‘काश्मिर फाइल्स’च्या अनुपम अंकलना पत्र

प्रिय अनुपम अंकल

तुम्हास आदराचा सलाम,

मी तुमच्या अभिनयाचा प्रचंड चाहता आहे. मी ज्याचा विरोधक राहिलो आहे, अशा पक्षाचा प्रचार तुम्ही करत आहात. तरीही तुमच्याबद्दल माझा आदर किंचितही कमी झालेला नाही. माहीत नाही का असं होतंय. पण मी तुमच्या अभिनयाचा निखळ चाहता आहे.

तुम्ही माझ्या वेदनांवर हास्याची/समाधानाची फुंकर घातलेली आहे. आजही घालता. त्यामुळेच मी तुम्हाला प्रत्येक भूमिकेत पसंत केलं. भरभरून प्रेम व आत्मियता दिली. त्यामुळेच कदाचित भाजप व संघ विचारांची भूमिका तुम्ही निवडली, तरीही मी तुमचा आजही तेवढाच आदर आणि सन्मान करतो.

एफटीआय प्रकरणात टीका झाल्यानंतर तुम्ही उघडपणे होय, मी मोदींचा चमचा आहे”, असं विधान केलं. तुम्ही स्वत:ला जमुरा म्हणून घेतलं. मला फार दु:ख झालं. पुढे तुम्हाला ले मेरे जमुरे...म्हणत तुमच्या आकांनी पद्म सन्मान दिला. त्यावेळी मला खूप आनंद झाला. तुमच्या नावे शुभेच्छा संदेश पाठविला. तुम्ही घेतलेल्या राजकीय भूमिकेसाठी नव्हे, तर अभिनयासाठी तुम्हाला हा सन्मान दिलाय, असं मी स्वत:च्या मनाला समजावलं. तुमच्यावर विनोदी व उपाहात्मक मीम्सचा पाऊस पडत राहिला. मला फरा वाइट वाटलं. अशा अनेक मीम मेकर्सना ब्लॉकसुद्धा केलं.

पुढच्या काही प्रसंगात तुम्ही, “मी अजूनही भाड्याच्या घरात राहतो”, असं म्हटलं. त्यावेळीही मला खूप व्यथा झाल्या. इतका मोठा अभिनेता, इतका प्रसिद्ध, लोकप्रिय व असंख्य सिनेमे (काम) करूनही स्वतचं घर घेऊ शकला नाही, त्याबद्दल मनाला फार बोचलं.

वाचा : काश्मीरच्या अर्धवट फाईल्स

वाचा : रोहित सरदाना : मुस्लिमांच्या उद्ध्वस्तीकरणाचा खलनायक

वाचा : ‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला मुस्लिमद्वेषी विरोध

१७ मार्च २०२२ला #काश्मिर_फाइल्स सिनेमाचे चरित्रनायक म्हणून अनुपम अंकल आपण एक ट्विट केलं. त्यात लिहिलं, “दि काश्मिर फाइल्स नें ६ दिन में ८० करोड़ कमायें है..

शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत हा आकडा १०७ कोटी झाल्याचे तुम्ही जगाला सांगितलं. कदाचित हा सिनेमा आपल्याला स्वत:चं घर, बंगला किंवा डुप्लेक्स मिळवून देऊ शकतो. ज्यात तुम्ही आनंदाने राहू शकता. एसी खोलीत बसून भाजपचा प्रचार करू शकणार. परंतु आपला हा आनंद मला झेपू शकणार नाही. कारण ते घर तुम्ही माझ्या देश-धर्मबांधवांना शत्रूस्थानी आणून उभे करून मिळवलेलं असेल.

संबंधित सिनेमात तुम्ही आखलेल्या धोरणामुळे समाजात मुसलमानांविरोधात घृणा व विद्वेश माजला आहे. त्यामुळे हजारो देशबांधवाची घरे उद्ध्वस्त होण्याचा धोका संभवतो. त्यात अनेक देशबांधवांचा मृत्युदेखील होऊ शकतो. उरलेले बेघर होऊ शकतात. रस्त्यावर अन्नान्न फिरतील. कदाचित त्यांच्यापुढे अस्तित्वाचे प्रश्नही निर्माण होऊ होतील.

तुम्ही काश्मिरी पंडितांचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित सिनेमा केलाय, असं उघडपणे म्हणत आहात. परवा एका न्यूज चॅनेलवर आपल्याला रडू कोसळलं असं ऐकलं. तुमच्या दुखा:त सहभागी होता आले नाही, याचे वाइट वाटते. रुबिका लियाकतने तुम्हाला कवटाळल्याचे मीम्स पाहून तुमच्या वेदनांशी समरूप झालो. परंतु त्यावरचे टुकार व विनोदी मीम पाहून हसू का रडू कळलेच नाही.

काश्मिरी पंडितांच्या वेदनांना जागा करून दिल्याबद्दल तुमचे आभार. ह्या तद्दन व्यावसायिक सिनेमामुळे कोट्यवधींचा गल्ला जमेल पण पंडितांचा प्रश्न सुटणार नाही, हे तुमच्यासहित सबंध जगाला माहीत आहे. २०१४ पूर्वी तुम्हाला काश्मिर प्रश्न हा हिंदू-मुस्लिम इश्शू नसून हा राजकारण्यांनी बनविलेला मुद्दा आहे, असं वाटत होतं.

