आसामहून नागालँडची राजधानी दिमापूर येथे व्यवसायासाठी आलेल्या शरफूद्दीन
या मुस्लिम युवकाविरुद्ध येथील एका नागा युवतीने पोलिसांकडे तक्रार केली.
बलात्काराचा गंभीर आरोप तिने केला होता.
24 फेब्रुवारी रोजी नागा पोलिसांनी
शरफुद्दीन खानवर बलात्काराचा
गुन्हा नोंदवला आणि नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली गेली. नंतर स्थानिक
माध्यमे आणि सोशल मीडियावरुन अशी आवई उठवली गेली की, शरफुद्दीन हा बांग्लादेशी मुस्लिम होता. त्याआधारे 24 मार्च रोजी उपायुक्त
कार्यालयासमोर जमावाने मोठी निदर्शने केली. त्यानंतर पाच मार्च रोजी जमावाने
बिनदिक्कत तुरुंगाचे दरवाजे तोडून शरफुद्दीनला बाहेर काढले. त्याला
विवस्त्र करुन रस्त्यावरुन त्याची धींड काढली गेली. त्याचा आतोनात छळ केला गेला.
आणि त्यानंतर त्याची हत्या करुन त्याचं प्रेत चौकात टांगले गेले!
ही भीषण घटना वादग्रस्त ठरली कारण एकंदर घटनाक्रम पाहता अनेक प्रश्न
उपस्थित झाले. एक म्हणजे शरफुद्दीन हा आसामी मुस्लिम असला तरी बांग्लादेशी मुस्लिम
नव्हता आणि तरीही तो बांग्लादेशी असल्याच्या बोंबा माध्यमांनी उठवल्या? या अपप्रचाराला
बळी पडून आणि विचारशून्य होऊन तरुणाई
इतक्या मोठ्या प्रमाणावर जमावात सामील कशी झाली? हा
षडयंत्राचा भाग होता आणि तो कुणी रचले असावे? मीडियाने
शरफुद्दीन विरोधात खोटा प्रचार का केला? अशा अनेक प्रश्नांचा
मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.
घटना आणि मीडियाचा बनाव
पाच मार्च रोजी एकीकडे
देशभरातले बुद्धिमंत बीबीसी या परदेशी चॅनलनं
दिल्लीतील निर्भयाकांडवर तयार केलेला ‘इंडियाज् डॉटर’ हा
लघुपट भारतात रिलीज् करु नये या चर्चेत बिझी होते. एकीकडे या प्रकरणावरुन भारतात
बेगडी फेमिनीस्टपणाची झुल
पांघरुन आप-आपले पांडित्य सिद्ध करण्याची स्पर्धा चाललेली होती, तर दुसरीकडे नागालँडची आर्थिक राजधानी असलेल्या
दिमापूर शहरात ‘पीस मार्च’चं सोंग घेतलेला दहा
हजारचा जमाव अमानूषपणे एका निष्पापाची हत्या करत होतं.
दोन्हीकडे बलात्कारी
मानसिकतेबद्दल रोष होता. एकात आरोप सिद्ध झाला होता तर दुसर्यात फक्त तक्रार. अंगावर
शहारा आणणारा हा प्रसंग होता. एकोणिसाव्या शतकात जर्मनीत ज्यूंच्या कत्तली, अमेरिकेत काळे आणि 2013ला म्यानमारमधे रोहिंग मुस्लिमांना अशाच प्रकारे
अमानूष छळ केल्याचं ऐकिवात होतं पण दिमापूरमधे प्रत्यक्ष पाहण्यात आलं. एका लोकशाही
राष्ट्रात अशी घटना लांच्छानास्पद आहे. हे सर्व सुरु असताना सभ्य म्हणवणारा समाज ‘स्मार्ट फोन’मधून या विभत्स घटनेचं व्हीडिओ शूट करत
होता.
‘नई दुनिया’च्या म्हणण्यानुसार एका स्थानिक
वृत्तपत्राने आपल्या संपादकीय भूमिकेत स्पष्ट म्हंटलं होतं की, “पाणी डोक्यावरुन जाण्याआधीच जागे व्हा” असं चिथावणीखोर मजकूर छापलं
होतं. याच प्रकारचा प्रचार सोशल मीडियातून राबवला गेला. पीस मोर्चातील ‘नागा स्टुडेंट फेडरेशन’च्या दहा हजार
विद्यार्थ्यांनी सीआरपीएफच्या जवानासमोर तुरुंगाच्या वेगवेगळ्या तीन गेटमधून
प्रवेश केला. हे सर्व दिमापूरमधे कलम 144 असताना घडत होते. ‘बियांड
द हेडलाईन्स’ या संकेतस्थळानुसार शरफूद्दीन ज्या बॅरकमधे
होता, त्यात हॉटेलमधे शरफुद्दीनला मदत करणारा आणखी एकजण होता
पण जमावाने त्याला हात लावलं नाही, कारण तो नागा होता. तसेच
शरफूद्दीनला बाहेर काढताना त्या बॅरकमधील इतर कैदींनी फायदा उचलत पळ काढला असेही
वेबसाईट म्हणते.
