
नुकतीच मी पवित्र शहर मक्का इथं माझी तीर्थयात्रा (हज) पूर्ण केली आहे. मक्का पृथ्वीवरील सर्वांत पवित्र शहर मानलं जातं. तिथं हज यात्रेच्या काळात बिगर-मुस्लिमांसाठी प्रवेश पूर्णपणे निषिद्ध आहे. समस्त मुस्लिमांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा प्रसंग म्हणून हजयात्रेकडे पाहिलं जातं. सध्या अरबस्तानबाहेरून इथं २,२६,००० हून अधिक भाविक आलेले आहेत. सर्वांत मोठा जत्था तुर्कीमधून आला. त्यात सुमारे ५०,००० भाविक होते. ते सर्व ६०० हून अधिक वेगवेगळ्या बसेसमधून इथं आलेले आहेत. ही बाब तुर्की इस्लामपासून दूर जात आहे, या पाश्चात्त्य देशांच्या दुष्प्रचाराचं खंडन करते.
मला अमेरिकेतून मक्केला प्रत्यक्ष हज यात्रेसाठी येणाऱ्या केवळ दोन जणांची माहिती आहे. हे दोघेही पश्चिम भारतीय आहेत. त्यांनी नव्यानेच इस्लाम धर्म स्वीकारला आहे. श्री. एलिजाह मुहंमद, त्यांची दोन मुलं आणि काही मित्र हज काळ वगळता मक्केला गेले होते. त्यांची ही यात्रा ‘उमरा’ म्हणून ओळखली जाते. ही एक लहान प्रकारची तीर्थयात्रा असते.
‘उमरा’ यात्रा करणेदेखील मुस्लिम समुहात एक आशीर्वाद मानला जातो. मला शंका वाटते की, कधीही एकाच वेळी १० अमेरिकन नागरिकांनी मक्केला भेट दिली असेल. त्यामुळे माझा ठाम विश्वास आहे की मी प्रत्यक्ष हज करणारा पहिला अमेरिकन वंशाचा निग्रो असू शकतो. अतिशयोक्ती किंवा बढाई मारण्यासाठी मी हे सांगत नाही, तर खरोखरच ही बाब किती अद्भुत आणि अद्वितीय आशीर्वाद आहे, हे दर्शविणे त्याचा उद्देश आहे. किंबहुना मी तुम्हाला बुद्धिप्रामाण्य दृष्टिकोनातून या स्थितीचं यथायोग्य आकलन करण्यासाठी सक्षम करू इच्छितो. जेणेकरून तुम्हाला स्वत:च्या बुद्धिमत्तेचा कस योग्य प्रकारे लावणे शक्य होईल.
सर्वोंत्तम पवित्र शहरांची ही तीर्थयात्रा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता. एक असा अद्वितीय अनुभव ज्यामुळे मला अनपेक्षित आशीर्वाद लाभले. हे आशिर्वाद माझ्या स्वप्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त होते.
वाचा : श्रद्धा आणि ज्ञान-विज्ञानाची हास्यास्पद तुलनाजेद्दाहमध्ये उतरल्यानंतर काही वेळातच मला प्रिन्स मुहंमद फैसल भेटले. त्यांनी मला सांगितलं की त्यांचे सुविख्यात वडील महामहिम क्राउन प्रिंस फैसल यांनी अरबस्तानचे शासक या नात्याने मला प्रमुख पाहुणा म्हणून घोषित केलं आहे. त्या क्षणापासून माझ्यासोबत जो काही विनम्र व्यवहार सुरू होता, त्याचं वर्णन करण्यासाठी अनेक पुस्तकं लिहावी लागतील. महामहिमांच्या देखरेखीत मी जेद्दाह, मक्का, मीना येथील हॉटेल्समध्ये मुक्काम केला. त्यांनी माझ्या दिमतीला एक स्वतंत्र कार, ड्रायव्हर आणि एक धार्मिक मार्गदर्शक दिला होता. या शिवाय अनेक मदतनीस माझ्या सेवेत हजर करून देण्यात आलेले होते.
