सीरीफोर्ट ऑॅडिटोरियममध्ये 27 जानेवारीला बराक ओबामा यांचं बीजभाषण झालं, भाषणानंतर सबंध दोन तास माध्यमात अमेरिकेच्या राष्ट्रपतीनं शाहरुख खानचा नामोल्लेख केल्याची चर्चा होती. अशा आशयाच्या बातम्या संकेतस्थळावर झळकत होत्या, सर्वच माध्यमाला हेच फडतूस वाक्य मुख्य हेडलाईन स्वरूपात वापरले.
ओबामाच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकी मीडिया बारकाईने लक्ष देऊन होता. ‘हफिंग्टन आणि वाँशिंग्टन पोस्ट’ व्यवस्थितरित्या ओबामा दौर्याचं कव्हरेज देत होते. त्यांनी सीरीफोर्टचं भाषण संपताच “राष्ट्रपतीने भारताची कानउघाडणी” केली अशा आशयाच्या बातम्या लावल्या. त्यानंतर भारतीय इलेक्टॉनिकचं माहीत नाही परंतु ऑनलाईन माध्यमानं तीच बातमी कट पेस्ट केली. तोपर्यंत नमस्ते, शाहरुख, मेरी कोम आणि मिल्खाचा चोथा झाला होता.
धर्म संघर्षाचं कारण बनू नये
दिवसभर 'त्या' कान टोचल्याच्या बातम्या न्यूज फीड होत होत्या. दुसर्या दिवशी एकूण सर्वच माध्यमाने सदर बातमी मोठी करुन लावली. ‘ओबामामय’ झालेल्या माध्यमांनी अजून एक मोठी चूक केली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतीनं आपल्या अभिभाषणातून ओबामापेक्षा कटू शब्दात सरकारचं कान टोचलं होतं, परंतु माध्यमं ओबामानामा गात असल्यानं या अभिभाषणाकडे दुर्लक्ष झालं.
राष्ट्रपतीनं आपल्या भाषणात ‘धर्म हे संघर्षाचे कारण बनू नये’ म्हणत धर्मांतरावर जोरदार टीका केली. ‘सत्तापक्षाने आपली संवैधानिक आणि लोकशाही जबाबदारी ओळखावी, पूर्ण बहूमतात सरकार स्थापन झाले आहे त्यामुळे सरकारची जबाबदारी आहे की, स्वच्छ, कुशल, पारदर्शी आणि उत्तरदायी शासन द्यावे’ म्हणत राष्ट्रपतीनं भाषणात मागील काही दिवसांपासून भारतात सुरू असलेल्या भडक वक्तव्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकशाही देशाची प्रतिमा डागाळेल अशी भिती व्यक्त केली.
तडकाफडकी आणलेले ‘अध्यादेश’ लोकशाही आणि नितीमत्तेसाठी धोकादायक असल्याचं राष्ट्रपतीनं म्हटलं, त्याच प्रकारे विरोधी पक्षानं संसदेचं कामकाज चालू न दिल्यानं त्यांनादेखील फटकारलं. या बातम्या अपवादात्मक काही वृत्तपत्रानं सिंगल-डबल कॉलम दिल्या. परंतु ओबामाच्या पथसंचनात कुत्रा घुसल्यापासून ते ओबामानं किती सूट बदलले याच्या बातम्या भरभरुन बोलणार्या होत्या.
