पुन्हा ‘मोदी 0.2’ म्हणजे अगतिकतेचा विजय !



तराव्या लोकसभेच्या निकालातून हेच दिसून आलं की, भारतातील लोक २ हजार रुपये देऊन गॅस सिलेंडर खरेदी करण्याची तयारी ठेवत आहेत. २०१४मध्ये ४५० रुपये गॅस सिलेंडर होतं; गेल्या पाच वर्षांत ते ९००च्या घरात गेलं आहे. २०२४ पर्यत तो २ हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे, पण तरीही लोकं ते खरेदी करतील. पेट्रोल २०० रुपये लिटर भरतील. देशात मंदी आली तरी ते झेलतील. वाढत्या फीसमुळे शाळा, कॉलेज बंद पडलेे तरी ते घरी निवांत बसून राहतील. नोकऱ्या-रोजगार नसले तरी चालतील पण भाजपच्या धार्मिक राष्ट्रवादाला (?) भरभरून मते देण्याची त्यांची तयारी निकालावरून दिसून आली.
वास्तविक, भाजपचा अभूतपूर्व विजय ही संमोहनशास्त्राची ही कमाल आहे. याच कामासाठी भाजप २०१५पासून कामाला लागला होता. २०१४च्या विजयानंतरच भाजपने संघटन बांधणीतून तरुणांना एकत्र करण्याचं काम सुरू केलं होतं. १७व्या निवडणुकांचा प्रचार संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाध्यक्ष अमित शहांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रचार कामांची माहिती दिली होती. त्यात सांगितलेली कामे व यंत्रणा ही बीजेपीच्या यशाचं गमक आहे.
वाचा : 'राज'कीय पश्चातापाचे अटळ भविष्य! 
२४ मे च्या टेलिग्राफच्या वृत्तानुसार भाजपने फक्त पश्चिम बंगालमध्ये ५५ हजार व्हॉट्सअप ग्रूप अ‍ॅक्टीव्ह केलेले होते. लोकांना प्रचारी (विखारी) मेसेज पोहोचवण्याच्या कामाला तब्बल १० हजार लोकं लागली होती. (इतर राज्यात हा आकडा वेगळा असू शकतो). 
पश्चिम बंगालमध्ये गेम चेंजर ठरलेल्या या टीमने दररोज लोकांना फोन लावून, मेसेज पाठवून पाकिस्तान, हिंदु-मुस्लिम, बालाकोट, पुलवामा, जेएनयू, पुरोगामी आदी साधने वापरून लोकांना भाजपसंदर्भात मन परिवर्तन करण्यास भाग पाडलं.
दुसरीकडे प्रचार सभांमध्येसुद्धा मोदी-शहा जोडीकडून हेच मुद्दे लोकांवर फेकली जात होती. सैन्याच्या कामगिरींंवर प्रश्न उपस्थित करणारा काँग्रेस, तुकडे-तुकडे गँगला पाठिंबा देणारा काँग्रेस, साधक हिंदूंना दहशतवादी घोषित करणारा काँग्रेस, रफाएलवर संशय घेणारा काँग्रेस, नक्षलवादाचे समर्थन करणारे डावे, बांग्लादेशींना घर देणार्‍या ममता बॅनर्जी, दुर्गापूजा बंद करून मुस्लिमांच्या मिरवणुकांना परवानगी देणार्‍या ममता, गोरक्षकांना गुंड म्हणणारे पुरोगामी, सरकारच्या नीतिंवर प्रश्न उपस्थित करणारे सुधारणावादी, मोदींना विरोध करत पुरस्कारवापसी करणारे विचारवंत... अशा कितीतरी भाकड कल्पना (नरेटिव्ह) भाजपने मांडून ठेवल्या होत्या. हे मुद्दे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला कसे पूरक आहेत, याचा प्रचार भाजपने आपल्या प्रचारी भाषणातून केला. भारतीय सैन्याच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी भाजपला मते द्या, हा मोदींचा जुमलादेखील कामी आला. 
भाजपला ग्रामीण भागातून भरभरुन मते पडली. भाजप गेल्या पाच वर्षांत नेहमीच निवडणूक मोडमध्ये होतं. केवळ ते द्वेषी प्रचारच करत नव्हते तर त्यासाठी पुरक असं संदर्भ साहित्यदेखील फोटोशॉप व व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून प्रसारित करत होतं. हिंदु-मुस्लिम, पाकिस्तान, मंदिर-मस्जिद, ब्राह्मण-दलित, नेहरू-वाजपेयी, गांधी-नथूराम, धर्मद्रोही-श्रद्धाळू, देशभक्त-देशद्रोही, सरकारविरोधक-सरकारप्रेमी अशी फूट पाडण्याचं काम भाजपने यशस्वीरित्या केलं.
