जागतिक मानवाधिकार दिनाच्या पूर्वसंध्येला भारतात दोन अमानूष व नृशंस हत्या झाल्या. राजस्थानमध्ये झालेले हे दोन्ही खून ‘हेट क्राईम’चा भाग होते. एकात अलवर पोलिसांनी गौतस्कर म्हणून एन्काऊंटर केला तर दुसऱ्या एका घटनेत भाजपच्या हेटनेस राजकारणाचा राक्षस संचारलेल्या एका माथेफिरुने वृद्धाला जीवंत जाळून मारलं.
दोन्ही घटनेत मरणारे मुस्लीम होते. गेल्या तीन दिवसात राजस्थानमध्ये घडलेल्या या दोन घटनांनी सबंध देश हादरला, पण मीडिया कानोकान खबर नसल्यासारखा वागत होता. नृशंस हत्येपेक्षा मीडियाला राजकीय ‘नीचपणा’ जास्त महत्वाचा वाटला. शुक्रवारी 8 डिसेंबरला या घटनेच्या निषेधार्थ उदयपूरमध्ये मुस्लीम संघटनांनी भव्य निषेध मोर्चा काढला मीडियाने यालाही दुर्लक्ष केलं.
सात डिसेंबरला सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड झाला. ज्यात एक माथेफिरु एका वृद्धाला कुदळीने हल्ला करुन जीवे मारतो व त्याला पेट्रोल टाकून जाळून टाकतो. राजस्थानमधील राजमसंद शहरातील हा व्हिडिओ असल्याचं कळालं. हत्येचा व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओत हल्लेखोर खूनाची जबाबदारी स्वीकारतो, व म्हणतो ‘जे लव्ह जिहाद करतील त्यांना असेच मारलं जाईल.’
मरणारा पश्चिम बंगालमधील मुस्लीम मजूर होता. मारेकरी शंभूलाल हत्येनंतर 'प्रेम धर्मयुद्धा'वर (लव्ह जिहाद) अकलेचे तारे तोडतो. बघताना अंगावर शहारा येईल अशी चित्रफित नेटीझन्स शेअर करत होते. त्या 50 वर्षीय वृद्धाला आरोपी शंभू ज्या बिभत्सपणे व मानवतेला लाजवेल अशा पद्धतीने मारतो, त्या सर्व घटनेचं शुटींग करतो, हे खरोखरच अमानूष होतं.
मरणारा पश्चिम बंगालमधील मुस्लीम मजूर होता. मारेकरी शंभूलाल हत्येनंतर 'प्रेम धर्मयुद्धा'वर (लव्ह जिहाद) अकलेचे तारे तोडतो. बघताना अंगावर शहारा येईल अशी चित्रफित नेटीझन्स शेअर करत होते. त्या 50 वर्षीय वृद्धाला आरोपी शंभू ज्या बिभत्सपणे व मानवतेला लाजवेल अशा पद्धतीने मारतो, त्या सर्व घटनेचं शुटींग करतो, हे खरोखरच अमानूष होतं.
मयत मुहंमद अफराजुल हा पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातून रोजगारासाठी जयपूरपासून जवळ असलेल्या राजसमंद जिल्ह्यात आला होता. 50 वर्षीय मृत अफराजुलला तीन जावई आहेत. तो आपल्या पुतण्यासोबत गेल्या 12 वर्षापासून एका खोलीत राहात होता. त्याची मुलगी व जावईसुद्धा त्याच बिल्डिंगमध्ये राहातात.
स्थानिक दैनिक राजस्थान पत्रिकेनं शुक्रवारी अफराजुलच्या पुतण्याची प्रतिक्रीया छापली आहे. त्यात पुतण्या इनाउल म्हणतो, ‘माझा काका धार्मिक नव्हता कधीतरी शुक्रवारी नमाजला तो जाई, तो कधी कुणासोबत वाईट वागला नाही, कधी काळी इथून कुणीतरी एक मुलगी मालदाला पळवून नेली असेल तर त्याचा माझ्या काकाशी काय संबध?’
