संभ्रमित करणारा तलाकबंदी कायदा

गेल्या चार वर्षांपासून वादग्रस्त झालेल्या ट्रिपल तलाकच्या नाटकाचा पडदा कायद्यामुळे खाली पडला आहे. आता हा खेळ संपला. दुसऱ्या नव्या खेळासाठी भाजप सरकार सज्ज झालेलं आहे. तलाकपाठापोपाठ जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयक आणि चिटफंड अमेंडमेंट बिल-२०१९ राज्यसभेत मंजूर झालं. तीन दिवसात एकापाठोपाठ तीन विधेयक मंजूर करून तर सत्रामध्ये तब्बल २६ विधेयक भाजप सरकारने आपल्यातच विश्वविक्रम केलेला आहे.
एकतर्फी तलाक रद्दीकरणामुळे एक वादग्रस्त विषय अस्ताला गेला आहे. त्याबद्दल भाजप सरकार अभिनंदास पात्र आहे. शत्रूकरणातून का होईना भाजपने गेल्या ३३ वर्षांपासून छळत असलेले मुस्लिमविरोधाचे हत्यार स्वत:हून संपवले. मुस्लिमांच्या दानवीकरणाचे एक शस्त्र भाजपने कमी केल्यामुळे तुर्तास त्यांचे आभार मानूया.
प्रस्तावित कायद्यानुसार एकतर्फी घटस्फोट (तलाक ए बिद्दत) बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. अशा प्रकारे तलाक देणाऱ्या पतीला पोलीस वारंटशिवाय अटक करू शकतात. दोषी पतीला ३ वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. संशोधन विधेयकात ३ वर्षांच्या कारावासाची तरतूद तशीच ठेवण्यात आली आहे. आधीच्या विधेयकात तिहेरी तलाक दिल्याची तक्रार कोणालाही करता येत असे. त्यात बदल करून आता फक्त पीडित महिलेचे रक्ताचे नाते असलेले नातेवाईकच ट्रिपल तलाक दिलेल्या पतीविरोधात तक्रार करू शकणार आहेत. पहिल्या विधेयकात पतीला जामिनाची तरतूद नव्हती आता मॅजिस्ट्रेटला तो अधिकार देण्यात आला आहे. शिवाय कायद्यात पुन्हा मनोमिलन करण्यासाठी काही अटींसह समझोत्याला जागा ठेवण्यात आलेली आहे. नव्या तरतुदींमुळे पीडित पत्नीला मुलांचा ताबा दिला जाऊ शकतो. त्यांच्या भरण-पोषणासाठी मॅजिस्ट्रेट स्त्रीला ‘निर्वाह भत्ता’ मिळवून देऊ शकतो.
राज्यसभेत उपरोक्त विधेयकाच्या बाजुने ९९ तर विरोधात ८२ मते पडली. लोकसभेत २५ जुलैला हे विधेयक मांडण्यात आलं होतं. त्यावेळी विधेयकाच्या बाजुने ३०३ तर विरोधात ८२ मते पडली होती. दोन्ही सभागृहात विधेयकाला विरोध दर्शवत जदयू, टीएसआर, वायएसआर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला.
प्रस्तावित विधेयकावर अनेक स्तरातून मिली-जुली प्रतिक्रिया आल्या. बहुतेक जणांनी केंद्रातील भाजप सरकारला शुभेच्छा दिल्या. सत्तापक्षातील वादग्रस्त विधाने करणाऱ्या सर्वांनी विधेयकाला साहसी पाऊल म्हटले. तर पंतप्रधान मोदींनीही या ऐतिहासिक दिवशी कोट्यवधी मुस्लिम माता-भगिनींचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली. तर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसेदच्या दोन्ही सभागृहांनी मुस्लिम महिलांना न्याय मिळवून दिला. ही भारताच्या परिवर्तनाची सुरुवात आहे अशी प्रतिक्रिया दिली.
