
‘सकाळी दहाच्या सुमारास काही भगवे गमछे घातलेल्या काही तरूणांनी आमच्यावर हल्ला केला, ते जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देत होते, भितीमुळे आम्ही स्टॉल सोडून पसार झालो, त्यांनी आमचा माग केला. आम्ही पुलाखाली लपलो असता काहींनी आमच्यावर पुन्हा हल्ला केला, मग जीव वाचवण्यासाठी मी व माझा पती एका गावात शिरलो, तिथं आम्हाला गावकऱ्यांनी गावाबाहेर जायला सांगितलं त्यांचे म्हणने होते, तुमच्यामुळे आमच्यावरही हल्ला होईल. आम्ही तिथूनही सुसाट पळाले, आम्ही पळालो नसतो तर मी व माझ्या पतीने जीव गमावला असता’भीमा कोरेगावच्या हिंसाचाराचे हळुहळू सामाजिक व राजकीय पैलू बाहेर येत आहेत. कुणासाठी तो भयभीत करणारा दंगा होता, तर कुणासाठी राजकीय संधी होती. अनेकजण ‘बरं झालं माज उतरला’ असं म्हणणारेही होते. सोशल मीडिया चाळला समाजात किती विकृत मानवरूपी दानवं दबा धरून बसली आहेत, याची प्रचिती येते.
काहीजण हिंसाचारात पेटलेल्या वाहनांना नंबरींग करत आहेत, तर काहीजण ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सामील आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांचा लसावी काढत आहेत. एकूण पाहता जे झाले ते बरं झालं अशी मानसिकता गेल्या आठवडाभरात पाहायला मिळाली. भीमा कोरगांव, वढू बुद्रूक वासीयांची भिती व दहशतीचे वातावरण मनातून काढू पाहात आहेत.
प्रिंट मीडियाने यांच्या धक्कादायक कथा छापल्या आहेत. गामस्थांच्या तोंडातून बाहेर पडणारे ते भगवाधारी नेमके कोण होते? ही आवाजं मीडियाने संपादनातून गहाळ केली आहे. त्यामुळे ते नेमके कोण आहेत? हे अवघ्या महाराष्ट्रात माहीत आहे, पण सत्ताशहामुळे त्यांना हात लावण्याची हिम्मत कोणी दाखवू शकणार नाही.

वाचा : अफराजुलची हत्या - हिंस्रपणाचा कळस
मुख्यमंत्र्यांनी थेटपणे बाहेरच्यांनी दंगल घडवली असं म्हटलं आहे, त्यामुळे उमर व जिग्नेशविरोधात तक्रार दाखल करणाऱ्यांना बळ मिळालं, किंबहूना मुख्यमंत्र्यांनीच तक्रार करण्याची दिशा सांगितली असावी अशी शक्यता आहे. बहूजनप्रतिपालक राजावंशीय कथित राजेंनी दंगलीचा दोष अमूक-तमूक व्यक्तींवर लावणाऱ्यांची सरेआम लायकी काढली. त्यामुले प्रमुख दोषींना आपोआपच क्लीन चिट मिळाली.
दुसरं म्हणजे या वक्तव्यामुळे हिंसाचार घडण्याचे अजून एक कारण चाणाक्ष जनतेच्या पुढ्यात होतं. सरकारने चौकशी समितीघोषित करून टाकली. हा अहवाल येईल, तसा तो बासनातही जाईल. मुंबई दंगलीच्या ‘श्रीकृष्ण आयोगा’चे काय झालं हे उदाहरण आपल्यासमोर आहे.
चौकशी समितीतील विद्यमान न्यायाधिशांना दोषींना जागेवर शिक्षा करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणीप्रकाश आंबेडकर यंनी केली आहे. ती मागणी मुख्यमंत्री मान्य करतील अशी अपेक्षा ते करत आहेत, मंगळवारच्या ‘महाराष्ट्र बंद’नंतर कोम्बिंग ऑपरेशन रोखण्याचे आश्वासन सीएमने दिलं होतं. हा शब्द मुख्णंत्र्यांनी पाळला नाही मग हे आश्वासन ते पाळतील याची काय शाश्वती? दुसरीकडे राज्यसभेत अजून एका दलित नेतृत्वाने ‘हिंसाचाराला सरकारला दोषी ठरविता येत नाही’ म्हणत भाजपला क्लीन चिट दिला आहे. त्यामुळे खरे दलित नेतृत्व नेमकं कुठलं असा प्रश्न आंबेडकरी अनुयायांना पडला आहे.
