नागरिकत्व सुधारणाकायद्यामुळे देशातील ढवळून निघालेले वातावरण दिल्ली दंगल आणि त्यामध्ये सहभागाचा आरोप ठेवून काही जणांवर दाखल करण्यात आलेले देशद्रोहाचे गुन्हे या सगळ्या पार्श्वभूमीवर 'इन्शाअल्लाह'ही कादंबरी येत आहे.
कादंबरीच्या नावावरूनच चर्चा सुरु झालीआहे. काहीतरी वादग्रस्त असणार आणित्यामुळे ही चर्चा आणखी वाढणार असे ही वाटत आहे; पण अभिराम भडकमकर लिखित ही कादंबरी त्या अर्थाने निराशाच करणारी आहे. वैचारिकतेचा आव न आणताही मुस्लिम समाजाचा आत्मशोध घेत समाजातील ताण-तणावाचे यथार्थ चित्रण करण्यात भडकमकर यशस्वी झाले आहेत.
भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू' ला दहावर्षे पूर्ण होणे आणि 'इशाअल्लाह' येणे या मध्ये तसे काही सूत्र नाही. परंतु, सध्या समाजाची मानसिकताच अशी बनली आहे की नावामध्येही काही तरी शोधत राहतो; पण वेगळ्या अर्थाने पाहिले तर हिंदू म्हणून जगण्याची समृद्ध अडगळ असली, तरी मुस्लिम म्हणून जगताना ही अडगळ समृद्ध नव्हे तर जीवघेणीही बनते.
वाचा : आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!
वाचा : जिवघेणा कोण? कोरोना की मराठी मीडिया
समकालीन परिस्थिती मध्ये कधी नव्हे एवढा मुस्लिम समाज अस्वस्थ आहे. जागतिकीकरण धार्मिकअर्थाने ही त्यांच्यावर येऊन आदळले आहे. कोठेतरी सिरीया मध्ये काही घडतेआणि त्याचा परिणाम थेट गावात बसलेल्या समाजा वर ही होतो. त्यांच्या कडेही संशयाने पाहिले जाते, हे त्याला अनुभवावे लागत आहे.
मुस्लिम समाजाची ही सगळी अस्वस्थता अभिराम भडकमकर यांनी मांडली आहे. मराठी साहित्यामध्ये मुस्लिम समाजाचे चित्रण अगदी झालेच नाही असे नाही. परंतु,काळ्या किंवा पांढऱ्या रंगातच पाहण्याची सवय लागली असल्याने एकतर गुन्हेगार, दहशतवादी किंवा अगदी प्रेमळ चाचा, सहृदय भाई अशा पद्धतीने पात्रांची मांडणी झालेली पाहायला मिळते. अगदी मुस्लिम समाजातील लेखकांनीही काही अपवाद वगळता ही अस्वस्थता मांडलेली नाही.
या पार्श्वभूमीवर अभिराम भडकमकर यांनी केलेले चित्रण 'बर्ड आय व्ह्यू' प्रमाणे संपूर्ण अंदाज घेण्यात यशस्वी होते. त्याला समकालीन संदर्भ दिले असल्याने यातील घटना- घडामोडी एकदम अनोळखी वाटत नाहीत. मनात कोठेतरी त्याचे संदर्भ जुळायला लागतात. हेच अभिराम भडकमकर यांचे यश आहे. त्यातही बागवानी भाषेचा लहजा इथल्या माती तील वाटतो.
जुनैद नावाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गायब होण्याने सुरु झालेला प्रवास मुस्लिम समाजातील ताणतणावांचा शोध घेऊ लागतो. त्यामध्ये सुधारणावादी रफीक, काहीतरी वेगळे घडविण्याची इच्छा असणारा झुल्फी यांच्या सोबतच हिंदू मानसिकतेला कट्टर वाटणारी पात्रेही येतात. मुख्य म्हणजे कोल्हापूर सारख्या मध्यम शहरात ही कादंबरी घडत जाते यालाही एक महत्त्व आहे.
हिंदू मानसिकतेतून मुंबईतील नागपाडा- भिवंडी, पुण्यातील कोंढवा येथील मुस्लिम आणि गावाकडचा मुस्लिम यांच्यात फरक असल्याचे बोलले जाते. परंतु, मुस्लिम म्हणून जगण्या तीलअस्वस्थता ही केवळ शहरांमध्ये नाही तर गावां मध्येही आहे. येथील मुस्लिम समाजही विचार व्यूहातून जात आहे.
वाचा : 'राम के नाम..' एका इतिहासाचे दस्ताऐवज
एखादी घटना घडली की त्याच्याकडेही त्याच नजरेने पाहिले जाते. मग तो एखादा अशिक्षित तरुण असो की महाविद्यालयात शिकविणारी उच्चविद्याभूषित प्राध्यापक हे वास्तव आहे.
कश्मीर में लोगों को जिंदा जलाती हैं आर्मी, मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार, घराघरांत घुसून लूटपाट... आणि जे चाललंय, तो एक मोठा लढा आहे. काफर जमातच या सगळ्याच्या मुळाशी असे मांडणारा नदीम सारखा तरुण आहे. तसाच पाकिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, येमेन, लिबीया सारख्या इस्लामी देशांतही अशांती का आहे? असे विचारणारा सुधारणावादी रफीक ही आहे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवले झुल्फीही काही तरी नवे घडविण्याचा प्रयल करत आहे. त्यामुळे रफीक जेव्हा म्हणतो की, .....कौन कहता हैं आसमान में छेद हो नहीं सकता एक पत्थर तो तबीयतसे उछालो यारो....
तेव्हा झुल्फी म्हणतो, आपल्या वाटणीचे आसमानच फाटलंय, ते शिवायचेसोडून पत्थर मारायची भाषा कशाला. मारा, तोडा, नाकारा, जाळाची भाषा करायची कशाला. त्याचा आशावाद हेच या कादंबरीचे बलस्थान आहे._
कौन कहता हैं फटे आसमानकों सिया नहीं जा सकता एक सुई धागा तो तबीयत से चला दो यार...
सौजन्य : व्हॉट्स ॲप
अविनाश थोरात
(लेखक लोकमत पुणे आवृत्तीचे वृत्तसंपादक आहेत)
पुस्तकाचे नाव : इन्शाअल्लाह
लेखक : अभिराम भडकमकर
प्रकाशन : राजहंस प्रकाशन

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com