गेल्या महिन्यात राजेश खन्ना स्टारर ‘प्रेम कहानी’ पाहण्याचा योग आला. अभिनेत्री मुमताजसह त्यात शशी कपूर व विनोद खन्ना
यांनीदेखील अभिनय केला आहे. त्यात विनोद खन्ना यांचं ‘शेरखान’ नावाच्या पात्राचा अभिनय खूपच भावला. योगायोगाने त्याच आठवड्यात (६ ऑक्टोबर)
विनोद खन्ना यांचा वाढदिवस होता.
रात्री बारा-एकला सिनेमा संपला. वाटलं काहितरी लिहून काढावं. तत्काल
प्रभावामुळे तीन-चार वाक्य सहज सूचली तशी ती टायपून काढली. पण कॉर्पोरेट कंपनीचा
एम्प्लॉई असल्याने लवकर झोपी जाणणं भाग होतं, कारण सकाळी पाचला आवरून शिफ्टसाठी
निघायचं होतं. पण झोप लागेपर्यंत विनोद खन्नांचे पात्र व त्यांचा अभिनय बराच वेळ डोळ्यासमोर
तरळत राहिला.
सकाळी पीकअप व्हॅनमध्ये बसून मोबाईल चाळण्याऐवजी विनोद खन्नाच्या पात्राचा
विचार करू लागलो. काही शब्द लिहून काढली. बोटं की पॅडवर धावले अन् बघता-बघता
ऑनलाईनसाठी छोटासा लेख तयार झाला. विनोद खन्ना व्हर्सटाईल अॅक्टर आहेत.
बॉलीवूडमध्ये अनेक भूमिका त्यांनी उत्तमपणे रंगवल्या आहेत. पण १९७१ साली आलेल्या ‘मेरा गांव मेरा देश’ सिनेमामुळे त्यांना खरी ओळख प्रदान
झाली, असं म्हणता येईल.
जब्बर सिंह नावाचं एक निगेटिव्ह शेडचं पात्र त्यांनी रंगवलं होतं. गाव त्यातील
समाजकारण अशी या सिनेमाची पार्श्वभूमी होती. धर्मेंद्रनी त्यात प्रमुख भूमिका
साकारली होती. राज खोसला यांच्या या सिनेमावर आधारित पुढे ‘शोले’चा ‘गब्बर सिंह’ तयार झाला, असं अनेक सिनेप्रमींचं
म्हणणं होतं. किंबहुना 'गब्बर'चा रोलदेखील विनोद खन्ना यांना ऑफर
झाला होता, असंही सांगितलं जातं.
जब्बर सिंह हे पात्र आजही अजरामर आहे. विनोद खन्ना यांच्यामध्ये अभिनयाच्या
अनेक छटा आहेत. (ह्याच छटा त्यांचा मुलगा अक्षय खन्नाकडे अनुवांशिकपणे आलेल्या
आहेत.) त्यामुळेच ते अनेक उत्तम सिनेमे करू शकले. प्रत्येक भूमिकेत विनोद खन्नांनी
जीव ओतला.
त्यांनी साकारलेला बॉलीवूडचा व्हीलेन जरासा हटके होता. परविश सिनेमातील किशन बाप
पोलीस अधिकाऱी संस्कारी कुटंबात वाढलेला युवक आहे. परंतु सूडभावनेने तो पेटलेला
आहे. असाच हटके व्हिलेन विनोद खन्ना यांच्या रूपाने अनेक सिनेमात येत राहतो.
वाचा : देव आनंद : जवांदिल आणि बहुअयामी व्यक्तिमत्त्व !
