मायभूमीत बहुसंख्याक ज्यावेळी अल्पसंख्याकांवर हल्ले करायला लागतात, अन् न्यायव्यवस्था अल्पसंख्याकांच्या न्यायहक्काचे रक्षण करु शकत नाही, अशावेळी त्या देशातील पीडित समुदायाने न्याययाचना कुणाकडे करायचीअसा प्रश्न निर्माण होतो. भारतात सुरु असलेल्या अल्पसंख्याकाच्या मानवी अधिकाराचे हनन यावर जगभारत चिंतेचा सूर लावण्यात येतोय. अमनेस्टी इंटरनॅशनल या जागतिक मानवी अधिकारासाठी काम करणाऱ्या संस्थेने अनेकवेळा अल्सपख्याकाच्या असुरक्षिततेबद्दल भारताला सुनावलं आहे. शेजारीराष्ट्रांतून भारतातील अल्पसंख्य नागरिकांच्या सुरक्षिततेसंबधीचिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या शुक्रवारी 8 डिसेंबरला न्यूयॉर्क टाईम्सने एक विशेष लेख लिहून भारताला अल्पसंख्याकाच्या मानवी अधिकारासंदर्भात अनेक प्रश्न विचारले आहेत. सोमवारी 18 डिसेंबरला जागतिक अल्पसंख्य अधिकार दिन आहे, त्या निमित्ताने भारतातील अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेसंबधी चर्चा सुरु व्हावी अशी अपेक्षा आहे.
तीन वर्षात देशात अल्पसंख्य समुदाय असुरक्षित झाला आहे, फाळणीनंतर प्रथमच मुस्लीम समुदाय स्वत:ला मायभूमीत भयभीत झाले आहेत. वारंवार मुस्लीम समुदायांवर धर्मद्वेषातून जीवघेणे हल्ले होत आहेत. राजसमंंदची घटना पाहता हिंदुत्वाच्या समांतर सैन्याने (?) मुस्लिमांविरोधत धर्म युद्ध छेडलं आहे. अशा परिस्थितीत सरकार व प्रशासन कुठलीच ठोस भूमिका घेतलेली नाही. हल्लेखोरांना सरकारचे समर्थन असल्याने हल्ले होत आहेत, अशी वारंवार केली जात आहे.
भाजपच्या सत्ताकाळात देशात गोरक्षेच्या नावाने सुरु असलेल्या ‘मॉब लिचिंग’ने 30 जणांचा जीव घेतला तर 2 हजाररपेक्षा जास्त जणांना जखमी केले. हे वादळ काहीसं शात होताच ‘हेट क्राईम’च्या घटना वाढल्या आहेत. आत्तापर्यत तब्बल 50 जण ‘हेट क्राईम’चे बळी ठरले आहेत. तर पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत. या सर्व घटना नोंद झाल्याने चर्चेत आल्या आहेत, किरकोळ घटनांची अजूनही कसलीच नोंद नाही, अशा परिस्थितीत ‘मारो-काटो’ संस्कृतीवर मानव सुरक्षा कायदा प्रभावी ठरु शकतं त्यामुळे हा कायदा आणावा अशी मागणी देशातील अल्पसंख्य समुदाय करत आहे.
गेल्या आठवड्यात 6 डिसेंबरला राजस्थानच्या राजसमंद शहरात एका पश्चिम बंगालच्या मुस्लीम मजूराची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मुस्लिमोफोबिया ग्रस्त वातावरणाचा परिपाक होती. गेल्या तीनएक वर्षात भारतात मुस्लीम समुदायाविरोधात तुच्छतावादी दृष्टीकोन वाढीस लागला आहे. त्यातून त्यांच्यावर हल्ले केले जात आहे. ज्याप्रकारे अमेरिका व इंग्लंडमध्ये वर्णद्वेषातून अश्वेतावर हल्ले होतात, अगदी त्याचप्रमाणे भारतात बहुसंख्य़ समुदायाच्या हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. राजसमंंदची घटनेची अनेक आंतरराष्ट्रीय मीडियाने दखल घेतली आहे, 8 डिसेंबरला 'न्यूयॉर्क टाईम्स'ने एक सविस्तर लेख लिहून भारत मुस्लीम समुदायासाठी असुरक्षित झाल्याचं म्हटलं आहे. भारतातही अनेक ठिकाणी निषेध सभा घेऊन निदर्शनं करण्यात आली, अनेकांनी हिंदुत्व विचारसरणीच्या गुंडांना आयसिसची भारतीय आवृत्ती म्हटलं आहे.