तुलनेत विरोधक फक्त हिटलर, फॅसिझम, मोदी हटाव, सरकारचे अपयश, धार्मिक ध्रुवीकरण आदी मुद्दे अवजडभाषेत सांगत सुटली. अघोरी सत्तेची पाच वर्षे उलटले तरीही भाजपविरोधी व पुरोगामी मंडळी हिटलर आणि फॅसिझमच्या पलीकडे मोदींचं विश्लेषण करत नाहीयेत. मोदींना माणूस म्हणून त्यांच्या कमकुवत बाजू समजून घेण्याचा प्रयत्नच केलेला दिसत नाही.
वाचा : आम्ही भारतीय: कल्पनेचे बळी
गेल्या 5 वर्षांत मोदी-भाजप समर्थक वाढण्याचं कारण जर समजून घेतलं तर असं लक्षात येईल की, ज्या टारगेट गटांना लक्ष्य़ करून त्यांनी विचार पेरला, त्या गटांनीच लोकसभा निवडणुकीची धुरा खांद्यावर वाहिलेलं होतं. कुठलाही पैसा न घेता सेवाभावातून (?) काम करणारे कसे पुढे येतात, याबद्दल विरोधकांनी कधीच विचार केला नाही. ते नेहमीच वैचारिक पातळीवर विरोध करण्याच्या भूमिकेत दिसून आले. याउलट, भाजप व त्यांच्या समर्थक गटाने सामान्य लोकांपर्यंत आपले (विखारी) संदेश पोहोचवण्याचं काम केलं. कुठलेही मुद्दे हिंदु-मुस्लिमच्या पलीकडे जात नव्हते. हाच भाजपसाठी व्होट बँक संघटित करण्यासाठीचा टास्क होता.
केवळ देशप्रेमाची (?) महती सांगून भाजपने लाखो तरुणांना आपलसं करून घेतलं. इतकेच नाही तर त्यांना कृतीकार्यक्रम देऊन व्यस्त ठेवलं. त्यांची उर्जा सत्करणी (?) लागावी यासाठी त्यांच्या कार्यशाळा, बैठका, मेळावे घेतले. त्यांच्यात विशिष्ट विचार रूजवून त्यांना बोलतं केलं. 
भाजप व संघाने अशा प्रकारचे संघटन देशातच नाही तर परदेशातही तयार केलं. केवळ मीस कॉल देऊन लाखो तरुणांना पक्षाचे सदस्यत्व दिलं. सदस्य केलं म्हणजे त्यांचा डाटा बेस आपल्याकडे जमा करून घेतला. याच डाटा बेसच्या आधारे लोकांची मने (मते) परावर्तित करण्याचं काम भाजपने यशस्वीरित्या पार पाडलं.
बहुसंख्याकामध्ये तयार केलेल्या धर्मजाणिवेचा विचार करून सत्तापक्षाने त्याला राष्ट्रप्रेमाच्या श्रद्धेशी जोडलं. श्रद्धा आणि राष्ट्रप्रेम याला समांतर पातळीवर उभं केलं. याउलट, विरोधकांनी त्या भाजपच्या धर्मश्रद्धांचं हसं केलं. त्यांच्या देशप्रेमाची टिंगल उडविली. राष्ट्रभक्तीवर शंका घेतली. श्रद्धेला विवेकाशी जोडून त्याचा बाजार मांडला.
हीच मोठी गल्लत विरोधकाकडून झाली. एकीकडे राहुल गांधी व प्रियांका गांधी मंदिर वारी करत होते तर दुसरीकडे अप्रत्यक्षरीत्या ते हिंदूंच्याच धर्मश्रद्धांशी खेळत होते. काँग्रेसजनींच्या हिंदू होण्याच्या प्रॅक्टीसमुळे ते उघडे पडत गेले. किंवा असेही म्हणता येईल की, भाजपने त्यांच्या धर्मश्रद्धांना नागडं केलं. 
भाजप विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या संघटन बांधणीचं गमक लक्षात घेतलं असतं तर निकालाचे चित्र जरासं वेगळं दिसून आलं असतं. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांना भाजपशी दोन हात करण्यााचं यंत्र गवसलं नाही. किंवा ते शोधू पाहात नाहीत, असंही म्हणता येईल. 
२०१४च्या निवडणुकांनंतर त्यांना पराभवाच्या धक्क्यातून सावरायला दोन वर्षे लागली. नोटबदलीनंतर विरोधकाला बळ आलं. राफाएलनंतर ते आक्रमक स्वरूपात बाहेर आले. तत्पूर्वी त्यांना वाटत होतं की, भाजपच्या अन्यायी धोरणांचा विरोध विचारवंत व जनतेवर सोपवू. याच उक्तीप्रमाणे हळूहळू विरोधक निष्क्रिय होत गेला.  
