मागच्या आठवड्यात मुस्लिमांचा अतिमहत्वपूर्ण सणांपैकी असलेला ‘रमजान ईद’ हा मोठा सण साजरा झाला. ईद म्हणजे “मुस्लिमांना नविन कपड्याचे आकर्षण तर गैरमुस्लिमांना शिरखूर्म्याचं”. या ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी नेटकट्ट्यावर शुभेच्छूकांचा अक्षरश: ऊत आला होता. या शुभेच्छूकांच्या भाऊगर्दीत मुस्लिम नॉनमुस्लिम सगळेच सामील होते.
अर्धकोर चंद्र त्यासोबत सुंदर मुलगी किंवा गोंडस बाळ असलेल्या इमेजस् धडाधड अपलोड होत होत्या. नेहमी हेटाळणी आणि कुत्सित नजरेला जबाबदार असलेली पांढरी जाळीदार टोपी घालून नॉनमुस्लिम आदाबची पोझ् देत होते. मुस्लिमांच्या इतर सणांच्या वेळी उदास व भकास असलेला हा सोशल कट्टा यंदा ‘ईद मुबारक’च्या फोटोंनी ट्च्च भरलेला होता.
त्याच दिवशी जागतिक व्याघ्र दिवस होता, यासंदर्भात साधा एकही फोटो अथवा कंटेट आय मीन मजकूर या सोशल भींतीवर नव्हता. त्याचदिवशी गाझा संघर्षात सुमारे शंभर नागरिकांनी जीव गमावला होता. पण आपण ईदच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त होतो. कोणी नविन कपडे घालून मिरवत होते, तर कोणी मिष्ठान्न घेत फिरत होते. आमच्या सामाजिक भावना किती रिक्त झाल्या आहेत ना! असे का व्हावे? विचारा प्रश्न स्वत:ला.
बॉलिवूडमध्ये एक म्हण आहे, “उगते सुरज को सलाम” असंच काहीतरी होतंय आपलं, दिवस ठरवून त्या दिनविशेषावर भाष्य करायचं आणी दुसर्या दिवशी विसरुन जायचं. या अशा अभासी जगात वावरतोय आपण. ट्विटर, फेसबुकवर जे ट्रेंड दिवसभर गाजत असतात. (ते ट्रेंड कोण ठरवतं याचा शोध घ्यावा लागेल) त्यासंदर्भात आपण दिवसभर चर्चा करत राहतो.
राज, ओवेसी, गिरिराज, सिंघल अशा आलतू-फालतू पुढार्यांना आपण प्रसिध्दी देत असतो. हे ट्रेंड फक्त एका दिवसासाठी असतात. दुसर्या दिवशी परत वेगळा इश्श्यू चर्वीला जातो. याच अल्पायुषी जगापायी “फेसबुक दंगल” घडवून आणण्याचं सामर्थ्य आपणच जमा करतो. कोणीही अगदी सहजतेनं आपल्या धार्मिक, राजकीय, सामाजिक भावना चटकन दुखाऊ शकतो आणी आपण पटकन ‘रियक्शन’ द्यायला मोकळे. राग, वैताग, मत्सर, टोमणे, द्वेष, पूर्वग्रह आपण फेसबुकवर अभिव्यक्तीच्या नावाखाली खपवतो. ही कुठली अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्य, काय करतोय, कुठे जातोय आपण. इतक्या कमकुवत असतात का आपल्या भावना?
अरब राष्ट्रात याच सोशल माध्यमांनी वर्षानुवर्षे सत्तेला चिटकून असलेल्या सत्ताधिशांना खाली खेचलं, या माध्यमाच्या ताकदीचा वापर विधायक कामासाठी अरब तरुणांनी केला. भारतातही चांगल्या कामासाठी या माध्यमाचा वापर काही तुरळक मंडळी करत असली तरी त्यांची पोस्ट दखल घेण्याजोगी असतात. त्यांच्यासाठी विधायक समाजहिताच्या चळवळींची व्यासपीठ म्हणून ही माध्यमे आहेत. ही मंडळी या व्यासपीठाचा आधार घेऊन प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहेत.
“गल्ली ते दिल्ली” वर बोलणारी ही सोशल माध्यमं आता बदलत आहेत. लाईक, कमेंट, शेअरच्या पलीकडे जाऊन “माझा” वर चर्चा करण्यापेक्षा “गाझा” वर चर्चा करत आहेत. मागील काही दिवसापासून इस्राईल पॅलेस्टाईनवर युध्द लादत असल्याच्या निपक्षपाती बातम्या, माहिती काही हौशी ‘फेसबुक जर्नलिस्ट’नी दिल्या.
आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार या 24 दिवसात सुमारे 1,360 पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमूखी पडले आहेत. आमच्यावर ज्या ठिकाणाहून क्षेपणास्त्राचा मारा होतोय, त्याच ठिकाणी आम्ही बॉम्बवर्षाव करतो आहोत. असं इस्राईलनं कितीही ओरडून जरी सांगितलं तरी सार्या जगाला माहितीय काय होतंय. कुठं गेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, कुठं गेलीत संयुक्त राष्ट्राच्या शांतता परिषदा. असं सोशल माध्यमातून विचारलं जातंय.