भीमा कोरेगांवच्या हिंसाचाराचा धूर शांत झाला असला तरी निखारे अजून तेवत आहेत. घटनेला आठवडा उलटला आहे, मात्र, खरे सूत्रधार कोण? य़ाचा तपास अजून लागलेला नाही. खरे गुन्हेगार बाहेर येण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. कारण सरकारची इच्छाशक्ती दंगेखोऱांना शोधण्याची नाही, त्यामुळे सत्ताधिकाऱ्यांनीच दंगली घडविल्या असाव्यात असं दबक्या आवाजात कुजबूज सुरु आहे.
घटनेच्या दोन-तीन दिवस आधीचा सोशल मीडिया तपासला तर दंगेखोर कोण होते, याचा तपास चुटकीसरशी लागेल. भीमा कोरेगावला जमणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना उघडपणे धमकावणारे ते कोण होते? भीमा कोरेगावात आकडा कमी पडत असेल तर पालकमंत्री गिरीश बापटांना कमी करा म्हणणारे नेमके कोण आहेत? सांकेतिक भाषा वापरून दंगलीचे वातावरण तयार करणारे कदाचित कधीच बाहेर येणार नाहीत. सरकारचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर म्हणून गेले सोशल मीडियामुळे हिंसाचार झाला, कदाचित ते खरे बोलले असावेत, कारण त्यांना गुप्त इनपूट पोहचले असावेत, त्यामुळेच ते बोलून गेले.

डिसेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुण्यातील हडपसरमध्ये ऑटोला धक्का लागला म्हणून काही समाजकंटकांनी डझनभर गाड्यांची तोडफोड केली. क्षुल्लक घटनेला हिंदू-मुस्लीम रंग देऊन दहशतीचे वातावरण तयार करण्यात आलं होतं. या घटनेची वेळीच दखल घेतली नसती तर भयानक दंगा घडण्याची शक्यता होती.
कारण गेल्या तीन महिन्यापासून पुण्यात दंगलीचे वातावरण तयार करण्याचे काम काही अदृय शक्ती करत आहेत. पुण्यातील निगडी, पिंपरी चिंचवड, रूपी नगर भागात मुस्लीम समुदायावर हल्ले करून दंगलीची पार्श्वभूमी तयार करण्यात आली. बजरंग दल, हिंदू एकता मंचच्या कार्यकर्त्यांनी फेसबूकवरुन दंगल पेटवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केलं होतं. (प्रतिक गोयल, सकाळ टाईम्स, 26 डिसेंबर 2017)
वाचा : दे(द्वे)शभक्तीला चपराक
वाचा : ‘मारो-काटो’ संस्कृतीचे समर्थन धोकादायकसांकेतिक भाषा वापरुन थेटपणे चिथावणी देऊन हिंदू राष्ट्र सेना व बजरंग दलाचे कार्यकर्ते मुस्लीम द्वेषाचे वातावरण तयार करत होते. 20 डिसेंबरला निगडी कबरस्तानच्य़ा दीशादर्शक फलकावर बजरंग दलाच्या शाखेचा फ्लेक्स लावण्यात आला. हा फलक महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व पोलिसांच्या उपस्थितीत काढण्यात आला. या निमित्ताने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक मुस्लीम तरूणांना जबाबदार धरत त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला.
