२०१४ नंतरचा भाजप सरकारचा सत्ताकाळ हा धार्मिक ध्रुवीकरणासोबत ‘राष्ट्रवाद’च्या मीडिया ट्रायलचा काळ म्हणून गणला जाईल. गेल्या सहा वर्षांत भारतीय संस्कृतीची बहुसांस्कृतिक सहिष्णू रचना आणि त्याच्या मूल्यव्यवस्थेला धक्का पोहचवण्यात आला.
भारतीय समाजमन कधी नव्हे ते यावेळी मोठ्या प्रमाणात कलुषित झालं आहे. हजारो वर्षांपासून गुण्या गोविंदानं राहणारा हा समाज अचानक एकमेकांना वैरी म्हणून एकमेकांकडे पाहत आहे. भाजपने मतपेटीच्या राजकारणासाठी भातीय सभ्यता, संस्कृती आणि सहजीवनावर घाला घातला आहे. परिणामी समाज धर्मा-धर्मात व जातीत विभागला गेला आहे.
बहुसंख्याक असलेल्या समाजगटाकडून अल्पसंख्य मुस्लिमांना केवळ धर्म अलग आहे म्हणून त्यांना वेगळेपणाची वागणूक दिली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे दिसणे, राहणे, खाणे, उपासना पद्धती, प्रार्थना स्थळे डोळ्यात खुपू लागली आहे. अशा धर्मवादी वातावरणात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या ‘मिश्र संस्कृती’चा धागा पुन्हा एकदा गुंफण्याची गरज निर्माण झाली आहे. तथाकथित धर्मवादी संघटनांचा विखारी उन्माद रोखण्यासाठी भारतातील बहुसांस्कृतिक वैभव असलेल्या ‘गंगा-जमुनी संस्कृती’ प्रवाह नव्यानं रुजवण्याची गरज आहे.
व्यापक दूरदृष्टी
आज ११ नोव्हेबर स्वतंत्र भारताला शैक्षाणिक व सांस्कृतिक क्षेत्राला नवी दीशा देणाऱ्या मौलाना आजाद यांचा जन्मदिवस. मौलानांचे राहणीमान व आचार-विचार एक आदर्श होते. भारताला ‘दारुल अमन’ म्हणजे जागतिक शांततेची भूमी बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आझादांचा हा स्मरण दिन.
१८८८ साली अरबस्थानातील मक्का शहरात जन्माला आलेले हे व्यक्तिमत्व स्वंतत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते, ज्यांनी भारताला एकविसाव्या शतकापर्यंत घेऊन जाणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली.
संगीत, नाटक, कला व साहित्य अकादमी स्थापन करून भारताच्या सांस्कृतिक वैभवात कमालीची भर टाकली. या संस्था स्थापनेतून मौलाना म्हणवणाऱ्या आजादांची दूरदृष्टी किती व्यापक होती हे लक्षात येते.
धर्म, समाज आणि हिंदु-मुस्लिम एकतेच्या क्षेत्रात मौलाना आजादांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. हिंदु-मुस्लिम एकतेवर त्यांचा एक कोट वारंवार उल्लेखित केला जातो.
किंबहुना या वाक्याशिवाय आज त्यांच्यावरील कुठलाही लेख पूर्ण होत नाही, मार्च १९४० मध्ये काँग्रेसच्या रामगढच्या एका अधिवेशनात दिलेल्या भाषणात आजाद म्हणतात, “स्वराज्य आणि हिंदु-मुस्लिम एकता या दोहोंपैकी एकाची निवड करायची झाल्यास मी हिंदु-मुस्लिम ऐक्याची निवड करेन, कारण स्वराज प्राप्त करण्यास विलंब झाला तर माझ्या देशाचं नुकसान होईल, पण हिंदु-मुस्लिम ऐक्य साध्य झालं नाही तर सबंध मानवजातीचे नुकसान होईल आणि ते मी कदापि सहन करू शकणार नाही.”
