगभरातील पुरूषी मानसिकता जैसिंडा आर्डर्न यांच्याविरोधात टीकाकारांच्या भूमिकेत उतरली होती. प्रेग्नेंसीच्या निर्णयानं जैसिंडा आर्डर्न ट्रोल झाल्या. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने ट्रोलर्सना फटकारलं आहे, ‘आमचं दुर्दैव आहे की 30 वर्षानंतरही बेनझीरवर टीका करणारे कमी झालेलं नाही’ असं डॉननं म्हटलंय.
बेनझीर भुट्टोशिवाय जैसिंडा आर्डर्न यांची चर्चा पूर्ण होणार नाही. न्यूझीलँडच्या पंतप्रधानांच्या निमित्तानं 30 वर्षापूर्वीच्या इतिहासाचं पुनरावलोकन होत आहे. 1988 साली पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी खंबीरपणे सर्व टीकाकारांना उत्तर दिलं होतं.
1987 साली बेनझीर भुट्टोंचा देशातील सैन्य शासन उलथवून टाकण्याचा लढा सुरु होता. पाकिस्तानचे सैन्य शासक ‘जनरल जिया उल हक’ यांनी लोकशाही पद्धतीनं निवडणूका घेण्याचं जाहीर केलं. बेनझीर भुट्टो गरोदर असून निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही असं हक यांना वाटले. निवडणूक नाट्यानंतर काळजीवाहू सरकार स्थापन करू असा डाव जिया उल हक यांचा होता. पण बेनझीर या कणखर महिला होत्या.
त्यांना वडिल झुल्फीखार अली भुट्टोंच्या खूनींना हरवायचं होतं. बेनझीर यांनी निवडणुकीत सहभाग घेतला व भरघोस मतानं जिंकून आल्या. बेनझीर पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या. पण विरोधकांनी ‘मॅटर्निटी लीव्ह’ वरुन बेनझीर यांचा छळ सुरु ठेवला. या त्रासातून बेनझीर यांनी एका प्री-म्यैच्योर बाळाला जन्म दिला. आपल्या टीकाकारांना त्यांनी ‘प्रेग्नेंसी एंड पॉलिटिक्स’ या बीबीसीच्या लेखातून खरमरीत उत्तर दिलं होतं. विरोधकांचे मनसुभे हाणून पाडत त्यांनी मातृत्व स्वीकारलं होतं.
जगात वांझ व अविवाहित म्हणून अनेक राजकारणी महिलांना छळण्यात आलं आहे. 2005 साली जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्कल यांच्यावर मुलं जन्माला न घातल्यामुळे चिखलफेक झाली होती.
ऑट्रेलियाच्या एका बड्या राजकीय नेत्यानं 2010 साली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान राहिलेल्या ‘जूलिया गिलार्ड’ यांना वांझोटी म्हणून हिणवलं होतं. वांझ महिला शासन करण्यास अनफिट असतात, अशी टीका जूलिया गिलार्ड यांच्यावर झाली होती.
जूलिया गिलार्ड यांनी सत्तेवर येताच महिलासांठी विशेष कायदे केले होते. संसदेत महिला खासदारांना बाळाला स्तनपान करण्याचा अधिकारही त्यांनीच ऑस्ट्रेलियाला दिला आहे. भारतालाही एकट्या राजकीय महिलांना छळण्याचा काळाकुट्ट इतिहास आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, ममता बनर्जी, जयललिता, मायावती, शीला दीक्षित, उमा भारती आणि वंसुधरा राजे यांच्यावर अनेकदा चिखलफेक झाली आहे.
मायावती व जयललिता यांच्या बाबतीत अनेक गैरसमज नियोजितपणे पसरवण्यात आले आहेत. मुळात महिला सिंगल आहे की माता आहे हे सक्षम राजकारणाचं परिमाण असू शकत नाही, तरीही भारतात अनेकजण ही तुलना करू पाहतात.
मातृत्व हे एका महिलेच्या आयुष्यातलं एक महत्वपूर्ण वळण असतं. मातृत्व हा पूर्णत: स्त्रीचा अधिकार आहे. तो तिच्यावर लादता येत नाही. मातृत्वाबद्दल पाश्चिमात्य देशातील अनेक राष्ट्रात महिलांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. भारतात तर कमवत्या व सक्षम महिलांवरही मातृत्व लादलं जातं.
वाचा : निगार जौहर : पाकिस्तानची पहिली लेफ्टिनेंट जनरल
वर उल्लेखित केलेल्या राजकीय महिलांवर पुरुषप्रधान मानसिकता लादण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी तो झुगारून इतिहास रचला. भारतातच काय तर जगातही राजकीय क्षेत्र हे फक्त पुरुषांचेच आहे, अशी मान्यता आहे. पण अलिकडे महिलांनी या पुरुषप्रधान मानसिकतेला झुगारून अनेक राजकीय बलस्थाने आत्मसात केली आहेत. कोणालाही संधी मिळाली तर तो पुढे जाऊ शकतो. मग त्यात महिला व पुरुष हा भेदभाव कुठून आला.
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 6 फेब्रुवारी 2018ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com