वाचा : लोकसहभागातून माध्यमक्रांती
ओबामा भाऊंना शुभेच्छा
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ओबामा हे पहिलेच अमेरिकी अध्यक्ष होते. त्यांच्या भारत भेटीवर लक्ष देण्यास ‘सोशल कट्टा’ आँखे बिछाये हजर होता. ‘ओबामा भाऊं’ना शुभेच्छा देणारे दादा, मामा, भाऊंची व्हॉट्स अॅप रेस सुरु होती. तर काही नेटकर्स उपराष्ट्रपती हामीद अन्सारी वर घसरले होते तर काही पंतप्रधानच्या शेरवानीवर. (ही बातमीदेखील प्रथम हफिंग्टन पोस्टने ब्रेक केली)
कोणताही फेसबुक्या परराष्ट्र धोरणावर बोलत नव्हता किंवा ओबामाच्या ‘त्या’ वाक्याची शेअरिंग करत नव्हता. ‘एखाद्या दरिद्रीनारायणाच्या घरी पहिल्यांदाच धनाढय़ नातेवाईक आल्यावर ते गरीब कुटुंबीय आणि गाव ज्याप्रमाणे हरखून जाते त्याप्रमाणे भारताचे झाले आहे’ अशा शब्दात काहींनी ओबामा दौर्याचं विश्लेषण केल. ज्याप्रमाणे देशातील कॉर्पोरेट मंडळी अमेरिकेच्या राष्ट्रपतींना भेटण्यास लाईनीत उभे होते. ते बघितल्यावर आपलीच लाज आपणास वाटावी अशी परिस्थिती झाली होती.
भविष्यातील सुपर पावर राष्ट्राने असं अमेरिकेसमोर गुडघे टेकावे, किती दयनीय अवस्था म्हणावी लागेल. ‘आपण मजबूर आहोत पण लाचार नाहीत’ हे ठणकावून सांगणे जमेल का कोणाला. पाहूण्यांचे मेहमाननवाजी करावी पण मनधरणी नको, एक हजार कोटी खर्च करुन हा जो लवाजमा उभा केला होता, त्यातून काय साध्य झालं? हा प्रश्न अनुत्तरित राहू नये म्हणजे झालं.
सत्ताबदल त्यात भूमिकाबदल
यूपीए सरकारच्या काळात अमेरिकेसोबत होत असलेल्या ‘न्यूक्लिअर डील’वर बहिष्कार घालणारा वर्ग आज सत्ताधारी भूमिकेत असताना किती दीन दिसत होता. या अणुकराराच्या मुद्दय़ावर मनमोहन सिंग हे भारतास विकायला निघाले आहेत अशी टीका त्या वेळी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली होती. परंतु त्या वेळी सिंग जे करू पाहत होते तेच मोदी यांनी आज केलं.
सत्तेत असलेले बरेचजण व्यतिगत पातळीवर या कराराला विरोध करत होते त्यांनी आज करावा विरोध आणि आपलं मंत्रीपद राखून दाखवावेत. या मुद्द्यावर आजच्या विरोधीपक्षाने तत्कालिन विरोधी पक्षासारखं ‘हीन दर्जाचं’ राजकारण केलं नाही. कारण या विरोधी पक्षाला माहितीय राष्ट्रहिताच्या आड राजकारण आणायचे नसतं.
ओबामा यांची भारतभेट फिरत होती काही प्रमुख मुद्दय़ांभोवती. भारत-अमेरिकेत रखडलेला अणुकरार, बौद्धिक संपदा कायदा, सागरी परिवहन आणि सुरक्षा, दहा वर्षासाठी भारत-अमेरिका सुरक्षा कराराचे नुतनीकरण, दोघा देशाच्या सहाय्याने आपसात सैन्य सहकार्य वाढवणे, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कार्बन वायू उत्सर्जनावर र्निबध. यात पर्यावरण आणि अणुकराराचा मुद्दा हा सर्वाधिक गुंतागुंतीचा.
भारतातील पर्यावरण प्रेमीच्या डोळ्यासमोर भोपाळ गॅस कांड व नुकतेच झालेले फुकोशिमा दिसत असून त्यामुळे पर्यावरणप्रेमी जैतापूर कुडालकूलमला विरोध करत आहेत. तसेच यात लोकल पॉलिटीक्स सामील असले तरी केंद्र त्यांच्या विरोधाला जुमानणार नाही हेदेखील तेवढेच सत्य आहे.
वाचा : हा निषेध आणि तो निषेध!
