दंगलीचं शास्त्र आणि भाजप

बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या नियोजित दंगली आटोक्यात आल्या असल्या तरी पीडितांची मनं निखाऱ्यात अजूनही धगधगत आहेत. मस्जिद आणि दर्ग्यांवर हल्ले करून त्याचे व्हिडिओ फूटेज सोशल मीडियातून यथोचित प्रसारण सुरू आहे. अशी दृष्ये विनासेन्सॉर दाखवून ‘गोदी मीडिया’ वातावरण भडकावण्याचे कंत्राट पूर्ण करण्याचं काम करत आहे. 
टीव्हीवरून प्रथमच दंगलीची भयानक दृष्ये वारंवार दाखवले गेली. ही दृष्ये पाहून देशभऱातील आर्थिक घुसमट व बेरोजगारीच्या दरीत कोसळलेल्या सामान्य जनतेची मानसिकता दंगली घडविण्यासाठी तयार होणं साहजिकच आहे. भाजप सरकार आणि मीडियाची ही घातकी माऩसिकता कोबरा पोस्टनं उघडकीस आणली आहे. पण यावर सरकार व मीडियाला उत्तर मागण्याऐवजी विरोधी पक्षानं ‘संधी’चं राजकारण सुरू केलं आहे.
हिसेंचे गौरवीकरण 
भाजपकृपेनं रामनवमीच्या मिरवणुकीच्या निमित्तानं देशात दंगली घडविण्याचा आयोजन करण्यात आलं. राजस्थानच्या जोधपुरला मुस्लिम मजूर अफराजुलचा खूनी शंभू रेगरचं गौरवीकरण करून शोभायात्रा काढली गेली. लोकशाही देशात कथित लव्ह जिहादला संपवणारा वीर म्हणून विकृत शंभूला प्रचारित करण्यात आलं. यावर पोलीस व गृहयंत्रणेची दर्शकाची भूमिका पार पाडली. काही ठिकाणी रामनवमी शोभायात्रेत सरकारी वर्दीत बंदोबस्ताला असलेले पोलीस राम-नामाचा गजर करत नाचताना दिसले. काही ठिकाणी नंग्या तलवारी घेऊन मुस्लिम व अल्सपंख्याकांना पोलीस भीती दाखवत होते.
बिहारमध्ये राजदला तिलांजली देऊन समाजवादी म्हणवणाऱ्या नीतिशकुमार यांनी भाजपशी सूत जुळवलं आणि राज्यात हिंदू धर्मवाद्यांचा उत्पात सुरू झाला. तीन वर्षात न घडलेलं मॉब लिचिंग भाजप सरकार स्थापनेच्या काहीच दिवसात घडलं. राजदपासून फारखत घेतल्यापासून राज्यात आत्तापर्यंत 200 सांप्रदायिक दंगली घडल्या आहेत. 
मार्च महिन्यात तब्बल 30 धार्मिक दंगली घडल्या आहेत. बहूतेक घटना अशावेळी घडल्या ज्यावेळी हिंदूंची धार्मिक शोभायात्रा मुस्लिमांच्या मोहल्ल्यातून गेली. दंगली आता तर सरकारचे मंत्री थेट दंगलीचं नियोजन करत आहेत. पण नीतिशकुमार सरकारनं त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घालणं सुरू केलं आहे. 
बिहारचे जंगलीराज
'सुशासन बाबू' म्हणून प्रतिमा असलेले नीतिशकुमार दंगलीवर गप्प आहेत. दंगेखोर दिवसा-ढवळ्या मुस्लिमांवर हल्ले करत आहेत, त्यांच्या धार्मिक स्थळांची विटंबना करत आहेत. पण सुशासन बाबू कुठलीच कारवाई न करता ‘नागपूर हेडक्वॉटर’चे आदेश पाळताना दिसत आहेत. सरकारनं आपले मंत्री पदाधिकारी दंगली घडविण्यासाठी मोकाट सोडलेत. केंद्रातील भाजप सरकारनं पश्चिम बंगालला दंगलीचा अहवाल मागितला आहे पण बिहारच्या सुशासन बाबूला पाठीशी घातलं आहे. 
नीतिशकुमार यांना दंगलीचा जाब न विचारता ममता दिदींनं नोटीस पाठवलीय, याचं कारण स्पष्ट आहे, बिहार दंगली भाजपच्या पदाधिकाऱ्यानं घडविल्याचा आरोप आहे. दुसरं म्हणजे थर्ड फ्रंटची बांधणी करत ममता दिदीनं भाजपला 2019 साठी मोठ्या दडपणात टाकलं आहे. 