वाचा : मन तडपत 'रफी' गीत बिन
योगायोग असा की, १९६८ साली सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या विनोद खन्ना यांना पहिली नकारात्मक भूमिका मिळाली. दिग्गज अभिनेते सुनील दत्त यांनी त्यांचे भाऊ सोम दत्तसाठी ‘मन के मीत’ नावाचा सिनेमा तयार केला होता. त्यात व्हिलेन पहिली संधी मिळाली. पुढे चार-एक वर्षांत ‘पूरब और पश्चिम’, ‘सच्चा झूठा’, ‘आन मिलो सजना’, ‘मस्ताना’ आणि ‘मेरा गाँव मेरा देश’ इत्यादी सिनेमात त्यांना नकारात्मक पात्र साकारत सिने इंडस्ट्री आपली जागा भक्कम केली.
त्यांच्या जन्म १९४६ साली ब्रिटिश भारतातील पेशावरमध्ये झाला. त्यांचे वडिलांचं
नाव किशनचंद खन्ना आणि आईचं नाव कमल खन्ना होतं. वडिल एक प्रसिद्घ व्यापारी होते.
ज्यांचा व्यवसाय टेक्सटाइल, डाई आणि रसायन बाज़ारात पसरलेलं होतं. जनम्च्या वर्षभरात भारताची फाळणी झाली.
त्यानंतर त्यांचं कुटुंब सुरुवातीला दिल्ली व नंतर मुंबईला स्थलांतरित झालं.
देखणेपणा व अभिनयाचे विविधांगी गण हे विनोद खन्ना यांचं वेगळंपण म्हणायला हवं. होय खरंच वेगळंपण होतं. इतके हिरो असूनही विनोद खन्ना त्या भाऊगर्दीत आपलं वेगळपण ठसविण्यास यशस्वी ठरते. त्यांनी आपल्याला मिळालेलं प्रत्येक काल्पनिक पात्र अक्षरश: जिवंत केलं. एकीकडे त्यांनी कपटी व धुर्त व्हीलेन साकारला तर दुसरीकडे रोमाण्टिक पात्रदेखील साकारलं. दोन्ही भूमिकेत दर्शकांनी त्यांना भरपूर पसंती दिली.
वर्ष १९७३ ते १९८० पर्यंत त्यांनी अनेक सिनेमात सोलो हीरोची भूमिका साकारली. ज्यात ‘फरेबी’, ‘हत्यारा’, ‘क़ैद’, ‘ज़ालिम’, ‘इनकार’ होते. पण त्यांची ओळख मल्टिस्टार सिनेमाचा नायक अशीच कायम राहिली. ‘गद्दार’, ‘आप की खातिर’, ‘मैं तुलसी तेरे आँगन की’, ‘खून की पुकार’, ‘शौक़’, ‘आधा दिन और आधी रात’, ‘आरोप’, ‘जेल यात्रा’, ‘ताक़त’, ‘दौलत’ असी त्यांची सुरुवातीची मल्टिस्टार सिनेमे होते. पण ‘हेरा-फेरी’, ‘परवरीश’, ‘मेरे अपने’, ‘कुरबानी’, ‘मुकद्दर का सिंकदर’, ‘हाथ की सफाई’ अशा अनेक यशस्वी मल्टिस्टार सिनेमांनी त्यांना चांगलीच ख्याती लाभली.
शिवाय त्यांनी अनेक सपोर्टिंग रोलही केले. ज्यामुळे त्यांच्या स्टारडमला चार चाँद लागले. मुळात सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये मल्टिस्टारर चित्रपटांचा ट्रेंड होता. एका सिनेमात तीन-तीन नायक असे. अशा सिनेमात काम करणं जोखमीचं मानलं जातं. त्यात आपल्या भूमिकेला किती महत्त्व मिळेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळं अशे सिनेमे करण्यास बहुतेक अभिनेते नकार देतात. कदाचित ही चिंता व भीती विनोद खन्ना यांना वाटली नसावी. त्यामुळेच त्यांनी या बड्या नायकांच्या गर्दीतही ‘हिरो’ म्हणून आपलं नाणं गाजवलं.
