मुस्लिमांच्या ज्ञानकेंद्रावर हल्ला

गेल्या ७० वर्षांत अलीगड मुस्लिम विद्यापीठ अनेकदा लक्ष्य करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यानंतर वारंवार अलीगडकडे बोटं उगारण्यात आली. कधी प्रतिगाम्यांनी तर कधी कथित सुधारणावाद्यांनी अलीगडला मुस्लिमांच्या शत्रुकरणासाठी वापरलं. भाजपच्या सत्ताकाळात तर कुठल्याही शैक्षाणिक संस्था त्याच्या कथित राष्ट्रवादाच्या प्रयोगशाळेतून सुटल्या नाहीत. अलीगडही लक्ष्य झालं. या विद्यापीठावरील हल्ला हा मुस्लिमांच्या सांस्कृतिक वारसा आणि ज्ञानकेंद्रावर आघात आहे. मुस्लिमांच्या ऐतिहासिक आदर्श प्रतीकांना नष्ट करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून या घटनेकडे पाहावं लागेल. इतका मोठा हल्ला घडूनही मुस्लिम समाजातून कुठलीच प्रतिक्रीया न येणे म्हणजे सर सय्यद यांच्या विचारांशी बेईमानी आहे. समाजाच्या शैक्षाणिक प्रगतीबद्दल लाँग टर्म विचार करणारे सर सय्यद आज जर जिवंत असते तर समाजाची ही अवनती पाहून त्यांनी आपल्या प्रयत्नावर नक्कीच पुनर्विचार केला असता. हल्ल्याच्या चार दिवसानंतरही या घटनेचा निषेध विद्यापीठाच्या गेटबाहेर पडू शकला नाही, यापेक्षा मोठं दुर्देव अजून काय असू शकतं. सर सय्यद यांनी १०० वर्षांपूर्वी समाजाच्या कर्म दरिद्र्यतेची चिंता करून आधुनिक शिक्षण प्रणालीची पायाभरणी केली. अशा महान अवलीयाच्या स्वप्नांचा चुराडा होत असताना समाजाने अनभिज्ञ राहावं ही कुचेष्ठा नव्हे तर काय आहे.
इस्लामने दिलेली इल्मची परंपरा झिडकारत इहलोकी गप्पांत व्यग्र असलेल्या मुस्लिम समाजाला आधुनिक शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड चळवळ राबवली. यातून मुस्लिम समाजाला इंग्रजी शिक्षण परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न त्यांनी अठराव्या शतकात केला. त्यांनी घरोघरी जाऊन मॉडर्न एज्युकेशनचं मूल्य लोकांना समजून सांगितलं. लोकवर्गणीतून एक-एक पैसा जमा करत त्यांनी १८७५ मध्ये अलीगडमध्ये एक शाळा स्थापन केली. दोन वर्षांनंतर ही शाळा मोहम्मेडन अँग्लो ओरियंटल कॉलेज झाली. तब्बल ४० वर्षांनंतर कॉलेजचे अलीगड मुस्लिम विद्यापीठात रुपांतर झालं. अनेक उच्चविद्याभूषित स्कॉलर, राजकीय नेते, डिप्लोमॅट, आयएएस, कुलगुरू, केंद्रीय मंत्री, पद्मभूषण, भारतरत्न या विद्यापीठाने देशाला दिलेले आहेत. एका अर्थाने मुस्लिम समाजात ज्ञानपरंपरा विकसित करण्याचं महत्त्वाचं काम या विद्यापीठाने केलेलं आहे. असं असतानाही भारताचा मानबिंदू असलेला हा शैक्षाणिक वारसा जतन करण्याची तसदी मुस्लिम समाज घेताना दिसत नाही. मुस्लिमच काय तर भारतातील अन्य कुणालाही या विद्यापीठाबद्दल काहीच आत्मियता न वाटणे दुर्दैव आहे.  
