'हेट क्राईम' लोकशाही मूल्यांना घातक

त्तर प्रदेशच्या बागपतमध्ये बुधवारी 22 नोव्हेंबरला तीन मुस्लीम तरुणांना काही अज्ञातांनी रेल्वेत जीवघेणी मारहाण केली. त्या तरुणांचा पेहराव व त्यांनी घातलेली टोपी हाणामारीमागचं प्रमुख कारण होती. दिवसाढवळ्या असे धर्मद्वेषी हल्ले होत आहेत, अशा अवस्थेत सामान्य मुस्लीम भयग्रस्त वातावरणात जीवंत राहण्याची भीक मागत आहे. 
इस्लाम फोबिया नंतर आता भारतात मुस्लिम फोबियाचा ज्वर काही कट्टरपंथीयामध्ये वाढू लागला आहे. ठोबळमानाने व आपल्या दांभिक सोयीसाठी बोटावर मोजण्याइतके ही लोकं असल्याचं आपण म्हणतो. यावर सर्वांचे चटकन एकमत होतं, पण वर उल्लेखित घटना पाहता यात एकूण सर्वजण मुस्लिमोफोबियांनं ग्रस्त असल्याचं जाणवतं. ट्रेनमध्ये त्या तरुणांना ज्यावेळी मारहाण होताना मदतीसाठी आवाज देऊनही सीटवरुन कुणीच उठत नव्हतं, ही बाब खरंच धक्कादायक आहे. याच पॅटर्न मागच्या इतर तीन धर्मद्वेषी घटनांमध्ये घडला आहे.

बारा जुलैला यूपीच्या फर्रुखाबादमध्ये एका मुस्लीम कुटुंबाला रेल्वेत मारहाण करण्यात आली, त्यावेळी महिला व वृद्धांना हल्लेखोर छळताना कोणीच त्यांच्या मदतीसाठी आलं नाही. असाच पॅटर्न जुनैदच्या बाबतीत घडला, पण हा मोड्यूल अजूनही धक्कादायक होतं, कारण रेल्वेत बसलेले अन्य प्रवासी हल्लेखोरांना चेतवत होते. 

ठाराविक सरकारी गुंडामध्ये असलेली ही प्रवृत्ती सामान्य जनतेमध्येही अवतरली आहे. त्यावेळी लोकशाही भारताबद्दल खरंच चिंता व्हायला लागते. धर्म व वर्णद्वेषाच्या हिसंक प्रवृत्तीने आपण सर्वजण ग्रस्त झालो आहोत. त्यामुळे आज ही वेळ केवळ मुस्लिमांवर आहे असं समजू नका, उद्या कदाचित हीच वेळ बहूसंख्यांवरही येईल, त्यावेळी खरंच आपली काय भूमिका असेल...

बुधवारी 22 नोव्हेंबरला काही अज्ञातांनी गुलजार अहमद, अबू बकर, मोहम्मद इसरार या मुसलीम तरुणांना रेल्वेत जबर मारहाण झाली. तर उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत सायरा नावाच्या मुस्लीम महिलेचा बुरखा जाहीररीत्या उतरवण्यात आला. 

तिसरी घटना मुंबईत घडली. अफरोज नावाच्या एका स्वच्छता दूत तरुणाला काही जणांनी जबर मारहाण केली. तर अन्य एका घटनेत उत्तर प्रदेशच्य़ा बारंबाकी जिल्ह्य़ातील मिशनरी शाळेनं एका मुस्लीम विद्यार्थींनीला स्कार्फ घातला म्हणून शाळेबाहेर जाण्यास सांगितलं. या घटना प्रथमदर्शनी हेट क्राईमचा भाग असल्याचे स्पष्ट आहे. परिणामी या घटनांचे पडसाद देशभरात उमटले. 
सोशल मीडियावरुन राग व संताप व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी हैशटॅग हेट क्राईम ट्वीटरवर टॉप ट्रेंडमध्ये होता. वरील घटना मुस्लिमोफोबियाचा भाग असल्याची प्रचिती आहे.

बागपतचे तीन मुस्लीम तरुण दिल्ली ते हरिद्वार रेल्वेने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान बागपतजवळ या तरूणांना मारहाण झाली. तीनही तरुण मदरसा शिक्षक आहेत. पीडित गुलजारने बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रीयेत तो म्हणतो, “त्यांच्याजवळ धारदार शस्त्र होतं, या हत्याराने आमच्यावर हल्ला सुरु केला, आम्हाला त्यावेळी काहीच सूचत नव्हतं, आम्ही ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांना मदतीसाठी आवाज देत होतो पण कोणीही आमच्या मदतीला येत नव्हतं, आम्ही हल्लेखोरांना विचारत होतो काय झालं आम्हाला सांगा तरी, पण ते काहीच बोलत नव्हते, नंतर काही वेळाने ते म्हणाले टोप्या घालून फिरता व्हंय, आम्ही दाखवतो तुम्हाला टोपी घातल्याने काय होतं, दादागिरी करता ना काढतो तुमची दादागिरी”
वाचा : शरफुद्दीन मारला गेला, कारण तो ‘खान’ होता?

