सोशल मीडिया आणि नवलेखन

खिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनामध्ये सोशल मीडियावर एक परिसंवाद असावा असा माझा आग्रह होता. तसेच त्यासाठी वक्तेदेखील मीच निवडणार असा अट्टाहास मी आयोजकांना बोलून दाखविला; तसा त्यांनी तो मान्यही केला, त्याबद्दल त्यांचे आभार! सोशल मीडिया रोजगार देणारं क्षेत्र म्हणून पुढे येत असताना ते लेखक घडविण्याचे माध्यम म्हणूनही फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात असा एखादा परिसंवाद असावा अशी मी विनंती केली. 
प्रसारमाध्यमांचे सुलभीकरण होत असताना सिटिजन जर्नालिस्ट नावाची संकल्पना रुढ होत आहे. मेनस्ट्रीम मीडिया सामान्यांची भाषा बोलत नाही, ही तक्रार तशी फार जुनी आहे. पण अलीकडे या तक्रारकर्त्यांच्या पायात मीडिया चक्क लोटांगण घालत आहे. जी माध्यमे पूर्वी सामान्याची भाषा व त्यांचे प्रश्न मांडत नव्हते, तीच माध्यमे आता लोकप्रश्नांच्या मागे धावत सुटली आहे. आज बदलत्या माध्यमात तैमूरचं खेळणं तुटलं ही बातमी मेनस्ट्रीम मीडियाची गरज असते. तसं शेतकरी आंदोलनावरदेखील पूर्णवेळ लाईव्ह ठेवण्याची आवश्यकता फेसबुकमुळे शक्य झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मीडियाचं स्वरूप कमालीचं बदलत आहे. सोशल मीडिया व समांतर (पॅरेलल) मीडियाने प्रस्थापित माध्यमसंस्थाना आपल्या परंपरागत चौकटीतून बाहेर पडण्यास भाग पाडलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रसारमाध्यमांचं लोकशाहीकरण झालेलं आहे, असं म्हणण्यास जागा आहे.
गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया अभिव्यक्तीचं सशक्त माध्यम म्हणून पुढे येत आहे. सुरुवातीच्या काळात ठराविक वर्गापुरता मर्यादित असलेला हा प्लॅटफॉर्म आज सामान्यांच्या बोटांच्या तालावर नाचत आहे. कधी काळी बड्या-बड्या फिल्मी सेलिब्रिटींनी ट्विटरला आपला मीडिया म्हणून वापरलं. भरभरून बोलणाऱ्या सेलिब्रिटींना १६० शब्दात व्यक्त व्हायचे म्हणजे एक मोठं आव्हान होतं. पण त्यांनी मोजक्या शब्दांनी त्यांच्या विचारांना अधिक कल्पक स्वरुपात माडलं. त्यातून शब्दांचे सामर्थ्य वाढलं आणि त्यातून एका नव्या भाषेचा जन्म झाला.
वाचा : प्रतिकांचे साहित्यकारण किती दिवस? 
तंत्रज्ञानाची भाषा
हिंग्लिश, मिंग्लिश भाषेतून पुढे जात आता मोबाईलची व तंत्रज्ञानाची एक नवी भाषा उदयास आली. एकीकडे तंत्रज्ञानामुळे भाषा लोप पावत आहे अशी चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे याच तंत्रज्ञानाने एका अन्य ग्लोबल भाषेला जन्म दिलेला आहे. म्हणजे एका अर्थाने तंत्रज्ञानामुळे भाषा समृद्ध झालेली आहे. तंत्रज्ञानात्मक भाषेनं प्रसारमाध्यमांना अधिक कल्पक केलेले आहे. त्याच भाषेत बोलायचे झाल्यास वन लाईन स्टोरीची व्याप्ती वाढत आहे. भाषेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास बरेच मुद्दे निघू शकतात. पण तो विषय तूर्तास बाजूला ठेवू या.
