स्वातंत्र्याचा नेमका अर्थ कोणता?

स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्याय या उद्दात्त हेतूसाठी अनियंत्रित ब्रिटिश सत्तेविरोधात राष्ट्रीय चळवळ अस्तित्वात होती. त्यास सर्वधर्मीय जाति-समुदायाचे सक्रिय सहकार्य व बळ लाभलं होतं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर उपरोक्त उद्दिष्ट अमलात आणण्यासाठी राज्यघटनेची निर्मिती झाली. परंतु स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यघटनेत सूचीबद्ध वचने निष्क्रिय ठरू लागली आहेत. केंद्रीय सत्तेतील वर्तमान द्वेषवादी राजकारण राज्यघटनेवर स्वार झाले असून त्यातील अंतर्भूत मूलभूत हक्क व सामाजिक न्याय दुर्मिळ बाब ठरते की काय, अशी भिती वाटत आहे. 

गेला पंधरवडा मुस्लिम द्वेषाच्या अतिउच्च टोकासाठी गाजला. एका पाठोपाठ एक अशा भयंकर घटना घडत होत्या. एक संवेदनशील नागरिक म्हणून वारंवार होणाऱ्या अशा हेट क्राइममुळे मेंदू बधीर झाला आहे. मराठी प्रदेशात रेल्वेच्या बोगीत घडलेली घटना भयंकर होती. मुस्लिम आहेत, ही ओळख पटवून दोघावर राजकीय हिंदुत्व धारण केलेल्या एका रेल्वे गार्डने गोळ्या झाडल्या. 

३१ जुलै २०२३ रोजी मुंबईत घडलेल्या घटनेमुळे मनात भिती एकवटली आहे. मुस्लिम असण्याचा दोषारोपणाची प्रक्रियेने सार्वजनिक वावर धोक्यात आला आहे. जयपूर-मुबई या धावत्या रेल्वेत चेतन सिंहने नावाच्या एका रेल्वे गार्डने लक्ष्यकेंद्रीत गोळीबार करून तीन मुस्लिमांची हत्या केली. अब्दुल कादरभाई मुहंमदल हुसैन भानपूरवाला (४८), असगर अब्बास अली (४८) आणि सय्यद एस. (४३) यांच्यासह आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना (५८) यांचाही मृत्यू झाला. पहाटे साडेपाचच्या सुमारास मीरा रोड ते दहीसर दरम्यान ही घटना घडली. 

हल्लेखोर मुंबईतील लोअर परळ आरपीएफ कार्यालयात तैनात होता. त्याने ही हत्या मुस्लिम द्वेषाचा विषाणू चावल्याने केली, असं त्याने घोषित स्वरूपात सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रेरणेतून ही हत्या घडवून आणली, अशी निर्लज्ज कबुली चेतन सिंहने मृतदेहासमोर उभं राहून दिली. त्याने त्याचा वीडियो तयार केला होता. आश्चर्य म्हणजे ही बातमी गोदी मीडियाने दिलीच नाही. एका माथेफिरुचा गोळीबार असाच बोतमी दिवसभर चालू होती. परंतु सत्य उघडकीस येण्यास विलंब लागला नाही.
वीडियोत तो म्हणतोय, “ये लोग पाकिस्तान से ऑपरेट हुए हैं. मीडिया यही कवरेज दिखा रहा है. उनको सब पता चल रहा है कि ये क्या कर रहे हैं. वोट देना है, अगर हिंदुस्तान में रहना है तो मैं कहता हूं कि मोदी और योगी है, ये दो है.”

मुसलमानांच्या सार्वजनिक वावर, व्यवहार व आढळ प्रतिबंधित करणारी ती घटना होती. आता बस किंवा हॉटेल अशा गर्दीच्या स्थळी फोन रिसीव करताना ‘वालेकूम सलाम’ म्हणण्यासही मन धजावत नाही. एकटे फिरताना नकळतपणे सार्वजनिक वावर अधिक आकसलं जात आहे.