दोन आठवड्यापूर्वी म्हणजे 22 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशमध्ये तीन मुस्लीम तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याच आठवड्यात ‘हेट क्राईम’च्या एकूण चार घटना घडल्या. सर्वामध्ये मुस्लीम समुदायाला लक्ष्य करण्यात आलं. याच सदरामध्ये त्यावर सविस्तर लेखन झालेलं आहे. या 'हेट क्राईम'च्या घटनेवर सरकारी पक्षाकडून अजून काहीच प्रतिक्रीया आलेली नाहीये. त्यामुळे पुढच्या हल्ल्याचा धोका अजूनही कायम आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. लागलीच राजसमंदची घटना घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली, इथंपर्यंत सर्व ठीक होतं. पण ज्या पद्धतीने खूनी व्यक्तीचे महिमामंडन सुरु आहे हे खरच धक्कादायक आहे.
अफराजुलच्या हत्येच्या आरोपात शंभूला अटक झाल्यापासून त्याच्या कृत्याचे समर्थन व्हॉट्सअपमधून सुरु होतं. अनेकांनी शंभूने कथित धर्मरक्षा केल्याचे सांगत त्याची वाहवाही केली. शंभूच्या कौतुकासाठी फेसबुकवरुन पोस्टी लिहल्या. शंभूच्या बचावासाठी एकत्र येत ‘मारो-काटो’ संस्कृतीचे समर्थन केलं आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे लक्षात येताच राजसमंद परीसरातली इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. गुरुवारी अफराजूलचा खूनी शंभूला उदयपूर सेशन कोर्टात हजर करण्यात आलं, त्यावेळी शंभूचा बचाव करणारा मोठा समुदाय कोर्टात हजर होता. दैनिक भास्करने बातमी दिली आहे की, शंभूच्या पाठींब्यासाठी उपस्थित असलेल्या जमावाने कोर्ट परिसरात धुडगूस घातला. इतकंच नव्हे तर समर्थकांनी कोर्टाच्या छतावर चढून भगवा ध्वज फडकवला.
वाचा : शरफुद्दीन मारला गेला, कारण तो ‘खान’ होता?
शंभूने केलेल्या हत्येत कुठलंच गूढ नव्हतं, उघडपणे कॅमेऱ्यासमोर त्याने एका व्यक्तीचा निर्घूण खून केला होता. त्यामुळे तो प्रथमदर्शनी आरोपी नसून थेट दोषी सिद्ध होतोय. त्यामुळे एखाद्या हल्लेखोराचे उघडपणे समर्थन करणे बेकायदेशीर आहे. हत्येनंतर त्याने खून करण्याचा हेतू काय होता, याची कबुली ऑन रेकॉर्ड दिली आहे. परंतु अनेकांनी शंभू दोषी नाही म्हणत त्याचा बचाव करायला सुरुवात केली आहे. शंभूने केलेल्या खूनाला धर्मरक्षा म्हणत अनेकांनी त्याच्यासाठी समर्थन जमा करण्याचं काम केलं. देशभरातून शंभूसाठी पैसा जमा करण्यात आला.
शंभूने केलेल्या हत्येत कुठलंच गूढ नव्हतं, उघडपणे कॅमेऱ्यासमोर त्याने एका व्यक्तीचा निर्घूण खून केला होता. त्यामुळे तो प्रथमदर्शनी आरोपी नसून थेट दोषी सिद्ध होतोय. त्यामुळे एखाद्या हल्लेखोराचे उघडपणे समर्थन करणे बेकायदेशीर आहे. हत्येनंतर त्याने खून करण्याचा हेतू काय होता, याची कबुली ऑन रेकॉर्ड दिली आहे. परंतु अनेकांनी शंभू दोषी नाही म्हणत त्याचा बचाव करायला सुरुवात केली आहे. शंभूने केलेल्या खूनाला धर्मरक्षा म्हणत अनेकांनी त्याच्यासाठी समर्थन जमा करण्याचं काम केलं. देशभरातून शंभूसाठी पैसा जमा करण्यात आला.
हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार अवघ्या तीन दिवसात 516 जणांनी शंभूच्या पत्नीच्या बँक खात्यात तब्बल तीन लाख रुपये जमा झालेे.