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अलीगड विद्यापीठाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलीगडसोबत दारूल उलूम देवबंदनेदेखील ब्रिटिश सरकारविरोधात बंड केले. याआधी १८५७च्या उठावात अनेक मुस्लिम उलेमांनी इंग्रज सरकारविरोधात विद्रोह केला. उत्तर प्रदेशच्या तब्बल ५६ जिल्ह्यात उलेमा ब्रिटिशविरोधात उभे राहिले. हिंदूंनीदेखील मुघलांची सत्ता मान्य करून बहादूरशाह जफर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशविरोधात लढा दिला.
वाचा : 'राज'कीय पश्चातापाचे अटळ भविष्य! 
पहिल्या स्वातंत्र्याच्या उठावासाठी हिंदु आणि मुस्लिमांनी प्रथमच एकत्र येत लढा दिला. इंग्रजविरोधात विद्रोहाच्या निमित्ताने मतभेद विसरून मोठ्या संख्येने हिंदु-मुस्लिम एकत्र आले होते. या एकत्रीकरणाला ब्रिटिशांनी सत्तापालटाचा धोका म्हणून बघितलं. त्याचे परिणाम फार मोठ्या प्रमाणात भारतीयांवर पडले. तत्पूर्वी ब्रिटिशांनी हा बंड मोडून काढला. उठावात सहभागी झालेल्या बंडखोरांना मोठ्या संख्येने ठार मारण्यात आले. बहुतेक बंडखोर मुस्लिम होते. मृत्यूच्या आकड्यासंदर्भात अभ्यासकांकडे वेगेवगळी आकडेवारी असली तरी एकट्या दिल्लीत २७ हजार मुस्लिमांना फासावर लटकवण्यात आलं होतं. कानपूर, अवध सारख्या जिल्ह्यात ३० हजार उलेमा आणि मदरशांतील विद्यार्थ्यांना ठार करण्यात आलं. १८५७चा उठाव ब्रिटिशांच्या जिव्हारी लागला होता. ब्रिटिशविरोधात हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन केलेलं हे बंड इंग्रजांच्या पचनी पडलं नाही. यानंतर इंग्रजांनी फोडा व राज्य करा ही नीती अवलंबवली.
मुस्लिमांचे शत्रुकरण झाल्यशिवाय हे शक्य होणार नव्हते. मुसलमांनाच्या विरोधात बहुसंख्य हिंदूंना उभे कऱण्यचं षडय़ंत्र आखले गेले. १८५७च्या निमित्ताने हिंदु-मुस्लिमांचे झालेलं एकत्रिकरण इग्रजांच्या दृष्टिने घातक होतं. त्यामुले ते मोडून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी मध्ययुगीन इतिहासाला आधार केला गेला. ब्रिटिशांनी मुस्लिमांचा वस्तुनिष्ठ इतिहास नष्ट करून त्याजागी रक्तपाताचा व युद्धाचा इतिहास रचला. अशा प्रकारे मुस्लिमांचा इतिहास विकृत करण्याची मोहीम सुरू केली. ब्रिटिश इतिहासकार जेम्स मील, इलियट आणि डाऊसन या प्राध्यापकांना हाताशी धरून इंग्रजांनी मुस्लिमांचा इतिहास राक्षसी केला.
वाचा : एमआयएम-वंचित युती अन् पुरोगामित्व
मूळ फारसी कागदपत्रांचा सोयीचे भाषांतर करून इलियट आणि डाऊसन या प्राध्यापक द्वयींनी इंडियन हिस्टरी टोल्ड बाय ओन हिस्टीरीयन नावाचे १० खंड लिहले. विषेश म्हणजे हे ग्रंथ ब्रिटनमध्ये बसून लिहिण्यात आले. सदर ब्रिटिश लेखकांनी मूळ कागदपत्रांचा गैरअर्थ काढत चुकीचा अनुवाद केला. अनेक अभ्यासकांच्या मते सोयीचा व अर्धवट इतिहास त्यांनी रचला होता. अशा पद्धतीने ब्रिटिशांनी नियोजितपणे मुस्लिमांचा इतिहास विकृत पद्धतीने तयार करून जगापुढे मांडला. याच इतिहास लेखनामुळे भारतीय समाजात हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष सुरू झाला. इतिहास विकृतीकरणाची ही बाब सर सय्यद अहमद खान यांच्या लक्षात वेळीच आली, त्यानंतर त्यांनी वस्तुनिष्ठ इतिहास लेखनाची चळवळ सुरु केली.