फेब्रुवारी, २०१९ला मोठ्या बंधूसोबत एक दिल्ली दौरा केला होता. केंद्रीय मनुष्यबळ खात्याअर्गत चालणाऱ्या उर्दू भाषा विभागात काम होतं. त्याचं ऑफिस ओखला इथं होतं. फरिदाबादनंतर ट्रेनची गती कमी झाली तसे लोकलचे प्रवासी चढत-उतरत होते. पलवल स्टेशनवतर आमच्या दोन्ही सिटवर तीन जाट तरुण येऊन बसले. आधीच तिथं एक पन्नाशीचे एक गृहस्थ येऊन वृत्तपत्र वाचत होते. नंतर आलेले त्यांच्या ओळखीचे वाटले. चौघांमध्ये संवाद सुरू झाला. स्वाभाविक विषय हातातील वृत्तपत्राच्या बातम्यावरून पुढे जाऊन वर्तमान राजकारण, पाकिस्तान, युद्ध, मुसलमान, गोरक्षा, राम मंदिर असे चालू होते. काहीच वेळात दोन पार्टी झाल्या. 

एका बाजूला पन्नाशीतले गृहस्थ तर दुसरीकडे ते दोन तरुण होते. काकाजी त्या धिप्पाड व मजबूत अंगयष्टीच्या युवकांना सांगत होते की राजकारण आणि प्रत्यक्ष व्यवहार वेगवेगळे असतात. द्वेष व हिंसा राजकीय लोक घडवून आणतात, त्यासाठी अविचारी तरुणांचा वापर केला जातो. जाट तरुण भडकले. आपसातील वादावादी टोकाला जात होती. तरुण त्या काकाजीला हिसेंचं राजकारण ‘धडा शिकवण्या’साठी कसं योग्य आहे, पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी काकाने वाद थांबवला. परंतु त्यांचा तू-तू, मैं-मैं ऐकून आम्हा दोघा भावंडांनी आपसात सुरू असलेला संवाद बंद केला. मला पलवलचा जुनैद आठवला. त्याची याच स्टेशनवर केलेली नृशंस हत्या डोळ्यासमोर आली आणि अंगभर अनामिक भिती संचारली. थरथरत्या थंडीत अंगाला घाम सुटला. भय्याच्या चेहऱ्यावरही अस्वस्थता पसरली होती. ओखला उतरेपर्यंत आम्ही आपसात काहीच बोललो नाही.

गेल्या सात-आठ वर्षांत प्रत्येक रेल्वे प्रवासात भिती अधिकाधिक भेदक होत आहे. अनियंत्रित सत्ता हाशिल करू पाहण्याऱ्या वर्तमान सरकारने चोहीकडे भिती, द्वेश, तिरस्कार व संशय आणि अमानिक भीतीचं वातावरण तयार करून ठेवंल आहे. याच अनामिक भितीतून सध्या मणिपूरमध्ये जातीय दंगली घडत आहेत.

हेट क्राईमला संरक्षण व दंगलखोरांना पाठिशी घालण्याच्या सरकारच्या धोरणामुळे हरयाणामधील गुरुग्राम, मेवात, नूह पेटला आहेत. तिथं मुस्लिमांची प्रार्थनास्थळे, वस्त्यांवर लक्ष्यकेंद्री हल्ले सुरू आहेत. परंतु अद्याप दोषींवर कार्रवाई झालेली नाही.

संघ-भाजपप्रणित वर्तमान फुटपाड्या राजकारणात अनेक संदर्भ बदलेले आहेत. देशप्रेम असो वा नागरी स्वातंत्र्य, विनाश असो वा विकास, इतिहास असो की नागरीकशास्त्र, विज्ञान असो की भूगोल इत्यादी घटकांचे पाहिजे तसे अर्थ लावणे सुरू आहे. पूर्वी धार्मिक सण-उत्सव नागरिकांच्या स्नेहमेळाव्याचे केंद्रे होती, आता द्वेष, तिरस्कार, हिंसेची कारक ठरू लागली आहेत.