मौलाना आजाद यांनी आपल्या कृतीतून, लिखाणातून धार्मिक सहिष्णुता व सौहार्दतेचा संदेश दिला. रामगढ़चे उपरोक्त भाषण दोन विभिन्न धार्मिक समुदायात एकात्म शक्तीचे बळ निर्माण व्हावे, या हेतुने त्यांनी मांडणी केली होती.
भाषणात एका ठिकाणी ते म्हणतात, “अनेक मानवी अशा संस्कृती आणि धर्म भारताकडे प्रवाहित व्हावेत. भारताच्या आतिथ्यशील भूमीत घर सापडावे आणि भटकणाऱ्या अनेक मानव समूहांना इथे विश्रांतीस्थळ लाभावे ही भारताची इतिहासदत्त नियतीच होती. इतिहासाच्या प्रभात काळापूर्वीच हे भटकते मानव समूहांचे तांडे भटकंती करीत करीत वाट काढीत हळूहळू भारतात येऊन धडकले आणि नंतर त्यांच्या पाठोपाठ नवागतांच्या लाटा मागून लाटा येऊन धडकल्या. भारताच्या अफाट आणि सुपीक भूमीने ह्या सर्वांचे स्वागत केले आणि त्यांना आपल्या हृदयाशी धरले.”
हिंदु-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार
मौलाना आजाद यांनी हयातभर हिंदु-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला. असगरअली इंजिनियर यांनी ‘इस्लाम एण्ड मॉडर्न एज’ या पत्रिकेत मौलाना आजाद यांच्यावर एक छान लेख लिहिला आहे. लेखात इंजिनियर यांनी आजादांच्या ‘वहादत ए दीन’या संकल्पनेवर भाष्य केलं आहे, वहादत ए दीन म्हणजे राष्ट्रीय एकात्म; याचा उहापोह करताना इंजिनियर लिहितात,
“मौलाना आजांदांनी कुरआनच्या दृष्टिकोनातून हिंदुझम, जैनिझम, ख्रिश्चनिटी, बौद्धीझम, जुडोझम आणि झोराष्ट्रीनिझम समजून घेतलं. या धर्मांना त्या अनुषंगाने भाष्य करत युक्तिवाद केला.”
इंजिनियर म्हणतात, “स्वातंत्र्यप्राप्तीच्या संघर्षामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना इतर धार्मिक आस्था असणाऱ्या सहकाऱ्यांशी विशेषत: हिंदुशी सहकारात्मक भूमिका घ्यावी लागली. त्यातूनच एका बाजूला हिंदु-मुस्लिम ऐक्य तर दुसऱ्या बाजूला सर्व धर्माची एकता ‘वहादत ए दीन’ वर त्यांनी भर दिला. स्वत:च्या या संघर्षातून त्यांनी धार्मिक एकतेची संकल्पना मांडली.”
मौलानांनी इंग्रजी भाषेचा व त्यातील धर्मग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. आजाद धर्मपंडित असले तरी ते बरेचसे आधुनिक होते. आजादांवर सर सय्यद, मौलाना शिबली नोमानी, अल्ताफ हुसेन हाली, मौलाना हुसेन नदवी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.
उलेमा, कवि, साक्षेपी पत्रकार, संपादक, लेखक, तत्त्वज्ञ, राजकीय नेता अशा विविधांगी प्रतिभेनं त्यांचं व्यक्तिमत्व सारगर्भित झालेलं होतं. वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षी त्यांनी लिखाण सुरू केलं. सर सय्यद अहमद खान यांचे विचार वाचून आपणही हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी वृत्तपत्र सुरू करावं असं त्यांना वाटलं. सोळाव्या वर्षी त्यांनी एका वृत्तपत्राचे संपादन केलं. सामाजिक व धार्मिक प्रबोधनासोबत ते इंग्रजी सत्तेविरोधात सडेतोड लेखन करत. परिणामी ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवली.
ब्रिटिशांनी हे वृत्तपत्रे जप्त केल्यानंतर त्यांनी १९१२ साली कलकत्त्याहून स्वत:चे अनियतकालिक ‘अल हिलाल’ सुरू केलं. या वृत्तपत्रातून त्यांनी क्रांतिकारी विचार समाजात मांडला. स्वातंत्र्य आंदोलनात या वृत्तपत्राचं महत्वाचं योगदान होतं. आपल्या लेखणीतून त्यांनी वारंवार ब्रिटिश सत्तेविरोधात प्रहार करत राहिले.
