‘गन कल्चर’ विरोधात कॅटलिनचा लढा

मेरिकेच्या एका तरुणीचा पाठीवर रायफल लादलेला कॉलेज कॅम्पसमधला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोत दिसणाऱ्या या मुलीचं नाव कॅटलिन मारिएअसं आहे. या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बंदूक बाळगण्यास मनाई आहे, असं असतानाही ती एके-१० रायफल्सघेऊन थेट परिसरात घुसली. 

कुणीही तिला अडवलं नाही. बंदूकसोबत तिनं एक प्ले कार्ड ट्विटरवर अपलोड केलं आहे, त्यात माझ्याकडून बंदूक घेऊन दाखवाअशा आशयाचा मजकूर लिहला आहे. कॉलेज कॅम्पसच्य़ा सुरक्षा व्यवस्थेत आव्हान दिलेला कॅटलिनचा हा फोटो गन कंट्रोल कायद्याची कसोशीनं अंमलबजावणी व्हावी यासाठी हा फोटो अमेरिकेत गाजतोय.

फेब्रुवारीत अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एका शाळेत बंदूकधारी विद्यार्थ्यानं गोळीबार केला, यात तब्बल १७ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेत ‘गन कंट्रोल एक्ट’ लागू करावा यासाठी देशपातळीवर मोठी मोहीम छेडण्यात आली. शाळा, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेच्या ‘गन कल्चरविरोधी मोर्चे काढण्यात आले. फेब्रुवारी-मार्च ही दोन महिने अमेरिकेत ‘गन कंट्रोल एक्ट लागू करण्याच्या मागणीसाठी गाजले. या अभियानाला #NeverAgain असं नाव देण्यात आलं होतं.

वेगवेगळ्या पद्धतीनं अमेरिकन लोकांनी गन कल्चरचा विरोध केला. काहींनी गन्स कटरच्या साहाय्यानं आपल्या व्यक्तिगत बंदूका नष्ट करून त्याचे व्हिडिओ अपलोड केले. तर काहींनी बंदूका कचऱ्यात फेकून दिल्या. १४ मार्चला अमेरिकन पालकांनी मुलांच्या भवितव्याची चिंता करत अनोख्या पद्धीतने गन कल्चरचा विरोध केला. 

वाचा : कमर गुलची रायफल आणि वायरल असत्य

वाचा : रशियन कॉन्स्टिट्यूशन गर्ल

वाचा : ट्रम्प यांच्या मुलामुळे अमेरिकेत इ-सिगारेटला बंदी

एका शाळेच्या पटागणांत तब्बल ७० हजार लहान मुलांच्या बूट जोड्यांचं प्रदर्शन भरवून गन कल्चरचा निषेध या पालकांनी नोंदवला होता. याच शाळेत २०१२ साली एका बंदूकधाऱ्यानं अनेक चिरमुरड्या मुलांचा जीव घेतला होता. आता तरी बंदूक संस्कृतीला आळा घालावा अशी मागणी हे पालक सरकारकडे करत होते. ट्रम्प सरकारनं व्यक्तिगत फायद्यासाठी बंदूकीच्या व्यवसायाला चालना दिली, असे अनेक आरोप आंदोलनादरम्यान झाले.

२४ मार्चला असाच एक भव्य मोर्चा अमेरिकेत काढण्यात आला, जगभरातील प्रसारमाध्यामांनी याची दखल घेत, अमेरिकेवर टीका केली. यानंतर अगदी दोनच दिवसात ट्रम्प सरकारनं ‘गन कंट्रोल एक्ट’ लागू केला. अमेरिकन विद्यार्थी व पालकांच्या आंदोलनाला यश आलं, पण या कायद्याची अंलबजावणी योग्य पद्धतीनं होत नसल्यानं गन कल्चरला चाप बसली नाही. 

कायदा झाल्यानंतरही बंदूक हल्ल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत ‘गन कंट्रोल कायद्याची कसोशीनं अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ओहयो प्रांतामधील एका विद्यापीठात कैटलिन मारिएनं रायफल्स घेऊन निषेध नोंदवला. कैटलिनच्या अनोख्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय. #CampusCarryNow (चला कॅम्पसची काळजी घेऊयाया हैशटॅग अंतर्गत कैटलिनचा बंदूकधारी फोटो व्हायरल केला जात आहे.