वारंवार ‘सिजफायर’ (युध्दविराम) घोषित करुनही इस्राईलचे हल्ले सुरुच आहेत. राज्यसभेत गझापट्टीतील हिंसाचारावर चर्चा करण्याच्या मुद्द्यावर बराच वाद झाला. कॉंग्रेससह विरोधकांनी या मुद्द्यावर चर्चा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली असताना सरकारने मात्र यावर चर्चा करण्याचे टाळले. यावरदेखील सोशल माध्यमाने तटस्थ भूमिका घेत राज्यसभेत चर्चा व्हायलाच पाहिजे अशी बाजू घेतली. भारतातील प्रसार माध्यमांची या प्रकरणाची दखल घेवो न घेवो पण इथल्या सोशल माध्यमांनी जरुर घेतली.
भारतीय प्रसारमाध्यमांना विक्रीमूल्य देणारं गाझातील संघर्ष नव्हता असंच म्हणावं लागेल. फुटबॉल विश्वकप, रेल्वेदरवाढ, अर्थसंकल्पाचे ‘अच्छे दिन’ वेदिक वितंडवाद यावरच माध्यमांचं पूर्ण कव्हरेज होतं. पण ‘थँक्स टू सोशल मीडिया’. कारण या माध्यमांनी पॅलेस्टिनची खरी परिस्थीती बाहेर काढली व एक नव्या वादाला जागा करुन दिली. असे असले तरी अमेरिका किंवा संयुक्त राष्ट्रसंघाने इस्राईल संदर्भात अजून कोणतीच कठोर भूमिका घेतल्याचं माझ्या माहितीत नाही.
इस्रायलविरोध
सोशल मीडियावर पॅलेस्टिनबद्दल मोठ्या प्रमाणात दु;ख़, संवेदना व्यक्त झाल्या. इस्राईली उत्पादनावर बहिष्कार करणारे मजकूर वारंवार प्रकाशित होत होते. कोक, नाईके, नेस्टले, नोकिया, नेसकॅफे आजपासून नाही वापरणार असे स्टेट्स अपलोड होत होते. गाझापट्टीत निष्पाप बालकावर, महिलावर बॉम्बवर्षाव करणार्या इस्रायली नागरिकाचा ‘युध्द पर्यटना’चे फोटो ट्विटर, फेसबुकवर अपलोड होत होते.
जखमांचा ‘मेकअप लावून घेणार्या इस्रायली सैनिकाचा‘असली चेहरा’ याच माध्यमांनी पुढे आणला. इराक, युक्रेन, अफगाण, मलेशिया, क्राईमिया बाबतीत संवेदशिलता जपत मजकूर प्रसारित होत होते. इंटरनेटमुळं झालेल्या बदलांचा परिणाम सामाजिक सतरावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
पेपर, टीव्ही या माध्यमाला बदलण्यास इंटरनेटनं भाग पाडलं . आणी नवा ऑनलाईन मीडिया जन्माला आला. याच सोशल माध्यमाने भारतीय समाजकारण व राजकारणात प्रचंड उपलथापालथ घडवून आणली. लोकशाही व्यवस्थेत सार्वजनिकरित्या जनजागृती, जनमंथनाचे कार्य या माध्यमांनी केले.
सोशल माध्यमामुळे जनचळवळ, जनक्रांती, जनआंदोलनाचे नवीनच पर्व उदयास आले. या माध्यमाचा गैरवापर टाळण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. ते प्रयत्न बाहेरून कोणी करण्यापेक्षा ही माध्यमे वापरणाऱ्यांनीच केले तर अधिक परिणामकारक ठरेल.
जखमांचा ‘मेकअप लावून घेणार्या इस्रायली सैनिकाचा‘असली चेहरा’ याच माध्यमांनी पुढे आणला. इराक, युक्रेन, अफगाण, मलेशिया, क्राईमिया बाबतीत संवेदशिलता जपत मजकूर प्रसारित होत होते. इंटरनेटमुळं झालेल्या बदलांचा परिणाम सामाजिक सतरावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
पेपर, टीव्ही या माध्यमाला बदलण्यास इंटरनेटनं भाग पाडलं . आणी नवा ऑनलाईन मीडिया जन्माला आला. याच सोशल माध्यमाने भारतीय समाजकारण व राजकारणात प्रचंड उपलथापालथ घडवून आणली. लोकशाही व्यवस्थेत सार्वजनिकरित्या जनजागृती, जनमंथनाचे कार्य या माध्यमांनी केले.
सोशल माध्यमामुळे जनचळवळ, जनक्रांती, जनआंदोलनाचे नवीनच पर्व उदयास आले. या माध्यमाचा गैरवापर टाळण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. ते प्रयत्न बाहेरून कोणी करण्यापेक्षा ही माध्यमे वापरणाऱ्यांनीच केले तर अधिक परिणामकारक ठरेल.
कलीम अजीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com