मुस्लिमांना संसदीय लोकशाहीचं प्रतिनिधित्व नाकारणं, त्यांच्या निवडणुकीतील सहभागाला व्होट जिहादची लांछने लावणं, उमेदवारी नाकारणं, त्यांच्या राजकीय व आर्थिक प्रश्नांची दखल न घेणं, त्यांना व्यवस्थेच्या बाहेर ढकलणं आता सर्वज्ञात झालेलं आहे.
अशा संकट काळात त्यांनी वेगळा राजकीय मार्ग शोधला तर पुन्हा त्यांची नालस्ती करण्याची व्यापक मोहिम सुरू होते.
मुस्लिमांची मतं प्रत्येकांना हवी आहेत, पण त्यांच्या प्रश्न, समस्यांची दखल कोणालाही घ्यायची नाही. तरीही प्रत्येकजण मुस्लिम मतांवर आपला दावा ठोकतो व तो बळकावण्यासाठी प्रयत्नशील राहतो. त्यासाठी धर्मनिरपेक्षेची भावनिक साद घालतो, वेळेप्रसंगी त्यांना धमकावतो.
भाजपलाही मुस्लिम मतं हवी असतात. त्यासाठी तो त्यांना चुचकारतो. पसमांदा वैरण पुढे करून कांग्रेसला दोष देतो. पण मतं मिळणार नाही, असं लक्षात येताच तो मानधनावर बहुउमेदवार देऊन मुस्लिम मतांना निष्कामी करतो.
इतर पक्ष मात्र मुस्लिम मतांवर आपलाच हक्क गाजवू लागतात. परंतु मतं मागण्यासाठी ते त्यांच्याकडे जात नाहीत. लोकशाहीवरील संकट तथा धर्मनिरपेक्षता रक्षणाची हाक दिली की ते मिळतील, असं त्याला वाटत असतं.
याव्यतिरिक्त त्यांना वेगळे प्रयत्न करावेसे वाटत नाहीत.
परिणामी तथाकथित धर्मनिरपेक्ष दल मुस्लिमांच्या राजकीय व नागरी मुद्द्यांना हात घालत नाही, त्यांची प्रश्न एजेड्यावर घेत नाही. याउलट तो सतत मुस्लिमांना गृहित (teken to Grant) धरत असतात. आमच्याशिवाय पर्याय काय? असा दंभ त्यांच्याकडे असतो.
मुस्लिम, परधर्मद्वेश बाळगणाऱ्या राजकीय पक्षांना थारा देत नाही, फॅसिस्ट राजकारणाला स्वीकारत नाही, राष्ट्रीय भूमिका म्हणून तो लोकशाही राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्षतेचा सोबती असतो, या भावबंधाचा गैरफायदा तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष उचलत असतात.
त्यांना वाटतं की, मुस्लिम कुठल्याही स्थितीत भाजपला मतं देणार नाही, मग ती आपल्यालाच मिळतील, त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज काय?
तरीही योग्य वेळ-काळची वाट पाहत मुस्लिम अशा पक्षांकडे उमेदीने पाहतो. त्याला वाटतं की, आज ना उद्या ते आपल्या प्रश्न-समस्यांची दखल घेतील. पण ती आशा कधीही पूर्ण होत नाही.
अशा स्थितीत जे पक्ष मुसलमानांना विश्वासात घेतात, त्यांच्या प्रश्नांची दखल घेतात, नागरी समस्या समजून घेतात, दुःखावर फु़ंकर घालतात, समानतेचं वर्तन करतात, राजकीय प्रतिनिधित्व-उमेदवारी देतात, भूमिका म्हणून विकासात योगदान स्वीकारतात, अशा पक्षांना तो मते देतो. त्यांच्या बाजुने उभा राहतो, त्यांना भरभरून मताधिक्य देतो. मग तो कोणताही बिगर-भाजपाई पक्ष असो की तत्सम प्रादेशिक..
आपली निसटलेली मतं पाहता तथाकथित मुख्य प्रवाही धर्मनिरपेक्ष पक्षांना थोडं दुख होतं. ते पुढे निघून जातात. पण यात वाटेकरी म्हणून एखादा मुस्लिमकेंद्री पक्ष आला तर त्यांचा थयथयाट होतो.
मग ते पक्ष AIMIM असो AIUDF, AUML, WPI, SDPI, I.S.L.A.M. तत्सम.. मुस्लिम मतं बाजुला सरकली की त्यांच्या पायाखालची जमीन हलू लागते. त्यावर थेट प्रतिक्रिया न देता सेक्युलॅरिझमचा आडोसा पुढे करतात. मग निसटलेली मते त्यांच्या दृष्टीने धर्मनिरपेक्षतेवरील संकट होऊन जातं.
मुसलमानांची मते मुस्लिमकेंद्री पक्षांना मिळताच त्यांना लोकशाहीवरील धोका संभवतो, सेक्युलॅरिझम संकटात जाताना दिसतो, ती कृती त्यांना फुटीरवादी राजकारण वाटू लागते.
आपल्या मुस्लिम मतांचे वाटेकरी मुस्लिमकेंद्री पक्ष कसे होऊ शकतात? या प्रश्नांच्या अंतिम शेवटी त्यांना मुसलमान फुटीर, अलगाववादी, देशद्रोही वाटू लागतो.