थर्ड फ्रंटची भीती
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राज्यात शांतता प्रस्थापित करण्याऐवजी भाजपविरोधात ‘थर्ड फ्रंट’ उभं करण्याची मोट बांधत आहेत. तसं पाहिलं तर ममता बॅनर्जीचं काम कौतुकास्पद आहे, पण त्यांनी साधलेली वेळ चुकीची आहे. ‘सांप्रदायिक भाजप’ला त्यांनी आयती संधी देऊ केली आहे, त्यामुळे केंद्रीय उच्चशिक्षण व मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर पेपर लीकवर बोलण्याऐवजी ममता दीदींवर तोंडसुख घेत आहेत. 
तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नाने भाजपची झोप उडाली आहे. त्यामुळे सरकारचे मंत्री आणि उपराष्ट्रपती घटनात्मक जबाबदाऱ्यांना केराची टोपली दाखवत विरोधकांवर टीका करत सुटले आहेत. क्षुल्लक गोष्टींवर ट्वीट करणारे प्रधानसेवक दंगली आणि लीकेजच्या श्रृखलेवर गप्प आहेत. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना प्रधानसेवकांना ‘वीक चौकीदार’ म्हणत झापलं आहे.
भाजपचे नेते आणि पदाधिकारी सरकारी काम सोडून दंगली घडविण्याचा काम यथोचित पार पाडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये संचारबंदी लागू असताना भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो रॉकेल ओतण्यासाठी पोहचले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मज्जाव केला तर बाबुल सुप्रियो यांनी अधिकाऱ्यांना हाणामारी केली, त्यांच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मारहाणीचा खटला भरला आहे. यावरुन भाजपनं राजकारण तापवलंय. 
दुसरीकडे भाजपचे केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा मुलगा अरिजित चौबे याच्यावर दंगली भडकवल्याचा आरोप आहे, कोर्टाने त्याच्याविरोधात अटक वारंट जारी केलं आहे, पण अजूनही पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. भाजपनं पोलीस आणि न्यायव्यस्था आपल्या खिशात कोंबून ठेवल्याचा हा पुरावा आहे. राजरोसपणे दंगेखोर नासधूस करत फिरत आहेत. बंगाल व बिहार साप्रदायिक दंगलीनं होरपळलं आहे, पण भाजपनं त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुस्लिमांवरोधात मोकाट सोडलं आहे. 
दंगलीला कोण जबाबदार?
रामनवमीच्या दंगलीवर राजद नेते तेजस्वी यादव यांनी सरसंघचालक मोहन भागवतांना जबाबदार ठरवलं आहे. दंगली कशा भडकवायच्या त्याचे प्रशिक्षण भागवतांनी दिलं असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.
आर्थिक बकालपण, करांचा वाढता बोजा, बँकांचा पैसा लूटी, लोकांचा खाजगी डेटाची विक्री, खाजगी अधिकारांची गळचेपी इत्यादी मुद्दे देशातील सामान्य जनतेला छळत आहेत. परिणामी सरकार व मुख्य न्यायाधिशाविरोधात अविश्वास प्रस्तावाची मागणी सुरु आहे. 
सरकार यावर चर्चा करण्याऐवजी पळ काढत आहे. विरोधकांनी नॉऩ इश्शूजचे राजकारण करत मूळ मुद्दे दुर्लक्षित केले आहेत. त्यामुळे सरकारला उगारण्यासाठी अस्त्र भेटले आहे. चालू आडवड्यात संसदेचं कामकाज फक्त सोळा मिनिटे चालले. त्यामुळे सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही. भाजप सरकारलाही तेवढंच हवं होतं. 
विरोधी आपलं उपद्रव्य मूल्य दाखवण्याच्या भानगडीत सभागृहाचं कामकाज रोखत आहेत. नुकतंच (२१ मार्च) सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश जे चेलमेश्वर यांनी मुख्य न्यायाधिशांना पुन्हा एकदा पत्र लिहून चर्चेची मागणी केली आहे. न्यायव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेपाला या न्यायाधिशांनी विरोध केला आहे, पण मुख्य न्यायाधिश दीपक मिश्रा मौन बाळगून आहेत.
सांप्रदायिकतेची बीजं
आर्थिक आणि विकासाचं राजकारण बाजूला सारत भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरणाला खतपाणी घालणं सुरू आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी हिंदुवादी संघटनांच्या मदतीनं देशात अराजक माजवलं आहे. विकासाचे मुद्दे बाजूला पडत राम मंदिराचा मुद्दा पुढं केला जात आहे. 