शनिवारी बीबीसीने दिलेल्या अफराजुलचा जावई म्हणतो, ‘पन्नास वर्षाचा म्हातारा कुणाशी प्रेमसबंध ठेवू शकतो, तो तीन लग्न झालेल्या मुलीचा बाप होता, तुच्छतावादातून ही हत्या झालीय, खूनीला कडक शिक्षा झाली पाहिजे’
स्थानिक दैनिक राजस्थान पत्रिकेनं शुक्रवारी अफराजुलच्या पुतण्याची प्रतिक्रीया छापली आहे. त्यात पुतण्या इनाउल म्हणतो, ‘माझा काका धार्मिक नव्हता कधीतरी शुक्रवारी नमाजला तो जाई, तो कधी कुणासोबत वाईट वागला नाही, कधी काळी इथून कुणीतरी एक मुलगी मालदाला पळवून नेली असेल तर त्याचा माझ्या काकाशी काय संबध?’
शनिवारी बीबीसीने दिलेल्या अफराजुलचा जावई म्हणतो, ‘पन्नास वर्षाचा म्हातारा कुणाशी प्रेमसबंध ठेवू शकतो, तो तीन लग्न झालेल्या मुलीचा बाप होता, तुच्छतावादातून ही हत्या झालीय, खूनीला कडक शिक्षा झाली पाहिजे’
बीबीसीचे रिपोर्टर दिलनवाज पाशा यांनी अफराजुल ज्या खोलीत राहात होता, त्या खोलीमालकाची 13 डिसेंबरला प्रतिक्रीया घेतली, त्यात तो म्हणतोय की 'अफराजुल खूपच शांत असे गेल्या अनेक वर्षात त्याचं कुणाशीही भांडण नव्हतं तो असं कृत्य करुच शकत नाही' शंभूला तात्काळ अटक करण्यात आली.
या नृशंस हत्येच्या निषेधार्थ देशभरात तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. अनेक ठिकाणी लाखोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरत आहेत. मानवी अधिकार दिनाच्या चार दिवस आधी ही घटना घडल्याने मानवाधिकार आयोगाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आयोगाने राजस्थान सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बीबीसीने अफराजुल यांच्या कुटुबांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.
अफराजुलच्या कुटुंबीयाने आरोप केला की ‘अफराजुल मुस्लीम असल्याने त्याला मारण्यात आले. आम्ही गरीब रोजगारासाठी परमुलूकाला आलोय. आम्ही कशाला कुणाच्या मुलीची छेड काढू’ आरोपीला तात्काळ फासावर लटकवावं अशी मागणी अफराजुलच्या कुटुंबीयाने बीबीसीकडे केली आहे. दुसरीकडे पश्चिम बंगाल सरकारने अफराजुलच्या कुटुंबीयांना 3 लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
दूसऱ्रीया एका घटनेत एका व्यक्तीला पोलिसांनी गाय-तस्कर म्हणून एन्काऊंटरमध्ये ठार मारलं आहे. अलवरमधली गेल्या सहा महिन्यातली ही तिसरी घटना आहे. गेल्या महिन्यात एकाला गोळी मारुन ठार मारण्यात आलं होतं. तर तीन आठवड्यावंतर पुन्हा एकदा पोलिसांनी गौ-तस्करीच्या संशयातून एकाला पाठलाग करत जीवे मारलं आहे. देशभरात गेल्या आठवड्यातील ‘हेट क्राईम’च्या पाच घटना घडल्या आहे. पण सरकार यावर गप्प आहे.
वाचा : दंगलीचं शास्त्र आणि भाजप
वाचा : उन्मादी जमावाचा पैटर्न कुठला?मीडियाची भूमिका
या घटनांवर समांतर मीडिया दोन दिवस या घटनांवर हळहळ व्यक्त करत होता, पण मेनस्ट्रीम पुन्हा-पुन्हा आपला ‘नीचपणा’ उगाळत होता. आठ डिसेंबरला ‘ऑल्ट न्यूज’नं एक लेख लिहून मीडियाच्या या बोटचेपी भूमिकेची चीरफाड केली. कशा पद्धतीने मीडियाने राजस्थानच्या घटनेकडे दुर्लक्ष करुन उथळ बातम्यांना प्राईम टाईमची जागा दिल्याचं विश्लेषण ऑल्ट न्यूजने केलंं.
