भाजपचे राजकारण म्हणजे पेराल ते उगवेल!



मेरा बेटा गया कोई बात नहीं, दूसरे को तकलीफ़ मत होने दो, इस्लाम का पैगाम अमन का पैगाम है. इस्लाम ये कहता है कि खुद तकलीफ उठा लो लेकिन दूसरे को तकलीफ ना होने दो. हमारे आसनसोल में हम लोग अमन चैन से रहना चाहते हैं और मैं इस्लाम का पैगाम देना चाहता हूं, बेटा मरने के बाद भी मुझे जो इसे सहने की ताक़त मिली है वो अल्लाह की दी हुई है. अपने मुल्क में शांति रहे, दंगा-फसाद ना हो और हमारे किसी भाई को तकलीफ़ ना हो. 
ही वाक्य आहेत पश्चिम बंगालच्या इमाम इम्तदुल्लाह रशीद यांची. पश्चिम बंगालच्या दंगलीत इम्तदुल्लाह यांचा तरूण मुलगा हाफेज सब्कातुल्ला याला दंगलीत हल्लेखोरांनी ठार मारलं. त्यानंतर इम्तदुल्लाह यांनी बीबीसीला दिलेली ही प्रतिक्रिया आहे. इम्तदुल्लाह यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मुलाच्या मृत्युनंतर इम्तदुल्लाह यांनी दिलेली प्रतिक्रीया अश्वासक व बोलकी आहे.
वाचा : मारो-काटोसंस्कृतीचे समर्थन धोकादायक
बीबीसीसारख्या काही माध्यमांनी बिहार आणि पश्चिम बंगाल दंगलीचं निश:पक्षपाती ग्राउंड रिपोर्टिंग केलं. पण इतर मीडिया हाऊसनं दंगलीआड सांप्रदायिक वातावरण तयार करण्याचं राजकारण सुरू ठेवलं. कधी नव्हे ते यावेळी प्रसारमाध्यमांनी दंगलीचे भयान लाईव्ह दृष्ये टीव्ही स्क्रीनवर दाखवले. ही दृष्ये विनासेन्सॉर दाखवूनगोदी मीडियावातावरण भडकावण्याचे कंत्राट पूर्ण करण्याचं काम करत होता. भडक बातम्या देऊन आगीत तेल ओतण्याचं काम दंगल काळात मीडियानं यथोचित पार पाडलं
टीव्हीवरून दंगलीची एकांगी दृष्ये वारंवार दाखवली जात होती. ही दृष्ये पाहून देशभऱातील आर्थिक घुसमट बेरोजगारीच्या दरीत कोसळलेल्या शोषित तरूणांची मानसिकता दंगली घडविण्यासाठी तयार होणं साहजिकच आहे. गोदी मीडिया व सांप्रदायिक भाजपचा दंगली घडविण्याचा हा घातकी चेहरा कोबरा पोस्टनं मार्चमध्ये उघडकीस आणला. दंगलीच्या काळात हे स्टिंग ऑपरेशन प्रसारित होणे निव्वळ योगायोग होता. पण अनेक धक्कादायक खुलासे कोबरा पोस्टच्या स्टिंगमधून बाहरे आले आहेत. या स्टिंगमुळे मीडिया बाजारात फेकपेड न्यूज चा जीवघेण्या राक्षसाची सामान्य नागरिकांना ओळख झाली.
मीडियाला हाताशी धरून देशात सांप्रदायिकतेची बीजं पेरली जात आहेत. कोबरा पोस्टचे स्टिंग पाहिल्यास नेमकं काय सुरू आहे याचा चांगला अंदाज येऊ शकतो. नुकतंच जेएनयूचा बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमदच्या आईनं इंडिया टूडे व टाईम्स नाऊ या न्यूज चॅनलवरफेक न्यूज चालवून मुलाची बदनामी केल्याचा खटला भरला आहे
नजीब आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा खोटा बनाव या न्यूज चॅनलनी रचला होता. मुलाला बदनाम केल्याप्रकरणी 2 कोटीचा दावा नजीबच्या आईनं ठोकलाय. सोमवारी 2 एप्रिलला केंद्र सरकारनं फेक न्यूज देणाऱ्या पत्रकारांवर कारवाईची घोषणा केली होती. पण प्रधानसेवकांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही घोषणा तात्काळ मागे घेण्यात आली आहे.