या बदललेल्या राजकीय संस्कृतीने वर्तमान सरकारच्या कार्यकाळात नवनवीन पायंडे (सत्तापक्षाच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे) घालून दिली आहेत. मतांच्या राजकारणासाठी दुर्बल गटाविरोधात अमानवी दुष्प्रचार राबविण्यास जणू स्वीकृती मिळताना दिसते. इतिहासपुरुषांच्या बदनामीपासून सुरू झालेली ही प्रक्रिया प्रत्यक्ष हेट क्राइम घडविण्यापर्यत आलेली आहे. मुस्लिमविरोधी बोलणे, त्यांच्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन बाळगणे, दोषारोपण करणे, त्यांना शत्रुभावी ठरवणे इत्यादी घटक राजकीय नेतृत्व सिद्ध करण्याचे महत्त्वाचे आयाम ठरत आहेत. सौहार्द, सद्भावना, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मआदरभाव, निष्पक्षता, सहिष्णुता विनोद ठरवला जात आहे. 

गांधी, नेहरू, आरक्षण, टीकाकार, आदिवासी, मुस्लिम, ख्रिस्ती आदींची बदनामी व चारित्र्यहनन ही वर्तमान राजकीय व्यवस्थेची गरज व अट झालेली दिसते. मुस्लिमविरोध वर्तमान राजकारणाचा अविभाज्य अंग ठरत आहे. अशा सत्तेच्या अनियंत्रित राजकारणामुळे हजारों वर्षांची प्राचीन समन्वयी परंपरा व सद्भावावर आधारित सहजीवन उद्ध्वस्त होऊ लागले आहे. निवडणुकीतील मतांच्या शूद्र गरजेपोटी शांतताप्रिय समाजात तिरस्कार, द्वेषाणूची बीजे पेरली जात आहेत.

विकास, देश व राष्ट्रहिताच्या झेंड्याखाली बहुसंख्यकवादाचा प्रादूर्भाव उत्तरोत्तर वाढत आहे. धडा शिकवण्याच्या मानसिकतेने सर्वसामान्याचे राजकीय हिंदूकरण होऊ लागले आहेत. प्रसिद्धीमाध्यमे अस्मितेच्या प्रश्नांना अजेंडास्वरूप लावून धरत आहेत. त्यांच्या दृष्टीने जनतेची मूलभूत प्रश्न दूय्यम, बेदखल किंवा कमी महत्त्वाची आहेत. मीडियाकृपेने समाजाला धर्म, मंदिर, हिंदूहित, देशभक्तीचा गुंगारा देण्यास वर्तमान सरकार व प्रसिद्धी माध्यमे यशस्वी झाली आहेत.

घटनात्मक व कायदेशीर हक्कापासून वंचित ठेवून त्यांच्यासाठी दूय्यम नागरीकत्वाच्या दिशेने प्रवास सुरू आहे. ‘हिंदू खतरे में’ म्हणत धर्मांधतेला बळकटी प्रदान करून देण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते. एकाच वेळी समान नागरी संहितेची चर्चा करायची, त्याचवेळी देशवासीयांसाठी एकसारख्या असलेल्या नागरी कायद्याच्या लाभापासून वंचित ठेवायचे. लक्ष्यकेंद्री हिंसक हल्ले असो वा हेट क्राइमच्या तक्रारींना बेदखल करायचे. पीडितांना न्याय व नागरी कायद्याचा लाभ मिळू नयेत, यासाठी प्रशासकीय व राजकीय स्तरावर प्रयत्नशील व्हायचे.