घरात शंभू एकमेव कमवता होता, शंभूच्या कृत्याचे त्याच्या कुटुंबीयानी परिणाम भोगावे लागणे योग्य नाही, त्यासाठी आर्थिक आधार म्हणून ही रक्कम जमा केली असेल तर यात काही वावगं नाही पण, रक्कम जमा करताना ‘शंभूच्या सुटकेसाठी सढळ हाताने मदत करा’ असं सांगून आर्थिक मदत जमा करणे धोकादायक आहे. नॅशनल स्पीक या वेबसाईटने शुक्रवारी मदत निधी देणाऱ्याच्या नावाचा एक फोटो दिला आहे, यात 20 रुपयापासून ते 20 हजारापर्यंत मदत दिल्याचे नोंद आहे. याच वेबसाईटने गुरुवारी एक बातमी दिली आहे की, शंभूला निर्दोष सोडवण्यासाठी मोठ्या रकम जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नॅशनल स्पीक या वेबपोर्टलने लिंक केलेल्या एका ऑडिओत कुणीतरी महिला पदाधिकारी म्हणते की, ‘शंभू निर्दोष सूटून बाहेर येईल तुम्ही काळजी करु नका, माझं चांगल्या राजकीय नेत्याशी याबाबत बोलणे झालेले आहे, पण जे शंभूला अटक करणाऱ्या हिदुत्वाच्या शत्रू मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिधियांचा बंदोबस्त करा’ हे वादग्रस्त वक्तव्य व्हॉटेसअपवरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. मुख्यमंत्र्याना उघडपणे जीवे मारण्याची भाषा वापरली जाते यावर पोलीस काहीच न करणे मोठ्या संकटाची चाहूल आहे.
वाचा : दंगलीचं शास्त्र आणि भाजप
वाचा : उन्मादी जमावाचा पैटर्न कुठला?गुरुवारची उदयपूर कोर्टातली घटना नक्कीच धक्कादायक होती. कलम 144 लागू असतानाही शंभू सर्मथक कोर्टाच्या आवारात जमा झाले. दैनिक भास्करने आपल्या बातमीत म्हटलंय की शंभू समर्थकांनी पोलिसांवर तब्बल 15 मिनटे दगडफेक केली. यात 10 पोलीस अधिकाऱ्यांसह 31जवान जखमी झाले. यात 4 शिपाई गंभीर जखमी झाले. 3 पोलीस निरिक्षक व एक डिप्टी गोपालसिंह यांना मोठ्या जखमा झाल्या. उत्तरादाखल पोलिसांनी लाठीमार करायचा प्रयत्न केला पण शंभू समर्थकांनी वकील आणि पोलिसांसोबत बाचाबाची केली. दगडफेक करणाऱ्या 88 आरोपींना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं. शुक्रवारी या सर्व आरोपींच्या बचावासाठी जयपूरमध्ये पुन्हा एकदा शंभू समर्थक रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांनी तब्बल 17 जणांना ताब्यात घेतलं.
सोशल मीडियावरुन अजूनही शंभूचे कौतुक सुरु आहे, शंभूचे महिमामंडन करणाऱ्या एकूण 7 जणांना आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. यात तिघंजण व्हॉट्सअपवरुन वादग्रस्त व्हिडिओ सेंड करणारे आहेत. शुक्रवारी हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीत उदयपूरचे पोलीस अधिक्षक आनंद श्रीवास्तव म्हणतात की,‘आत्तापर्यंत 207 पैकी 132 जणांना अटक केली आहे. बाकीचे अजून फरार आहेत’पोलिसांनी सांगितलं आहे की, हत्येच्या कटात शंभूशिवाय अजून कोणी सामील होतं का याचा तपास सुरु आहे. तसेच शंभूच्या पत्नीचे बँक खाते सील करण्यात आले आहेत, पण अन्य खाते क्रमांक गेऊन मदतीचे आवाहन अजूनही सुरुच आहे.
शंभूच्या हिंसक कृत्याचं हिंदुत्ववादी संघटनांनी उघडपणे कैतुक केलं आहे. बुधवारी उदयपूर कोर्टात पोलिसांना झालेली मरहाणीची घटना दंगल नव्हती का? एका खूनी हल्लेखोराला समर्थन करुन पोलिसांवर हल्ला करणे दहशतवाद नाही का?खूनीच्या समर्थनार्थ कोर्टाच्या इमारतीवर भगवा फडकवणे देशद्रोह नाही का? राजसमंदची घटनेने देशाचे मान खाली घालायला भाग पाडलं आहे, जगभरात भारताची छी थू केली जात आहे. असं असताना केंद्रीय पातळीवर सरकारने कुठलेच पावले उचलली नाहीयेत. गोरक्षकांचा उन्मादात सुप्रीम कोर्टाच्या हस्तेक्षेपामुळे घट झाली. प्रत्येक गोष्टीत सुप्रीम कोर्टाने कान खेचायचे तर सरकार कशासाठी आहे. जनतेच्या जीवंत राहण्याच्या अधिकाराची रक्षा सरकार करु शकत नाही. अशावेळी त्या पीडित समुदायाने न्यायासाठी दाद कोणाकडे मागायची? दुसरं म्हणजे ‘मारो-काटो’ संस्कृतीचे आपण सर्वजण गप्प राहुन एका अर्थाने समर्थन करत आहोत, हे भविष्यासाठी धोकादायक आहे, हे अजून आपल्याला लक्षात आलेले नाही.
कलीम अजीम
Twitter@kalimajeem
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com