ख्वाजा युनूसच्या आईचा हुंकार 'मला न्याय मिळणार का?'


मला न्याय मिळणार का? लोकसत्ता, मुंबई, 8 मार्च 2005 / प्रतिनिधी

मी कोणी मोठ्या साहेबाची बायको नाही, की मी फार शिकलेलीही नाही. माझ्या कमावत्या धडधाकट तरुण मुलाला मुंबईचे पोलीस घेऊन गेले होते. त्याच्या छातीवर दणादण नाचून त्याचे काळीण त्या नराधमांनी फोडले. त्याचे प्रेतही मला मिळू दिले नाही. मला दुसरे काही नको, मला न्याय द्या. त्या पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा हायी हीच एका असहाय आईपी इच्छा आहे, असे आर्त उद्गार ख्वाजा युनूसची आई आयेशा बेगम हिने आज ‘लोकसत्ता’शी बोलताना काढले.
खाजा यूनुसच्या खुनाच्या आरोपात मुंबईतील एन्काऊंटर फेम अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यापासून मुंबई पोलिसांतील काही अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना शिक्षा झाल्यास मुंबईला अतिरेक्यांचा धोका संभवू शकतो, अशी चर्चा सुरू केली आहे. मात्र मराठवाड्यातील एका गरीब मुस्लिम घरातील एकुलत्या एक कमावत्या तरुणाची निघृण हत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांवर कशा पद्धतीचे आभाळ कोसळले हे ख्वाजाच्या आईला भेटल्यावर जाणवते.
गरिबीचे चटके सोसत अत्यंत मेहनतीने शिकून इंजिनीयर झालेल्या ख्वाजाच्या खून पोलिसांनी केला. त्यांनी त्याचे प्रेत जरी आम्हाला दिले असते तरीही आम्ही गरीब लोक न्यायालयात गेलो नसतो. त्याचे विधिवत दफन करून गप्प बसलो असतो. मात्र मोलिसांनी त्याचे प्रेतही आम्हाला दिले नाही. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे आपला पसरून मी भीक मागितली होती. तेव्हा हे काँग्रेसचे शासन आहे. इथे असा अन्याय होत नाही, असे ते म्हणाले होते. मला खरेच न्याय मिोल का हो? असा टाहो त्या माऊलीने आज काही पत्रकारांसमोर बोलताना फोडला तेव्हा उपस्थितांच्याही डोळ्यांत अभू उभे राहिले.
मी मुस्लिम असल्याने हा प्रचार कारत असल्याचा आरोप सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केला होता. मग आज राज्य गुन्हा अन्वेषण शाखाही मुस्लिम झाली का, असा सवालही आयेशा बेगम यांनी केला. ख्वाजाच्या खुनाची भरपाई म्हणून आपण दोन कोटींचा दावा न्यायालयात केला आहे का, असे त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, पैशाने नोकर विकत घेता येतो. मुलगा नाही. माझा मुलगा रोज माझ्या स्वप्नात येतो. मी केवळ दिसायला जिवंत आहे. मात्र माझं काळीज कधीच जळून गेलंय. त्याचा आत्मा या नराधम पोलिसांना सोडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
ख्वाजा अतिरेकी होता. त्याच्या पलायनाचा फायदा घेऊन जर अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात फसवले तर ते योग्य होईल का, असा प्रश्न त्यांना केला असता त्या म्हणाल्या. पोलिसांवर आम्हालाही खूप विश्वास होता. ख्वाजा दुबईहून आल्यावर चिखलदऱ्याला मित्रांबरोबर पिकनिकसाठी गेलेला असताना पोलीस आमच्याकडे आले. त्याला अपघात झाल्याचे सांगून त्याचा फोटो व मोबाईल त्यांनी माझ्याकडून घेतला.
ख्वाजाच्या लग्नासाठी काढलेला फोटो ते माझ्याकडून घेऊन गेले होते. तोच फोटो आज सगळीकडे छापून येतो आहे. माझ्या यूनुसच्या डोक्यावर सेहरा बांधलेला मला बघायचा होता पण त्याच्या डोक्यावर कफनही मला पहायला मिळाले नाही, असे उद्विग्न उद्गार त्या मातेने डोळे पुसत काढले.