सर सय्यद यांनी मूळ कागदपत्रे शोधून मुस्लिमांचा वस्तुनिष्ठ इतिहास जतन करण्याचे काम सुरू केलं. त्यांनी भारतात प्रथमच वस्तुनिष्ठ भारतीय इतिहास लेखनाची परंपरा सुरू केली. सर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली उर्दूइंग्रजीत अनेक फारसी ग्रंथाच्या अनुवादाचे काम सुरू झालं. सर सय्यद स्वतही एक उत्तम अनुवादक होते. ते अनुवादात अडकले नाहीत तर त्यांनी १८५७च्या उठावाची नेमकी कारणे शोधून त्यावर एक विस्तृत अहवाल तयार केला. हा अहवाल ब्रिटिश सरकारकडे सबमिट केला. उठावाची कारणे नमूद करताना, बेरोजगारी, स्थलांतर, शिक्षणाचा अभाव, उद्योगात आलेली निराशा आदी मुद्दे अधोरेकित करून उठावाचं खरं कारण त्यात नमूद केलं. नंतरच्या काळात या अहवालाचा एक ग्रथही तयार झाला.
सर सय्यद यांना इंग्रजीउर्दूअरबी आणि फारशी भाषा चांगल्या पद्धतीने अवगत होत्या. एएमयू विद्यापीठाच्या स्थापनेनंतर इतिहासाची मूळ संदर्भ साधने एकत्रित करून त्यांनी ती विद्यापीठात संरक्षीत केली. याच एका क्षमतेवर अलीगड विद्यापीठ अनुवादाचं महत्त्वाचं केंद्र बनलं.
सर सय्यद यांच्या प्रयत्नामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इतिहासाची अनुवाद पंरपरा अलीगडमध्ये सुरू झाली होती. या मोहिमेतून जगभरातून अनेक महत्त्वाची पर्शियन कागदपत्रे मिळवून त्यांनी संरक्षीत केली. मुहंमद हबीबइब्राहिम कूंजूएम अहतरअलीसय्यद अतहर अब्बास रिजवीएजाज हुसेनमुन्शी जकाऊल्लाह सारख्या नामवंत मंडळीकडून सर सय्यदनी मुस्लिमांचा इतिहास पुस्तकरुपात जतन करून घेतला.
मुन्शी जकाऊल्लाह यांच्या मार्फत लाखो पर्शियन कागदपत्रे अनुवादीत करून घेतली. मुन्शी जकाऊल्लाह यांच्या नावे १ लाख ५८ हजार पाने लिहिलेली आहेत. त्यांनी तब्बल १६१ पुस्तकातून इतिहाससमाजशास्त्रभूगोलविज्ञान इत्यादी विषयावर भाष्य केलेलं आहेत. आजही अनेक दर्जेदार पुस्तके अलीगड विद्यापीठात आहेत. सर सय्यद यांनी आपल्या हयातीत भारतीय मुस्लिमांचा एकूण इतिहास संरक्षीत केला होता.
आजही अकॅडमीक वस्तुनिष्ठ इतिहास लेखनात अलीगड विद्यापीठ अग्रणी मानलं जातं. समाजशास्त्रमानववंशशास्त्र आणि राजकारणावर मुस्लिमकेंद्री संशोधन करणारी संस्था म्हणून अलीगडचं नावं घेतलं जातं. आज इरफान हबीब  आणि शिरीन मुसवीसारखे जागतिक किर्तीचे इतिहासतज्ज्ञ अलीगडमध्ये ही पंरपरा चालवत आहेत. इरफान हबीब मध्ययुगीन भारतीय इतिहासाचे चालते-बोलते संदर्भकोश मानले जातात. ज्ञानाचा इतका मोठा साठा एकट्य़ा अलीगड विद्यापीठात सामावलेला आहे. मुस्लिमांची आदर्श प्रतीके नष्ट करायला निघालेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची खरी मेख या विद्यापीठात अडकली आहे. त्यातून वेळोवेळी अलीगडला लक्ष करण्यात आलं आहे.
