सोशल मीडियासंदर्भात दोन धक्कदायक बातम्या गेल्या आठवड्यात आल्या, एकात सरकारने सोशल मीडिया हातळणाऱ्यांवर ठेवलेली करडी नजर, तर दुसऱ्या बातमीत मोबाईल स्क्रीन अॅडिक्शनचे धक्कादायक निकाल होते. फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडियावर केंद्रातील भाजप सरकार बारकाईने लक्ष ठेवणार आहे.
या कामासाठी सरकारने खाजगी संस्थाना हायर केलं असून त्यांना जनतेच्या अभिव्यक्तींच्या हालचालींवर नजर ठेवण्याचं काम दिलं आहे. अंतर्गत सुरक्षा या हेतूने सरकार हे पाऊल उचलत असेल तर काही प्रमाणात या धोरणाला मान्यता देता येईल, पण केवळ जनमाणसाच्या सरकारविरोधी अभिव्यक्तीची गळचेपी म्हणून हे धोरण राबवित असेल तर ते घटनाबाह्य आहे. कारण गेल्याच वर्षी सुप्रीम कोर्टाने व्यक्तिगत अधिकार व स्वातंत्र मूलभूत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणाचं समर्थन कदापि करता येणार नाही.
सरकारच्या या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. अनेक राजकीय पक्षांनी या धोरणाला विरोध दर्शवला आहे. पण यूझर्सनं यावर दिलेली प्रतिक्रीया त्याला या गोष्टीचं गांभिर्य नसल्याचं द्योतक आहे. काही महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी रुपये सरकारविरोधी सोशल मीडिया युझर्सना आटोक्यात आणण्यासाठी खर्च केले आहे. भारतीय जनतेचा हा पैसा सामान्य माणसाचा आवाज दाबण्यासाठी खर्च केला जात आहे. अशावेळी सामान्य माणसाकडून कुठलीही प्रतिक्रीया न येणे धोक्याचे लक्षण आहेत.
वाचा : बालके, पालक आणि गेमिंग ॲडिक्शन
वाचा : प्री एज्युकेशनचा आग्रह म्हणजे अबोध बालकांवर अत्याचार
सरकारकडून एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जनतेच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवलं जाणार आहे. फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्अॅपवर तुम्ही काय संदेश पाठवता, किंवा तो प्राप्त करता, फेसबुकवर तुम्ही काय मते मांडली, ईमेलद्वारे तुम्ही काय व कोणाला संदेश पाठवला आहे, त्यात काय लिहिलं आहे, ही सर्व माहिती केंद्र सरकारकडे जमा होणार आहे.
या माहितीचा सरकार वाट्टेल त्यावेळी केला जाईल. या कामासाठी सरकारने 42 कोटींचं टेंडरही काढल्याचं एकिवात आहे. मोबाईल आणि इंटरनेट अॅडिक्शनमुळे आपण खासगी न राहता पब्लिक झालो आहोत. तुमची कुठलीही माहिती सेफ नाही. या माहितीचा वापर कॉर्पोरेट कंपन्यासोबत राजकीय पक्षांनीदेखील तुमची मते बदलण्यासाठी सुरु केला आहे. केब्रिज अनालिटिकाची डेटा चोरीची घटना याचं उदाहरण ताजं आहे.
मोबाईल यूझर दिवसाकाठी तब्बल दीडशे वेळा मोबाईल पाहतो, असं धक्कादायक सर्वे जामिया विद्यापीठाने नुकताच प्रकाशित केलाय. काही क्षण मोबाईल बघितला नाही की अस्वस्थता वाढते, असंही निरिक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आलं आहे. मोबाईलची विशी साजरी होत असताना त्याचे दुष्परिणाम हळुहळू बाहेर येऊ लागले आहेत.
