जुमा प्रवचन : ज्ञानाची किल्ली


शु
क्रवारी, ८ मे रोजी जुमाच्या सामूहिक नमाज़पूर्वी मस्जिदमध्ये मौलवींनी केलेलं प्रवचन मला आधीच्या मांडणीपेक्षा प्रभावी वाटलं. यावेळी त्यांनी भारतीय मुसलमानांतील पंथीय भेदाभेदावर कोरडे ओढत ज्ञानार्जन, श्रम व आर्थिक समृद्धीचं महत्त्व पटवून दिलं.


मस्जिदमध्ये दाखल झालो, त्यावेळी १ वाजून २० मिनिटं झाली होती. आत शिरताच मौलवी प्रत्यक्ष व्यवहार व धार्मिक नितीतत्वे यांवर उपस्थितांची कानउघाडणी करतानाचे शब्द कानी पडले.

मुख्य नमाज़पूर्वीची औपचारिक नमाज़ अदा करून मी प्रवचन ऐकायला गर्भगृहात दाखल झालो. त्यावेळी मौलाना मुसलमानांतील पथीय भेदाभेदावर भाष्य करत होते. १:३६ला प्रवचनाचं समारोप करताना त्यांनी ज्ञानर्जनाचं महत्त्व पटवून दिलं. शेवटची १० मिनिटं शांतपणे त्यांचं प्रवचन ऐकता आलं.

माझे कान नेहमीप्रमाणे बारकाईने मौलवींचे शब्द टिपत होते. थोड्याच वेळात वाटलं, मोबाईल आणला असता तर रेकॉर्ड करता आलं असतं. प्रचवन संपेपर्यंत दोन-तीनदा हे शल्य मनाशी छळत राहिलं. भर दुपारी ४० डिग्री तापमानाशी संघर्ष करत उपस्थित नमाज़ी कान देऊन ऐकत होते.



मुफ्ती साहेब मुसलमानांतील पंथसंप्रदायी प्रवृत्ती व भेदनितीवर तुटून पडले. म्हणाले, शिया आणि सुन्नी हा भेद किती दिवस पाळायचा. मानव म्हणून आपण एकमेकांकडे का पाहत नाहीत? शिया-सुन्नी किंवा इतर पंथासंदर्भात वाद उपस्थित केल्यावर तुमची विभागणी स्वाभाविक आहे. शत्रूपक्ष तुम्हाला शिया-सुन्नी म्हणून नव्हे तर ‘मुस्लिम’ म्हणूनच ओळखतो. कठिणप्रसंगी हल्लेखोर तुम्हाला शिया किंवा सुन्नी म्हणून नव्हे तर तो मुस्लिम म्हणूनच लक्ष्य करतील.

वर्तमान स्थितीत भाषा, प्रांत इत्यादी अनेक भेद असताना आपण पुन्हा पंथीय भेद का कवटाळत आहोत? इस तरह के फिसादों से कुछ भी हासील नहीं होने वाला है. आता यातून बाहर पडलं पाहिजे.

त्यांनी या संदर्भात इराण-अमेरिका-इस्रायल युद्धकाळात देखील भाष्य केलं होतं. युद्ध प्रासंगिक असल्याने राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक गरज म्हणून त्यांनी हे भाष्य असावं म्हणून मी स्वाभाविक दुर्लक्ष केलं. त्याहीवेळी त्यांनी केलेली मांडणी खूपच प्रभावी व उद्बोधक होती.‌

त्यात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या मुस्लिमांच्या पंथभेदावर त्यांनी तीव्र भाषेत प्रहार केले होते. शियापंथीय हे भाऊबंद आहेत. तात्विक संदर्भात त्यांच्यावर वाद घालत बसू नये. अल्लाह त्याचा निवाडा करेल. तुम्ही का वाद घालता? ही एकत्र येण्याची वेळ आहे, असं ते म्हणाले होते. या प्रवचनातही त्यांनी अशाच पद्धतीने चिंतनीय भाष्य केलं.

म्हणाले, मुस्लिमांनी पंथीय भेद विसरून भातृभाव जन्मास घातला पाहिजे. वर्तमान राजकारण तुम्हाला केवळ मुस्लिम म्हणूनच ओळखतो. विखार पसरवणाऱ्याकडून मुस्लिम म्हणूनच तुम्हाला लक्ष्य केलं जात आहे. तिथं कुठलाही जातीय किंवा पंथीय भेद नाही. अशावेळी पंथीय भेदाभेद विसरून आपसात एकात्म होण्याची गरज आहे. आपस में मुत्तहिद होने की जरुरत हैं. बेदार होने की जरुरत है. नफरत फैलाने वालों को पहचानने की जरुरत है. आपसात सेन्हभाव जपा. माणूस म्हणून, इमानधारक म्हणून पंथीय भेद पाळू नका. खुल्या मनाने सर्वांचा स्वीकार करा.