वास्तविक पाहता, मुस्लिमांची ही ज्ञानसाधना नष्ट करण्याचा डाव धर्मवादी संघटनांकडून आखला जात आहे. बॅ. जिना तर नुसते प्यादे म्हणून वापरलेले आहेत. खरा डाव तर विद्यापीठातील इतिहासाची साधने नष्ट करण्याचा होता. हा अमूल्य ठेवा जतन करणाऱ्या हिदुत्ववादी शक्तींनी इरफान हबीब यांना वारंवार धमक्या दिल्या आहेत.
अलीगड विद्यापीठाच्या स्वायत्ततेला यापूर्वी अनेकदा हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला आहे. राम जन्मभूमी आंदोलनानंतर काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाची लाईन स्वीकारली. याचा मोठा फटका अलीगड विद्यापीठाला बसला. मुस्लिम अनुनयाचा आरोप झटकून लावण्यासाठी काँग्रेसने हिंदुत्तवाद्याच्या दबावापोटी अलीगड विद्यापीठ कायदा संमत केला. या कायद्याआड विद्यापीठाला शासनाच्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न झाला. गेल्या कित्येक वर्षांपासून अलीगड विद्यापीठाला संघ-परिवार हिदुत्वाची प्रयोगशाळा बनवू पाहतो आहे. बॅ. जिना यांच्या फोटोवरून अलीगड विद्यापीठाचा वाद उत्पन्न करणे हा त्याचाच एक भाग आहे.
इतिहास विकृतीकरणाची संघ-भाजपच्या मोहीमेने आता टोकाचं स्वरुप धारण केलं आहे. पुस्तकांच्या पानात ढवळाढवळ करून इतिहास बदलणेही खेळी आता जूनी झाली आहे. बदलत्या काळात आता थेट इतिहासाचे मूळ संदर्भ नष्ट करण्यापर्यत या धर्मवादी शक्तीची मजल गेली आहे.
संशोधनाच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ ऐतिहासिक ठेवा जतन करणाऱ्या शिक्षणसंस्थाना लक्ष्य करण्याचं धोरण आखलं जात आहे. राष्ट्रवादाचं भूत उभं करून ही खेळी खेळणे त्यांना सोपं जातं. या कुटिल डावाआड आपला सुप्त अजेंडा रेटून इतिहासाची साधने नष्ट करण्याचा मूळ उद्देश पूर्ण करणे सुरू आहे. यावर लक्ष जाऊ नये यासाठी नॉन इश्शूजना राष्ट्रवादाचा मुद्दा बनवून त्याचे राजकीय ढोल बडविणे सुरु आहे. या राष्ट्रभक्तीच्या भूताने आता नामांकित शिक्षण संस्थाकडे मार्गक्रमण केलं आहे. जेएनयूहैदराबाद केंद्रीय विद्यापीठजाधवपूर यूनिव्हर्सिटीदयाल सिंह कॉलेजएफटीआयआयटीआयएसएसरामजस कॉलेजफर्ग्युसन कॉलेजमुंबई विद्यापीठ इत्यादी शिक्षण संस्थामध्ये आपली धर्मांध विचारधारापोसण्याचा आटापिटा सरकारभक्तांकडून सुरू आहे. एक अर्थाने शैक्षाणिक संस्थांना हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनविण्याचे धोरण भाजपभक्त राबवित आहेत.