अनिद्रा, हायपर टेन्शन, रक्तदाब वाढणे, नैराश्य, चिडचीड, एकटेपणा यासह इत्यादी असे असाध्य आजार उदभवू लागले आहेत. कधीकळी तरुणाईंला गुंगाऱ्या देणारा मोबाईल आज प्रोढांनासुद्धा अॅडिक्ट करत आहे. इंटनेटच्या मायावी दुनियेत प्रौंढदेखील हरवून जात आहेत. विवाहितांच्या सोशल मीडियाच्या अती वापरामुळे नसत्या समस्यांना जन्म दिला आहे. हे स्क्रीन अॅडिक्शन संसार तुटण्यापर्यत मजल मारत आहे. अशावेळी थोडसं थांबून विचार करण्याची गरज आहे.
एखादा दिवस सोशल मीडियावर ‘फेस’नाही दाखवलं तर अस्वस्थता वाढते. साहजिकच त्यातून नेट अॅडिक्शन वाढले आहे. चांगल्या गोष्टी सोडून वाईट गोष्टींचा प्रचार, प्रसार नेटीझन्सनी सुरु केला आहे. व्हॉट्स अप नॉनव्हेज मॅसेज, न्यूड व्हीडीओ शेअरिंगचे ‘हब’ बनले आहे.
दर दोन दिवसाला कोणीतरी आपली परवानगी न घेता व्हाट्सअप ग्रूपमध्ये अॅड करत असतो. त्या ग्रूपच्या मध्यमातून फालतू जोक्स, फोटोस, प्रक्षोभक मॅसेजस, पाठवण्याचं काम सुरु असतं. काही ग्रूपस् प्रोपोगंडा मॉडल व विशिष्ट भूमिका राबवतात. यातून अल्पसंख्य समुदायाबद्दल भ्रम पसरवून सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणण्यापर्यंत मजल मारली जात आहे.
व्हीडीओ, टेक्स्ट, इमेजेसच्या माध्यमातून भंपक माहिती, भाषणे, कात्रणे प्रचारीत केली जात आहेत. सतत एकाच प्रकारचे मजकूर टाकून संमोहनशास्त्राचा आधार घेत मन तयार करण्याचे काम विशिष्ट संघटनाद्वारे चालवले गेले. त्याच्या आहारी आपण सगळेच कळत-नकळत गेलो होतो, हेदेखील आपणास मान्य करायला हवे.
व्हॉटस अपच्या वापरातून प्रक्षोभक भाषणे, व्हीडीओ क्लिप्सची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशा कृत्यातून समाजघातकी पुढार्यांना मोठे करण्यात या व्हॉट्स अपवाल्याचा मोठा वाटा आहे.
कॉलेज, अभ्यास, वाचन, सोडून तरुणाई अशा फालतू मॅसेज देव-घेव करण्यात आपला बहुमूल्य वेळ वाया घालवत आहेत. तिकडचे प्रक्षोभक मजकूर वाचून, इकडचेही कामाला लागतात. दोन्ही गटाकडून भंपक कल्पकतेच्या जोरावर डेटानिर्मीती करत शेअरिंग सुरु होते. त्या ‘कॉन्सपिरंसी’ मॉडेलच्या आहारी जाऊन तासंतास चर्चा करत बसतो.
अशा प्रकारे समाजद्वेश पसरविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यातून विघातकी घटकांना बळ देऊन समाजमनात विष पेरण्याचे काम आपणच करतो आहोत. भलं-बुरं काय ते समजून त्यावर विचार केला तर नक्कीच अशा कृत्यांना आपण आळा घालू शकतो.
अलीकडच्या काळात मोबाईलमुळे गुन्ह्यात तिप्पटीनं वाढ झाल्याचं निरिक्षण नोंदवण्यात आलं आहे. महापुरुषाचे अवमान, देव-देवतां विरुद्ध अपशब्द वापरणे, धर्म-जातीवर लांछने, राजकीय नेत्याचे अवहेलना करणे अशा प्रकाराला आपण आळा घालू शकतो.