वाचा : धर्मनिरपेक्षतेचे कुली आम्हीच का व्हावे?’ 
काँग्रेसकडे जवळ असलेली मंडळी त्यांची समर्थक आहे, पण ते मतदार नाहीत. त्यांचे वयही आता साठी पार (ओल्ड ग्रूप) गेलेलं आहे. ते आता निरिक्षकांच्या भूमिकेत आहेत. इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या काळातील काँग्रेस समर्थक (मतदार) काठावर बसून आहेत. 
भ्रष्टाचार, महागाई, सरकारचं नैतिक पतन इत्यादी कारणामुळे त्यांची प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याची इच्छाही उरलेली नाही. याउलट, प्रचंड उर्जा असलेला तरुणवर्ग हा देशात ५५ टक्क्यांपर्यंत आहे. यातले २५ टक्के तरुण सन २००० नंतर जन्मलेले आहेत. त्यांना स्वातंत्र्य आंदोलन, पंडित नेहरूंचा समाजवाद, इंदिरा गांधींचा कणखरपणा, राजीव गांधीची दूरदृष्टी, हाशीमपुरा दंगल, मंडल आयोग, दिल्लीतली शिख दंगल, रामजन्मभूमी आंदोलन, जागतिकीकरण, बाबरी उद्ध्वस्तीकरण, मुंबई दंगल, गुजरातचा नरसंहार इत्यादीबद्दल ही पिढी अनभिज्ञ आहे. 
आज महात्मा गांधी कोण होते? असा प्रश्न कॉलेज कॅम्पसमध्ये विचारला तर हजारो तरुणांच्या कपाळी आठ्या पडतात. काही वर्षांपूर्वी एका यूट्यूब चॅनेलने सावित्रीबाई फुले कोण होत्या? असा प्रश्न मुंबई-दिल्लीच्या महानगरातील तरुणांना विचारला. त्यातल्या ८० टक्के तरुणांना सावित्रीमाई माहीत नव्हत्या. तसंच महात्मा गांधींच्या बाबतीत आहे. राजकीय घटनाक्रमांना घेऊन अनभिज्ञ असलेल्या या पिढींवर कुठलाही 'राजकीय' विचार सहजपणे कोरता येऊ शकतो.   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आक्रमक राजकारण, मुस्लिमविरोध बघत-बघत ही पिढी मोठी झाली आहे. जय श्रीरामच्या घोषणा, मंदिर वही बनायेंगे, बाबरी तो झांकी हैं.. अशा घोषणा दररोज त्यांच्या कानी पडतात. ही कुठली विचारधारा आहे. त्याचा नफा-तोटा काय होईल, हे सांगणारा त्यांना कुणी नाही. त्यांना भाजपचे धार्मिक ध्रुवीकरणाची नीती माहीत नाही. या वर्गाला संघ-भाजपविरोधात असलेल्या प्रागतिक संघटना व पक्षाचा वैचारिक संघर्ष माहीत नाही. त्यांच्या मनावर संघाचा हिंदूराष्ट्राने गारूड घातलं आहे. हिंदूचे राज्य ही कल्पना त्यांना सुखावणारी आहे. याच रंजक कल्पनेतून ही तरुण पिढी भाजपची व्होट बँकझालेली आहे. 
याच तरुणाईच्या बळावर भाजपने देशभरात द्वेशाचं राजकारण सुरू केलं आहे. मॉब लिचिंग, गोरक्षा, राम मंदीर, दलित, आदिवासींवर हल्ले, संविधानाचे अवमान, विचारवंताच्या हत्या. प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे निरुपण, महामानवाचा अवमान, गांधी-नेहरूंबद्दल अशब्द वापरणे. दहशतवादी नथूरामचे उदात्तीकरण, माफीवीरांचे गौरवीकरण, शालेय़ अभ्यासक्रमात हिंदुवादी विचारांचा प्रसार आदी घटक पसरवण्याचे काम भाजपने केलं आहे.
प्रशासन म्हणून भाजप सरकार चालविण्यास असमर्थ ठरला आहे. आर्थिक पतघसरण, लघुउद्योजकांचे हाल, छोटे व मध्यम व्यापाऱ्यांचा धंदा बुडाला आहे. सामान्याचा पैसा घेऊन क्रोनी कॅपिटलिस्ट (भुरटे उद्योजक) देश सोडून फरार झाले आहेत. कोट्यवधींचा भ्रष्ट्राचार करून भारताच्या अर्थव्यवस्थेला खिंडारे पाडली गेली. अनेक उद्योग-धंदे डबघाईला आले आहेत. नोटबदलीमुळे लाखोंं लोकांचे रोजगार गेले, अशा विविध प्रकारामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. भाजपच्या  धोरणांचा तो बळी पडला आहे. इकडे जाऊ की तिकडे अशा अगतिकतेत भारतीय मतदार अडकला.