***
ख्वाजा युनूस प्रकरणातील निलंबित पोलीस पुन्हा सेवेत 
लोकसत्ता, मुंबई - २७ मे (2003) (प्रतिनिधी) :
घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी युनूस सय्यद ख्वाजा याच्या कथित पलायनप्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या उपनिरीक्षक सचिन वाझे व दोघा पोलीस शिपायांना सेवेत पुन्हा घेण्यात आल्यामुळे या प्रकरणाबाबत गृहखात्यामधील अनागोंदी कारभाराचे चित्र स्पष्ट झाले आहे.
युनूस ख्वाजाला पोलीस कोठडीत करण्यात आलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. मतीन या सहआरोपीने न्यायालयाला दिली होती. तसेच आपल्या मुलाचा खून झाल्याचा आरोप ख्वाजाच्या आई-वडिलांनीही केला होता. याबाबत ख्वाजाचा शोध लागत नाही तोपर्यंत दर महिन्याला त्याच्या चौकशीच्या प्रगतीचा अहवाल न्यायालयाला द्यावा व त्याच्या कुटुंबीयांना दरमहा पाच हजार रुपये देण्याचा न्यायालयाचा आदेशच धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.
पोलिसांच्या भाषेत पळून गेलेल्या युनूसचा अद्याप शोध लागला नसून या प्रकरणाच्या चौकशीचे काम ‘मोक्का’ न्यायालयाचे न्यायाधीश ए. पी. भंगाळे हे करीत असताना या पोलिसांच्या फेरनियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळाच वास येत असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे. संगणक अभियंता असलेल्या युनूसला औरंगाबाद येथे अटक करून तेथील पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या हवाली केले होते. युनूसची अधिक चौकशी करण्यासाठी त्याला गुन्हा अन्वेषण विभागाच्या अंधेरी येथील सीआययू युनिटच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले होते. या युनिटचे उपनिरीक्षक सचिन वाझे, पोलीस नाईक राजेंद्र तिवारी, शिपाई सुनील देसाई व राजाराम निकम यांचे मथक युनूराला मुढील चौकशीसाठी जीपने औरंगाबाद येथे घेऊन जात असता ७ जानेवारी रोजी पहाटे ५.३०च्या सुमारास पारनेर-सुपे घाटात ही गाडी उलटली. त्याचा फायदा घेऊन युनूस हा बेडीसह पळून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र ६ जानेवारी रोजी चौकशीकरिता नेलेल्या ख्वाजाला कोठडीत प्रचंड मारहाण झाल्याचे डॉ. मतीन याने न्यायालयासमोर सांगितले होते. ख्वाजाने कोठडीबाहेर येताच रक्ताची उलटी केल्याचे डॉ. मतीन याचे म्हणणे होते. त्या अवस्थेत चालण्याचेही त्राण नसलेल्या ख्वाजाला तात्काळ हलविण्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची धावपळ झाली होती, अशी माहितीही मतीन याने दिली.
आरोपी पळून जाण्याच्या प्रकरणाची पोलीस आयुक्त रणजितसिंह शर्मा यांनी गंभीर दखल घेऊन १० जानेवारीला या चारठी पोलिसांना सेवेतून निलंबित केले होते. मात्र पाच महिने उलटून गेले तरी युनूसचा ठावठिकाणा शहर पोलिसांना लागला नाही. दरम्यान यूनुसच्या आई-वडिलांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्यात पोलिसांनी आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप केला होता. या गंभीर प्रकरणाची पोलीस योग्य प्रकारे चौकशी करोन नाहीत याबाबत न्यायाधीश भंगाळे यांनी नाराजी व्यक्त करून या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला.
युनूस पलायन प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्यात असताना या प्रकरणाला जबाबदार असलेल्या उपनिरीक्षक वाझे व दोघा शिपायांना सेवेत पुन्हा घेण्याच्या आदेश निघाल्यामुळे काँग्रेससह विविध जाव्या व पुरोगामी पक्षांमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप चालू असताना या तिघा पोलिसांना कोणत्या मार्गाने सेवेत सामावून घेतले गेले याच्या सुरस कहाण्या सध्या पोलीस दलात चघळल्या जात आहेत. बडे राजकीय नेते व पोलीस यांच्या दरम्यान मध्यस्थाची भूमिका निभावणाच्या काही जणांनीच या तिघांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे म्हणून विशेष प्रयत्न केल्याची चर्चाही सध्या सुरू आहे. एकूण हे सर्व प्रकरणच दाबून टाकण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून करण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे.