सपोर्टिंग रोल करताना त्यांना ‘आन मिलो सजना’, ‘सच्चा झूठा’, ‘कुदरत’, ‘राजपूत’, ‘प्रेमकहानी’ इत्यादी चित्रपटात राजेश खन्ना सोबत सपोर्टिंग रोल मिळाला होता. सुपरस्टार जितेंद्रसोबद त्यांनी ‘एक हसीना दो दीवाने’, ‘एक बेचारा’, ‘परिचय’, ‘इंसान’, ‘अनोखी अदा’ आणि ‘जन्म कुंडली’सारखे सिनेमे केले.
वाचा : 'सिनेअभिरुची' की 'पुणेरी' जाणिवांचा सांस्कृतिक वर्चस्ववाद
ओशोच्या सहवासात
अनेक सिनेपत्रकारांच्या मते विनोद खन्ना अमिताभपेक्षा गुणी अभिनेते होते.
त्यांना अनेक संधी मिळाल्या पण काही संध्या स्पर्धा व सिनेसृष्टीत अंतर्गत
कुरघोड्यामुळे गमावाव्यादेखील लागल्या. अनेकजण खंत व्यक्त करतात की, विनोद खन्ना ओशो
आश्रमात गेले नसते तर नक्कीच महानायक झाले असते.
विनोद खन्ना यांनी आपल्या करिअरच्या एका मोठ्या काळापर्यंत स्टारडम गाजवला. त्यांच्या
करियरमध्ये एक काळ असाही आला की, त्यांना जितेंद्र, अमिताभ, ऋषि कपूर इत्यादी सुपरस्टारपेक्षा
अधिक मानधन दिले गेले.
सिने करिअर भरभराटीला असताना विनोद खन्ना आचार्य रजनीशच्या सहवासात आले. १९८२ साली
सिनेसृष्टीतून संन्यास घेत सर्वकाही सोडून ते ओशो आश्रमात दाखल झाले. सिनेपत्रकार अनिता
पाध्ये ‘एक होता गोल्डी’ पुस्तकात लिहितात, “विनोद खन्ना आणि गोल्डी आनंद यांच्या
ओशो आश्रमात जाण्याच्या निर्णयाने सबंध इंडस्ट्रीत खळबळ माजली. सगळीकडे एकाच
चर्चेला उधाण आलं.”
दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम कारकीर्द ठसवणारे कलावंत होते. गोल्डी आनंद ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’, ‘हरे रामा हरे कृष्णा’ सारखे सिनेमे देऊन महागडे दिग्दर्शक झाले होते. सिनेक्षेत्रातील
अनेक मित्रांनी दोघांच्या निर्णयाला प्रखर विरोध दर्शवला. अशा निर्णयाने त्यांच्या
कुटुंबात कलह निर्माण झाला. देव आनंद यांना गोल्डीचा निर्णय खटकला. तिकडे विनोद
खन्ना यांच्या पत्नीनेदेखील काडीमोड घेतला.
गोल्डी व विनोद खन्ना पूर्णवेळ पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील आश्रमात
राहू लागले. दोघंजणही ओशोसोबत व्यस्त झाले. दोघांचाही उमेदीचा काळ ओशोच्या सहवासात
गेला. याच काळात आचार्य रजनीश अमेरिकेत फसवणूकीच्या एका गंभीर खटल्यात अडकले. परिणामी
ओशोसह विनोद खन्ना आणि गोल्डींना भारतात परतावं लागलं.
अमेरिकेत ओशोसह गोल्डी आणि विनोद खन्ना यांची पूर्ण नाचक्की झाली. ही गोष्ट
दोघांच्या जिव्हारी लागली. या घटनेनंतर विनोद खन्ना काही काळ अज्ञातवासात गेले.
चार-पाच वर्षानंतर १९८७ साली ते पुन्हा बॉलीवूडमध्ये पोहचले. मात्र त्याकाळी विनोद
खन्ना यांच्या रिक्त जागेनं अनेक स्टारला जन्म दिला होता.