अशा घटकांना प्रसिद्धी देण्याऐवजी त्याची रितसर तक्रार दाखल करता येऊ शकते. ठिकठिकाणी पोलिसांनी तशी सोय करुन दिली आहे. रिपोर्ट स्टेटस, अनफ्रेंड, ब्लॉक, सारखे पर्याय उपलब्ध असून त्याचा वापर वाढविता येऊ शकतो. क्रेंब्रिज अॅनालिटिकाच्या घटनेनंतर वादग्रस्त शब्दाचे स्टेटस फिल्टर करण्याचे काम सुरु आहे, ही फिल्टर करणारी यंत्रणा आहोरात्र राबून कंट्रोवर्शल पोस्ट हटवत आहेत. सतत एक सारख्या येणार्या पोस्टला वॉच ठेऊन सदर व्यक्तीवर कारवाई करण्याचा बडगा पोलिसांनी उचलला आहे.
इंटरनेट वापरात पोर्नोग्राफिक साईट्स बघण्यात आम्हा भारतीयांचा अग्रक्रम आहे. पोर्नोग्राफीमुळे इकोनॉमी मार्केटला मोठा आर्थिक लाभ होतो. पण युझर्सला काय मिळते तर शून्य; उलट नानाविध सवयी यूझर्समध्ये जडल्या जातात. सतत मोबाईलशी चिकटून राहिल्यानं स्क्रीन अॅडिक्शनचा या नव्या आजाराची लागण झाली आहे. मोबाईल इंटरनेटचा वापर विधायक कामासाठी करता येऊ शकतो.
मोबाईल ॲडिक्शन ओळखून त्यातून बाहेर येण्याची गरज आहे. व्हर्च्युअल मीडियमच्या बाहेर येऊन वास्तव जग स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे. ऑनलाईन मित्रांमध्ये कनेक्टेड राहण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारल्या पाहिजेत. घरात मोबाईलला चिकटून राहण्याऐवजी कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे, वाचन लेखन, खेळ, प्रवास, ट्रेकिंगला वेळ दिल्यास आरोआप स्क्रीन ॲडिक्शन सुटू शकते.
वाचा : मैदानी खेळ कमी होणे किती धोक्याचे ?
वाचा : विद्यार्थी जंक फूडच्या आहारी का जातो?
मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर गरज असेल तेव्हाच करा, इंटरनेटवर काय पहायचं, काय पाहू नये यादी स्वत:च करा. रात्री झोपताना मोबाईल जवळ बाळगू नका, पालकांनीदेखील मोबाईलचा वापर शक्यतो गरज असतानाच करावा, मुलांशी सातत्यानं संवाद साधावा. ॲडिक्शनची लागण वेळीच ओळखून वेळेप्रंसगी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.
जाता-जाता: बीड जिल्ह्यातील वाचक मित्रांशी कनेक्टेड राहता यावे या अनुशंगाने मी गेली वर्षभर आपल्याशी समकालिन राजकीय घटनांवर मुक्तसंवाद साधला. काही वेळा कम्यूनिकेशन थेयरी मधला हा ‘आत्मसंवाद’ एकतर्फी घडला असेल. परंतु हा ‘आंतरसंवाद’ घडवण्याचा मी सहेतूक व प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
सदर कम्यूनिकेशन प्रक्रिया यशस्वी झाली की नाही हे मला माहीत नाही, या प्रश्नांचं उत्तर तुमच्याकडे आहे. या सदरातून राजकीय घटनांवर मी भाष्य केलं आहे. येत्या काळात नव्या विषयावर वेगळ्या धाटणीचं लिखाण मी इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सदराची सांगता इथं करत आहे. माणूस नॉस्टेलजियात रमतो, आठवणींचा गोतावळा वयाच्या कुठल्याही टप्प्यावर त्याची पाठ सोडत नाही, अशा काही आठवणींचा कोलाज व कॅनव्हास घेऊन मी आपल्या भेटीला येईल.. तोपर्यत ‘दटे रहो… कनेक्टेड रहो....!

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com