मीडियाला हाताशी धरून सांप्रदायिकतेची बीजं पेरली जात आहेत. कोबरा पोस्टचे स्टिंग पाहिल्यास याचा अंदाज येऊ शकतोे. नुकतंच जेएनयूचा बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमदच्या आईनं दोन न्यूज चॅनलवर मुलाची बदनामी केल्याचा खटला भरला आहे. नजीब आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा खोटा बनाव या न्यूज चॅनलनं रचला होता. मुलाची बदनामी केल्याप्रकरणी २ कोटीचा दावा नजीबच्या आईनं ठोकलाय. याआधी झी न्यूजवर वैज्ञानिक गौहर रजा यांनी देशद्राही म्हणत बदनामी केल्याप्रकरणी खटला भरला आहे. 
फेक न्यूज पब्लिश करून सांप्रदायिक वातावरण तयार केल्यानं कर्नाटक पोलिसांनी 'पोस्ट कार्ड'च्या संपादकाला बेड्या ठोकल्या आहेत. भाजप सरकारच्या काळात प्रसारमाध्यमांची कधी नव्हे तर इतकी बदनामी होत आहे. प्रथमच सर्वसामान्य नागरिक मीडियावर कोलित उगारत आहेत. कोबरा पोस्टनं तर या प्रसारमाध्यमांच्या अब्रूंचे धिंडवडे काढलेत.
बिहार व पश्चिम बंगालची दंगल पाहून देशात २०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं कळतंय. भगवान रामाच्या नावानं देशात हिंदू-मुस्लिम दूही पसरवण्याचं काम भाजपकडून जारी आहे. दोन्ही राज्यात मुस्लिमांची घरे व व्यावसायिक प्रतिष्ठानं लक्ष्य करण्यात आहेत. 
आठएक जिल्हे दंगलीत धुमसत आहेत. रोजगार मागणारे हात हातात लाठ्या-काठ्या-दगडं-विटा घेऊन आपल्याच बंधू-भावांवर उगारत आहेत. आपल्याच शेजाऱ्याला त्रिशूळ दाखवून रक्तपात घडवत आहे. घर-कुटुंब-नोकरी-शिक्षणाचे प्रश्न विसरून संधीसाधू राजकारण्यांचं इंधन बनत आहेत. चार वर्षापूर्वी भ्रष्टाचार व लोकपालसाठी रस्त्यावर उतरणारा तरूण वर्ग आज सांप्रदायिक फेसबुक पोस्ट टाकून सत्ताधारी पक्षाला रसद पुरवत आहे. अण्णा हजारे दिल्लीत एकट्यानंच उपोषण करुन बेदखल झाले. 
वाचा :  ‘धार्मिक-सांस्कृतिकविविधता संपवण्याचा डाव’
वाचा : मानवी ढाल समर्थनाचं 'डर्टी वॉर'
२०११ला पाठींबा देणारे केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण, रामदेवबाबा यावेळी उपोषणस्थळावर फिरकलेसुद्धा नाहीत. भाजपनंच सिसीटीव्हीतून मॉनेटरिंग करून आण्णांवर लक्ष ठेवलं. पण आठ वर्षांपूर्वी भ्रष्टाचारावर बोलणारा तरुण आज काही चोरट्यांनी बँकांचा कोट्यवधींचा पैसा पळवला तरी गप्प आहेत. गेल्या चार वर्षांत झालेला हा बदल चिंतनीय आहे.

कलीम अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: दंगलीचं शास्त्र आणि भाजप
दंगलीचं शास्त्र आणि भाजप
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgFmuGICKTmBs3__WNbAdKpTscRV2kr3l8rcx5YVQlvE1Jmxt5UmQ5BC5WJRbN-PlsybS6RA7cwoTnYPv0zx3wUi9jm71PSdmFAYzoGlWN1a5IE1tGYtXMXrDvFH0zLUyNj7PFNj-croTpo/s640/dilip_ghosh_in_ramnabomi_with_wepons_2553698_835x547-m.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgFmuGICKTmBs3__WNbAdKpTscRV2kr3l8rcx5YVQlvE1Jmxt5UmQ5BC5WJRbN-PlsybS6RA7cwoTnYPv0zx3wUi9jm71PSdmFAYzoGlWN1a5IE1tGYtXMXrDvFH0zLUyNj7PFNj-croTpo/s72-c/dilip_ghosh_in_ramnabomi_with_wepons_2553698_835x547-m.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/04/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/04/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content