इतकेच नव्हे तर प्रिंट मीडियाने मुख्य पानावर बातमी न देता आतल्या पानावर सिंगल कॉलम बातमी दिली होती. ऑल्ट न्यूजने मीडियाच्या एकूण 'हेट क्राईम'च्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करत भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच न्यूज लाँड्री व मीडिया विजिल या वेबसाईटनंही मेनस्ट्रीम मीडियाने प्राईम टाईममध्ये ‘नीचपणा’ केल्याबद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत.
देशात पहिल्यांदा असं होतंय की एका राजकीय पक्षाने पेरलेलं विषाचा दंश सामान्य माणसांच्या दातांतून वापरले जात आहे. द्वेश व तुच्छतावादाचे हे वातावरण एक-एक करुन प्रत्येक राज्यात पसरत आहे. भाजपने सामान्य माणसांच्या मनात मुस्लिम फोबिया पेरला आहे. केवळ द्वेषापोटी मुस्लीम समुदायावर हल्ले वाढले आहेत. सर्व हत्यांमध्ये एकच पॅटर्न वापरण्यात येतोय. नृशंस हत्येनंतर व्हिडिओ तयार करुन व्हायरल करणे, त्या व्हिडिओतून मुस्लिमांच्या मनात दहशत निर्माण करणे,असे समान पॅटर्न वापरले जात आहे. विशिष्ट समुदायाविरोधात द्वेषबुद्धी तयार करुन अनामिक शक्तीद्वारे झुंड वापरली जात आहे.
प्रत्येकाला जन्मापासूनच सन्मानपूर्वक व सुरक्षित वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा पुरवणे सरकार व प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु अलिकडे दोन- धर्मात कुरघोड्या व द्वेशाचं राजकारण करुन सत्ता टिकवण्याची भाजप करत आहे. मानवाच्या मृत्यूवर सरकार दरबारी राजकारण सुरु असते. मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी भाजप सरकार द्वेषमूलक राजकारणाची आयुधं वापरत आहे. परिणामी राज्यघटनेचे दिलेले अधिकार व मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. प्रशासन व पोलिसी यंत्रणा जातीयवादी व धर्मवादी झालेली आहे. त्यामुळेच अल्पसंख्याकांना न्यायाचा अधिकार नाकारला जात आहे. प्रशासनाच्या अशा व्यवहारामुळे मुस्लीम समुदायाचा विश्वास प्रशासन व न्यायपालिकेवरुन संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
कायदा सांगतो की प्रत्येक गुन्हेगाराला समान शिक्षा झालीच पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. कठोर शिक्षा फक्त मुस्लिमांसाठी आहे. इतर आरोपी व गुन्हेगार मोकाट सुटतात. मुस्लिमांच्या बाबतीत कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून समान शिक्षा देण्याची प्रक्रिया पाळली जात नाही. रविवारी मानवी हक्क दिन पाळला जाईल. अनेक उदाहरणे दिले जातील सरकार दरबारी कार्यक्रम होतील. मुस्लिमांच्या समान अधिकारांच्या गप्पा केल्या जातील. पण ज्यावेळी मुस्लिमांच्या कायद्याचा व संरक्षणाचा प्रश्न येतो, त्यावेळी कुठं असतात मानवी हक्कासाठी लढणारे?राजस्थानच्या घटनेवर एकही मानवी अधिकार कार्यकर्ता रस्त्यावर निषेधासाठी उतरला नाही. ही सोयीची मानवी अधिकाराची लढाई नव्हे काय?भारतीय लोकशाहीमध्ये मानवी अधिकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण न्याययंत्रणा व प्रशासन दुटप्पी व द्वेषभावनेतून वागत असेल तर अधिकाराची व न्यायाची अपेक्षा कुणाकडे करायची?
जाता-जाता बशीर बद्र यांचा एक शेर..
सात संदूक़ों में भरकर दफ़्न कर दो नफ़रतें
आज इंसा को मोहब्बत की ज़रूरत है बहुत
कलीम अजीम
Twitter@kalimajeem
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com