***
ख्वाजा युनुसच्या आईला २० लाखांची भरपाई
झी 24 तास, Updated: Apr 11, 2012, 02:12 PM IST
ख्वाजा युनुसच्या आईला २० लाख रूपयांची भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यसरकाला दिले आहेत. ख्वाजाच्या आईनं दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयानं हा आदेश दिलाय. पोटा कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या ख्वाजाचा तुरूंगात मृत्यू झाला होता. खालच्या न्यायालयानं याआधी ३ लाख रूपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते, मात्र उच्च न्यायालयानं भरपाईची रक्कम २० लाख रूपयांपर्यत वाढवून दिली आहे. दहा पोलिस अधिकाऱ्य़ांवर कारवाई करण्यासंबंधीची ख्वाजाच्या आईची विनंती मात्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
सैयद ख्वाजा युनूस सैयद अयूब ऊर्फ ख्वाजा युनूस हा घाटकोपर बेस्ट बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित आरोपी होता. २७ वर्षांचा ख्वाजा युनूस हा पळून गेलेला नसून पोलिसांनी कोठडीत केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा हे सरकारनेही मान्य केले आहे. घाटकोपर क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मृतदेहाची कुणाच्याही नकळत विल्हेवाट लावली, असं सरकारने मान्य केलंय आणि तसा खटलाही संबंधित पोलिसांवर सरकारने दाखल केला आहे. असल्याने पोलिसांच्या या दुष्कृत्याबद्दल राज्य सरकारने ख्वाजा युनूसची आई आसिया हिला २० लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.
दुबईत इंजिनियर म्हणून नोकरी करणाऱ्या ख्वाजा यूनूसला ३९ हजार रुपये पगार मिळत होता. तो आज जिवंत असता, तर वयाच्या ६०व्या वर्षापर्यंत नोकरी करून किमान १० कोटी रुपये कमावून घरच्यांना दिले असते, असा विचार करून त्याच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांकडून याहून जास्त भरपाई हवी असल्यास त्यासाठी वेगळा दावा दाखल करण्याची मुभा कोर्टाने ख्वाजाच्या आईला दिली आहे.
पोलिसांच्या चौकशीस उच्च न्यायालयाचा नकार
दिव्य मराठी - Apr 11,2012
मुंबई - घाटकोपर येथे बेस्ट बसमध्ये 2002 मध्ये बॉम्बस्फोट घडवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ख्वाजा युनूस याच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या दहा पोलिस अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. दरम्यान, ख्वाजा युनूसच्या आईला देण्यात येणार्‍या नुकसान भरपाईच्या रकमेत 3 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढीस न्यायालयाने मंजुरी दिली.न्यायालयाने म्हटले आहे की, ख्वाजा यूनूस याच्या मृत्यूमुळे त्याची आई आसिया बेगमने घरातील आपला कमावता मुलगा गमावला आहे. तसेच ख्वाजाच्या मानवी हक्कांवरही गदा आणण्यात आली होती हे उजेडात आलेले आहे. त्यामुळे त्याच्या आईला देण्यात येणार्‍या भरपाईची रक्कम 20 लाख रुपये करण्यात आली आहे. ख्वाजा युनूसला चौकशीसाठी नेले जात असताना पोलिसांच्या जीपला अहमदनगर येथे 6 जानेवारी 2003 च्या रात्री अपघात झाला. त्या वेळी परिस्थितीचा फायदा घेऊन ख्वाजा युनूस पळून गेला होता असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मात्र त्याला पोलिसांनीच कारस्थान रचून मारल्याचेही आरोप झाले होते. त्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दहा पोलिस अधिकार्‍यांची चौकशी करण्यासाठी आदेश देण्यास मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. ए. एम. खानवलिकर व न्या. आर. जी. केतकर यांच्या खंडपीठाने मंगळवारी नकार दिला. याबाबतची याचिका ख्वाजा युनूसची आई आसिया बेगम यांनी दाखल केली होती.