हिंदू-मुस्लिम इत्तेहादविषयी तुम्ही सातत्याने बोलत होता. लोकांचे भ्रम दूर करीत होता. पण २०१४ नंतर तुम्हाला देशातील व नंतर काश्मिरचे मुस्लिम शत्रू वाटायला लागले. तुम्ही त्यांच्याबद्दल खूपच अनाप-शनाप उद्गार काढले. तरीही मी तुम्ही मला आवडत राहिला. तुमच्या जन्मदिनी तुम्हाला शुभेच्छा पाठवित राहिलो.



चालू महिन्यात तुमचा वाढदिवस होता, त्यावेळी भरभरून शुभेच्छा दिल्या. लंबी उम्र व उत्तम आरोग्याच्या सदिच्छा दिल्या. पण तुम्ही भारतीय मुस्लिमांची उम्र छोटीच राहावी, हे भाजप समर्थकांचे धोरण पूर्ण करण्यासाठी देव पाण्यात घालून बसला आहात, हे उमजतं तेव्हा अधिकच वेदना होतात.

२९ जून २०१० साली तुम्ही लिहिता, “माझे मन काश्मीरसाठी रडते. राजकारण आणि दहशतवादाने ही जन्नत तेथील जनतेसाठी जहन्नूम बनवून सोडली आहे. हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी.

काश्मिर प्रश्नावर होणाऱ्या राजकारणामुळे आपण व्यथित झाला होता. त्यावेळी ३ सप्टेंबर २०११ला तुम्ही लिहिता, “समस्या काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांची नाही. आम्ही वर्षानूवर्षे एकमेकांसोबत शांततेत राहिलो. हे सर्व राजकारण्याचे कारस्थान आहे...”

३० डिसेंबर २०१२ साली तुम्ही एक ट्विट केलं, त्यात लिहिलं, “विसरू नका. माफही करू नका. आम्हाला काश्मिरी मुस्लिमांसह पंडित महिलांचाही विसर पडता कामा नये. दोघेही कमी-अधिक प्रमाणात समान दुःखातून गेले आहेत.

पंडिताच्या समस्येला धार्मिक रंग देण्यास विरोध करीत तुम्ही १९ जानेवारी २०१३ला तुम्ही लिहिलंय, “मी पाहतोय की काही लोक काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाच्या आक्रोशाला धार्मिक रंग देत आहेत. हा मुद्दा धर्माचा नाही. हा मुद्दा हिंदू आणि मुस्लिम दोघांनी भोगलेल्या मानवी दुःखाबद्दल आहे.

२०२२ साली तुम्हाला हा इश्शू स्थानिक मुस्लिमांनी उपस्थित केलेला मुद्दा वाटतो. विचारसरणीत इतका ९० अंशीय बदल का घडला, याबद्दल आश्चर्य वाटलं. पण जवळपासची राजकीय अडचण पाहता, जरासा व्यावहारिक झालो. भावनिक न होता वेळीच स्वत:ला सावरले.

गेली १५ दिवस तुम्ही सातत्याने तुमच्या ट्विटर खात्यावरून मुस्लिमद्वेशी प्रचार राबवित आहात. सिनेमागृहात मुस्लिमांना उद्देशून दिलेल्या चिथावणींना तुम्ही पोस्ट करीत आहात. प्रधानसेवक मोदांसोबतचे आपले फोटो व त्यांनी पाठवलेली कौतुकाची पत्रे पोस्ट करीत आहात. राजकीय हिंदुत्वाचे धुरीण योगी आदित्यनाथासोबतचे फोटो आनंदाने मिरवत आहात.

वाचा : आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!

वाचा : जिवघेणा कोण? कोरोना की मराठी मीडिया

हिंदुत्वाच्या शाल पांघरलेल्यांना तुम्ही सिनेमा पाहण्याचा भाविनक आग्रह करीत आहात. हा खरा इतिहास होता, तो आजपर्यंत दडविला होता, असं तुम्ही म्हणत आहात. हृदयावर हात ठेवून प्रामाणिक राहा व खरे बोला की, हा इतिहास अद्याप दडवला होता. मग या विषयावर जनतेने वाचलेली, पाहिलेली असंख्य पुस्तके, माहितीपट, सिनेमा व अहवाल सगळं काही काल्पनिक होतं का? किंवा ते प्रकाशितच झालेलं नाही, अशीही तुम्ही आता थाप मारू शकता. किंवा ते सगळं खोटं आहे, असंही तुम्ही म्हणण्याची शक्ती एकवटली असावी.

