सर सय्यद अहमद खान ‘हंटर कमिशन’चे सदस्य होते. त्यांच्यासमोर महात्मा फुले यांनी बहुजनांच्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचं शिक्षण द्यावं अशा प्रकारच्या तत्सम मागण्या केल्या होत्या. त्याचवेळी बदरुद्दीन तय्यबजी हे देखील कमिशन पुढे हजर झाले. त्यांची मागणी वेगळी होती.
तय्यबजी व इतर विभुतींनी त्यावेळी मुंबईत अंजुमन इस्लाम नावाची शिक्षण संस्था स्थापन केलेली होती. परंतु त्यांची तक्रार होती की मुस्लिम आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवत नाहीत. ते मध्ययुगीन मानसिकतेत अडकलेले आहेत. त्याना वाटतं की आम्ही शासनकर्ते होतो; त्यामुळे शिक्षण घेऊन आम्ही इंग्रजाचं शिक्षण घेऊन आम्ही ब्रिटिशांची गुलामी करणार नाही.
तय्यबजी ज्यांच्या विषयी तक्रार करत होते ते अभिजन वर्गातील मुस्लिम होते. ते एलिट वर्गातील मुस्लिम मानसिकतेबद्दल हंटर कमिशनकडे तक्रार करत होते.
स्वाभाविक, तोपर्यंत बहुजन मुसलमानांमध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालेलं नव्हतं. अनेक वर्ष अंजुमन इस्लाम वरिष्ठवर्णीय मुस्लिमांच्या मुलांना शिक्षण देत होते..
अपवादात्मक परिस्थितीत निम्नवर्गीय, मागास मुस्लिमांची मुलं शाळेत येत होती. पण त्यांची संख्या नगण्य होती. तय्यबजींनी मागणी केली की शासनाने मुस्लिमांना शिक्षण व्यवस्थेत सामावून घेण्यासाठी तशा प्रकारचं सिलेबस डिझाईन करावं. इंग्रजीसह फारसी, अरबी भाषांना प्राधान्य द्यावं..
थोडक्यात, फुले आणि तय्यबजी दोन वेगवेगळ्या परिस्थितीवर स्वार झालेले पण एकच उद्दिष्ट घेऊन पुढे जात होते.
याउलट सर सय्यद यांनी त्यावेळी अलीगडमध्ये ‘मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज’ची स्थापना करून अभिजन मुस्लिमांसाठी शिक्षणाची दारं खुली केली होती.
वाचा : महात्मा फुले आणि सर सय्यद अहमद खान
वाचा : अलीगड विद्यापीठ : मुस्लिमांच्या ज्ञानकेंद्रावर हल्ला
ब्रिटिशपूर्व मुघल सत्तेत अभिजन मुस्लिम मोठ्या प्रमाणात प्रशासनात होते. परंतु १८५७ नंतर परिस्थिती बदलली. प्रशासनातून मुस्लिमांना हळूहळू बाजूला करण्यात आलं.. सर सय्यद ही स्थिती पूर्ववत करू पाहत होते. त्यासाठी त्यांनी अलीगडमध्ये मदरसा व नंतर कॉलेज सुरू केलं होतं.
सर सय्यद आपला कौटुंबिक वारसा मुघल सत्तेशी जोडत होते.. त्यांचे पूर्वज मुघल राजवटीत पारंपरिक पद्धतीने न्यायनिवाडा करीत होते. पुढे सर सय्यदनी देखील इंग्रजांच्या आमदानीत हेच खानदानी काम पत्करलं.
निवृत्तीनंतर ते मुस्लिमांना प्रशासनात सामावून घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यरत झाले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. अॅग्लो ओरिएंटल कॉलेज त्यातील एक..
थोडक्यात फुले, सर सय्यद आणि तय्यबजी हे शिक्षणाचं एकच उदात्त ध्येय घेऊन पुढे आले होते..
फुलेंनी बहुजनामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती केली. तय्यबजीप्रणित शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडून मुस्लिमांनी राष्ट्रीय चळवळीत सहभाग घेतला व कालांतराने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
याउलट सर सय्यद यांचं कॉलेज (नंतर विद्यापीठ) मुस्लिमांनी राष्ट्रीय चळवळीपासून अंतर राखून राहावं अशा प्रकारचा प्रचार राबवत होते. शिक्षण घ्यावं व प्रशासनात जाऊन इंग्रजाची नोकरी पत्करावी, हे त्याचं धोरण होतं. त्यासाठी शिक्षण घेण्याची ऐपत असलेल्या मुलांना त्यांनी शिक्षण दिलं.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कित्येक दशकं त्यांच्या विद्यापीठात वरिष्ठ वर्णीय, पांढरपेशा, नौकरदार अभिजन मुस्लिमांची मुलं शिकत होती.