या फोटानंतर कैटलिन अमेरिकेत सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून लोकप्रिय झालीय. अनेक आघाडीच्या मीडिया हाऊसनं तिच्या मुलाखती घेतल्या आहेत. न्यूयॉर्क टाईम्सवांश्गिटन पोस्टद न्यूज या मीडिया संस्थांनी तिच्यावर विषेश स्टोरी प्रकाशित केली आहे. कैटलिनला सोशल मीडियावर अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. आता तरी सरकारनं गन कंट्रोल एक्टची कठोरतेने अंमलबजावणी करावी अशी मागणी करत कैटलिनचा फोटो रीट्विट केला जात आहे.

गन कल्चरसंदर्भात फॉक्स न्यूज दिलेल्या एका मुलाखतीत कैटलिननं म्हटलंय की, ‘मला कॅम्पसमध्ये बंदूक न घेऊन जाण्याचा नियम मला फार पूर्वी तोडायला हवा होता, १९७०मध्ये व्हियतनाम युद्धाचा शांततेनं निषेध करणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर गोळ्या जाळून त्यांना चार करण्यात आलं, त्याचवेळी याचा विरोध खरी करायची गरज होती. मी नुकतीच डिग्री पूर्ण केली आहे, त्यामुळे योग्य कारणासाठी मी हा नियम मोडला आहे

वाचा : ब्राझीलमध्ये महिला जर्नलिस्टचा का होतोय लैंगिक छळ?

हिंसक गेमचा प्रभाव

लहान मुलं असो की तरुण सर्वांना हल्ली मोबाईल गेमचं प्रचंड वेड लागलं आहे. बहुतेक गेम हिंसक व हिंसेला प्राधान्य देणाऱ्या असतात. जगभरात शालेय मुलांमध्ये गेमचा ट्रेंड वाढलेला दिसतो. अगदी चार-पाच वर्षांच्या लहान मुलांमध्ये देखील गेम व वीडियो स्क्रीनचं झपाटलंपण दिसून येते.

अमेरिकेत अनेक मुले हिंसक व्हिडिओ गेम सातत्याने खेळत असतात असं दिसून आलं आहे. सर्वेक्षण सांगतात की, हिंसक गेम खेळणाऱ्या ६०-७० टक्के मुलांना वाटते की, आपणही अशाचत पद्धतीने हिंसा करीत सुटावं. अर्थात ही मानसिक इच्छा गेम खेळणाऱ्या अनेकांमध्ये पाहावी होते. बेरोजगारी, एकटेपणा, मानसिक स्थैर्यता नसणे, मित्रमंडली नसणे, रिकामटेकडेपणा इत्यादी कारणे मोबाईल गेम खेळण्यासाठी पुरेसे असतात.

किंबहुना अनेकवेळा दिसून आलं की, सिग्नललादेखील अनेकजण गेम खेळतात. म्हणजे त्या तीस-चाळीस सेकंदातसुद्धा गेमचं वेडेपण स्वस्थ बसू देत नाही. सतत बिझी असणारे तरुणसुद्धा रिकाम्या वेळेत, किंवा मिळेल त्या वेळेत गेम खेळतात. संशोधन सांगतात की, अमेरिकेत एकटेपणा, नैराश्य व त्यातून व मानसिक तणावामुळे शाळा, तसेच सार्वजनिक ठिकाणी बेधुंद गोळीबाराच्या घटना घडतात.

अनेक अहवाल सांगतात की, अशी हत्याकांडे घडण्याच्या कारणांमध्ये हिंसक वीडियो गेम हेदेखील महत्त्वाचे कारण असते.