मग ते अशा मुस्लिमकेंद्री पक्षांची भाजपची बी-टीम म्हणून संभावना करतात. कारण ते त्यांच्या दृष्टीने ‘वोट कटुआ’ असतात. त्यांच्या पराभवाला थेट जबाबदार असतात. त्यांना वाटतं की मुस्लिमकेंद्री पक्षांना पडणारी मतं हे मतांचं विभाजन असतं. किंबहुना त्यांच्या दृष्टीने ओबीसीकेंद्री किंवा दलित आधारभूत राजकीय पक्षांना मिळणारी मतं विभाजित नसतात. असले तरी त्याविषयी उघडपणे बोलणं मात्र ते टाळतात..
कारण तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांच्या जात केंद्री, सत्तालुलोप व वर्चस्ववादी वृत्तीला कंटाळून त्यांनी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हे पक्ष उभं केलेले असतात. त्यामुळे अशा पक्षांना ते थेट अंगावर घेत नाहीत.
मात्र मुस्लिम आधारभूत राजकीय पक्षांना मिळालेली मतं त्यांना विभाजनकारी वाटतात. अशी (मुस्लिमाची) मतं विभाजित होऊन प्रतिस्पर्धी पक्ष निवडून येतो, असं त्यांचं बीजगणित असतं. याचा दुसरा अर्थ मुस्लिम मतावर आपलीच एकाधिकारशाही आहे, असं त्यांना सिद्ध करायचं असतं. म्हणजेच ते मुस्लिम मतदारांना घरगडी म्हणून पाहतात. त्यांनी उमेदवारी मागू नये, केवळ मतदानच करत राहावं. आम्हाला मतदान करणे हेच राष्ट्रीय कर्तव्य आहे, असं त्यांना सांगायचं असतं.
प्रतिस्पर्धी - मग भाजपव्यतिरिक्त कोणीही असो; तो निवडून येऊच नये, ती मते आम्हालाच मिळावी असा त्यांचा गर्भित इशारा असतो.
मतं विभाजित होऊ नये म्हणून मुस्लिमकेंद्री पक्षांची आघाडी-युती मात्र ते करत नाहीत. कारण त्यांना त्यांच्याशी राजकीय तडजोड, व्यावहारिक वाटाघाटी करायच्या नसतात. एक पॉलिटिकल एनिमी संपवला तर लढायचं कोणाविरोधात? असं त्यांचं साधं गणित असतं. दुसरं असं की आम्ही दिलेल्या तुकड्यावर जगणारे आम्हाला समान हिस्सा कसा काय मागू शकतात, असा हा त्यांचा मूळ राग असतो. अशावेळी ते त्या-त्या पक्षांची प्राथमिक चर्चाही करत नाहीत.
(मुस्लिम पक्षांना मिळणारी) मुसलमानांची मते त्यांना हवी असतात, पण त्यांचे राजकीय प्रश्न, आर्थिक गुंता सोडवायचा नसतो. त्याचप्रमाणे सत्तेचे लाभ किंवा लोकशाहीतील वाटा मात्र मुसलमानांना द्यायचा नसतो. अशावेळी एकच काम त्यांच्याकडे उरतं, ते म्हणजे, होईल तेवढी त्यांची बदफैली-बदनामी-अवमानना करणे...
मग ते त्यांना भाजपची बी-टीम संबोधतात, संघाचे हस्तक म्हणतात, शहा-मोदींसोबतच्या औपचारिक फोटोंचा दुष्प्रचार करतात, अर्धसत्य माहिती प्रसारित करून मतदारांची दिशाभूल करतात, फेक न्यूज व्हायरल करतात, अल्पसंख्य समाजाचा बुद्धिभेद घडवून आणण्यासाठी दिशाभूल मोहीम राबवतात, एआयच्या मदतीने फेक फोटो-वीडियो-ऑडियो व्हायरल करतात.
आपली छुपी हातमिळवणी दडवून मुस्लिमकेंद्री पक्षांच्या नैसर्गिक युती-आघाडीला देशविरोधी सिद्ध करतात. धर्मनिरपेक्षतेचं संकट दाखविण्याचा आटापिटा करतात.
अंतिमत: धर्मनिरपेक्षतेचं सोवळे धारण करून, लोकशाहीची आवरणं पांघरून मुस्लिमकेंद्री पक्षांची बदनामी करण्यासाठी सर्व शस्त्रं-अस्त्रं-आयुधं वापरतात.
त्यामुळेच सर्वसामान्य मुसलमानांची अशी भावना झाली आहे की लोकशाहीवरील संकट व धर्मनिरपेक्षता रक्षणाचं सोंग घेऊन मुस्लिमांना आर्थिक संकटात लोटणं, राजकीय प्रश्न बाजूला सारणं, त्यांचं राजकारण संपवण्याचं कट-कारस्थान रचलं जात आहे.
याउलट माझं वैयक्तिक निरीक्षण असं की मुस्लिम आधारभूत राजकीय पक्षांविषयी कुठलीही चर्चा, समीक्षा, विश्लेषण व आकलन मांडण्यापूर्वी प्रवाहपतित विचार टाकून दिल्याशिवाय नवी दृष्टी येणार नाही. त्याचप्रमाणे वर्तमान संदर्भाला बाजूला टाकून वर्षानुवर्ष मुस्लिम मतांवर दावा देखील ठोकता येणार नाही.
साधं गणित आहे, मुसलमानांची मतं हवी असतील तर त्यांची राजकीय, आर्थिक व शैक्षणिक समस्यांचा गुंता सोडवला पाहिजे. त्यांच्या असुरक्षित भावनेचा निपटारा केला पाहिजे. त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी पूर्ण केली पाहिजे. यातील कुठलीच निकड न भागवता केवळ मतांवर दावा करणं अव्यवहार्य आहे.
.
.
कलीम अज़ीम, पुणे
२४ जानेवारी २०२६
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com