वाचा : संभ्रमित करणारा तलाकबंदी कायदा
अविचारी तरुणांना हायजॅक करण्याचे काम भाजपने यशस्वीरित्या केलेलं आहे. याउलट काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांना तरुणासाठी कुठलाच कृती कार्यक्रम तयार केला नाही. अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने तरुणांना पक्षात सामावून घेण्याचं धोरण आखलं आहे. परंतु अल्पावधीत सोशल मीडियावर भांडकुदळ टीम म्हणून ही तरुणाई प्रसिद्ध झालेली आहे. 
विरोधी विचार पटला नाही की, ही मंडळी थेटपणे लोकांवर शाब्दिक हल्ले करत सुटतात. संयमतेने तो विचार ऐकून घेण्याची मानसिकता कुठे आढळत नाही. भाजपच्या टोळधारी टीमच्या चमूसारखा हा गटदेखील प्रतिक्रियावादी होत आहे. त्यामुळे या तरुणांचे मेनस्ट्रीम राजकारणातले भवितव्य अधांंतरी दिसून येत आहे.
भाजपविरोधी राजकीय पक्षांकडे कुठलाही ठोस कृती कार्यक्रम नाही. त्यांच्यामध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड संघर्ष सुरू असल्याने पक्षाला खिंडार पडलेली आहेत. दोन्हीकडे परिस्थिती सारखीच होती.
देशात सक्षम विरोधी पक्ष नसल्याने आमचा प्रतिनिधी कोण अशा दोलायम अवस्थेतून मतदारांनी मतदान केलं मतांचा टक्का पाहिला तर भारतात एकूण मतदान ६३.९८ टक्के मतदान झालं. त्यात भाजपला ३१ ते ३८ टक्के मते प्राप्त झाली. तर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांना मिळून ५५ टक्के मतं पडली. अल्प मतातदेखील भाजपला बहुमत मिळाले. एका अर्थाने भाजपचा मतांच्या टक्केवारी पराभव आहे. 
पसंत नसतानाही पुन्हा एकदा भाजप सरकार  लोकांच्या माथी मारले गेले आहे. बहुमत असल्याने ते नक्कीच लोकप्रिय होते. पण इव्हीएमच्या तक्रारीवरदेखील दुर्लक्ष करून चालणार नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी ट्विट करून घोषणा केली की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. 
दुसरीकडे बहुजन वंचित आघाडीनेदेखील बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी केली आहे. नसता वंचितही विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. असे जर झाले तर लोकशाहीचा तो मृत्यू असेल. कारण लोकशाही प्रक्रियेत विरोधकांना देखील निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सुलभ वातावरण मिळणे गरजेचे आहे. जग भारताकडे लोकशाही यशस्वी करणारा देश म्हणून पाहतो, अशावेळी होणारी बदनामी हानिकारक असेल.
मतदारांच्या नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारी ही निवडणूक होती. धार्मिक राष्ट्रवादाचे बुजगावणे उभे करून निवडणुका जिंकल्या गेल्या. 'जेब की बात' पेक्षा लोकांना 'देशभक्ती' महत्वाची आहे, असे पटवून देऊन एका प्रकारे भाजपने मतदारांशी दगा केला आहे. भारतीय लोकशाहीतील ही अगतिकता आहे. 
मतदारांचा वाली कोण असा प्रश्न शेवटी उरतोच. अशा अवस्थेत स्थानिक पातळीवर निवडणुकांना सामोरे जाताना किमानपक्षी मूलभूत प्रश्नांबदल मतदारांनीच सजगता बाळगली पाहिजे.

कलीम अजीम, पुणे

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: पुन्हा ‘मोदी 0.2’ म्हणजे अगतिकतेचा विजय !
पुन्हा ‘मोदी 0.2’ म्हणजे अगतिकतेचा विजय !
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9hN3qslrHV8O1zM2ik_dhB9YT6J2mPArWSyyRweMqn6dM0AYR40jveDhrXitaZKT8F7xJHC1NLWooFKV3Cz6NtAHF4_d0rx5GtvWHH_K4erIEehNUY5PmhQpP5S-dmr_aaw4UdaUZU0CP/s640/images.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9hN3qslrHV8O1zM2ik_dhB9YT6J2mPArWSyyRweMqn6dM0AYR40jveDhrXitaZKT8F7xJHC1NLWooFKV3Cz6NtAHF4_d0rx5GtvWHH_K4erIEehNUY5PmhQpP5S-dmr_aaw4UdaUZU0CP/s72-c/images.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/05/blog-post_29.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/05/blog-post_29.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content