पोलिसांची अकर्ण्यमता
23 फेब्रुवारी रोजी एका नागा युवतीने आसामी शरफूद्दीनने बलात्कार
केल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपाची तथ्यता न पडताळता
शरफुद्दीनला 24 फेब्रुवारीला अटक केलं. शरफुद्दीन मुसलमान असल्यानं त्यास
बांग्लादेशी घोषित केलं गेलं. घटनेला ‘सांप्रदायिक साज’ चढवण्यासाठी सोशल मीडिया होताच.
हिंस्र जमावाला तुरुंगात घुसण्यासाठी स्थानिक पोलिसांनी मदत केली
असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एनडीटीव्हीला दिली आहे. सेंट्रल जेलमधून
कोणालाही बाहेर काढणं इतकं सोपं आहे का? बलात्काराचा आरोपी तुरुंगात कुठं आहे आणि एवढ्या कैद्यांमध्ये तो कोणता
आहे? हे कळणं पोलिसाच्या मदतीशिवाय शक्यच नाही असा प्रश्न
प्रथमदर्शनी कोणालाही पडू शकतो. शरफुद्दीनला फरफटत नेत असताना त्या सात
किलोमीटरमधे असाम रायफल्सचे कार्यालय आणि पोलिस चौक्या आहेत परंतु या जमावावर
कारवाई न करता यांनी मूकदर्शक होणं पसंत केलं.
आरोपी असमी मुस्लिम असल्याने कधी नव्हे ती यावेळी पोलिसांनी तत्परता
दाखवत आरोपीला कैद केले असे टाईम्स ऑफ इंडियाच्या 15 मार्चच्या अंकात म्हंटले आहे.
आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर परिसरात बोस्ला गावात राहणार्या शरफुद्दीनला
अटक करुन दहा दिवस उलटले असले तरी पोलिसांनी या घटनेचा तपास केला नव्हता. असं
असताना लोकल मीडियाने शरफुद्दीनला बांग्लादेशी घोषित करुन घटनेला सांप्रदायिक रंग
देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
निर्वासितांची समस्या
एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने पूर्व पाकिस्तान अर्थात बांग्लादेशला मुक्त केलं, युद्ध चालू होण्यापूर्वी मार्च ते सप्टेंबरपर्यंत एक कोटी हिंदू आणि मुस्लिम बांग्लादेशी शरणार्थींना भारताने राहायला जागा दिली होती. हे बांग्लादेशी शरणार्थी इशान्य भारत, पश्चिम बंगाल, दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशा वेगवेगळ्या प्रांतात आले. त्यानंतर डिसेंबरमधे भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला.
युद्ध संपूनही बांग्लादेश पूर्वपदावर आलेला नव्हते. त्यामुळे बांग्लादेशी निर्वासीत भारतातच राहू लागले. पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती जुल्फिखार अली भुट्टो आणि इंदिरा गांधी यांच्यात झालेल्या सिमला करारानंतर ‘इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशींना आपल्या स्वतंत्र देशात ‘वापसी’ करण्यास सांगितले. भारतातून लाखो बांग्लाभाषिक स्वतंत्र बांग्लादेशात गेले.
काहीजण याच मातीला आपलं माणून इथंच राहिले. इथंच उद्योग व्यवसाय सुरु केला. भारताने त्यावेळी त्यांना जबरदस्ती करुन हाकलून लावण्याचे धोरण स्विकारले नाही. त्यांना आपलं माणून त्यांना निवारा दिला. आजही या भारतात भारतीय म्हणून हिंदू आणि बांग्लादेशी निर्वासित राहतात. असे बांग्लादेशी हिंदू आणि मुसलमान आसाम आणि इशान्य भारतात मोठ्या प्रमाणात आहेत.
मात्र आसाममधे अशा निर्वासितात फक्त हिंदूंना संरक्षण देण्यासाठी ‘नागरिकता अधिकार सुरक्षा समिती’ सारखी संघटना काम करत आहे. हिंदू निवार्सितांचे रक्षण करुन बोडो आणि उल्फाच्या मदतीने बांग्लादेशी मुस्लिमांचे शिरकाण करण्याचे आरोप पूर्वीपासून होत आहेत. हा सांप्रदायिकतेचा किती दुटप्पीपणा होता. अर्थातच ह्या ‘एक्स्ट्रीमिस्ट’ अर्थात उजव्या संघटना वर्षानूवर्षापासून हिंदू आणि मुसलमानात संघर्ष घडवत असं चित्र आहे. या संदर्भात कोक्राझार आणि इतर घटना बोलक्या आहेत.