आज पेज थ्री बातम्यांचा मुख्य सोर्स ट्विटर हॅण्डल होतं. आज अनेक यूट्यूब चॅनल ट्विटरवर चालतात. सेलिब्रिटी गॉसिप्सना ट्विटरने अधिक व्यापक केलं आहे. काही यूट्यूबर्ससाठी ट्विटर सोन्याची कोंबडी ठरली आहे. दुसरीकडे ट्विटर बिग न्यूज ब्रेक करण्याचा महत्वाचा सोर्स झालेला आहे. अनेक टिव्ही चॅनलमध्ये एक मोठी टीम सोशल मीडियावर लक्ष ठेवून असते. सोशल मीडिया मॉनेटरिंगमधून त्यांना अनेक मोठ्या बातम्या सबसे पहले मिळतात. बातम्या ब्रेक करण्याच्या स्पर्धेत आपण अग्रेसर असलं पाहिजे असं न्यूज चॅनल व त्या बातम्या पसरवणाऱ्या संबधितांनीदेखील वाटते. पूनम पांडे, कमाल खान सारखे ट्विटर सेलिब्रिटी न्यूज चॅनल्सची मोठी जागा व्यापतात.
भाजप सरकारच्या काळात तर सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक महत्वाचे निर्णय, घोषणा, स्पष्टीकरण व आदेश ट्विटर व फेसबुकवरून भाजपच्या सरकारने दिलेले आहेत. थोडक्यात काय तर सोशल मीडियामुळे प्रसारमाध्यमांचे स्वरूप पूर्णत: बदलले आहे. तसेच माध्यमेदेखील मोठ्या संख्येने वाढली आहेत. इंटरनेटच्या फोर जी (4G) तंत्रज्ञानाने तर सोशल मीडियाचं दालन मोठ्या प्रमाणात विस्तारित केलं आहे. फोरजीमुळे डाऊनलोडरची संख्या कमी झाली आहे, डाऊनलोड करून तो डाटा साठवायचं कुठे या प्रश्नांतून डाऊनलोड मानसिकता कमी झालेली आहे. उलट फोरजीमुळे अपलोड करणे सोपं झालंय. डाऊनलोडरची संख्या कमी होत अपलोडरची संख्या वाढली आहे. त्यातून यूट्यूब चॅनलसारखं नवं माध्यम उदयास आलेलं आहे. अनेकांनी मोठा बिझनेस यातून मिळवलेला आहे.
वाचा : कुठलीही हिंसा ती निंदनीयच
सिटिजन जर्नालिस्ट
पूर्वी वृत्तपत्रातून राजकारण, खून, मारामाऱ्या, घोटाळे, सत्ताबदल, रक्तपात, दंगली, सांप्रदायिक हिंसा, सेलिब्रिटींचे लफडे, त्यांचे लग्न, त्यांची अपत्ये अशा घटना असत. सामान्य लोकांच्या घटना-घडामोडींना तिथे फारसं स्थान नसत. पण सोशल मीडियानं ती संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांला आवाज मिळाली आहे. आज प्रत्येक समूहघटक आपल्या प्रश्नांवर बोलत आहे, त्यांच्या सामाजिक समस्यांवर चर्चा करत आहे, इतकेच नाही तर सोशल मीडियामुळे आम जनतेला आपल्या घटनात्मक हक्काची माहिती झालेली आहे. त्यामुळे जो-तो आपल्या अधिकारांची मागणी करू लागला आहे. ज्यांना लिहिता येत नाही ते बोलत आहेत, ज्यांना बोलता येत नाही ते लिहीत आहेत. ज्यांना लिहिणे-बोलणं दोन्हीही जमत नाही, ते वेगवेगळे फोटो टाकून बोलत आहे. ज्ना फोटो काढता येत नाही तो फेसबुक लाईव्ह करून आपले प्रश्न मांडत आहे. एकूण म्हणजे सामान्य जनतेला फेसबुकनं आवाज दिलाय.
