मुहंमद रफींना आपण गायनासाठी ओळखतो.. पण रफी केवळ गायक नसून ते उत्तम बॅडमिंटनपटू होते.. आपल्या दैंनादिन जीवनात जेव्हा-केव्हा वेळ मिळेल ते बॅडमिंटन खेळायचे. आज रफींच्या जन्मदीन त्यानिमित्त काही सुखद आठवणींचा उजाळा आपण घेणार आहोत... रफींचे ज्येष्ठ चिरंजीव शाहीद रफी यांच्या संवादामधून मोहम्मद रफींना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय..त्यातला हा काही भाग...
रफींबद्दल असं म्हटलं जायचं की गाण्याचं कागद त्यांच्या पुढे सरकवायचा, आणि नजर फिरवताच सूर तयार.. ही रफीसाहेंबाची विशेष शैली होती.. तसंच नायक बघून ते गाण्याचा सूर आणि मुड तयार करायचे... हाच मुड त्यांचा घरी आल्यावरही असायचा. रफींच्या कुटुंबातला प्रत्येकजण आजही त्यांच्या आठवणींनं भावूक होतो.
प्रत्येक क्षण सोबत
शाहीद रफींच्या आठवणीमध्ये रमतात शोकेसमध्ये बॅट दाखवत म्हणतात 'बाबा घरी आले थोडासा वेळ असला की लगेच बैटमिंटन खेळायचे' आजही बाबांचे हातांचे ठसे बैटवर जाणवत असल्याचं शाहीद म्हणतात. रफींचं दुसरं आवडतं छंद म्हणजे कपड्यांचा.. चांगलं राहणीमान आणि टापटीप कपडे त्यांना खूप आवडायचे. चांगलं राहण्यासंबधी वारंवार अनेक सूचना दिल्याचं शाहीद म्हणतात. फावल्या वेळेत बाबांसोबत आम्ही मनसोक्त हिंडायचो.. असंही शाहीद सांगतात.. रफींना सुट्टीचा दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवायला आवडायचा. तसंच त्यांना नातवंडासोबत खेळायलाही खूप आवडायचं..
जन्म आणि बालपण
अमृतसरमधील कोटला गावात 1924 साली मोहम्मद रफींचा जन्म झाला. बीबीसीला दिलेल्या इंटरव्यूमध्ये रफी म्हणतात कि, “मी बारा वर्षाचा असताना मला गाण्याची आवड निर्माण झाली. गल्लीत येणारे एक फकीर गाणं गाऊन खैरात मागायचे. त्या फकीरांचा आवाज मला खूप आवडायचा. त्यामुळे मी त्यांच्या मागोमाग फिरायचो. हा माझ्या नित्यक्रमाचा भाग झाला होता. यानंतर मला गायनाचं अरक्षश: वेड लावलं”
लहान रफींचं गायनाचं वेड त्यांचा बाबांना आवडायचं नाही, परिणामी बाबांचा अनेकवेळा रफींना मारदेखील बसला. तरीही रफींनी लपून-छपून गायनाचा छंद जोपासला. सुरवातीला के. एल. सहगल यांना रफी खूप ऐकायचे.
असं म्हटलं जातं की एकदा रफी बरंच अंतर कापून शहरात सहगल यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला गेले होते. बराच काळ उलटला तरी सहगल आले नाही.. रसिक प्रेक्षकांमध्ये अस्वस्थता वाढली.. आरडा-ओरडा सुरु झाला.
प्रेक्षकांना शांत करण्यासाठी रफी स्टेजवर चढले. अन् माईक हातात घेऊन गाऊ लागले.. छोट्या रफींचे सूर कानावर पडताच गोंगाट करणारा जमाव एकदम शांत झाला. या एका गाण्यांवरुन मोहम्मद रफींचा गीत गायनाचा प्रवास सुरु झाला..
रफींनी 1941 साली ‘गुलबलोच’ या पंजाबी सिनेमासाठी पहिलं गीत गायन केलं.. रफी 1944 साली मुंबईत आले.. संगीतकार ए. आर कारदार यांनी 1944 साली रफींना ‘गांव की गोरी’ साठी रफींना पहिल्यांदा पार्श्वगायनाची संधी दिली.. मात्र, त्यांना प्रसिद्धी 1946 साली आलेल्या ‘अनमोल घडी’ या सिनेमातून प्रसिद्धी मिळाली..
अनमोल घडी या सिनेमातलं 'तेरा खिलौना टूट गया' या गाण्यानं रफींना मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर शहीद, मेला, दुलारी या चित्रपटांची गाणी लोकप्रिय झाली. त्यानंतर आलेल्या नौशाद यांच्याच 'बैजू बावरा' या चित्रपटातील गाण्यानं त्यांना मुख्य गायक म्हणून प्रसिद्धी दिली.
ओ. पी. नय्यर, रवी, एस.डी. बर्मन, नौशाद, मदन मोदन, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडींचे मोहम्मद रफी हे परमनंट गायक ठरले.. या त्रयींनी भारतीय सिनेसृष्टीला अनेक ओठावर रुळणारे गीतं दिली आहेत.. त्यांच्याबद्दल सांगितलं जातं की, रफी सिनेमांची कथा आवार्जून ऐकायचे.. नायकाचा मिजाज लक्षात घेता ते नेहमी गायचे.. त्यामुळेच पडद्यावर प्रत्यक्ष नायकच गातो की काय असा भास व्हायचा..