मुस्लीम महिलांना मारहाण करण्यात करत त्यांचा विनयभंग केला. या संबधी मुस्लीम तरूण तक्रार दाखल करायला गेले असता त्यांची तक्रार न घेता पोलिसांनी त्यांना हुसकावून लावलं. तक्रार घेण्याची हट्ट करत तरुणांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. दुसऱ्या दिवशी मारहाणीची तक्रार दाखल करुन घेतली. पण त्याच मुस्लीम तरुणांवर खूनाचे, हत्या करण्याचा प्रयत्न, हल्ला केल्याचे खटले पोलिसांनी भरले. स्थानिक भाजपचे नगरसेवक व आमदाराच्या दबावातून पीडित मुस्लीम तरुणांवर खटले भरण्यात आले. (एफआरआय क्रमांक 0941, कोंढवा पोलीस स्टेशन)

हिंदू एकता आघाडी, बजरंग दल आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांविरेधात दाखल झालेल्या तक्रारीत मुस्लीम समुदायाविरोधात चिथावणीखोर भाषा सोशल मीडियातून वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारा, कापा, विकेट पाडा अशी भाषा वापरुन मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.
गेल्या तीन महिन्यापासून असे प्रकार पुण्यात सुरू आहेत. परंतु यावर मुस्लीम समुदायाने कुठलीच प्रतिक्रीया दिलेली नाही. इतकं सुरू असतानाही मुस्लीम समाजाने शांत व संयमी भूमिका घेतली आहे. तरीही हिदुत्वादी संघटनांनी मुस्लिमांना भडकावण्याचे काम सुरूच ठेवलं आहे. 2014च्या मोहसीन शेखच्या हत्येनंतर पुण्यात सोशल मीडियावरुन मुस्लीम समुदायाला चेतवण्याचे प्रकार मोठ्य़ा प्रमाणात सुरु आहेत.
मोहसीन शेखच्या खटल्यात निरक्षक असेलेले अझहर तांबोळींनी खुद्द आठ प्रकरणात हिदुत्वादी संघटनांच्या विरोधात एफआरआय दाखल केली आहे. निगडीच्या प्रकरणातही त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एफआरआय नोंदवली आहे.

ही घटना ताजी असताना पुण्यात भीमा कोरेगावचा हिंसाचार घडला आहे. शुक्रवारी बीबीसी हिंदीने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. बीबीसीने वढू बुद्रूक व भीमा कोरेगावच्या दंगलीत हिंदुत्ववादी शक्तींचा हात असल्याचा अंदाज व्यक्त केला.
बीबीसीने आपल्या सकाळच्या रेडिओ कार्यक्रमात एका प्रत्यक्षदर्शी महिलेची प्रतिक्रिया ऐकवली, त्यात ती महिला म्हणते, ‘सकाळी दहाच्या सुमारास काही भगवे गमछे घातलेल्या काही तरूणांनी आमच्यावर हल्ला केला, ते जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देत होते, भितीमुळे आम्ही स्टॉल सोडून पसार झालो, त्यांनी आमचा माग केला. आम्ही पुलाखाली लपलो असता काहींनी आमच्यावर पुन्हा हल्ला केला, मग जीव वाचवण्यासाठी मी व माझा पती एका गावात शिरलो, तिथं आम्हाला गावकऱ्यांनी गावाबाहेर जायला सांगितलं त्यांचे म्हणने होते, तुमच्यामुळे आमच्यावरही हल्ला होईल. आम्ही तिथूनही सुसाट पळाले, आम्ही पळालो नसतो तर मी व माझ्या पतीने जीव गमावला असता’ (नमस्कार भारत, बीबीसी-5 जानेवारी)
भीमा कोरेगावची दंगल कोण घडवली हे स्पष्ट आहे, त्यामुळे सरकारने त्यांना तात्काळ शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. प्रधानसेवकांनी या दंगलीवर बोलावं अशी मागणीही केली जात आहे. शुक्रवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन जिग्नेश मेवाणीने मोदींवर निशाना साधला, ‘स्वत:ला आंबेडकर भक्त म्हणवणारे मोदी भीमा कोरेंगावच्या हिसेंवर का बोलत नाही’ असा प्रश्न त्याने विचारला.
भीमा कोरेगाव प्रकरणातून एकट्या जिग्नेशने भाजपला अंगावर घेतलं आहे, परवा म्हणजे मंगळवारी तो दिल्लीत ‘युवा हुंकार परिषद’ घेतोय. देशभरातून दलित समाजातील तरूण मुलं दिल्लीला जाऊन भाजपला आव्हान देणार आहे. भीमा कोरेगाव प्रकराणामुळे देशभरातील दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय राजकारण अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.
कलीम अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com