जगभरात प्रतिगामी विचार प्रबळ होत असताना सामाजिक सौहार्द जपणारे अनेकजण पुढे येत आहेत. असेच एक आहेत साजी चेरियन. भारतीय वंशाचे साजी चेरियन गेल्या तीन आठवड्यापासून खाडी देशातील प्रसारमाध्यमात पेज थ्री सेलिब्रिटी झाले आहेत. त्यांनी सामाजिक सलोखा जपण्यासाठी दुबईमध्ये अनोखा प्रयोग केला आहे. ज्यामुळे ते जगभरात पोहचले आहेत. सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारवंशीय साजी चेरियन यांनी दुबईमध्ये प्रवासी मुस्लिमांसाठी भव्य प्रार्थनास्थळाची निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत. दुबईच्या फुजैरा शहरात त्यांनी ही अलिशान मस्जिद बांधली आहे. इतकेच नाही तर साजींनी रमजान सुरू झाल्यापासून त्या मस्जिदीत दररोज तब्बल ७०० लोकांना इप्तार करवत आहेत. त्यांच्या या सद्भावनेच्या कामाची गल्फ न्यूजने विशेष वृत्त प्रकाशित करत यथोचित सन्मान केला आहे. गल्फ न्यूजच्या या बातमीमुळे साजी चेरियन जगभरात ओळखले जाऊ लागले आहेत.
केरळच्या ‘कायमकुल’ शहरात राहणारे चेरियन २००३ मध्ये व्यवसायानिमित्त दुबईला गेले. गल्फ न्यूजच्या मते, १७ वर्षापूर्वी चेरियन केवळ ५०० दिऱ्हम (९४ हजार भारतीय रुपये) घेऊन दुबईत आले होते. आज त्यांचा व्यवसाय संपूर्ण दुबईत पसरला आहे. या १७ वर्षांत त्यांनी दुबईमध्ये रियल इस्टेटमध्ये चांगला जम बसविला. सुरुवातीला ७० रुमचे बांधकामाचे कंत्राट त्यांना मिळाले. या कामात त्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. १६ लाखांचे कर्ज घेत त्यांनी हा बिझनेस सुरू केलेला होता. ज्याचे ४५० चेक बाऊंस झाले. पण ते खचले नाहीत. आज त्यांनी दुबईमध्ये अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत.
फुजैरा शहरातील पंचताराकिंत मानल्या जाणाऱ्या अल् हयात इंडस्ट्रियल एरिया भागात त्यांचा भव्य असा व्यवसायिक कॉम्प्लेक्स आहे. ‘इस्ट विले’ नावाच्या या टावरमध्ये ५३ विविध कंपन्यांचे ऑफीसेस आहेत. तिथं नोकरीसाठी विविध देशामधून आलेल्या २५० लोकांचं निवासी संकूल आहे. या कॉम्प्लेक्समध्ये राहणारे बहुतेक लोकं आशिया खंडातील आहेत. हा प्रकल्पदेखील साजी चेरियन यांनीच पूर्ण केला आहे.
या परिसरामध्ये कुठलीही मस्जिद नव्हती, त्यामुळे इथं राहणाऱ्या या टावरमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉई आणि कामगारांना लांब अंतारावर असलेल्या मस्जिदीत प्रार्थनेसाठी जावं लागत. त्यासाठी ही लोकं वाहने व टॅक्सीची मदत घेत. कामासाठी बाहेर देशाहून आलेल्या या लोकांना प्रार्थनेला जाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत. प्रार्थनेसाठी पैसे लागणे हे शल्य साजी चेरियन यांना बोचले. लोकांची अडचण पाहून साजी चेरियन यांनी इस्ट विले कॉम्प्लेक्स परिसरात मस्जिद बांधण्याची कल्पना सूचली.
मस्जिदसाठी साजींनी तब्बल ७० हजार स्क्वेअर मिटरची जागा २० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतली. मस्जिदचं काम सुरू झालं. साजी चेरियन यांच्याकडे मस्जिदीसाठी मदत येऊ लागली. पण त्यांनी ती घेण्यास नकार दिला. कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय त्यांनी तब्बल १.३ दिऱ्हम मिलीयन (२ कोटी ४५ लाख ५४ हजार ४००) खर्च करून एक मस्जिद उभी केली. वर्षभरात भव्य अशी मस्जिद उभी रहिली. मस्जिदचं नाव ‘मरियम उम्मे इसा’ असं आहे. म्हणजे हे नाव इसा मसिह यांच्या आईच्या (मदर मेरी) नावावर ठेवण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी रमजान महिन्यात या मस्जिदीचे लोकार्पण करण्यात आले. कॉम्प्लेक्समधील लोकांना सोय झाली. अनेकांनी साजी चेरियन यांचे आभार मानले. वर्षभरानंतर ही मस्जिद पुन्हा चर्चेत आली. कारण साजींनी या वर्षींपासून मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी सुरू केली आहे. दररोज ते ७०० रोजेदारांना इफ्तार खाऊ घालतात.
गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, “मस्जिद गेल्यावर्षी रमजानमध्ये सुरू झाली, पण शेवटचे काही दिवसच मी इफ्तार करू शकलो, यंदा रोज इफ्तार ठेवला आहे, महिनाभर मी रोजेदारांची सेवा करू शकणार याचा मला आनंद आहे.”
साजी धर्माने इसाई आहेत. प्रभू येशूच्या जीवनमार्गी तत्त्वांचा त्यांच्यावर बालपणापासून संस्कार झाल्याचे ते सांगतात. मानवतेची सेवा करण्याचं व्रत कुटुंबातून मिळाल्याचे ते सांगतात. धार्मिक सलोखा राखण्यासाठी त्यांनी उचलेले पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे.
एकीकडे जगभरात मुस्लिम विरुद्ध इसाई अशा संघर्ष बळावत असताना साजी चेरियनसारके लोक दोन धर्मांत सामाजिक सद्भभाव टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. धर्माच्या नावाने हल्ले करणाऱ्यांनी साजी चेरियनकडून नक्कीच धडा घ्यावा.
गेल्या महिन्यात न्यूझिलंड आणि श्रीलंकेत मानवतेला काळिमा फासणारे बॉम्बस्फोट झाले. त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. धार्मिक सलोख्याला बाधा पोहोचवणाऱ्या या घटना होत्या. या स्फोटाचे निमित्त करून जगभरात प्रतिगामी विचार उफाळून वर येऊ पाहात आहे, त्याला शह देण्याच्या कामासाठी साजी चेरियनसारखे लोकं पुढे येणे गरजेचं आहे.
मेल-kalimazim2@gmail.com
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com