वाचा : अफराजुलची हत्या - हिंस्रपणाचा कळस
गुलजार पुढे म्हणतोय की "मारहाण करणारे एकूण सातजण होते. स्टॉप आल्याने आम्हाला उतरायचं होत, तसं हल्लेखोरांना आम्ही सांगतलं, पण ते काहीच ऐकत नव्हते नुसते मारहाण करत होते, आमच्या अहेरा स्टॉपवर ट्रेन थांबली, आम्ही विनवण्या करत होतो, पण तो दरवाजा बंद करुन उभे होते, काही वेळात ट्रेन पुढे निघाली आम्ही घाबरलो, आम्हाला माहित नव्हते की आमच्यासोबत काय होणार आहे, अर्धा किलोमीटरट्रेन पुडे गेल्यावर आम्ही चैन खेचली व पळून गेलो, आठ किलोमिटरपर्यत जाऊन बागपत स्टेशनवर थांबलो”
बागपतच्या घटनेने एक पुन्हा एकदा सिद्ध झाले की मदतीसाठी याचना करुनही रोणी पुढे येत नव्हते. खरंच इतकी मानवीयता दुभंगली आहे का हो आमची? याद राखा अत्याचाराला प्रतिकार न करणारे आपण सर्वजण नुसते षंड नसून त्या हल्लेखोरांची साथी होत आहोत. 

घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबरला मंगळवारी उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात सीएमची जाहीर सभा होती. या सभेत एका मुस्लीम महिलेचा बुरखा जाहीररीत्या उतवरण्यात आला. भर सभेत सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी त्या महिलेला बुरखा काढण्यास भाग पाडले. अनेक ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव महिलांची तपासणी केली जाते. ही चेकिंग बंद खोलीत केली जाते, जाहीररीत्या नाही, मग यूपी पोलिसांना त्या मुस्लीम महिलेला सार्वजनिक स्थळीबेअब्रू करण्याचा अधिकार कोणी दिला? विशेष म्हणजे सायरा या भाजपच्याच महिला पदाधिकारी होत्या.
2014च्या सत्तातरानंतर देशात झुंडीच्या मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलं आहे. विशिष्ट समुदायाविरोधात द्वेषबुद्धी तयार करुन अनामिक शक्तीद्वारे झुंड वापरली जात आहे. यासाठी​ ​डिजिटल​ ​यंत्रणा​ ​अर्थात​ ​इंटरनेटचा​ ​ वापर​ ​हिंसक​ ​व​ वातावरण​ ​तयार​ ​करण्यासाठी​ ​होतोय. धर्म, राजकारण, खोट्या​ बातम्या, धर्मद्वेषी​ ​ व वर्णद्वेषी मजकूर, एखाद्या समाजाबद्दल गैरसमज​ ​तयार​ ​करुन​ ​सोशल​ ​मीडियातून​ ​पसरवला जात आहे. 

कळत​ ​नकळत​ ​आपण सर्वांनी असा संदिग्ध मजकूर फॉरवर्ड केला आहे. त्यामुळे आपणही नकळतपणे त्या हिंस्र झुंडीला चेतवण्याला कारणीभूत होतो, याचा विसर पडता कामा नये. बागपत, फर्रुखाबाद व जुनैदची घटना कदाचित आपल्यामुळे तर घडलली नसावी याबद्दल आपण पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे.
गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हेट क्राईम डोकं वर काढू लागलं आहे. देशात भाजपकृपेनं तयार झालेलं असहिष्णू वातावरण लोकशाही व्यवस्थेला गिळंकृत करु पाहतो आहे. असं असताना सरकार व गृहमंत्रालय केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. 

जनतेच्या संरक्षणासाठी असलेली पोलिसी व्यवस्थाही जेव्हा पक्षपात करायला लागते, त्यावेळी खरंच लोकशाही व समानतेची मूल्ये तुडवली जात असल्याचं जाणवतं. केवळ धर्म वेगळा आहे म्हणून पोलीस सावत्र वागणूक देत असतील तर भारताचं भविष्य काय असेल अशी चिंता पडल्यावाचून राहात नाही.
गेल्या आठवड्यात एका-पाठोपाठ तीन-चार अशा हेट क्राईमच्या घटना घडल्या. सर्वामध्ये एक सूत्र समान होतं की ते म्हणजे सर्वजण मुस्लीम समाजाशी संबधित होते. यातील एकूण तीन घटना या उत्तर प्रदेशमध्ये घडल्या आहेत. यागी सत्तेत आल्यापासून यूपीत मुस्लीमविरोधी वातावरण मोठ्या प्रमाणात तयार झालं आहे. परिणामी राज्यातील मुस्लीम समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