उमेदीचा काळ आचार्य रजनीशच्या सहवासात वाया गेल्यानं विनोद खन्ना खचून गेले
होते. तिकडे गोल्डीदेखील नैराश्यानं ग्रस्त झाले होते. मात्र, कोलमडून न जाता दोघांना
पुन्हा उभारी घेण्याचा निश्चय केला. काही वर्षातच विनोद खन्नांनी गेलेलं स्टारडम परत
मिळवलं. मात्र १९८० पूर्वीची सुसंगत स्थिती आता नव्हती. ‘इंसाफ’मधून त्यांनी बॉलीवुडमध्ये एंट्री केली. ह्या पुनरागमनानंतरही त्यांची
कारकीर्द बहरली.
‘जुर्म’, ‘इन्साफ’, ‘दयावान’, ‘चाँदणी’सारख्या सिनेमात त्यांनी रोमांटिक पात्रे साकारली. हा काळ एक्शनपटांचा होता.
अशा अनेक मल्टिस्टार सिनेमात विनोद खन्नाचं पात्र अनिवार्य झालं होतं. ‘आखिरी अदालत’, ‘खून का क़र्ज़’, ‘महासंग्राम’, ‘पुलिस और मुजरिम’, ‘क्षत्रिय’, ‘मुक़द्दर का बादशाह’, ‘सीआईडी’, ‘रिहाई’, ‘लेकिन’, ‘इंसानियत के देवता’, ‘इक्का राजा रानी’, ‘इना मीका डीका’ इत्यादी अनेक एक्शन
थ्रीलर सिनेमेदेखील त्यांनी केले.
वाचा : साहिर और नख्शब के अंदाज
१९९७ साली विनोद खन्ना यांनी राजकारणात पदार्पण केलं. भाजपच्या तिकिटावर
त्यांनी गुरुदासपूर येथून निवडणूक जिंकली. २००२ साली वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय
सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रीपद भूषवलं. २००९ साली लोकसभा निवडणुकीत गुरुदासपुरमधून
पराभव झाला. पण २०१४ साली त्यांनी ही जागा परत मिळवली. सध्या विनोद खन्ना पोलिटीकल
आणि फिल्म दोन्ही पात्रे सांभाळतात.
आजही व्हर्सटाईल अॅक्टर म्हणून विनोद खन्नांचं नाव घेतलं जातं. त्याकाळील सर्व
अॅक्टरमध्ये विनोद खन्ना जास्त सरस होते. त्यांचे बरेच गुण अक्षय खन्नामध्ये आहेत.
१९९७ साली त्यांनी मुलगा अक्षय खन्नासोबत ‘हिमालय पुत्र’मध्ये अभिनय केला. अक्षय खन्ना हा माझा आवडता अॅक्टर. तसंच राहुलदेखील मुरलेला
अॅक्टर आहे. हे दोघंही विनोद खन्नांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहेत.
सलमान खानच्या ‘वाँटेड’, ‘दबंग’ इत्यादी सिनेमात त्यांना
दर्शकांनी चांगलीच पसंती दिली. ‘रेड अलर्ट : द वॉर विदिन’ या अनंत महादेवन दिग्दर्शित चित्रपटांमधून काम केले होते. गेल्या वर्षी २०१५
साली त्यांचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ प्रदर्शित झाला व
गाजलाही!
पुण्यातील एफटीआयचे ते डिरेक्टर
होते. त्या काळातील अनेक विद्यार्थी सांगतात की, दिग्गज अभिनेता असूनही त्यांच्या वागण्यात
साधेपणा आहे. मी कोणी मोठा कलाकार आहे, अशी प्रौढी त्यांनी कधीच मिरवली नाही.
ते सर्वाशी मिळून-मिसळून वागतात.
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com