‘शुक्रवार’ या हिंदी मासिकाच्या ऑक्टोबर 2013च्या अंकात स्पष्ट म्हटले आहे की, अशा ‘एक्स्ट्रीमिस्ट’ संघटना या भागात आज मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यांचे काम कोणत्याही घटनेला सांप्रदायिक मुलामा चढवणे आहे धर्मावर आधारित तणाव वाढवून ‘सांप्रदायिक हिंसाचार’ घडवून आणणे असा या संघटनांचा उद्देश आहे असंही मासिकात म्हटलं आहे.
नागालँडमध्ये आसामी मुस्लिमांची संख्या मोठी असून ते मोठ-मोठ्या व्यवसायात बहुसंख्येनं आहेत. तसेच आसाममधून नागालँडला माल वाहतूक करणारे ट्रक चालकही मुस्लिम आहेत. अशा ट्रकचालकांना नागा त्रास देतात. लष्करी चौक्यामधून त्यांच्याकडून बेकायदा टॅक्स उकळला जातो.
बांग्लादेशी घुसखोर म्हणून त्यांना वारंवार हिणवलं जातं. याचा संताप आसामी ट्रक चालकामधे आहे, बरेचसे व्यापारी मुस्लिम असल्यानं नागालँडमध्ये यांचे परवाने काढून घ्यावेत असा मतप्रवाह आहे. शिवाय अशांत आसाममधून नागालँडमध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांबद्दलचा स्थानिकात राग असल्याचे म्हटलं जाते.
या सर्व पार्शभूमीवर दिमापूरची घटना एक मोठ्या षडयंत्राचा भाग असेल अशी गंभीर शंका व्यक्त केली जात आहे. आता याचा तपास जर सीबीआय करत असेल तर, ते सखोल तपास करतील अशी अपेक्षा लोकशाहीत देशात करण्यास जागा आहे.
मुस्लिम विरोधी प्रचार
मुस्लिमांवर प्रादेशिक अस्मितेचा आधार घेऊन कम्युनल हल्ले होतात. असे हल्ले या भागात नवीन नाहीत. वेळोवेळी भाषिक अस्मितेचा मुद्दा पुढे करत आसामीच्या बोडोकडून कत्तली होत होतात असेही यापूर्वी अनेकांनी दर्शवून दिलं आहे. आणि त्यामुळे षडयंत्राची शक्यता व्यक्त करण्यास जागा आहे. दिमापूरच्या घटनेत मरणारा केवळ खान होता म्हणून ही घटना घडली असेल तर ही आणखीण विचार गरज आहे.
शरफुद्दीनचा भाऊ घटनेनंतर मीडियासमोर आला व आम्ही बांग्लादेशी नसून भारतीय आहोत असं सांगितलं. एक भाऊ कमाल खान हा आसाम रेजिमेंटमध्ये आहे, तर दुसरा भाऊ इमानउद्दीन खान हा सन 1999 मधील कारगिल युद्धात शहीद झाला होता.
वडील सय्यद हुसैन खान हे भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. आता आम्हाला बांग्लादेशी ठरवून मारुन टाका असंही जमालुद्दीन म्हणाला. शरफुद्दीनच्या मृत्युनंतर त्या मुलीवर रेप झाला नव्हता असा अहवाल आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांनी जाहीर केला.
मृत्युनंतर सदर अहवाल तयार केला नसेनच तो अहवाल आधीच आला असेल. तसेच शरफुद्दीनची नातेवाईक असलेल्या त्या मुलीने दोन लाख रुपयासाठी खोटी तक्रार दाखल केल्याचं कबुलही केलं होतं अशीही वृत्त आहेत. असं असताना शरफुद्दीनला तुरुंगात का ठेवण्यात आलं असाही प्रश्न उपस्थित होतो. या घटनेनंतर एकूण 42 आरोपींना जेरबंद केलं असल्याची माहिती आहे त्याच्यावर केस दाखल केला जाईल. घटनेनंतर दिमापूर परिसरातील मुस्लिमात दहशतीचं वातावरण आहे अद्याप चार हजार मुस्लिम घर सोडून गेली असल्याची माहिती नयी दुनियानं दिली आहे.
असे सर्व पूर्वग्रह आणि घटना लक्षात घेता तरुणाईने सोशल मीडियाच्या अफवेला बळी न पडता बुद्धीवादाने विचार करावा असा धडा असावा. शरफूद्दीनच्या नृशंस हत्येप्रकरणी नागालँड सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री टी आर जेलियांग यांनी नुकतेच दिले आहेत. पोलिस केवळ बाहूले न शोधता खर्या आरोपीपर्यंत पोहचतील अशी आशा आहे.
Follow
On Twitter @kalimajeem
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com