अल हिलालमधून ते कुरआनचे भाषांतर व त्यावरील भाष्य प्रामुख्याने छापत. इंग्रज सत्तेवरचा संताप आणि त्या सत्तने देशातील जनतेची व विशेषत: मुस्लिमांच्या संपत्तीची केलेली लूट यावर ते सातत्याने लिखाण करत. यासह मुस्लिमांच्या सामाजिक व व्यावहारिक अवगुणांवरही त्यांनी वारंवार प्रहार केला.
भारतात एकत्र राहणाऱ्या विविध धार्मिक समुदायात आंतरसंवाद प्रस्थापित व्हावा, यासाठी ते सतत प्रयत्नरत असत. एका ठिकाणी ते म्हणतात, “जसे एक हिंदू अभिमानाने म्हणू शकतो की मी भारतीय आहे आणि हिंदू धर्माचे पालन करतो तसेच आम्हीसुद्धा तेवढ्याच अभिमानाने म्हणू शकतो की आम्ही भारतीय आहोत आणि इस्लाम धर्माचे पालन करतो. मी ही कक्षा अजून आणखी वाढवीन. भारतीय ख्रिश्चन व्यक्तीला अभिमानाने सांगण्याचा तेवढाच समान हक्क आहे की मी भारतीय आहे आणि भारताच्या एका धर्माचे म्हणजे ख्रिश्चन धर्माचे पालन करतो.”
मुस्लिमांनी केलं बेदखल
पत्रकारितेच्या माध्यमातून मुस्लिम समुदायांमध्ये हिंदु-मुस्लिम एकतेचा विचार रुजवला. आपल्या लेखणीतून त्यांनी मुस्लिमांत राष्ट्रवाद प्रसवणे व सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. हा काळ भारतात दोन धर्म समाजात दूही निर्माण करण्याचा होता, ‘मुस्लिम लीग’ने धर्माच्या नावावर भारतातील मुस्लिमांना विभक्त केलं होतं.
स्वातंत्र्य लढ्यात अधिकार व हक्काची भाषा लीगमुळे सुरू झाली होती, आपण हिंदुंपेक्षा वेगळे आहोत हा विचार ‘मुस्लिम लीग’ने पदोपदी मांडला. अनेक मुस्लिम स्वातंत्र्य योद्धे व विद्वान लीगच्या विखारी प्रचाराला बळी पडले. परिणामी हिंदु-मुस्लिमात फुटीचं राजकारण जन्मास आले, अशावेळी मौलानांनी दोन समाजाला जोडणारा विचार मांडला.
दुर्दैव असं की तत्कालीन जमातवादी शक्तींनी हाच ‘इस्लामी राष्ट्रवाद' म्हणून प्रचारित केला. मौलानांचा खरा विचार रुजला नसल्याने मुस्लिम समाजात अलिप्ततावाद बोकाळला. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही संकल्पना वारंवार माथी मारली गेली आजही फारशी वेगली परिस्थिती नाहीये. धार्मिक उलेमांनी सोयीचा विचार घेऊन तो प्रसवला. आज अनेक इस्लामी विद्वानाला आजादांचे विचार धोकादायक वाटतात, अनेक इस्लामी धर्मपंडित मौलानांना अनुउल्लेखाने मारतात.
आजच्या बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत इस्लामी व अन्य धर्म पंडितांनी घेतलेली भूमिका संशयस्पद आहे. राष्ट्रवाद, सामाजिक ऐक्य यापेक्षा धर्म त्यांना महत्त्वाचा वाटतो. आज धर्मवाद्यांमुळे दोन समाजात दूफळी निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत मौलाना आजाद यांचे धार्मिक सहिष्णुतेचे विचार व सामाजिक ऐक्याचे प्रयत्नांचा प्रचार-प्रसार करणे क्रमप्राप्त ठरते.
कलीम अजीम, पुणे
मेल: kalimazim2@gmail.com
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com