सोशल मीडियाच्या या आवाजामुळे अलीकडे विविध जातसमूहांमध्ये घटनात्मक अधिकारांच्या मागणी करणारी लोकं बोलू लागली आहेत. आपल्या प्रश्नांवर ते लिहू लागली आहेत. सरकारला प्रश्न विचारू लागली आहेत. सरकारची निर्णये, घोषणांची उलटतपासणी करू लागली आहेत. सरकारी धोरणांची चिकित्सा करू लागली आहेत. हे सोशल मीडियामुले शक्य झालेलं आहे. पूर्वी सामान्यांच्या आवाजाला प्रसारमाध्यमात स्थान नव्हते, पण या प्रश्नांची दखल घेत त्या सामान्य माणसाला प्रश्नांना स्थान दिले जाऊ लागले आहेत.
विविध मर्यादेमुळे जिथं प्रसारमाध्यमे पोहोचत नव्हती किंवा पोहचूच शकत नव्हती तिथला आवाज आता प्राइमटाईम चर्चेचा भाग बनू लागला आहे. जसे की मागे म्हटल्याप्रमाणे आज प्रत्येक मीडिया हाऊसनं सोशल मीडिया मॉनिटरिंग टीम ठेवली आहे, ही टीम देशभरात व जगभरातल्या विविध घटनांवर लक्ष ठेवून असते. काही मीडिया हाऊसनं व्हायरल सच नावाने फक्त सोशल मीडियाच्या बातम्याचे स्वतंत्र बुलेटीन सुरू केलं आहे. त्यामुळे आज कुठलीही बातमी दाबली जाऊ शकत नाही, प्रत्येक बातमीला आज आवाज मिळतोय. त्या बातमीला न्याय देण्यासाठी देशभरातून व जगभरातून लोकं उभी राहात आहेत.
आज तंत्रज्ञान शिक्षीत लोकांनी सोशल मीडियाचा चांगल्या अर्थाने ताबा मिळवला आहे. सोशल मीडियामुळे भाषेचा अडथडा दूर होत प्रत्येकांना आपली एक अभिव्यक्तीची स्वतंत्र भाषा सापडली आहे. सरकारला प्रश्न विचारणारी एक मोठी जमात आता उभी राहिली आहे. खऱ्या अर्थाने सोशल मीडिया विरोधी राजकीय पक्ष म्हणून कार्य करू लागला आहे. बातम्या मांडणे, त्यांचे विश्लेषण करणे, क्रॉस चेक करणे, तथ्य उलगडून दाखविणे आदी प्रकार सोशल मीडियावर होत असतात. त्यातून लिहिणारा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे. राजकीय कोट्या, चारोळ्या, किस्से, कविता, कथा, ललित लेखन, प्रवास वर्णन, ब्रेकअप स्टोरी, विनोद असे लिखाणाचे विविध प्रकार सोशल मीडियाची मोठी जागा बळकावते.
कुणी पीएमटी-लोकल रेल्वेचा किस्सा लिहितो, तर कुणी प्रशासकीय यंत्रणाची अरेरावी दाखवतो. एक मोठी जमात नागरी समस्यावर लिहीत असते. काहीजण लिखाणातून गुन्हेगारीवर प्रश्न उपस्थित करतात. काहीजण जनसमूहाच्या प्रश्नांवर बोलतात. कुणी नळाला पाणी आलं नाही म्हणतो, कुणी म्हणतो जाम पाऊस पडतोय, काहीजण अपरात्री लाईट गेल्यावर कसा निवांत झोपले याचं वर्णन करतो. कुणी काय वाचतो ते सांगतो. बरेच जण आयुष्यात काय मिळवलं यांची यादी टाकतो. आज कुठला सन्मान मिळाला, लांबचा व्यक्ती भेटला, जुना मित्र भेटला म्हणत सेल्फी काढून टाकतो.