३१ जुलैला दिवसभर सोशल मीडियाने सरकारवर शुभेच्छांचा पाऊस पाडला. भाजपच्या महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी बुरखा व स्कार्फ घालून मिठाई वाटल्याचे फोटो ही व्हायरल झाले. विविध महिला संघटनांनी विधेयकाचं स्वागत गेलं. ऑल इंडिया मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाच्या शाईस्ता अंबर यांनी विधेयकाचे स्वागत करत सरकारला धन्यवाद दिले. मात्र त्यांनी तलाकबंदीच्या कायद्याच्या गुन्हेगारीकरणाचा विरोध केला.
विधेयकावर अनेक राजकीय प्रतिक्रियादेखील उमटल्या. विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्राने फसवणूक करून विधेयक मंजूर करून घेतल्याचा आरोप केला. तुणमूल काँग्रेसच्या डेरेक ओब्रायन यांनी तीन दिवसात तीन विधेयक मंजूर करणे म्हणजे पिज्जा डिलिव्हरी आहे का, असा टोला लावला. याच पक्षाचे बंगाल सरकारमधील मंत्री सिद्दिकुल्लाह चौधरी यांनी, ट्रिपल तलाक विधेयक मंजूर होणे दुख:द बाब अस्लायचं मत व्यक्त केलं. सरकारचे हे पाऊल म्हणजे इस्लामवर हल्ला आहे, असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तिहेरी तलाकची प्रथा रद्द केल्याच्या भाजपच्या आनंदात शुक्रवारी अचानक विरजन पडलं. तिहेरी तलाक विधेयकाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका दाखल झाल्या. पहिली याचिका जमियतुल उलेमाच्या केरळ शाखेनं सुप्रीम कोर्टात तर दिल्लीचे वकिल शाहिद अली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेत दावा केला आहे की, हे विधेयक राज्यघटनेचे कलम १४, १५ आणि २१ चे उल्लंघन असून त्याला रद्द करावे, अशी मागणी केली आहे. संघटनेनं आपल्या याचिकेत असाही दावा केला आहे की, तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणल्यामुळे त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. कारण संबंधित कयद्यात अशी कुठलही व्यवस्था नाही जी घटनेच्या तथ्यांची पुर्तता करू शकेल.
लोकसभेत २५ जुलैला एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींनी हे विधेयक मुस्लिम महिलांसोबत भेदभाव करणारा असल्याचा आरोप केला. सरकारचे विधेयक राज्यघटनेच्या कलम १४ आणि कलम १५चे उल्लंघन करणारे असल्याचं सांगत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. त्याचवेळी सबरीमला मंदिरातील महिला प्रवेशावर केंद्र सरकार गप्प का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने अडल्ट्री (व्यभिचार गुन्हा नाही) व समलैंगिकतेचा अधिकार दिला आहे, अशावेळी तिहेरी तलाक हा गुन्हा कसा ठरवला जाऊ शकतो? हीच नवभारताची निर्मिती आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इस्लाममध्ये लग्न एक करार आहे. वर्षानूवर्षे एकच पती किंवा पत्नी सांसारिक आयुष्यात न पटण्यासारखं आहे. एक दिवस घरी नाही गेलो की त्या पतीची काय अवस्था होते, हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे त्या पती-पत्नीला एका जन्मापुरते राहू द्या. तुम्ही जर नवऱ्याला जेलमध्ये घातलं तर तो पोटगी कुठून देईल? जर नवऱ्याला तीन वर्षांशी शिक्षा होणार असेल तर बायकोने अशा लग्नाच्या बेडीत राहण्यात काय अर्थ आहे? तिला नको असलेल्या लग्नातून मुक्तीची तरतूद का नाही. का तिने तोच नवरा सहन करावा. त्या नवऱ्याला जामीन मिळावा की नाही, हे कोर्टांनी ठरवावं. ते तुम्ही का ठरवत आहात?” संबधित कायदा आणून हे सरकार मुस्लिम महिलांवर अत्याचार करत आहे, अशी टीका ओवेसींनी केली. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत या कायद्याचा विरोध करत राहीन असेही ओवेसी म्हणाले.