काही तासात घोषणा मागे घेणं इतकं सहज घडलेलं नाहीये. याचे सुक्ष्म निरिक्षण केल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. 3 एप्रिलला इंडियन एक्सप्रेसनं एक स्फोटक बातमी दिली होती. या वृत्तात 13 केंद्रीय मंत्र्यांनी एकाच वेबसाईटची फेक न्यूज शेअर केल्याचा दावा या एक्सप्रेसनं केला होता. या वेबासईटनं चार मोठ्या फेक न्यूज प्रसारित केल्याचं एक्सप्रेसचं म्हणने आहे. 
ही वेबसाईट पंतप्रधान मोदींच्या सततच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीची असल्याचा खुलासा एक्सप्रेसनं केला होता. या वेबसाईटच्या बातम्या शेअर करणाऱ्यांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी, कृषी मंत्री राधामोहन सिंग, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर, विजय गोयल, राज्यवर्धन सिंग राठौड, बाबुल सुप्रियो इत्यादींचा सामावेश आहे. हे वृत प्रसारित होताच सरकारने आपला निर्णय तडकाफडकी मागे घेतला आहे. 
मीडिया रिपोर्ट्सच्या बातम्या पाहिल्या तर अनेक न्यूज वेबसाईट या भाजपपुरस्कृत आहेत, त्यांचं काम काँग्रेस आमि मुस्लिमविरोधात बातम्या देणे, बातम्यांमधून भाजप व संघ परिवाराचा अजंडा रेटणे व दिशाभूल करणाऱे स्फोटक प्रसारित करणे हे काम या वेबसाईट करतात, ऑल्ट न्यूजनं अनेकदा या वेबसाईटची चिरफाड करत त्यंचा बनाव उघडकीस आणला आहे. 
अशा अवस्थेत भाजप सरकारने फेक न्यूवर चाप बसवण्याचा निर्णय त्यांच्याच अंगलट आला आहे. त्यामुळे काही तासातच हा निर्णय रद्द करण्यात आला. विषेश म्हणजे शुक्रवारी 30 मार्चला फेक न्यूज पब्लिश करून सांप्रदायिक वातावरण तयार केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनीपोस्टकार्डवेबासईटचा संपादक महेश हेगडेला बेड्या ठोकल्या आहेत. पोस्टकार्ड ही वेबसाईट भाजपपुरस्कृत फेक बातम्या प्रसारित करण्याचं काम करते. अशा वेबसाईटला संरक्षण देऊन धर्मद्वेषी अजेंडा रेटण्यासाठी भाजपनं हा निर्णय मागे घेतल्याचं स्पष्ट आहे.  
वर्णद्वेषी व धर्मद्वेषी हल्ले फक्त मुस्लिम समुदायावर होत आहेत असं नाही, सोमवारच्या भारत बंदचं उदारण पाहिलं तर दलित समुदायांवर वर्णभेदी हल्ले झाल्याचे अनेक उदाहरणे पाहायला मिळाली. अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर भारत बंदची हाक देण्यात आली होती. देशभरात दलित संघटनांनी मोर्चे काढले. 
मोर्चावरून अनेक ठिकाणी बजरंग दल व दलित संघटना समोरा-समोर होत्या. बजरंग दलाच्या गुंडांनी निळे झेंडे हाती असलेल्या दलित कार्यकर्त्यांना मारल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही फोटोत मोर्चावर हल्ले करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत होतं.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या सत्तेला नुकतंच एक वर्षं पूर्ण झालं आहे. या वर्षभरातअब तक एक हजारलोकं एन्काऊंटरच्या नावाखाली भाजप सरकारने संपवले आहेत. ठार केलेल्यांमध्ये बहूतेक तरूण दलित आहेत. या संदर्भात 2 एप्रिलला दी हिंदूनं सविस्तर बातमी दिली आहे. वर्षभरात य़ोगी सरकारने तब्बल एक हजार जणांचे घरे आणि कुटुंबे उद्धवस्त केल्याचं दी हिंदूनं म्हटलं आहे. योगी सरकारने मार्च 2017 मध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर एन्काऊंटरमध्ये 49 लोकं मारले गेले. 370 जखमी झाले तर 3 हज़ार पेक्षा जास्त लोकं अटक करण्यात आली आहेत. याउपलब्धीवर सरकारचे मंत्री कौतुकानं बोलत आहेत
राज्यातला क्राईम संपवण्यासाठी आम्ही पाहिजे ते करूअशा जाहीर घोषणा सरकार त्यांचे मंत्री करत आहेत. रिहाई मंचने तर दावा केलाय की सरकार फेक एन्काऊंटर करून दलित आणि मुस्लिम तरूणांना संपवत आहे. तर विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी भाजप आणि योगी सरकार यूपीत एन्काऊंटरचं गुजरात मॉडल लागू करत आहे असा आरोप केला आहे. बढतीसाठी सामान्य तरुणांना मारलं जातंय असंही अखिलेश यांनी म्हटलं आहे.