काहींना सेल्फी कढण्यासाठी किंवा फेसबुक वॉलवर लिहिण्यासाठी काहीतरी हवं म्हणून बातमी शोधायला जातात. काहीजण पर्यटन करतात. काहीजण जाडजूड पुस्तके वाचून संदर्भ जमा करतात. अनेकजण पुस्तके खरेदी केल्याचे फोटो टाकतात. पलीकडून ती वॉल बघणारी व्यक्ती किमान त्या पुस्तकाला झूम वरून वारंवार बघते तरी. आपल्याकडे ते असावं वाचू का नाही, ते नंतर बघू पण ते पुस्तक माझ्याकडे हवंय, असं वाटू लागतं. कुणी चांगल्या सिनेमावर बोलतो-लिहितो. अनेक वॉलवरून दुर्मिळ सिनेमांची माहिती मिळते. कुणी गाणं गाऊ लागतं. तर काहीजण गाणे रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड करतो. काहीजण मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करून शॉर्टफिल्म बनवतात. काही डॉक्युमेंटरी बनवतात. काहीजण फोटोग्राफी करायला लागतात.
सोशल मीडियावर लिहिण्यासाठी अनेकजण नवनवी पुस्तके वाचतात. ते संग्रही ठेवतात. कमेंट बॉक्समधून प्रतिक्रियावादी गट वाढला असला तरी विचार करण्याची पद्धत बाळावलेली आहे. काही प्रमाणात तिथे चिंतन दिसून येतं. अनेकदा प्रभावी कमेंट करता यावी म्हणून भाष्यकार, अभ्यासक, संशोधकांशी मैत्री ठेवतात. त्यांच्याशी चर्चा करतात. या ऐकीव माहितीवर कमेंटमधून अनेकांची तोंड बंद केली जातात. किंवा व्यक्तिमत्वाची छाप पाडली जाते. थोडक्यात काय सोशल मीडियामुळे लेखनकलेचा विकास झालेला आहे.
वाचा :  धार्मिक-सांस्कृतिक विविधता संपवण्याचा डाव
लेखकाची एक मोठी जमात
फेसबुकसारख्या सोशल मीडियाने कल्पक व नरेटिव्ह लिखाणाला गती दिली आहे. विनोद व राजकीय कोट्यातून बाहेर येऊन व्यावसायिक क्रियटिव्ह रायटिंगला चालना मिळाली आहे. आज अनेकजण सोशल मीडियावर वेगवेगळ्या ह्यूमरसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येकांची एक स्वतंत्र शैली आहे. प्रत्येकांची एक स्वतंत्र अशी भाषा आहे.  फेसबुकवर लिहिणाऱ्या अनेक क्रियटिव्ह लेखकांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियातून मोठा व्यवसाय मिळवला आहे.
पोलिटिकल पीआर नावाची एक वेगळं व स्वतंत्र क्षेत्र उदयास येऊन रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. अभ्यासकांना फेसबुक व ट्विटरसारखा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने त्यांच्या अभ्यासाला दीशा मिळाली आहे. त्यातून अनेक लेखक व राजकीय भाष्यकार तयार झालेले आहेत. त्यातून अनेक दर्जेदार कसदार लेखन करणारे लेखकाची एक मोठी जमात तयार झालेली आहे. चार-पाच वर्षापूर्वी आम्ही पुण्यातली मित्रमंडळी सुंबरान नावाचे एक यूथ मासिक काढत असू. त्यात आम्ही फेसबुकवरच्या अनेक मित्रांना लिहायला सांगितलं. अनेकांची प्रतिभा व अभ्यास बघून तो-तो विषय आम्ही त्यांंना दिला. त्याने त्या विषयावर केलेलं मंथन आम्ही प्रकाशित केलं. असा प्रकारे आम्ही अनेक लोकांना लिहिते केले. आज त्यातले बरेचजण मुख्य प्रवाही माध्यातून सदरलेखन करतात.