अणू सहकार्य की दबाव
जागतिक पातळीवर असं बोललं जात जातं की, भारताने अणू वीज प्रकल्पाबाबत जे कायदे केले आहेत, ते इतर देशांना मान्य नाही. याबाबत इंडियन लॉ असं सांगतो की, अणुऊर्जा केंद्रात काही अपघात घडल्यास अणुऊर्जा केंद्र चालवणाऱ्यांबरोबरच या केंद्रासाठी मशिनरी सप्लाय करणाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्याकडून नुकसानभरपाई घेतली जावी.
अपघात घडल्यास संबंधितांच्या विरोधात फौजदारी गुन्ह्य़ांबरोबर दिवाणी गुन्हेही दाखल करण्याचा अधिकार आपला कायदा नागरिकांना देतो. हे अर्थातच अमेरिकी कंपन्यांना मंजूर नाही. या कोंडीतून ओबामा आणि मोदींनी मार्ग काढल्याचं म्हटले जात आहे. दुसरं म्हणजे कार्बन वायू उत्सर्जनावर कोणत्याच देशाचे एकमत झाले नाही. प्रत्येकजण म्हणतोय ‘मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची आहे’ पण ते मी बांधणार नाही; असे जो कोणी देश स्पष्ट सांगतो आहे. म्हणजे प्रत्येक देश सांगतोय दुसर्यांनीच कार्बन उत्सर्जन कमी करावं, पण स्वत: मात्र कमी करणार नाही.
भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे जे दर्शन ओबामा यांना घडवण्यात आलं, त्यात 80 टक्के शस्रसामग्री रशियन बनावटीची होती. ओबामा त्याला न्याहाळत होते की कुत्सीतपणे बघत होते हा अनुत्तरीत प्रश्न राहील. असे असले तरी ओबामाच्या या भारत भेटीला सकारात्मक पावले अशा स्वरुपात अमेरिकन मीडियाने भारतीय पाहूणचाराची स्तृती केली आहे.
अमेरिका आणि भारताच्या सहकार्याने दोन्ही देश वेगवेगळ्या स्तरावर प्रगती करु शकेन अशा शब्दात अमेरिकन मीडियानं भारताचं स्वागत केलं आहे. ओबामानं जाता-जाता केलेले भाषण हे नियोजनपूर्वक होते. नव्या सरकार स्थापनेनंतर भारतात घडलेल्या घडामोडी, भाषणबाजीवर हे कानउघाडणी करणारे हे भाष्य होते. हे अमेरिकेच्या सिनेटसभेत सर्वमताने मंजूर करुन त्या स्वरुपाचे सर्क्यूलर काढण्यात आले होते.
सदर सर्क्यूलर व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवर आहे. या देशाच्या राज्यघटनेने दिलेला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क भारत आणि अमेरिकेचा समान दुवा असल्याचं ओबामा म्हणाले. धार्मिक आधारावर विभाजित होत नाही तोपर्यंत भारत प्रगती करत राहील, असंदेखील ओबामानं म्हटलं आहे.
भारत अमेरिका भेटीत जे निर्णये झालीत त्याची धुसफूस सुरु आहे, आर्थिक विकास साधायचा असेल तर, काही धाडसी निर्णय घ्यावी लागतात आणि विरोधकाचा विरोध आणि यामागील राजकारण देखील समजून घेण्याची तयारी पाहिजे नसता आर्थिक विकास हा अधांतरी ठरतो.
ओबामा आपल्या रिपब्लिक दिनासाठी आले यामुळे हरखून न जाता, ते आल्यामुळे आपल्या देशात किती व कोणती कामे होणार आहेत याकडे लक्ष द्यावे लागणार. मीडलक्लास ग्राहकांना भुलून होणाऱ्या परकीय गुंतवणुकीचा वापर देशाच्या आर्थिक विकासासाठी व्हावा. या गुंतवणुकीचा वापर कॉरपोरेट घराण्यासाठी होता कामा नये याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा बदलास प्रत्यक्ष सुरुवात केव्हा होणार हा प्रश्न कायम राहील..
कलीम अजीम, पुणे
सदरील लेख दैनिक प्रजापत्रमध्ये प्रकाशित झालेला आहे. त्याची मूळ लिंक -
-http://www.dailyprajapatra.com/p-8-m.php
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com