सय्यद शहाबुद्दीन यांच्या ‘द मिल्ली गॅझेट’ या साप्ताहिकाच्या पहिल्याच पानावर त्यांचे संपादक जफरूल इस्लाम खान यांनी एक बातमी दिली होती. माझ्या मते, ही बातमी भारतातल्या प्रत्येक महत्त्वाच्या वृत्तपत्राची आणि टीव्ही चॅनेलची हेडलाईन व्हायला हवी होती. मात्र ‘दै मिल्ली गॅझेट’ वगळता ही बातमी इतरत्र कुठेही प्रसिद्ध न झाल्याचे पाहून आपली प्रसारमाध्यमे त्यांच्या कर्तव्यापासून दूर जात असल्याच्या भावनेने मला वाईट वाटले. या बातमीचे शीर्षक होते-‘१९४७ साली पाडण्यात आलेली मशीद शीख बांधवांनी बांधून दिली!’ या बातमीचा गोषवरा मी येथे देतो.
पंजाबातील समराला या छोटय़ा शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सरवरपूर या खेडय़ात स्वातंत्र्यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर मुस्लिमांची वस्ती होती. फाळणीच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या दंग्यात येथील बहुतांशी मुस्लिम लोक गाव सोडून पाकिस्तानातील पंजाबात पळून गेले. गावातील एक मशीद हिंदू आणि शीख दंगेखोरांनी उद्ध्वस्त केली. गेल्याच वर्षी गावातील शिखांनी ही मशीद पुन्हा बांधून देण्याचा निर्णय घेतला.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे जथेदार किरपाल सिंग, स्थानिक आमदार जगजिवन सिंग आणि सर्व गावकऱ्यांनी, नव्याने बांधलेल्या या मशिदीचा शानदार हस्तांतरण सोहोळा २२ मे रोजी केला. मौलाना हबीबूर रहेमान सानी लुधीयानवी यांचे खास स्वागत केले. गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गावातील सर्वात ज्येष्ठ मुस्लिम नागरिक, दादा मोहम्मद तुफैल यांच्या हातात नव्याने बांधलेल्या मशिदीच्या चाव्या दिल्या, तेव्हा उपस्थित समुदायाने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या.
ही बातमी वाचल्यानंतर माझी छाती अभिमानाने फुलून आली. माझ्या धर्माचे, पंथाचे लोक गुरू नानकांच्या खऱ्या शिकवणीचे पालन करीत असल्याचे पाहून मन भरून आले. गुरू नानकांचे पहिले शिष्य भाई मर्दाना हे शेवटच्या श्वासापर्यंत मुस्लिमच राहिले आणि त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याची पूर्ण मुभा होती. पाचवे गुरू अर्जून ज्यांनी आदी ग्रंथाचे संकलन केले आणि हरमंदीर साहीब (आजचे सुवर्ण मंदीर) बांधले त्याचा शिलान्यास लाहोरचे सुफी संत हजरत मियाँ मीर यांच्याकडून करवून घेण्यात आला होता. महाराजा रणजिंत सिंहांच्या एका पत्नीने दाता गंज बक्ष यांचा संगमरवरी दर्गा बांधला, आज तो लाहोरमधील सर्वात प्रसिद्ध सुफी दर्गा आहे. या सर्व महात्म्यांचे आत्मे या घटनेने किती सुखावले असतील, असे मला वाटले.
अजूनही ही घटना जुनी किंवा शिळी झाली आहे, असे प्रसारमाध्यमांनी समजू नये. वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी आणि टी.व्ही. चॅनेल्सनी सरवरपूरला जाऊन या घटनेला प्रसिद्धी द्यायला हवी. नव्याने बांधलेल्या मशिदीची छायाचित्रे प्रसिद्ध करायला हवीत. मुख्य म्हणजे बाबरी मशीद पाडणाऱ्या एल. के. अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, साध्वी ऋतांभरा, कल्याण सिंग, हिंदू महासभावाले, शिवसैनिक, बजरंग दलीय आणि धार्मिक विद्वेषाची गरळ ओकणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी नेऊन हे दाखवायला हवे, की हा देश एक ठेवण्यासाठी कशा प्रकारच्या आंदोलनांची गरज आहे. असे झाल्यास याचे परिणाम खरोखरीच वेगळे होतील. आणि मला खात्री आहे की, स्वर्गातून गांधीजी सरवरपूरमधील गावकऱ्यांनी आशीर्वादाचा वर्षांव करीत असतील.
खुशवंत सिंग -
(१० ऑक्टोबर २०१०, ‘हिंदुस्तान टाइम्स’ मधील लेखाचा स्वैर अनुवाद)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com