जगभरात तंबाकूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या झपाट्याने
वाढत आहे. प्रत्येक वर्षी तब्बल ४० लाख लोकं या आजाराने मृत्यूमुखी पडत आहे.
एकीकडे ही चिंता सतावत असताना दुसरीकडे इ-सिगारेटमुळे नवे आजार उद्भवत असल्याची
प्रकरणे समोर आली आहेत. या घटनांमुळे जगभरात चिंतेचे सावट पसरलं आहे. परिणामी अनेक
देशांनी या सिगारेटवर बंदी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेत
सिगारेटमुळे तब्बल ६ तरुणांचा मृत्यू झाल्याने इ-सिगारेट पुन्हा एकदा चर्चेच्या
केंद्रस्थानी आली आहे. डब्लू एच ओ या जागतिक आयोग्य संघटनेने या घटनेबद्दल चिंता
व्यक्त केली आहे
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी
येत्या काही दिवसात इ-सिगारेट विक्री व वापरण्यास बंदी आणण्याचे संकेत दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात अमेरिकेतील तरुणांमध्ये मोठ्य़ा प्रमाणात
फुफुसाच्या विकारामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या विकारातून झालेल्या
अनेक मृत्यूचे कारण इ-सिगारेट असू शकतं, असाही संशय वर्तवला जात आहे.
अमेरिकेच्या आरोग्य पथकाने तब्बल ३३ राज्यात
तपासणी राबवली. वय वर्षे १०च्या पुढे केलेल्या या तपासणीत तब्बल ४५० तरुणांना
फुफुसाच्या विकार झाल्याने निदान झालं आहे. हे विकार इ-सिगारेटमुळे झल्याचं स्पष्ट
झालं आहे. ही आकडेवारी पाहता अमेरिकेत इ-सिगारेट बंदीच्या हालचालींने वेग धरला
आहे.
काय आहे इ-सिगारेट
इलेक्ट्रॉनिक सिगरेट किंवा ई-सिगरेट एक बॅटरीवर चालणारे
उपकरण आहे. ज्याला धूमपानाचा पर्याय म्हणून विकसित करण्यात आले आहे. सर्वप्रथम
२००३ साली चीनच्या एका कंपनीने हे सिगारेट मार्केटमध्ये आणले. २००५-०६पासून त्याची
देशविदेशात विक्री सुरू झाली. ज्याला सिगार, सिगारेट किंवा अन्य धुम्रपानासाठी पर्याय
म्हणून वापरले जाते. हे उपकरण एका छोट्या पुंगळी किंवा पाईपसारखे असते. काहीअंशी
हे बॅटरीसारखे किंवा मूळ सिगारेटसारखे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध आहे. यात
तंबाकूच्या जागी निकोटीन, ग्लिसरीन किंवा ग्लाइसोल इत्यादी लिक्विड वापरला
जातो. हे उपकरण तोंडात टाकून सुरू केले की त्यातून प्रेशरने वाफ निघते. इ-सिगारेट
ओढण्याला वेपिंग म्हणतात.
या वेपिंगचे आज मार्केटमध्ये अनेक फ्लेवर उपलब्ध
आहेत. त्यात मँगो, क्रीम, मिंट, मेंथॉल, कँडी, फ्रूट आणि एल्कोहल प्रमुख आहेत. कंपन्याचं म्हणणे आहे की इ-सिगारेट
धुम्रपानाचे व्यसन रोखण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. कृत्रिम धुरातून सिगारेट
ओढण्याची व्यसन हळूहळू कमी होऊन कालांतराने ते नष्ट होते, असा दावा या कपन्या
करतात. पण परिस्थिती मात्र उलट आहे.
आरोग्य तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, या इ-सिगारेटमध्ये
निकोटीन वापरलं असल्याने पूर्वीचा धोका इथेही कायम आहे. कंपन्या ५ टक्के म्हणत
असल्या तरी त्याचे प्रमाण अधिक असते,
असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे विवीध
फ्लेवरमुले धुम्रपानाची व्यसन कमी होत नसून ती वाढते, असा निष्कर्ष संशोधक
व हेल्थ एक्सपर्ट काढतात.
धोके
ब्रिटनमधील पब्लिक हेल्थ इंग्लैंड (पीएचई) या
संस्थेने गेल्या वर्षी एक रिपोर्ट सादर केला होता. त्यांचं म्हणणे होते की, इ-सिगारेटमुळे
इंग्लंडमध्ये दरवर्षी तब्बल २० हजार लोकं धूम्रपान सोडत आहेत. पीएचईने अशी शिफ़ारस
केली होती की, डॉक्टरांनी पेशंटना ई-सिगारेट वापरण्याच्या सूचना
कराव्यात असेही म्हटलं होतं. इतकेच नाही तर हॉस्पिटलमध्ये ई-सिगारेट विक्रीला
ठेवण्याचा सल्लाही संस्थेने दिला होता. सामाजिक कार्यकर्त्यांनी ई-सिगारेटला मात्र
विरोध दर्शवला. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशा सिगारेट ओढण्यास बंदीची मागणी केली
होती. त्यांचं म्हणणे होते की, यामुळे लोकं सिगारेट ओढण्यास उत्तेजित होतील.
हेल्थ एक्सपर्टचं म्हणणे आहे की, ज्यावेळी लोकं
तंबाकूजन्य सिगारेट पितात, त्यावेळी त्यांच्या पोटात धुराचे ७,००० घटक पोटात जातात.
ज्यातील ७० घटक कॅन्सरला जन्म घालणारे असतात. त्यामुळे ई-सिगारेट कमी धोक्याच्या
आहेत. या संदर्भात अनेकांची मते वेगवेगली आहेत. पण नव्या संशोधनातून हे सिद्ध
झालंय की ई-सिगारेट आरोग्यास अति-धोकादायक आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की, ई-सिगारेटमध्ये
मद्याऐवढे निकोटिन असते. त्यामुळे त्यावर तात्काळ बदी आणली गेली पाहिजे.
डब्लूएचओनेदेखील जास्त काळ ही सिगारेट वापरल्यास कॅन्सरचा धोका उदभवू शकतो, असा निष्कर्ष मांडला
होता.
न्यूयॉर्क टाइमच्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांच्या १३ वर्षाच्या मुलाला, बैरनलादेखील
इ-सिगारेटचं व्यसन जडलं आहे. ट्रम्प त्याचे हे व्यसन सोडू पाहत आहेत. पण मुलाला ती
सोडवत नाही. त्यामुळे ते ट्रम्प आक्रमक झालेले आहेत. कुठल्याही कारणाने का होईना
ट्रम्पचा निर्णय इतर देशातही बंदीची सुरुवात करू शकतो. अमेरिका व ब्रिटन इ-सिगारेट
कंज्यूम करणारे सर्वात मोठे देश मानले जातात. अलीकडे ब्रिटनमध्येही त्यावर बंदीची
चर्चा सुरू झाली आहे. तिथे लहान मुलांना या सिगारेटच्या विक्रीला बंदी घालण्यात आली
आहे.
भारतात नुकतीच इ-सिगारेटच्या विक्री व वापराच्या
बंदी टाकण्यात आली आहे. निर्णणयाचं उल्लंघन केल्यास १ लाखाचा दंड होणार आहे.
यापूर्वी महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, बिहार, केरळ, कर्नाटक, मिजोराम, काश्मीर आणि उत्तरप्रदेशसह १२ राज्यात
इ-सिगारेटला बंदी होती. आता देशभरात असेल..
कलीम अजीम, पुणे

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com