विषेश म्हणजे गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये सहारणपूरला दलितांचे हत्याकांड झाली. गौवंश हत्यच्या नावाखाली अनेक दलित आदिवासींवर हल्ले झाले. गेल्या वर्षभरात मॉब लिचिंग गौरक्षकांचा उच्छाद यूपीत वाढला आहे. राज्यात सांप्रदायिक दंगली, वर्णभेदी हल्ले भाजपकृपेनं सुरु आहेत. नुकतेच राज्य सरकारने डॉ. आंबेडकरांचे नाव बदलून वेगळा विषय चर्चेत आणला आहे. तर केंद्रानं दलित समाजाच्या संरक्षणासाठी असलेला अट्रॉसिटी कायदा कमकुवत करुन तो संपवण्याचा घाट घातला आहे. 
यावरून देशभरात रणकंदन माजलं आहे. या दोन्ही घटना (फेक) एन्काऊंटरशी जोडून पाहिल्यास अनेक गोष्टी क्लीक होऊ शकतात. सोमवारी 2 एप्रिलला दलित संघटनांकडून अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर भारत बंदची हाक देण्यात आली होती. अट्रॉसिटी कायद्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी दलित संघटना नेते करत आहेत
या मागणीसाठी देशभरात मोर्चे काढण्यात आले. मोर्चाना हिंसक वळण लागल्यानं सहा जणांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी बजरंग दल दलित कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. राजस्थानमध्ये भारत बंद दरम्यान झालेल्या हिसेंचे पर्यवसान दंगलीत झाले. मंगळवारी 3 एप्रिलला राजस्थानमध्ये तब्बल एक हजार जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात निमलष्करी दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. काही शहरात कर्फ्यू लावण्यात आला होता.
थोडक्यात काय भाजप सरकारनं गेल्या चार वर्षात धर्म आणि जातिच्या नावावर जे मतांचं पीक घेतलं आहे, त्याची परतफेड होण्याची वेळ आली आहे, सुरुवातीच्या काळात फक्त मुस्लिम समुदाय भाजपच्या द्वेषी राजकारमात भरडला जात होता, आता मागास व दलित हिंदूंनादेखील साप्रदायिकतेचे चटके बसत आहेत. त्यामुळे त्या-त्या प्रदेशात तो-तो पीडित समुदाय भाजपविरोधात रस्त्यावर उतरत आहे. 
दुसरीकडे भाजपपुरस्कृ धर्मवादी संघटनांनी सांप्रदायिक वातावरण तयार करण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे एक सजग नागरिक म्हणून आता आपली जबाबदारी आणखीन वाढली आहे. फक्त पश्चिम बंगालच्या इम्तदुल्लाह यांनी दंगेखोराविरोधात भूमिका घेणे इथपर्यंत थांबता कामा नये, आपणही मोठ्या संख्येनं दंगलखोविरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.  

कलीम अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: भाजपचे राजकारण म्हणजे पेराल ते उगवेल!
भाजपचे राजकारण म्हणजे पेराल ते उगवेल!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtHtKCo9phsk_P0dBqVak5cGBEnBvb_tH1pxy9PQeTdiGA9hWQseyxkMai_ewPb-hfHQ4j4AzDjym4WyvImnLLQD7MKZ1pUUT0Xbt6ZMC2eVnQdyKrmfGuXJ4_hQyex4lWT8FTouZr_ibg/s640/Roll-back-of-muzzling-of-press_106195_730x419-m.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtHtKCo9phsk_P0dBqVak5cGBEnBvb_tH1pxy9PQeTdiGA9hWQseyxkMai_ewPb-hfHQ4j4AzDjym4WyvImnLLQD7MKZ1pUUT0Xbt6ZMC2eVnQdyKrmfGuXJ4_hQyex4lWT8FTouZr_ibg/s72-c/Roll-back-of-muzzling-of-press_106195_730x419-m.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/04/blog-post_4.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/04/blog-post_4.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content