पुढच्या मांडणीत त्यांनी आणखीन दोन मुद्द्यावर विस्ताराने भाष्य केलं. त्यातील पहिला मुद्दा शिक्षणासंदर्भातील होता. उपस्थितांना उपदेश करत त्यांनी म्हटलं, आपल्या पाल्यांना आधुनिक शिक्षण द्या. मेडिकल, इंजीनियरिंग, विधीशास्त्रात त्यांचा प्रवेश घ्या. त्यांना आधुनिक ज्ञानशाखेत पारंगत करा, इतरही शाखा महत्वाच्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करू नका.



देशाला व समाजाला ज्ञानवंताची गरज आहे. अशा स्थितीत ज्ञान घेण्याऐवजी निष्काम राहणं, तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन त्यात गुरफटून राहिल्यास नुकसान तुमचंच आहे. आजची पिढी रात्रंदिवस मोबाईलमध्ये नसत्या कामात लागलेली आहे. मोबाईलमधून पाहिलं जाणाऱ्या कंटेटचा अंतिम निष्कर्ष हा वाममार्ग आहे. तुम्हा पाहत आहात, मोबाईलच्या दुष्प्रवृत्तीमुळे दररोज कितीतरी गुन्हे घडत आहेत. तरुण पिढीला यांपासून वाचवा. त्यांना शिक्षण द्या. त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांना उत्तम संस्कार द्या.

आज समाजात वकील आणि डॉक्टरांची प्रचंड गरज आहे. समाजाला अनेक प्रकरणात वकिलांची गरज भासते. तसंच द्वेषमूलक गुन्ह्यामध्ये इतर धर्मीय सांप्रदायिक वकील मुसलमानांचे खटले हाती घेत नाहीत. अशावेळी मुसलमानांनी स्वतः ते ज्ञान अर्जित केलं पाहिजे. समाजाची व देशाची गरज ओळखून समाजाने विधीक्षेत्रात अग्रेसर भूमिका बजावली पाहिजे. नफरती गुनाहों मे भी वकला लगते हैं. हमें माहीर वकला को तैयार करने की जरुरत हैं.

डॉक्टर की तो बहुत जरुरत हैं. हमारी ख़वातीन तरह-तरह के बिमारीयों में मुबतेला है. ते इतर धर्मीय डॉक्टरांकडे जाऊन मुक्तपणे आजाराविषयी बोलू शकत नाहीत. त्यामुळे आजार बळावतात. जननी सुरक्षेसाठी तर समाजाकडे डॉक्टरांची नितांत गरज आहे. त्यामुळे आपल्या मुलींना मेडिकल व नर्सिंग क्षेत्रात पाठवा.

ज्ञानासोबत मौलवींनी अर्थार्जनाचं महत्त्वही पटवून दिलं. अर्थाजन न करता केवळ आर्थिक अडचणीत अल्लाहच्या भरवशावर बसून राहणं बरोबर नाही. जोपर्यंत शरीरात जोम आहे, मनगटात ताकत आहे तोपर्यंत जास्तीतजास्त श्रम केलं पाहिजे. त्या श्रमातून अधिकाधिक अर्थाजन केलं पाहिजे. पैसा कमविला पाहिजे.

केवळ अल्लाहकडे साकडं घातल्याने तुमच्या अडचणी, गरीबी, दारिद्र्य सुटणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती महत्त्वाची असते. अल्लाह कृतीला प्राधान्य देतो. कृती न करता समस्या निवारणासाठी व आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अल्लाहकडे नुसते साकडे घालणं अव्यवहार्य आहे. घरी अल्लाहच्या नावे रडत बसला तर कोणी तुम्हाला पैसा-अडका आणून देणार नाही. ती मिळवणं तुमची जबाबदारी आहे.

याचक होऊ नका, तर अर्थाजन करा. हमेशा देने वालें बानो. लेने वाले मत बनो. लेने वाले बनने से आपकी जरूरतें पूरी नहीं होगी, बल्कि वह दिनों दिन बढ़ती ही जाएगी. इस देश को समाज को देनेवाले बनो. मागत राहिल्याने तुमची निष्क्रियता वाढेल. अल्लाहने तारुण्य अर्थार्जन करण्यासाठी आणि कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी दिलं आहे. ते नाहक गमावू नका.