भगवान रामाच्या नावाने मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन उपद्रव्य माजविणे, इस्लामविरोधी अक्षम्य घोषणाबाजी करणे, धार्मिक मिरवणुकीतून मुस्लिमविरोधी नारेबाजी करणे, तलवारी, बंदूका, रायफली, धारदार शस्त्रे नाचवणे, दर्गे, मस्जिदा लक्ष्य करणे. जात-धर्मविरोधी टिप्पणी करून मुस्लिमांना उत्तेजित करून त्यांच्या प्रतिक्रियेला हिंसेत रुपांतरीत करायचे. मग संघटितपणे त्यांची घरे व संपत्तीची नासधूस तथा जाळपोळ घडवून आणायची. त्यांच्या नृशंसरित्या हत्या घडवून आणायच्या. विनोदाचा भाग असा की हे सर्व राष्ट्रहित व धर्म संरक्षणाच्या नावाने केलं जात आहे.

पीडितांना दंगलखोर व दोषी सिद्ध करण्यासाठी एकतर्फी दुष्प्रचार राबवायचा. न्यायालयीन निवाडा न करता त्यांचे बुलडोझर जिनॉसाइड घडवून आणायचे. या सर्व दृष्कृत्यांना योग्य ठरविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा वापर करायचा; आदी गेल्या नऊ वर्षांच्या द्वेषवादी राजकारणाचा अविभाज्य भाग झालेला दिसून येतो.

हिजाबपासून अजानबंदी घडवून आणली. रस्त्यावर प्रार्थनेला मज्जाव केला गेला. सार्वजनिक स्थळी नमाजला बंदी झाली. क्षुल्लक वादाला धार्मिक रंग देऊन वातावरण विषाक्त करण्यात आलं. शिक्षण, सुविधा असो वा व्यापार-धंद्याला जिहाद म्हटलं गेलं. आर्थिक बहिष्काराची उघड मोहिम राबवली गेली व जात आहे. या द्वेषाणू व फुटपाड्या राजकारणाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत सर्वोच्च टोक गाठलेलं दिसते. 

एकेकाळी भारताचा शासक असलेल्या औरंगजेबचा डीपी लावणे गुन्हा म्हणून गणला जात आहेत. इतकंच नाही तर लुटखोर ब्रिटिशांच्या विस्तारवादाला हाणून पाडण्यासाठी प्राणांतिक संघर्ष करणाऱ्या बहादूरशाह जफर व टिपू सुलतान यांची फोटो जवळ बाळगणे, भिंतीवर, वाहनावर लावणेदेखील गंभीर गुन्हा ठरू लागला आहे. सत्ता हस्तगत करण्याच्या अनियंत्रित राजकारणाने समाजाचे धर्माच्या नावाने विभक्तीकरण घडवून आणू पाहत आहे. स्वातंत्र्याच्या या पंच्चाहत्तरीत हेच काय ते नागरी स्वातंत्र्य आणि हीच ती त्याची व्याख्या!

कलीम अजीम, पुणे

(परिवर्तनाचा वाटसरू, १५ ते ३१ ऑगस्ट अंकात प्रकाशित झालेलं टिपण.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: स्वातंत्र्याचा नेमका अर्थ कोणता?
स्वातंत्र्याचा नेमका अर्थ कोणता?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibGeUS14T_PzUCIm_SR8obh1VzvKHT0VhPgqwmf8d637_Jc06bVGkwWu10cgQdvsD0ubdmmLromnC3al2Ku3NBMWpJ4x_jf0pl1cnTxIzogpRTtDCxtcAFIxAZlCRekSkk5gsbxVVN9uddkhWAIQF_o4_tBVZY12UO3NVwxFtyOihVbUFUDKx-tTiRccWl/w640-h381/IndependenceDay%20Muslim%20Girl.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibGeUS14T_PzUCIm_SR8obh1VzvKHT0VhPgqwmf8d637_Jc06bVGkwWu10cgQdvsD0ubdmmLromnC3al2Ku3NBMWpJ4x_jf0pl1cnTxIzogpRTtDCxtcAFIxAZlCRekSkk5gsbxVVN9uddkhWAIQF_o4_tBVZY12UO3NVwxFtyOihVbUFUDKx-tTiRccWl/s72-w640-c-h381/IndependenceDay%20Muslim%20Girl.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2023/08/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2023/08/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content