आजही केंद्रीय प्रवेश पद्धती, भरमसाठ फीस इत्यादी कारणामुळे मध्यमवर्गीय गरीब मुस्लिम तिथं फिरकत नाही.. उत्तर प्रदेश राज्यातील मध्यमवर्गीय मुस्लिम देखील तिथं जाऊ शकत नाही.
सर सय्यद यांनी आपल्या हयातीत काँग्रेसला हिंदूंची संघटना म्हणत मुसलमानांनी त्यापासून लांब राहावं असा सल्ला दिला होता. इतकंच नाही तर त्यांनी मुस्लिमांनी काँग्रेस जॉईन करू नये यासाठी अनेक उपक्रम राबवले.
या विषयाला घेऊन तय्यबजी आणि सर सय्यद यांच्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष झालेला आहे. तय्यबजी यांनी पत्र लिहून सर सय्यद यांना अनेकदा सुनावलेलं आहे. दोघांचा हा पत्रव्यवहार वाचनीय आहे.
वाचा : मौलाना आजाद : भारतरत्न नाकारणारा अवलियावाचा : डावी चळवळ आणि दुर्लक्षित मुस्लिम
तय्यबजी व त्यांचे बंधू काँग्रेसचे संस्थापक-सदस्य होते. तिसऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. सर्वसामान्य मुस्लिमांनी काँग्रेसशी जोडून घ्यावं व ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाविरोधात मोठ्या जनचळवळीचा भाग व्हावं यासाठी मुस्लिमांना समाजकारण व राजकारणाशी जोडू पाहत होते. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष वेगवेगळे अभियान राबवून असंख्य मुस्लिमांना राष्ट्रीय सभेशी म्हणजेच काँग्रेसशी जोडून घेतलं होतं.
सर सय्यद बॅरिस्टर होते. ते व बदरुद्दीन तय्यबजी दोघेही ब्रिटिश सरकारच्या न्यायनिवाडा विभागात नोकरी करत होते. तय्यबजी तर मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. तरीदेखील त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राजकीय भूमिका घेऊन मोठी जनचळवळ राबवली. उघडपणे राष्ट्रीय सभेचं काम केलं. काँग्रेसला सर्वसामान्यांची संघटना करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले.
त्यासाठी अनेकदा त्यांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष देखील करावा लागला.
काँग्रेस आणि मुस्लिम हे समीकरण सर सय्यद यांना पटत नव्हतं. कारण तोपर्यंत इंग्रजांना कळून चुकलं होतं की आपण स्थापन केलेली संघटना आपल्या नियंत्रण कक्षाबाहेर गेली आहे आणि भारतीयांच्या राजकीय मागण्या कायदेशीर पद्धतीने लावून धरत आहे. त्यामुळे सरकारला काँग्रेसकडून नुकसान सोसावं लागत होतं. (पुढे या संघर्षाला थोपवण्यासाठी ब्रिटिशांनी मुस्लिम लीग व हिंदू महासभा स्थापन केली.)
सर सय्यद ही परिस्थिती जाणून होते. ते ब्रिटिश सरकारचे सेवक होते. पण त्यांची निष्ठा ब्रिटिशांच्या सत्तेशी होती. सरकारविरोधात कुठल्याही उपक्रमामध्ये मुसलमानांनी भाग घेऊ नये अशा मताचे ते होते.. मुस्लिमांनी शिक्षण घ्यावं व इंग्रजी सत्तेत नोकऱ्या धराव्या असा उपक्रम त्यांनी राबवला..
तय्यबजी सर सय्यद यांच्या लिखाणाचे चाहते होते. अलीगड चळवळीविषयी त्यांना आस्था होती. राजकारणातील ज्येष्ठ म्हणून त्यांचा आदर करत होते. परंतु काँग्रेसशी फटकून वागण्याची भूमिका त्यांना पटत नव्हती.
सर सय्यद व फुले समाजसुधारक होते. दोघांनीही भारतीय समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. रूढीग्रस्तता आणि मागासलेपणावर मात करण्यासाठी शिक्षणाला सर्वांत प्रभावी शस्त्र मानलं. सर सय्यदनी धर्माच्या नावे घुसखोरी केलेल्या अतिरेकाला सक्त विरोध केला. सामाजिक रुढी विरोधातील प्रचारासाठी ‘तहजी़ब-उल-अखलाक’ नावाचं नियतकालिक काढलं. फुलेंनी सामाजिक सुधारणासाठी देखील लेखन, प्रकाशन, प्रचारात मोठी आघाडी गाठली.
सर सय्यद यांनी १८५७च्या उठावाचा विरोध केला होता. फुलेंनी देखील या उठावाचा धिक्कार करत ब्रिटिश सरकारची बाजू घेतली होती. या दोन्ही बाबतीत सर सय्यद व फुले एकाच रथाचे सारथी आहेत. सर सय्यदना या उठावाची मोठी झळ बसली होती. तर फुलेंनाही चौकशी समितीला सामोरं जावं लागलं होतं.