वाचा : ‘मारो-काटो’ संस्कृतीचे समर्थन धोकादायक
मुस्लीम हेट क्राईमच्या तीन-चार घटना या एकट्या यूपीमध्ये घडल्या आहेत. योगी सत्ताधिष झाल्यापासून कट्टरवादी गटांना मोकळं रान मिळालं आहे. योगींचा हिदुत्तवादी व मुस्लीमविरोधी चेहरा या हल्ल्यामागचे सूत्र असल्याची मांडणी राजकीय अभ्यासक करत आहेत. 
नुकतंच मानवी आधिकार आयोगाने यूपी सरकारला वाढत्या गुन्हेगारीवर नोटीस बजावली आहे. योगी सत्तेत आल्यापासून राज्यात 433 एन्काऊंटर झाले आहेत. यावर मानवी अधिकार आयोगाने योगींना नोटीस बजावून सहा आठवठ्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. स्कॉल या वेबसाईटने उत्तर प्रदेशमध्ये वाढलेल्या हेट क्राईमवर एका लेखात सविस्तर भाष्य केलं आहे.
झुंडीला कुठलाच धर्म नसतो असं म्हटलं जातं. हिंसक झुंडीत जो कुणी सामील होतो तो क्रूर होतो, मग तो महिला पुरुषांमध्ये भद  बघत नाही, तसेच तो वयही बघत नाही.. काही महिन्यापूर्वी चोरीच्या आरोपावरुन एका महिलेला नग्न करुन तिची धिंड काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या महिलेला जीपवर बसवून शहरभर फिरवण्यात येत होतं. काहीजण त्या नग्न महिलेचा व्हिडिओ काढत होते. इथं झुंडीची मानसिकता त्या महिलेचे नग्न शरीर पाहण्याची होती. कदाचित कुणीही विचारलं नसेल की या महिलेला का फिरवत आहेत.
यापेक्षा धक्कादायक घटना जून महिन्यात झारखंडमध्ये घडली होती. मुलं चोरीच्या आरोपातून झुंडीने एका रात्रीत सहा जणांचा शिरच्छेद केला, यातील 4 जण मुस्लीम होते तर दोन जण हिंदू होते. धक्कादायक म्हणजे ती दोन तरुण ‘आम्ही हिंदू आहोत आम्हाला मारु नका’ म्हणत जिवाची भीक मागत होती, पण झुंड मानायला तयार नव्हती. अखेर त्या दोघांना कुटुंबायांसमोर हिंस्र झुंडीने ठार मारलं.

मृतकचे कुटुंबीय पीडितांचे ओळखपत्र दाखवत होते पण झुंड जीव घेण्यावर नडली होती, त्यामुळे त्याक्षणी झुंडीने त्या दोघांचा जीव घेतला. कुंटुबीयांसोमर त्या दोन तरुणांनी तडफडत जीव सोडला होता.
वाचा : उन्मादी जमावाचा पैटर्न कुठला?
झारखंडची घटना एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घेता येईल. कारण झुंडीचा मानसिकता फक्त हल्ला करण्याची असते.. आज मुस्लीम समुदायावर हल्ले होत आहेत. आपण फक्त बातम्या वाचून हळहळ व्यक्त करतोय. काहीजण हल्लेखोरांचं छुपं समर्थनही करत आहेत. सोशल मीडियाकडे आज पर्यायी व प्रभावी माध्यम म्हणून पाहिलं जातं, पण हेच हिंसक झुंड तयार करणारे अड्डे झाले आहेत. व्हर्च्युअल जगतात वारवरणारे हे हिंस्र श्वापद रस्त्यावर उतरले आहे.
ही हिंसक झुंड सरेआम लोकांवर हल्ले करत सुटली आहे. बागपत, जुनैद आणि फर्रुखाबादची घटना झुंडीची मानसिकता बदलल्याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. त्यामुळे सर्वाना एकदा ठरवावं लागेल या हिंस्र झुंडीला इंधन पुरवायचे का, त्यांचं इंधन व्हायचे..!

कलीम अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: 'हेट क्राईम' लोकशाही मूल्यांना घातक
'हेट क्राईम' लोकशाही मूल्यांना घातक
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj2m7scymzeSEJBC4jeUes1Za5oc5hRIKYOpJ6ZT_KAPT6pjFOR5k8QheE1EPSLSGQ_bto6xvrpePoNVSg88DdOYM1PMl87qUw230Bv2-Oo3NnFYoyQnH4D9F-LIMWaNxNXI0hyDmn4j0t1/s640/_98897899_gettyimages-452654260.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj2m7scymzeSEJBC4jeUes1Za5oc5hRIKYOpJ6ZT_KAPT6pjFOR5k8QheE1EPSLSGQ_bto6xvrpePoNVSg88DdOYM1PMl87qUw230Bv2-Oo3NnFYoyQnH4D9F-LIMWaNxNXI0hyDmn4j0t1/s72-c/_98897899_gettyimages-452654260.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2017/11/blog-post_26.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2017/11/blog-post_26.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content