यापूर्वी कधीही मला इतका मोठा स्नमान मिळाला नाही. शिवाय कधीही अशा प्रकारचा मान आणि आदराने मला कधीही इतकं लीन आणि अपात्र वाटलं नाही. एखाद्या अमेरिकन अश्वेत वर्णीय व्यक्तीला असा आदर दिला गेला, यावर क्वचितच कोणी विश्वास ठेवेल! वास्तविक, मुस्लिम जगतात जेव्हा एखादी व्यक्ती इस्लाम स्वीकारते, तिला त्याच क्षणी समान पातळीवर पाहिलं जातं. म्हणजेच ती गौरवर्णीय असेल तर श्रेष्ठतेचा फाजिल अभिमान बाळगणे सोडते. त्याचप्रमाणे अश्वेत वर्णीय असेल तर न्यूनतेचा गंड झटकून टाकते. इस्लाम सर्व मानवांना केवळ माणूस म्हणून स्वीकारतो. कारण अरबस्तानातील लोक मानतात की परमेश्वर एक आहे आणि सर्व मानव जात देखील समान आहे. सर्वजण एकमेकांचे बंधू आणि भगिनी म्हणजे एक मानवी कुटुंब आहोत.
मी इतकं प्रामाणिक आदरातिथ्य आणि खऱ्या बंधुत्वाचा अनुभव यापूर्वी कधीही बघितला नव्हता. तो अरबस्तानमध्ये मला दिसून आला. खरं तर, या तीर्थयात्रेत मी जे काही पाहिलं आणि अनुभवलं ते अद्वितीय होतं. त्यामुळे मला माझ्या विचारांच्या पद्धतींचा ‘नव्याने क्रम’ लावणे भाग पडलं. शिवाय माझे काही पूर्वीचे निष्कर्ष व ग्रह बाजूला ठेवावे लागले. या ‘वास्तविकतेशी जुळवून घेणे’ माझ्यासाठी फारसं कठीण नव्हतं. कारण दृढ विश्वास असूनही, मी नेहमीच खुले मन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सत्याचा बुद्धिप्रामाण्य शोध घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे ही लवचिकता असणे अत्यांतिक आवश्यक असते. या प्रक्रियेचा कधीही अंतिम शेवट असू शकत नाही.
इथं सर्व वर्णाचे आणि पृथ्वीच्या प्रत्येक भागातून आलेले मुस्लिम आहेत. गेल्या काही दिवसात मक्का (जेद्दाह, मीना आणि मुस्तलिफ) मध्ये हजचा विधी समजून घेत असताना मी एकत्र जेवलो आहे. एकाच ताटातून अन्न ग्रहण केले, एकाच ग्लासातून पाणी प्यायलो. एकच बिछाना किंवा गालिच्यावर झोपलो आहे. राजे, सम्राट आणि इतर प्रकारचे शासक - ज्यांची त्वचा श्वेतवर्णियापेक्षा सर्वांत गौर होती, ज्यांचे डोळे सर्वांपेक्षा निळे होते आणि ज्यांचे केस सर्वांधिक सोनेरी होते - मी त्यांच्या निळ्या डोळ्यांत डोकावून पाहू शकत होतो. समजू शकत होतो की ते मलाही बंधू मानतात. कारण एकाच परमेश्वरावरील (अल्लाह) श्रद्धेने त्यांच्या मनातून ‘वर्णभेद’ काढून टाकला होता. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन आणि इतर वर्णाच्या लोकांबद्दलचे त्यांचे व्यवहार आपोआप बदलले. एकात्मतेवर त्यांचा दृढ विश्वास होता. या समान व्यवहाराने अमेरिकन गोऱ्या लोकांपेक्षा ते अधिक उजळ ठरत होते. माझ्याशी केलेल्या मार्मिक वर्तन-व्यवहारात त्यांच्या वर्णाचा कोणताही अहंगड मला जाणवला नाही.
वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?वाचा : इस्लामी जाणिवांचा डावा अन्वयार्थ
इस्लामने एकेश्वरी श्रद्धा आणि सर्व मानवी समाजाला एकसमान म्हणून स्वीकारले. त्यामुळे गोऱ्यांसह (तथाकथित श्वेत) अश्वेत समाजालाही इस्लामच्या बंधुत्व धोरणात एकसमान म्हणून स्थान मिळाले.
यावरून मला दिसून आलं की, जर श्वेत अमेरिकन परमेश्वराचे (अल्लाह) एकत्व स्वीकारू शकले, तर कदाचित ते प्रामाणिकपणे मानवाचं एकत्व देखील मान्य करू शकतील. शिवाय वर्णभेदाच्या आधारे इतरांना कमी लेखणे बंद करतील. अमेरिकेत आता वर्णभेद एका असाध्य कर्करोगासारखा वाढत चालला आहे. अशा स्थितीत प्रत्येक विवेकी अमेरिकनाने वर्णभेदाच्या समस्येवर परिणामकारक उपाय म्हणून इस्लामकडे अधिक सन्मानाने पाहण्याची गरज आहे.
अमेरिकन अश्वेतांना त्यांच्या जातीय ‘द्वेषां’साठी कधीही दोषी ठरवता येणार नाही. कारण त्यांचे प्रतिरोध किंवा संरक्षण तांत्रिक आहेत. त्यांच्या नेणिवेतून ते आलेले आहेत. याच नेणिवेने त्यांना अमेरिकन गोऱ्या लोकांनी अश्वेतांविरुद्ध सुरू केलेल्या वांशिक भेदांवर प्रतिक्रिया देण्यासाठी भाग पाडलं आहे. परंतु अमेरिकेचा वर्णश्रेष्ठत्वाचा वेडा ध्यास त्यास आत्मघातकी मार्गावर वळणावर नेत आहे. ही कृती अथांग खोल दरीच्या अधिक जवळ नेणारी आहे. मला विश्वास आहे की महाविद्यालये व विद्यापीठांमधील नव्या पिढीतील श्वेत तरुण त्यांची स्वतःच्या निर्लेप व अल्प बाधित बुद्धिद्वारे ‘भिंतीवरील हस्तलेखना’चं योग्य आकलन करतील आणि आध्यात्मिक मुक्तीसाठी इस्लाम धर्माकडे वळतील. शिवाय जीर्णमतवादी पिढीला त्यांच्यासोबत येण्यास भाग पाडतील.
कदाचित वर्णश्रेष्ठत्वातून उद्भवणाऱ्या आपत्तीपासून अमेरिकेला वाचविण्याचा हाच एक सर्वोत्तम मार्ग आहे. या वंशाभिमानी प्रवृत्तीमुळेच जर्मनीवर विनाश ओढवला होता. या विघातकी वृत्तीचा शेवट हिटलर व त्याच्या नात्झी जर्मनी सैन्याच्या अंताने झाला. एक धडा म्हणून याकडे पाहता येईल.
आता मी मक्केची यात्रा पूर्ण केली आहे आणि माझा स्वतःचा वैयक्तिक आध्यात्मिक मार्ग अशा प्रकारे प्रशस्त केला आहे की मी माझ्या धर्माची (इस्लामची) खोली चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेन. मी आपल्या आफ्रिकन पितृभूमीत माझा प्रवास सुरू ठेवण्यासाठी काही दिवस मी तिथं राहीन. अल्लाहची इच्छा असेल तर, न्यूयॉर्कला परतण्यापूर्वी २० मे पर्यंत मी सुदान, केनिया, टांगुआनिका, झांझिबार, नायजेरिया, घाना आणि अल्जेरियाला भेट देईन.
तुम्ही हे पत्र तुमच्या इच्छेनुसार हवं तसं वापरू शकता.
अल-हज मलिक अल-शाहबाज़ (माल्कम एक्स)
(मक्का, सौदी अरेबिया, २५ एप्रिल १९६४)
मराठी अनुवाद : कलीम अज़ीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com