नायकाचा आवाज
देव आनंद, शम्मी कपूर, भारतभूषण, धर्मेंद्र, दिलीप कुमार, राजेन्द्र कुमार, जॉय मुखर्जी, विश्वजीत, राजेश खन्ना, शशी कपूर यांना तर रफींचा आवाज हा आपलाच आवाज वाटायचा.. याव्यतिरीक्त चित्रपट सृष्टीतील अनेक नायकांसाठी रफींनी अनेक गीतं गायली आहेत. ज्यात भगवानदादा पासून ते थेट नव्वदीतला कॉमेडी नायक गोविंदापर्यंत अनेकांना रफींनी आवाज दिलाय.
वेगळ्या धाटणीचे अनेक गाणीही रफींनी गायली आहेत.. अनेक विनोदी गाणेही मुहंमद रफींनी गायली आहेत.. महमूद, जॉनी वॉकर, किशोर कुमार यांच्या विशीष्ट आवाजासाठी त्यांच्याच शैलीत रफींनी गाणी गायली आहेत.. सत्तरच्या दशकात तर रफींची प्रसिद्धी इतकी वाढली की, चित्रपट संगीत, भावगीत असो वा भक्तिगीत असे सर्वच क्षेत्रं रफींच्या आवाजानं व्यापली होती.
रफींनी गायलेली भजनही तेवढेच लोकप्रीय आहेत.. “मन तरपत हरी दरशन को आज” “जय रघुनंदन जय सियाराम” “सुख के सब साथी” अशी अनेक भजनं कोणीही विसरू शकणार नाही..
भारतातले राष्ट्रीय सण असो वा लग्न ते मोहम्मद रफींच्या 4 गाण्यांशिवाय पूर्णच होत नाहीये. 1964 साली आलेल्या ‘हकीकत’ या सिनेमातलं मदन मोहन यंनी संगीतबद्ध केलेलं ‘कर चले हम फिदा..’ असो वा, याच साली आलेलं फिल्म ‘लीडर’ मधली संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलंल ‘अपनी आझादी को हम हरगीज मिटा सकते नही’ ही दोन गाणी आजही तेवढीच कर्ण आणि लोकप्रीय आहेत..
या गाण्यांशिवाय 26 जानेवारी असो वा 15 ऑगस्ट याचा आनंद साजरा होऊ शकत नाही.. ही दोन गाणी या दिवशी देशभरात वाजवली व गायली जातात.. तसंच संगीतकार रवी यांनी संगीतब्ध केलेली दोन गाण्याशिवाय भारतातलं कोणतंच लग्न लागत नाही..
पहिलं म्हणजे 1977 साली आलेला ‘आदमी सडक का’ या सिनेमातलं ‘आज मेरे यार की शादी है’ तर दुसरं 1968 साली आलेला बी आर चोपडा यांचा सिनेमा ‘निलकमल’मधील ‘बाबूल की दुवाए लेती जा’ ही दोन गाणी भारतातील सर्व धर्मीय लग्न सोहळ्यात वाजवलं जातं.. या दोन गाण्यांची प्रसिद्धी शेजारी राष्ट्र बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये आहे.. तिथंही ही गाणी लग्नात वाजवली जातात..
बाबूल कि दुवाएं
‘बाबूल..’ बद्दल रफी यांचा मुलगा शाहीद रफींबद्दल अविस्मरणीय प्रसंग सांगतात, “हमारी बडी बाजी से अब्बू के बहुत लगाव और प्यार था. बाजी के विदाई समय अब्बू बडे उदास थें. बाजी के जाने के बाद अब्बू बहुत देर अकेले बैठे रहे. इसके दो दिन बाद ही निलकमल की रेकॉर्डींग थी.. और अब्बू ने वह बेशकिमती गाना गाया”
या गाण्याबद्दल रफी बीबीसीच्या एका मुलाखतीत म्हणतात “हे गाणं मी गायलं खरं, पण ज्यावेळी निलकमल पाहिला, गाणं आणि बिदाईचा प्रसंग बघून मी खूप भावनिक झालो आणि मला रडू कोसळलं.. मुलगी बिदा झाली त्यावेळी मी रडलो नाही पण, हे गाणं पडद्यावर बघून मी खूप रडलो”
मुहंमद रफींबद्दल रियाजसुद्धा कमी करत.. हातात गीताचा कागद हातात आला की, ते दोनदा नजर फिरवायचे. आणि गाणं सुरु करायचे.. यावेळी संगीतकारांना सूर किंवा धूनही सांगायची गरज नसायची.. कागद हातात घेताच रफी गायनाला सुरवात करायचे.
मुहंमद रफी यांनी हिंदी, उर्दू, पंजाबी, मराठी, इंग्रजी, अरबी आणि तेलुगू भाषांमधून अनेक गाणी गायली आहेत.. एकूण 35-36 वर्षाच्या सिने प्रवासात रफींनी 26 हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. मोहम्मद रफी व्यवहारात मितभाषी होते. त्यांचं आणि लता मंगेशकरांचं गाण्यांच्या रॉयल्टीवरुन मोठा वाद झाला होता..
रफी रॉयल्टीच्या विरोधात होते. गाण्याचे पैसे निर्माते देतात मग रॉयल्टी का घ्यायची अशी रफींची भूमिका होती. लता दिदी मात्र उलट विचाराच्या होत्या.. तसंच आशा भोसले यांच्यासोबत रफींचे अनेकदा वाद झाले.. हे वाद मात्र, स्टुडिओ माईकवर आल्यास हा वाद शमायचा..
या व्यतिरिक्त रफींचं कुठंही वाद झाल्याची नोंद आढळत नाही.. रफींना हरफनमौला गायक म्हटलं जायचं.. असा मधाळ आवाजाच्या गायकाचा आज स्मृतिदिन.. सिनेसंगीतातील महान अशा गायकाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा..
कलीम अजीम
पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com