राज्यसभेत मंजूर झालेल्या विधेयकावर प्रतिक्रिया देताना एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसींनी विधेयकाला आव्हान देण्याचा इशारा दिला होता. ओवैसी ऑल इंडिया मुस्लिम मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आहेत. तिहेरी तलाकबंदी विधेयकाला बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, असा सल्लाही दिला होता. दुसरीकडे विधेयकावर प्रतिक्रिया देताना जमात ए इस्लामी आणि जमियत ए उलेमा ए हिंदने मुस्लिमांनी तिहेरी तलाकपासून स्वतचा बचाव करावा, अशी सूचना दिली होती. दोन्ही संघटनांनी राजकीय द्वेषबुद्धीने विधेयक आणल्याचा आरोप केला होता.
घटनात्मक पेच
आवश्यकतेची परिस्थिती नसताना केलेली शिक्षा ही जुलूमी असतेअसं माँटेस्क्यूचं प्रसिद्ध विधान आहे. सरकारच्या नव्या कायद्याच्या बाबतीच तेच झालं आहे. कोर्टाने एका बैठकीत दिला जाणारा तलाक घटनाबाह्य म्हणजे रद्द ठरवला आहे. म्हणजे तो घटस्फोट ग्राह्य मानला जाणार नाही. अर्थातच जो गुन्हा घडलाच नाही त्याची शिक्षा सरकार का देऊ करत आहेजर तिनदा तलाक देऊन तो पती-पत्नी एकाच घरात राहत असतील तर तो गुन्हा कसलाजर त्याने विवाहविच्छेद केला तर पत्नी तक्रार दाखल करू शकते. पण नागरी गुन्ह्यासाठी फौजदारी शिक्षेची तरतूद का केली आहे?
जिथे एखाद्या व्यक्तीचे नुकसान होतेअसे खासगी गैरव्यवहार किंवा व्यक्तिगत अधिकार यांच्याशी दिवाणी कायदा संबंधित असतो. त्यामुळे अशा प्रकरणात नुकसानभरपाई पुरेशी मानली जाते. याउलटजिथे केवळ एखाद्या व्यक्तीलाच इजा पोहोचते असं नाहीतर एकंदरीत संपूर्ण मानव समाजाच्या हितालाच बाधा पोहोचतेअशा परिस्थितीशी फौजदारी कायदा संबंधित असतो. अर्थातचइथे केवळ नुकसानभरपाई पुरेशी मानली जात नाहीतर त्या प्रकरणात शिक्षाही ठोठावली जाते. समाजाच्या वतीने शासन त्या आरोपीविरोधात फौजदारी खटला चालवते. (फैजान मुस्तफा). अशा परिस्थितीत पत्नीला तिनदा तलाक शब्द उच्चारणे हा गंभीर गुन्हा कसा काय ठरू शकतो?
जिथे नागरी कायदे पुरसे आहेत तिथे फौजदारी कायद्याची गरज नाही. याउलट असे काही गंभीर गुन्हे आहेतजिथे तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यात दंगल घडविणेप्राणघातक शस्त्र बाळगणेसमाजात वैरभावना पसरवणेनकली नोटा तयार करून त्या चलनात आणणेएखाद्या समूहाच्या धार्मिक श्रद्धांचा हेतूपुरस्सर आणि द्वेषभावनेने अपमान करणे इत्यादी. याउलट लाच घेतल्यास १ वर्षाचा कारावासप्राणघातक रोगांचा प्रसार होण्यास कारणीभूतअन्न व खाद्य वस्तुमध्ये भेसळइतरांचे आयुष्य किंवा वैयक्तिक सुरक्षेस धोका निर्माण होईल असं कृत्य इत्यादी गुन्ह्यासाठी ६ महिन्याची जेल किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे.
शस्त्राची मूठ
आपला समाज हा पुरुषप्रधान मानला जातो. या व्यवस्थेत स्त्री हिंदू किंवा मुस्लिम नसते तर ती केवळ एक अबला महिला असते. त्यामुळे पुरुष या कायद्यातून पळवाट काढेलच. शिक्षा भोगून आल्यावर तो पत्नीला नांदवेल अशी शक्यता फार कमी आहे. तसेच पतीला तुरुंगात पाठवल्यावर त्याचे कुटुंबीय त्या पीडित स्त्रीला सन्मानाची वागणूक देणार काअर्थातच नाही. उलटहा कायदा मुस्लिम स्त्रियांचे जगणे दूभर करणार आहे. पतिविरोधात तक्रार केल्यानंतर तिचे लग्न तर टिकणारच नाहीउलट हक्काची छतही तिच्या डोक्यावर राहिल की नाहीयाबद्दल साशंकता आहे.
