शनिवारी एकाच दिवशी जर्मनी, ब्रिटेन आणि अमेरिकेत ‘अण्टी कोरोना प्रोटेस्ट’ मार्च झाले. हजारोच्या संख्येने तरुणांनी एकत्र येऊन लॉकडाऊन आणि इतर नियमांच्या सक्तीविरोधात प्रदर्शने केली. तीनही ठिकाणी आंदोलक फेस मास्क आणि फिजिकल डिस्टिंन्सिगची पायमल्ली करत घोषणाबाजी करत होते. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं शिवाय दंडाची रक्कमही वसूल केली.
जर्मनीमध्ये दोन गटांचे सुमारे 38,000 एकत्र आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. राजधानी बर्लिनमध्ये झालेल्या या निदर्शनाला ‘अण्टी कोरोना प्रोटेस्ट मार्च’ असं नाव देण्यात आलं होतं. लॉकडाऊनची सक्ती, निर्बंध व उपचाराच्या नावाने होणारी लूट थांबवावी, अशी मागणी आंदोलक करत होते.
‘सक्तीच्या सुट्या आता नको’, ‘वॅक्सीनच्या सक्तीची गरज नाही’, ‘सत्यता जाणा, जागे व्हा’, ‘घोटाळा संपवा’ असे अनेक फ्लेक्सबोर्ड हातात घेऊन हजारों तरुण-तरुणी, महिला, वृद्ध आणि बालके आंदोलनात सामील झाली होती. नियोजित मोर्चा दुपारी सुरू झाला. निदर्शकांनी ब्रैंडनबर्ग गेट आणि व्हिक्टरी कॉलमच्या दिशेने शांततेत वाटचाल केली.
ब्रैंडनबर्ग गेटजवळ झालेल्या निदर्शनात 30 हजार आंदोलक सहभागी होते. पोलिसांच्या मते मोर्चात सामील एकाही आंदोलकांनी फेस मास्क लावला नव्हता. शिवाय शारीरिक अंतरही राखलं नव्हतं. कोरोना रोगराई रोखण्यासाठी लावण्यात आलेले प्रतिबंध काढावे, उपचारातली अनियमितता दूर करावी, नियमांत शिथिलता आणावी, शाळा, कॉलेज पूर्ववत व्हावीत, सक्ती कमी करावी, शिवाय लॉकडाऊन हटवावं, अशी मागणी आंदोलक करत होते.
सरकारी निर्बंध म्हणजे स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, असा निदर्शकांचा आरोप आहे. सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार आहे, पण सरकार तो हिरावून घेत आहे, स्वातंत्र्याला धक्का लावणारे हे नियम आम्हाला मान्य नाहीत, असा पावित्रा निदर्शकांनी घेतला. इथला निषेध मार्च शांततापूर्वक होता. मात्र संसद भवनजवळ झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.
फिजिकल अंतर न राखता मोठा जनसमुदाय जमा झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना परत जाण्यास सांगितलं. परंतु निदर्शकांनी ठिय्या मांडला. बर्लिन पोलिसांनी या विरोध प्रदर्शनाला बळाचा वापर करत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. संतप्त निदर्शकांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक केली. यात अनेकजण किरकोळ जखमी झाले. पोलिसांच्या मते आंदोलक हिंसक झाल्याने नाईलाजाने बळाचा वापर करावा लागला.
उन्माद माजवणाऱ्या सुमारे 300 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी 3,000 पोलिसांची कुमक लावण्यात आली होती. पोलीस महिला व वृद्ध आंदोलकांना फरफटत घेऊन जातानाचे फोटो दि गार्डियन व वॉल स्ट्रिट जर्नलच्या वेबसाईटला होते. स्थानिक मीडिया हाऊस डायच्च वेलेनेदेखील पोलीस बळाचा वापर करत असल्याचे बरेच फोटो-फिचर प्रकाशित केले.
पोलिसी अत्याचाराचे वीडियो, फोटो सोशल मीडियावर आल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. हफिंग्टन पोस्टच्या मते जर्मनीच्या अण्टी कोरोना आंदोलनाचे लोट संपूर्ण यूरोपमध्ये परसले. ठिकठिकाणी तरुणांनी एकत्र येत लॉकडाऊनच्या सक्तीचा विरोध केला.
यापूर्वी अशा प्रकाराचे विरोध प्रदर्शन पॅरिस व अन्य ठिकाणीदेखील झाले होते. एकाच दिवशी यूरोपमध्ये अनेक निदर्शने झाली. सोशल मीडियातून लॉकडाऊनविरोधात एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. जर्मनीचे गृहराज्यमंत्री अँड्रियास गिझेल यांचं म्हणणं होतं की, रशियन एंबेसीसमोर आंदोलन करणाऱ्यामध्ये उजव्या विचारांची लोक सामील होती, त्यामुळे त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.
डायच्च वेले म्हणते की, ‘गेल्या काही दिवसांपासून उजवे गट सरकारविरोधात प्रचंड टीका करत आहेत. अनेक आंदोलकांच्या शर्टावर उजव्या विचाराचे स्लोगन होते.’ गृहराज्यमंत्री म्हणतात, ‘उजव्या अतिरेक्यांना दुसऱ्यांदा असा प्रयत्न कदापि करू देणार नाहीत.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जर्मनीत 2 लाख 42 हजार संक्रमित पेशंट आहेत. त्यातील दोन लाख 13 हजार बरे झाले आहेत. मृताचा आकडा 9,360 पेक्षा अधिक आहेत. मुत्युदर व रिकव्हीरी रेट कमी असल्याने लॉकडाऊन शिशिल करावे अशी मागणी जर्मनीमध्ये जोर धरत आहे.