ख्वाजा युनूस मृत्युप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे व तीन कॉन्स्टेबलच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांनी 5 डिसेंबर 2007 रोजी दिले होते. मात्र या मृत्यू् प्रकरणास जबाबदार असलेल्या अन्य दहा पोलिस अधिकार्‍यांची चौकशी करण्यास या आदेशात नकार देण्यात आला होता. त्याचे सविस्तर विश्लेषणही या आदेशात केलेले होते.पोलिस महासंचालक कार्यालय व गृहखात्याकडील या प्रकरणाच्या फायलींची मुंबई उच्च न्यायालयाने बारकाईने पाहणी केली होती. ख्वाजा युनूसच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या दहा पोलिस अधिकार्‍यांचा त्याच्याशी संबंधित प्रकरणासाठी नेमण्यात आलेल्या तपास पथकात समावेश नव्हता. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी औरंगाबादहून डॉ. अब्दुल मतीन व जहीर यांना अटक करण्यापुरताच या अधिकार्‍यांचा संबंध होता. त्यामुळे ख्वाजा युनूस मृत्युप्रकरणी त्यांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करणे अन्यायकारक होईल असे मत गृह विभागाने व्यक्त केले होते, असे मुंबई उच्च न्यायालयाने 77 पानी निकालात नमूद केले आहे....निर्दोषत्वही शक्यघाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी ज्या आठ लोकांवर खटले दाखल करण्यात आले त्यांची विशेष पोटा न्यायालयाने निदरेष मुक्तता केली होती. या निकालाची आठवण करून देत मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ख्वाजा युनूसचीही कदाचित निदरेष मुक्तता होऊ शकली असती. ख्वाजा युनूसची आई आसिया बेगमला महाराष्ट्र शासनाने भरपाईपोटी याआधीच तीन लाख रुपये दिले आहेत. आता आणखी 17 लाख रुपये भरपाईची रक्कम आसिया यांना आठ आठवड्यांच्या आत द्यावी असा आदेश उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. ही भरपाईची रक्कम ख्वाजा युनूस प्रकरणी दोषी असलेल्या पोलिसांकडून काही काळानंतर वसूल करण्याचा पर्याय राज्य शासनाकडे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.ख्वाजा युनूस प्रकरणाचा घटनाक्रम 2 डिसेंबर 2002 - घाटकोपर रेल्वेस्थानकाबाहेर बेस्टमध्ये बॉम्बस्फोट 23 डिसेंबर 2002 - ख्वाजा युनूसला अटक 3 जानेवारी 2003 - युनूसवर पोटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल 6 जानेवारी 2003 - चौकशीसाठी युनूसला पोलिस जीपमधून अहमदनगर येथे नेण्यात आल्याचा सूत्रांचा दावा. 28 एप्रिल 2003 - ख्वाजा युनूस बेपत्ता झाल्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी उच्च् न्यायालयात याचिका दाखल केली. 17 व 18 फेब्रुवारी 2003 - डॉ. अब्दुल मतीन याने अशी साक्ष दिली की, युनूसचा पोलिस कोठडीत खूप छळ करण्यात आला. 6 डिसेंबर 2007 - ख्वाजा युनूस प्रकरणी चार पोलिसांच्या चौकशीस सरकारची परवानगी
***
संकलन - कलीम अजीम

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ख्वाजा युनूसच्या आईचा हुंकार 'मला न्याय मिळणार का?'
ख्वाजा युनूसच्या आईचा हुंकार 'मला न्याय मिळणार का?'
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgrsF8ZHUtkXq8ynl-PL6shG7nIemq85Tu7sDr0IWWnuXXq-_al0GpacKcj2CHr1NfYvXmf6X8n6NCSV6JyaXo0yzYCqj6ATzwHP5b-VUUDgmpVEZ7Ao3rR9lFNZtqL3DtXyKmcKA4tNDFi/s640/Khwaja+Yunus.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgrsF8ZHUtkXq8ynl-PL6shG7nIemq85Tu7sDr0IWWnuXXq-_al0GpacKcj2CHr1NfYvXmf6X8n6NCSV6JyaXo0yzYCqj6ATzwHP5b-VUUDgmpVEZ7Ao3rR9lFNZtqL3DtXyKmcKA4tNDFi/s72-c/Khwaja+Yunus.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2012/04/0-0.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2012/04/0-0.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content