पतीला तुरुंगात पाठवल्यावर त्या पत्नीला घरात ठेवून घेईलखरंच इतकी प्रामाणिक व नीतिवान कुटुंब व्यवस्था आहे का हो आपलीतलाक न घेताही स्त्रिया पतीच्या घरातून बेदखल होऊ शकतात. अशावेळी कुठला कायदा तिच्या वैवाहिक व कौटुंबिक अधिकारांच्या बाजुने उभा राहिलकुठल्या कायद्यातून तिला संरक्षण मिळू शकेल?
वास्तविक पाहताजर कुण्य़ा स्त्रिला आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचे असेल तर तिने कायदेशीर मार्गाकडे वळावे. जर कायद्यातून कुटुंब उद्ध्वस्त होत असतील तर कुठली महिला हे पाऊल उचलेलएका महिलेला सुखी कुटुंब हवे असतेत्यासाठी ती आयुष्यभर खस्ता खात असते. त्याग करत असते. इच्छा-आकाक्षांना तिलांजली देत असते. मग ही भारतीय स्त्री का म्हणून स्वत:हून आपले कुटुंब रस्त्यावर आणेलसरकारने तिला कायद्याचा आधार देण्याऐवजी ‘जाच’ दिला आहे. कायदा तर मानवाच्या हितासाठी व कल्याणासाठीत्याला सुरक्षा पुरवण्यासाठी असतो. सरकारच्या बहुचर्चित कायद्यातून या अपेक्षा पूर्ण होतात काएका महिलेला तिच्या विवाहालातिच्या नात्याला व तिच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी कायद्याची गरज असते. तिची ही गरज अस्तित्वात असलेल्या ‘कौटुंबिक हिंसाचारविरोधी विधेयक-२००५’ मधून पूर्ण होऊ शकते. मग नव्या कायदा करण्याची गरज काय होती. याच कायद्याला अजून बळकट केले असते तर मुस्लिम महिलाच काय तर सर्व जातीसमूहाच्या व धर्माच्या महिलांना कायदेशीर संरक्षण मिळू शकलं असतं.
वास्तविकया कायद्याने महिलांचे जगणे व त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या शस्त्राची मूठ पुरुषांना देऊ केली आहे. तलाक न देता मुस्लिम पुरुष पत्नीला वाऱ्यावर सोडू शकतो. त्याला कायदा अडसर ठरू शकत नाही. प्रस्तावित कायद्यामुळे भाजपचा हट्ट तेवढा पूर्ण होणार पण मुस्लिम महिलांचे वैवाहिक प्रश्न सुटणार नाहीततर ते अधिक अंधकारमय होऊन गुंतागुंतीचे होणार आहेत. 

कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: संभ्रमित करणारा तलाकबंदी कायदा
संभ्रमित करणारा तलाकबंदी कायदा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEikl1Jg2cgP0WJN4gnXbFPXwX4kqT7Om5s6UEgt4vRY8NF998_GFFyy4ur59fG_mtHcDceG-UpeJiMNUSHIfUc3FgM0tR7HVFbOeF_rcz2ZQaCcvH-8WH3d9jqMGd2Kvw2FYDpxSHlJlJ6c/s640/855272-triple-talaq1.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEikl1Jg2cgP0WJN4gnXbFPXwX4kqT7Om5s6UEgt4vRY8NF998_GFFyy4ur59fG_mtHcDceG-UpeJiMNUSHIfUc3FgM0tR7HVFbOeF_rcz2ZQaCcvH-8WH3d9jqMGd2Kvw2FYDpxSHlJlJ6c/s72-c/855272-triple-talaq1.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/08/blog-post_4.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/08/blog-post_4.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content