शैक्षाणिक संस्थामधील मूळ इतिहासची साधनेसंशोधन नष्ट करण्याच्या प्रक्रियेतून विद्यापीठांवर हल्ले केले जात आहे. दोन महिन्यापूर्वी रामनवमी उत्सवाच्या निमिताने बिहारपश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये दंगली घडविण्यात आल्या. या काळात मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करून त्यांची विटंबना करण्यात आली. दंगलीचं निमित्त करून पाटणा शहरातील बहूचर्चीत खुदाबक्ष ग्रंथालयावर हल्ला झाला. खुदाबक्ष लायब्ररीत इतिहासाचे असंख्य साधने संग्रहित केलेली आहेत. धर्मवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात खुदाबक्ष लायब्ररीतील अनेक दुर्मिळ ग्रंथाचे नुकसान झालं.
प्रसारमाध्यमाच्या बातम्यानुसार या हल्ल्यात अनेक दूर्मिळ पुस्तके जाळून टाकण्यात आली. ही घटना ताजी असताना बॅ. जिनाचे भूत तयार करून अलीगडच्या भव्य ग्रंथागाराला लक्ष्य करण्याचा डाव आखण्यात आला. गेल्याच आठवड्यात अलीगड मुस्लिम विद्यापीठात संघाची शाखा लावण्याची मागणी कुलगुरुंकडे करण्यात आली होती. ही मागणी धुडकावून लावताच मोहम्मद अली जिना यांचा नावाचा वापर करून विद्यापीठाला लक्ष्य करण्यात आलं आहे. 
भारतीय मुस्लिम समाजातील इतिहासातील स्थान नष्ट करायचा डाव धर्मवादी आखत आहेत. हा इतिहासाचा अमूल्य ठेवा जतन करण्याची जबाबदारी भारताच्या सर्व विवेकवादी नागरिकांची आहे. मध्ययुगीन इतिहासाचा वापर करुन गेला कित्येक दशकं ही मोहीम राबवणं सुरू आहे. आत्ता स्वातंत्र्य लढ्यातील आदर्श प्रतीकं पुसून टाकण्याची मोहीम सुरू आहे.
ब्रिटिशांचं लांगुनचालन करून महत्वाची पदे बळकावणाऱ्या धर्मवादी गटांचा स्वातंत्र्य लढ्यात काडीचाही सहभाग नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादाच्या भंपक काठ्या घेऊन ते इतिहास विकृत करायला निघाले आहेत. यातून काँग्रेसला बदनामी मोहीम सुरू आहे. सांस्कृतिक वारसाज्ञानसाधनेची केंद्रे संपवून धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून आपलं स्थान बळकट करत आहेत. येणाऱ्या काळात 'आम्ही स्वातंत्र्य सैनिक होतोअसा इतिहास आपणास वाचयलाव मिळू शकतोत्यामुळे सजग होऊन ही कुरघोडी समजून घेण्याची गरज आहे. 

कलीम अजीमपुणे
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मुस्लिमांच्या ज्ञानकेंद्रावर हल्ला
मुस्लिमांच्या ज्ञानकेंद्रावर हल्ला
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEio8Z1CZvRyEgUfIJlSWp644ZEKBtWB-1CPR53kD75qFGLDs-erVCPgQpr6BvSRLxhyphenhyphenIiUxlxDVy9nvtRauQ7UE8J9ioNw5xaf-oz60t7UIIvE9O7tAFUzf2MJEtHWOeL_GSAFN6jsyog5U/s640/Aligarh-Muslim-University-Jinnah-PTI5_3_2018_000172B.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEio8Z1CZvRyEgUfIJlSWp644ZEKBtWB-1CPR53kD75qFGLDs-erVCPgQpr6BvSRLxhyphenhyphenIiUxlxDVy9nvtRauQ7UE8J9ioNw5xaf-oz60t7UIIvE9O7tAFUzf2MJEtHWOeL_GSAFN6jsyog5U/s72-c/Aligarh-Muslim-University-Jinnah-PTI5_3_2018_000172B.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/05/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/05/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content