निव्वळ चर्चेत राहण्यासाठी अनुपम अंकल आपण आपला विवेक व शालीनता राजकारण्याकडे गहाण ठेवली, याबद्दल राहून राहून फार वाइट वाटतं. चर्चेत राहणं मुद्दा नसेल तर लोकप्रियता हा मुद्दा असावा का? कदाचित तोही नसेल. तुम्ही राजकीय भूमिकेशिवायदेखील लोकप्रिय होता आणि पुढेही राहणार.. इतकेच नाही तरी अजरामर ठरणार. तुम्ही केलेल्या अभिनयाने/सिनेमातील चरित्र भूमिकांनी तुम्हाला आपल्या आयुष्याला पुरतील इतकी मोठी शिदोरी दिलीय.

मग भाजपचा अनुनय करून पैसा कमावणे हा तर तुमचा उद्देश नाही ना! माझ्या आतल्या मनाला वाटतं तेही नसेल. पण तुमची किरकोळ विधाने पाहून आपल्या आकांना खुश ठेवण्यासाठी व वेगवेगळे लाभ मिळवण्यासाठी आपण आपल्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. प्रामाणिकपणाने विचार करा, आपणास पैसा हवाय की लोकांचं निखळ व निस्पृह प्रेम! माझं मन सांगते, तुम्ही दोघांपैकी जनतेच्या निर्व्याज प्रेमाची निवड कराल!

कारण सामान्य जनतेचे सांसारिक उद्ध्वस्तीकरण करून तुम्हाला पैसा कमविण्याची हौस नसावी. त्यामुळे रक्तलांच्छनातून मिळवलेला पैसा तुम्ही लाथाडाल, अशी अपेक्षा आहे.

पैसाही मुद्दा नसेल तर आपण शांत चित्त राहून, एकांतात बसून, विवेकाशी संवाद साधून अंतर्मनात डोकावून पाहा. तिथं तुम्हाला रक्तबंबाळ झालेल्या तबरेज अन्सारीचं थडगं दिसेल, तिथं तुम्हाला उनाचे ते कोरडे दिसतील. गोवंश हत्येच्या नावाने झालेल्या मृतांच्या शेकडो विधवांच्या आर्त वेदना व कोरडी झालेली अश्रू दिसतील.

तिथंच तुम्हाला रोहित वेमुलाच्या अस्थी दिसतील. बुलंदशहरच्या पोलीस अधिकाऱ्याचं न्यायासाठी झटणारे कुटुंब दिसेल, धर्मांच्या नावाने छळ केलेल्या बलात्कार पीडितांचे हुंकार दिसतील. कठुआची आठ वर्षांची निरागस आसिफा दिसेल. शेजारीच हिंदू धर्माचे उदात्तीकरण करीत बलात्काराच्या दोषींना समर्थन देण्यासाठी काढलेली मिरवणूक दिसेल. 

बाजूला जय श्रीरामचा धाकाने दिल्ली दंगलीत मारले गेलेल्यांचे निष्पाप चेहरे दिसतील. पुढे कोविड काळात गंगा किनारी पुरलेली मृतदेह भेटतील. वेळेवर उपचार मिळाला नाही म्हणून मरण पावलेला तुमचा वैचारिक मित्र रोहित सरदाना दिसेल.. पंजाब-दिल्ली सीमेवर वर्षभर थंडीच्या कडाक्यात गोठून मृत्यू झालेले ५०० शेतकरी दिसतील. जीपच्या चाकांखाली लखीमपूरच्या शेतकऱ्याला चिरडलेली व्रण दिसतील.

तरीही तुम्ही संवेदनाहिन झाला असाल तर ईश्वर तुमचे भले करो! माझं तुमच्यावरील निर्व्याज प्रेम तसूभरही कमी होणार नाही. पण इथून पुढे मात्र तुमच्या राजकीय भूमिकेची कठोर चिकित्सा करीत राहील.

तुमचा एक सिने चाहता...

 कलीम अजीम, पुणे

मेल-kalimazim2@gmail.com

(१९ मार्च २०२२ रोजी अक्षरनामामध्ये प्रकाशित झालेलं टिपण.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,43,इस्लाम,38,किताब,18,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,276,व्यक्ती,7,संकलन,62,समाज,234,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘काश्मिर फाइल्स’च्या अनुपम अंकलना पत्र
‘काश्मिर फाइल्स’च्या अनुपम अंकलना पत्र
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEi73DKuoj0YJPRxbMvoHdcK30d7QOQTX9oz6A-Y6zcyQ2fYklAbETRvFNb2UATBU_1YZDuxrtm7JHyIwH8d9MS1N8-DXQcKJEL5K52CfUjtOe4AKBFMNxjl3MzxexPWExF1Yv8JUet5uKh6DRk1HqjdkoJGbQmufSBInYwJ62Ia6Y6QfrvwnFkfeyP0dg=w640-h452
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEi73DKuoj0YJPRxbMvoHdcK30d7QOQTX9oz6A-Y6zcyQ2fYklAbETRvFNb2UATBU_1YZDuxrtm7JHyIwH8d9MS1N8-DXQcKJEL5K52CfUjtOe4AKBFMNxjl3MzxexPWExF1Yv8JUet5uKh6DRk1HqjdkoJGbQmufSBInYwJ62Ia6Y6QfrvwnFkfeyP0dg=s72-w640-c-h452
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2022/03/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2022/03/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content