ब्रिटेनमध्येदेखील नियमात शिथिलतेच्या मागणीसाठी निदर्शने झाली. शेकडो लोकांनी लॉकडाउन, प्रतिबंध आणि फेस मास्क घालण्याच्या विरोधात राजधानीच्या ट्राफलगर चौकात गर्दी केली होती. दि गार्डियन म्हणते की, मेट्रोपॉलिटन पोलिसांनी निदर्शकांना इशारा दिला की 30 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर निर्बंध आहे, त्यामुळे जागा मोकळी करावी. आंदोलकांनी संतप्त होत आपल्या मागण्या रेटून धरल्या. परिणामी पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
लॉकडाउनची नवे नियम काढून टाकावीत, 'लसीची सामूहिक सक्ती बंद करा', 'आरोग्य सुईच्या टोकापासून मिळत नाही', 'उपचाराच्या नावाने होणारी फसवणूक बंद करावी', 'कोरोनाचा घोटाळा बंद करावा' अशा मागण्याचे फलक हातात घेऊन निदर्शक घोषणाबाजी करत होते. गार्डियनला दिलेल्या प्रतिक्रियेत एकजण म्हणतो, “वायरस ही एक फसवणूक आहे. तो आहे किंवा नाही यावर माझा अजूनही विश्वास नाही, सध्या जे काही घडत आहे ते सामान्य फ्लूपेक्षा कमी किंवा तितकेच आहे. त्यासाठी लॉकडाउन व त्यासोबत जे काही होत ते कोणत्याही दृष्टीने अक्षम्य आहे.”
निदर्शकांनी संसद सदस्यांना ‘कोविड अॅक्ट’च्या नूतनीकरण करण्यास मनाई केली आहे. तरीही त्यांनी त्यास मान्यता दिली तर आम्ही त्यांना पदावरून काढून टाकण्याची मोहीम राबवू, असा पावित्रा त्यांनी घेतला. इथल्या बहुसंख्य नागरिकांना वाटते की, कोरोना उपचाराच्या नावाने आपण फसवले जात आहोत.
अमेरिकेत गेल्या काही महिन्यापासून लॉकडाऊनचा सतत विरोध केला जात आहे. शनिवारीदेखील विविध ठिकाणी याच मुद्द्यावरून निदर्शने झाली. शिवाय सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीत कृष्णवर्णीयांची हत्या हा ज्वलंत मुद्दा बनला. शनिवारी व रविवारी देशभरात ठिकठिकाणी ‘ब्लैक लिव्ज मैटर’ आंदोलनाला गती मिळाली.
ब्लॅक पँथर सिनेमाच्या मुख्य नायकाच्या मृत्युसह या बातमीला प्रमुख स्थान प्राप्त झाले होते. गार्डियनने तर कोलंबियात झालेल्या 16 कृष्णवर्णीयाच्या मृत्युवर स्पेशल कव्हरेज केलं. रिपोर्ट म्हणतो की, मंगळवारी रात्री उशिरा तीन तरुणांचे मृतदेह व्हेनेझुएलाच्या पूर्वेकडील सीमेजवळील रस्त्यावर सापडले. देशभरात चालू वर्षी झालेल्या विविध हिंसाचाराच्या घटनेत कमीतकमी 39 कृष्णवर्णीय मारले गेले आहेत.
या रिपोर्टने अजून एक धक्कादायक सत्य बाहेर काढलं आहे. तो म्हणजे, ब्लॅक लिव्जच्या आंदोलनात सामील झालेल्या युवकांवर लक्ष्यकेंद्री हल्ले वाढली आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एकजण म्हणतो, “आम्ही सतत भीतीच्या छायेत जगत आहोत. आम्हाला माहीत आहे की आम्ही कोणत्याही क्षणी मारले जाऊ शकतो आणि सरकार आम्हाला वाचविण्यासाठी फारसे प्रयत्न करेल, असे वाटत नाही.”
अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत उभय पक्षाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. लॉकडाऊन, कोराना वायरस, बेरोजगारी व कृष्णवर्णीशी होणारा सततचा वांशिक भेदभाव ज्वलंत मुद्दे म्हणून पुढ़े आले आहेत. निवडणुकाच्या काळातही वर्णअभिमानी गट वांशिक हल्ले करत आहेत. कोरोना संकटाच्या काळात उपचारात भेदभाव होत असताना वंशीय हल्लेही कृष्ण वर्णीयांवर होत आहेत, या दुहेरी संकटाला आव्हान देण्यासाठी मोठ्या संख्येने अफ्रो अमेरिकन रस्त्यावर उतरलेले आहेत.
जगभरात आता लॉकडाऊनचा विरोध होत आहे. रोगराईला आळा बसवण्यासाठी अस्तित्वात आलेली ही उपाययोजना आता जुनी झाली असून इतर प्रयोग राबवायला हवेत, अशी मागणी चोहीकडून होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात 'अण्टी कोरोना प्रोटेस्ट मार्च'चे हे लोन अन्य देशातही पोहोचू शकते. अशावेळी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून इतर पर्यायावर विचार करणे क्रमप्राप्त आहे. गेल्या सहा महिन्यापासून जग विविध निर्बंधांचा सामना करत आहे. तरीही संक्रमित पेशंट कमी होत नाही तर उलट वाढत आहे. परिणामी अन्य उपाययोजनांवर त्वरीत अंमलबजावणी सुरू व्हावी, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य बाळगून आहेत.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com