दोघांनी शिक्षण संस्था उभ्या करून भारतीयांसाठी आधुनिक शिक्षणाची दारं खुली केली. फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य, गरीब, शेतकरी बहुजनात ज्या प्रकारची क्रांती केली ती सर सय्यद घडवू शकले नाहीत.. कारण सर सय्यद यांच्या शैक्षणिक भूमिकेत उदात्तपणा नव्हता.
त्यामुळेच अलीगड चळवळ एलिट वर्गापर्यंत मर्यादित राहिली. आज २०० वर्षानंतरही त्याचा लाभधारक हा एलिट, श्रीमंत, धनाड्य वर्गच आहे. अलीगडने एलिट वारसा यथोचितपणे चालू ठेवला आहे.
दुसरीकडे अंजुमन इस्लाममध्ये गरीब, मध्यमवर्गीयांना शिक्षणाची संधी लाभली. मुलं आणि मुली असा भेद अंजुमनने पाळला नाही. त्यामुळे शैक्षणिक सामाजिक व राजकीय हस्तक्षेप व बदल अंजुमन करू शकली.
सर सय्यद यांनी एक उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून परिस्थितीशी समझोता केला होता. शासनाशी मैत्री करून अनेक लाभ पदरात पाडून घेता येईल ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी फुले, आंबेडकरांसारखी अनिच्छेने सरकारशी तडजोड स्वीकारली होती.
वाचा : यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनकवाचा : खिलाफतीच्या बदल्यात गोरक्षण?
उत्तम दर्जाचं इंग्रजी शिक्षण मिळावं यासाठी सर सय्यदनी युरोपमधून अनेक प्राध्यापक अलीगडमध्ये बोलावून घेतले होते. राज्यकारभाराची भाषा इंग्रजी असेल त्याकरिता समाजाला इंग्रजी येणं गरजेचं आहे, असा त्यांचा आग्रह होता..
त्यांनी अरबी, उर्दू, फारसीला तेवढं महत्त्व दिलं नाही.. परिणामी समाजाने त्यांना अधर्मी घोषित करून मुसलमानांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा देऊ पाहणारा एक सरफिरा मौलवी म्हटलं होतं... परंतु सर सय्यद आपला उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून कार्यरत राहिले..
सर सय्यद यांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत गेली.. परंतु सर सय्यद यांनी स्वीकारलेली तडजोड त्यांच्या निधनानंतर अलीगड कॉलेजचा अलिखित कायदा ठरून गेली..
युरोपियन प्राध्यापकांनी अलीगड कॉलेजमधून ब्रिटिशविरोधी चळवळ उभी राहू नये, यासाठी यथोचित प्रयत्न केले. पण शिक्षण घेऊन शहाणी झालेली एक पिढी मात्र विद्रोह करून उठली. तिने राष्ट्रीय चळवळीशी धुरा हाती घेऊन विद्यापीठ, व्यवस्थापन आणि इंग्रज सत्तेविरोधात बंड केले.
अलीगड विद्यापीठातच वेगळं राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं. हे विद्यापीठ नंतर ‘जामिया इस्लामिया’ म्हणून नावारूपाला आलं.. मुहंमद अली, ज़ाकीर हुसैन आणि महात्मा गांधी या चळवळीचे कर्ते होते..
जामिया मधून राष्ट्रीय चळवळीची एक मोठा विचारप्रवाह जन्मास आला.. या चळवळीने राष्ट्रीय सभेला केवळ बळच दिलं नाही तर मोठी लीडरशिपही दिली.
सर सय्यद आपल्या उत्तरार्धात ब्रिटिश सत्तेच्या अधीन गेले. कालांतराने त्यांना आपली चूक समजली. परंतु पिढी शिक्षित करण्याचा उदात्त दृष्टिकोन ते साध्य करू शकले. त्यामुळे काहीअंशी त्यांना समाधान लाभलं. काळ बदलला तसा ब्रिटिश साम्राज्यसत्तेचा अस्तासाठी याच अलीगड चळवळीने मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित मनुष्यबळ दिलं.
आज अलीगड़ चळवळीचे प्रणेते सर सय्यद यांचा जन्मदिवस... देशभरात तो ‘सर सय्यद डे’ म्हणून साजरा केला जातो.
त्यांना अभिवादन
कलीम अज़ीम, पुणे
१७ ऑक्टोबर २०२६
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
“जर्द पत्तो का बंद जो मेरा देश हैं, दर्द की अंजूमन जो मेरा देश हैं” गीतकार गुलजार यांच्या या ओळी ‘अब्दुल वाहिद शेख’ यांच्या आयुष्याला कलाट...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com