पाच वर्षांपूर्वी फेसबुकवर किस्से लिहिणारे आज कथाकार झाले आहेत. त्यांची कथासंग्रह प्रकाशित झालेली आहेत. राजकीय कोट्या व प्रवास वर्णन लिहिणाऱ्या अनेकांनी रविवारच्या पुरवणीत जागा मिळवली आहे. आज अनेक दैनिकाने फेसबुक सेलिब्रटी व लेखकांचे सदरे सुरू केलेली आहे. वेबसाईट तर याच फेसबुक लेखकांच्या जोरावर उभ्या आहेत. हिंदीतले दि लल्लनटॉप, ऑडनारी, दखल कि दुनिया, नेशनल दस्तक, मीडिया व्हिजिल अशा इत्यादी वेबसाईटनं फेसबुकवरील लेखकांना संधी देऊन त्यांना तयार केलं आहे. दि लल्लनटॉप नावाची पॉप्युलर वेबसाईट फेसबुकच्या चार मित्रांनी येऊन सुरू केली होती. आज त्याचा वार्षिक टर्नओव्हर लाखोंच्या घरात आहेत. वीस एक लोकांना त्यांनी रोजगार दिलाय.
मराठीतही असे अनेक प्रयोग झाले आहेत. आमच्या सुंबरान वेबसाईटसाठी आम्ही अनेकांना लिहिते केलेलं होतं. राम जगताप यांचा अक्षरनामा फेसबुकच्या लेखकांना संधी देते. फेसबुवरील लेखकांना विषय देऊन अनेक फेसबुकर्सना अक्षरनामानं लिहिते केलेले आहे. मुकेश माचकर यांचे बिगुल तर फक्त सोशल फेसबुकवरील लिखाणासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक फेसबुकर्सना लेखक म्हणून तयार केलेलं आहे. सॅबी परेरा सारखा उत्तम लेखक बिगुलमुळे महाराष्ट्राला मिळाला आहे. अक्षरनामामुळे आनंद शितोळे सारखा जाणकार लेखक तयार झालेला आहे. अक्षरनामामुळेच अक्षय शेलारसारखा तरूण सिनेसमीक्षक आज महाराष्ट्राला परिचीत झालेला आहे. दिव्य मराठीने तर अनेक फेसबुक लेखकांना मान्यवर लेखक म्हणून परिचित करून दिलं आहे. संपत मोरे सारखा सामान्य माणूस आमच्या सुंबरानमुळे लिहिता झालेला आहे. दिव्य मराठीला ह्यूमन इटरेस्ट स्टोरी देण्याचा संपत मोरेंचा मोठा वाटा राहिला आहे. मध्यंतरी मटाने श्रीरंजन आवटेचं सोशल भान नावाचे सदर सुरू केलं होतं. सोशल मीडियातून लेखक व भाष्यकार झालेला श्री आज महाराष्ट्राला परिचित आहे. अनेक दर्जेदार ब्लॉगर सोशल मीडियाने देशाला दिलेले आहेत. या ब्लॉगरनं राजकीय सत्तांतर घडविणारे लिखाण केलेलं आहे.
मध्यंतरी मी व माझा मित्र कुणाल गायकवाड एका न्यूज चॅनलमध्ये होतो. तिथे आम्ही अनेक फेसबुकर्सना आणून पॅनलवर बसविलं होतं. विनायकच्या टॉक शोला आम्ही अनेक सोशल मीडियावरची मुले बसवलेली होती. त्यांनी उत्तमपणे अनेकदा आपली बाजू मांडलेली आहे.
वाचा : मुसलमानांचे राजकीय व सांस्कृतिक आत्मभान
लिहिते झाले लोक
सोशल मीडियामुळे वैचारिक लेखनाची एक मोठी फळी तयार झालेली आहे. अनेक दिवाळी अंकाच्या संपादकांनी फेसबुकर्सना असाईन्टमेंट देऊन लिहितं केलेलं आहे. मीदेखील विविध विषयावर सत्याग्रहीसाठी बऱ्याच फेसबुकर्सना लिहितं करत असतो. मध्यंतरी वंदे मातरम वादावर मी फेसबुकला एक चांगलं स्टेटस वाचलं. त्यात आनंदमठ कांदबरीचा उल्लेख आलेला होता, मी ते प्रकरण वाचलं असल्यानं ते मला माहीत होते. लागलीच मी त्याचा नंबर मिळवून त्याला फोन केला. सुरुवातीला लिहिणे जमणार नाही, मला लिहिता येत नाही म्हणत त्याने टाळलं. पण मी त्याला आग्रह केला. दोन दिवस मागे लागल्यानंतर त्याने एक टिपण लिहून दिलं. पुन्हा ते टिपण त्याच्याकडे पाठवून काही एलिमेंट जोडण्याची विनंती केली, त्याने अशा तीन टप्प्यात तो लेख लिहून मला दिला. तो लेख संपादन करून मी प्रकाशित केला. नवी माहिती त्यातून बाहेर आली होती. वाचकांनी ती आवडली. लेख प्रकाशित झाल्यावर त्याच्या उत्साह वाढला तो आणखी लिहू लागला. त्याने नंतर त्याचा ब्लॉग सुरू केला. असे बरेच लेखक मी अक्षरनामा व सत्याग्रहीसाठी तयार केलेले आहेत.