गोळीबाराच्या अनेक घटनामधील पाहणीत दिसलं की, गोळीबाराच्या घटनांचे हिंसक व्हिडिओ गेम खेळणाऱ्या मुलांच्या बंदूक चालवून पाहण्याची इच्छा प्रबळ होते. असा पाहणीत २०० मुलांचा समावेश करण्यात आला होता. बहुतेक मुलांमध्ये आक्रमकता व हिंसेचा लवलेशही नव्हता. सर्वांना हिंसक वीडियो गेम देण्यात आले. त्यापैकी गेम खेळणाऱ्या ६० टक्के मुलांच्या मनात बंदूक चालवून पाहण्याची इच्छा जागृत झाली.

एकटेपणा कारणीभूत

रिपोर्ट सांगतात की, वरचे वर अमेरिकेत सार्वजनिक स्थळी बंदूका चालवण्याचे प्रकार वाढत आहेत. एप्रिल १९९९मध्ये देशातील कोलोरॅडो येथील लिटलटॉन शाळेत विद्यार्थ्यांनी केलेल्या गोळीबारात १२ जण मारले गेले होते. विशेष महणजे हा गोळीबार दोन शालेय विद्यार्त्यांनी केला होता.

मार्च २००५ मध्ये १६ वर्षे वयाच्या एका विद्यार्थ्यांने आपल्या आजोबा व त्यांच्या एका सहाकाऱ्याला जीवे मारले आणि मग तो जवळच्या रेड लेक हायस्कूलमध्ये गेला. तिथे त्याने केलेल्या गोळीबारात ५ विद्यार्थी, एक शिक्षक, सुरक्षारक्षक मारला गेला होता.

एप्रिल २००७मध्ये व्हर्जिनिया टेक येथे २३ वर्षे वयाच्या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात ३२ जणांचा मृत्यू झाला होता. तर डिसेंबर २०१२मध्ये- कनेक्टिकट येथील न्यूटाउन येथे १९ वर्षे वयाच्या एका युवकाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तेथील एका शाळेत गोळीबार करून २० लोकांना ठार केले होते. 

चालू २०१८ वर्षी म्हणजे फेब्रुवारीत फ्लोरिडामधील पार्कलँड येथे एका युवकाने शाळेत केलेल्या गोळीबारात १४ विद्यार्थ्यांनी जीव गमावला होता. त्यानंतर त्याच महिन्यात ह्युस्टनमधील हायस्कूलमध्ये एका हल्लेखोराने १० जणांना गोळ्या झाडून ठार केले होते.

बहुतेक हिंसक घटनेमागे वेडेसरपणा हा मीडियात चर्चेला येतो. परंतु सुरक्षा यंत्रणांची अकार्यक्षमता लपविण्यासठी ती एक सोय असते, असं जाणकार मानतात. किंबहुना अशा अनेक हिंसक कृत्यामागचे नेमके कारण कधीच कळू शकत नाही. पोलीस तपास सुरू आहे, असं मीडिया सातत्याने सांगत असतो. पण त्यात सत्याता नसते, असं दिसून आलं आहे.

अमेरिकासहित सबंध यूरोप खंडात गन कल्चर फोफावलेलं दिसून येते. त्यामुळे कॅटलीनच्या या अनोख्या मोहिमेची चर्चा करणे सयुक्तिक ठरते.

(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 28 मे 2018ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘गन कल्चर’ विरोधात कॅटलिनचा लढा
‘गन कल्चर’ विरोधात कॅटलिनचा लढा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjCAMr81uj6Rsy9OT83cpXIPFxNMHTJDu4kQgCeLoD4cofOb9MMa5Q00oeRhvxYUvKYokhJoiNhvg4y14slaWs4OwEO8UeZDEb-uIJ7zTXgFlx5pkfYXd51LcgL2aGSBnhwJ7MSFS9Psg2Y/s640/%2523CampusCarryNow.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjCAMr81uj6Rsy9OT83cpXIPFxNMHTJDu4kQgCeLoD4cofOb9MMa5Q00oeRhvxYUvKYokhJoiNhvg4y14slaWs4OwEO8UeZDEb-uIJ7zTXgFlx5pkfYXd51LcgL2aGSBnhwJ7MSFS9Psg2Y/s72-c/%2523CampusCarryNow.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/05/blog-post_54.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/05/blog-post_54.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content