मेहनत, कष्ट, शिक्षण आणि ज्ञानातून व्यक्तित्व घडवता येतं. संपत्ती-समृद्धी घडवता येते. समृद्धीच्या किल्ल्या तुमच्या व्यक्तिमत्त्वात आहेत. ते व्यक्तिमत्व श्रम आणि ज्ञानाने घडते. श्रम आणि ज्ञानार्जन न करता नुसते, अल्लाहकडे मदतीची याचना करणं स्वतःची फसगत करण्यासारखं आहे.



मौलवींनी इथं एक मौलिक उदाहरण दिलं. म्हणाले, बाजारात गाडी उभी करताना आपण त्याची किल्ली काढून घेतो. किल्ली तशीच ठेवून अल्लाहच्या विश्वासावर राहत नाही की अल्लाह माझ्या गाडीची काळजी घेईन. तसंच ज्ञान व समृद्धी तुमच्या किल्ल्या आहेत. त्या जपून ठेवल्या पाहिजे. त्याची राखण न करता नुसतं अल्लाहच्या विश्वासावर बसणं चुकीचं आहे.

श्रमज्ञानातून मिळवलेल्या समृद्धीच्या किल्ल्यात जपल्या पाहिजेत. ज्ञान व समृद्धी ही यशाची किल्ली आहे. ती किल्ली सुरक्षित न ठेवता अल्लाहकडे नुसती निर्रथक याचना करत राहणं मूर्खपणाचं आहे, असं सांगत त्यांनी समारोप केला.

भिवंडीची ही मस्जिद प्रांत कार्यालय, एसटी स्टँड, महापालिका, सेशन कोर्ट, पोलीस उपायुक्त कार्यालय अशा बहुतांश शासकीय कार्यालयापासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. उपस्थितांमध्ये माझ्यासारखे अनेक आगंतुक होते. बहुतांश नोकरदार व उच्चशिक्षित दिसले.

गेल्या शुक्रवारीही मी याच मस्जिदमध्ये जुमा अदा केली. मग इथून बरोबर अडीच वाजता हज हाऊसकडे रवाना झालो. लोकलच्या प्रवासात जुमा प्रवचनाची एक पोस्ट टाकली होती. रात्री उशीरा पुण्याच्या दिशेने परतलो.

योगायोग. या आठवड्यातही याच मस्जिदमध्ये येऊन बसलो होतो. पण जुमा नमाज़नंतर लिहिण्याची उसंत भेटली नाही. आज लिहितोय. समकाल टिपतोय. कारण हा बदल मला आश्वासक वाटतोय.

पुढच्या शुक्रवारी अजून एका नव्या मस्जिदीच्या शोधात.

मस्जिद : मोमीन मस्जिद

ठिकाण : इस्लामपुरा, भिवंडी

दिनांक : ९ मे २०२६

कलीम अज़ीम, पुणे

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,54,इस्लाम,44,किताब,26,जगभर,132,पत्रव्यवहार,4,राजनीति,310,व्यक्ती,27,संकलन,65,समाज,273,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: जुमा प्रवचन : ज्ञानाची किल्ली
जुमा प्रवचन : ज्ञानाची किल्ली
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAKXQBlD-r4jiDY0Qp0VbxYpyjTPVafMOiGmd2gL7emIs6bPT51ylWtp_XSlo9SYyGv3mQWCB4nS7TJp7vjore0iXEn94lxufjD5b_ZSmmCUnvGmJEmHQptNCYaZfKFNeMAkuzQLsFHNM8LMlFUSlFNzxQ08fipApRUydupxZcM-mo8PvSWmK1euAREZGU/w640-h330/Muslim%20Namaz.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAKXQBlD-r4jiDY0Qp0VbxYpyjTPVafMOiGmd2gL7emIs6bPT51ylWtp_XSlo9SYyGv3mQWCB4nS7TJp7vjore0iXEn94lxufjD5b_ZSmmCUnvGmJEmHQptNCYaZfKFNeMAkuzQLsFHNM8LMlFUSlFNzxQ08fipApRUydupxZcM-mo8PvSWmK1euAREZGU/s72-w640-c-h330/Muslim%20Namaz.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2026/05/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2026/05/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content