फेसबुकमुळे विविध भाषामध्ये तुमचे लिखाण अनुवाद केले जातात. माझे बरेच लेख हिंदीतून उर्दूत अनुवाद करून प्रकाशित केले जातात. आम्हीदेखील इंग्रजी व हिंदीतले बरेच लेख मराठीत अनुवाद करून प्रकाशित करतो. फेसबुकमुळे लेखक सीमापार गेलेला आहे. मध्यतंरी मी लोकमतसाठी पाकिस्तानच्या एका स्ट्रीट स्कूलची स्टोरी केली होती. महापालिका अतिक्रमण ठरवून पुलाखलाची गरीब मुलांसाठी असलेली ती शाळा उधवस्त करू पाहात होती. त्या संचालक महिलेला मी लिंक पाठवली, तिने ती स्टोरी गुगलच्या मदतीने ती अनुवाद करून संदर्भासाठी स्थानिक महापालिकेत सादर केली होती. हे केवळ फेसबुकमुळे शक्य झालं आहे. अनेकजणांनी मला उत्तम बातम्यांची लिंक पाठवलेल्या आहेत. फेसबुकच्या याच मदतीच्या जोरावर मी लोकमतचा कॉलम जगभर वर्षभर चालवू शकलो.
थोडक्यात काय तर फेसबुकनं अनेक लोकांना लिहिते केलेलं आहे. तसंच त्यांच्या रोजगाराची साधनेदेखील त्यांना मिळवून दिलेली आहेत. फेसबुकमुळे अनेक क्रियटिव्ह लेखक तयार झालेले आहेत. अनेकजणांनी टित्रपटात संवाद लेखकांची स्पेस मिळवली आहे. पोलिटिकल पीआर व कंटेट रायटिंगच्या क्षेत्रात फेसबुक लेखकामुळे नवी जाण आलेली आहे. त्यामुळे सोशल मीडियाचे क्षेत्र येत्या काळात प्रचंड विस्तारणार असून तो फक्त अभिव्यक्तीचं माध्यमच नव्हे तर रोजगाराचे एक प्रमुख साधन म्हणून पुढे येणार आहे.

(१२व्या अखिल भारतीय भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात सोशल मीडिया व नवलेखनाची परंपरा या परिसंवादात केलेली मांडणी..)
वीडिओ पाहा

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: सोशल मीडिया आणि नवलेखन
सोशल मीडिया आणि नवलेखन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgs2NTIj-lkTWU-8sZz2RjS5JQMbrrhSLvzG27KcIhEpvW-xOtuKxURmJKzzlxFaHFHdb7jO-QWvHZsm29P-NAuV0mdBViMc1nO2UW9cgzlw25CX4vVKlePgfFKV2uk5qQeyET6BRPc9Yph/s640/IMG_20190105_130030.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgs2NTIj-lkTWU-8sZz2RjS5JQMbrrhSLvzG27KcIhEpvW-xOtuKxURmJKzzlxFaHFHdb7jO-QWvHZsm29P-NAuV0mdBViMc1nO2UW9cgzlw25CX4vVKlePgfFKV2uk5qQeyET6BRPc9Yph/s72-c/IMG_20190105_130030.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/01/blog-post_1.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/01/blog-post_1.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content