सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?


 "सदर लेख 26 ते 28 फेब्रुवारी 2019 या काळात व्हॉट्सअप व फेसबुकवरून व्हायरल झालेला आहे. भाजप सरकारच्या काळात हिंदुत्ववादी शक्ती आपले व आपल्या तथाकथित नेत्यांचे उदात्तीकरण करीत आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी काडीमात्र संबध नसलेल्या संघटकांना स्वातंत्र्य लढ्याशी जोडले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सावरकरांना देशभक्त ठरवून त्यांची व्यक्तिपूजा केली जात आहे. मुळात उपलब्ध कागदपत्राच्या आधारे अनेक नवनवीन खुलासे बाहेर आलेले आहेत. सदर बाब लक्षात घेऊन आम्ही हा लेख पुनर्प्रकाशित करीत आहोत. वेगळी मांडणी असणारा हा लेख आम्ही नजरिया वाचकासाठी देत आहोत. लेखातील मतांशी व युक्तिवादांशी नजरिया परिवार सहमत असेल असे नाही. सदर लेखाच्या मजकूराची सर्वस्वी जबाबदारी ही लेखिकेचीच आहे. व्हायरल लेख असल्याने  नजरिया परिवाराने हा लेख वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या पलीकडे नजरिया परिवाराचा या आशयाशी संबध असावाच असे नाही."

जचा दिवस (26 फेब्रुवारी) वि. दा. सावरकर यांची पुण्यतिथी. आज सावरकरभक्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. त्यांनी कैक दिवसांपासून अन्नपण्याचा त्याग केला होता आणि २६ फेब्रुवारीला त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी अन्नपण्याचा त्याग करून आत्महत्या करण्यामागचे कारण काय होते? ते जाणून घेण्यासाठी सावरकरांचा जीवनपट समजून घेणे आवश्यक आहे.
या घटनेतील अनेक तथ्ये समोर आलेलीच नाहीत, तर काही तथ्यहीन गोष्टींचा मात्र खूप गाजावाजा करण्यात आलेला आहे. स्वतः सावरकरांनीही स्वतःची जनमानसातली  प्रतिमा उजळून काढण्यासाठी अनेक प्रयत्न स्वतःहून केलेले दिसून येतात.
जसे की त्यांनी स्वतःचे जीवनचरित्र टोपण नावाने लिहिले व त्यात स्वतःलाच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ही पदवी दिली. भारताच्या संघराज्यात संस्थानांनी सामील होऊ नये असे संस्थानिकांना सांगत फिरणाऱ्या सावरकरांनी नंतर स्वतःची प्रतिमा 'फळणीविरोधी' आणि 'अखंडभारतवादी' अशी निर्माण करण्यात यश मिळवले.
सावरकरांची 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट' करण्यासाठी संघपरिवारासहित गायक मंगेशकर कुटुंबीय, फडके कुटुंबीय आणि इतर उजवे लेखक-गायक-कलाकार सतत राबले. त्याचेच हे फळ की आज सावरकर भक्तांना 'सावरकरांनी आत्महत्या केली' म्हटलं की राग येतो. 'सावरकरांनी देहत्याग केला' असं म्हणावं, असा त्यांचा आग्रह असतो. भाषा ही राजकीय षड्यंत्राचे हत्यार बनते ते असे. त्यात पुन्हा भाषेचे 'ने मजसी ने....'  सारखे काव्यरूप गानसम्राज्ञीच्या गोड स्वरात गुंफून पेश केले की त्याचा प्रभाव मनांवर खोल आणि दीर्घकाळ राहतो. तो प्रभाव दूर सारून तथ्यांची मीमांसा करायला मग 'हुश्शार' मनं धजत नाहीत!
सर्वांत पहिल्यांदा सावरकरांना ४ महिन्यांसाठी तुरुंगात जावं लागलं त्याचं कारण होतं, त्यांच्या विरुद्ध सिद्ध झालेला ब्रिटिश स्त्रीच्या विनयभंगाचा गुन्हा!  लंडन मधली १९०८ सालची ही घटना होय. 
त्यांनी मदनलाल धिंग्रा यांना ब्रिटिश ऑफिसरचा खून करण्याची "प्रेरणा" दिली परंतु खटला सुरू झाल्यावर स्वतःची जबाबदारी साफ झटकली. लंडनच्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत धिंग्रांनी सावरकरांची "भ्याड" म्हणून निर्भत्सना केली. सावरकरांनी नंतर पॅरिसला पलायन केलं. 
सावरकरांचं "१८५७: भारताचे पहिले स्वतंत्रता युद्ध" या पुस्तकाचं हस्तलिखित आणि पिस्तुलं स्वतःच्या जीवावर उदार होऊन भारतात आणणारा एक मुसलमान होता. सिकंदर हयात खान हे त्यांचं नाव. सावरकरांनी या व्यक्तीबद्दल कुठंही ऋण व्यक्त केलेले नाहीत. का? तर ते मुसलमान होते!
जॅक्सन खून खटल्यात सावरकरांनी दिलेली  जबानी मुंबई-दिल्ली येथे खटल्याच्या मूळ दस्तऐवजाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांच्या चरित्रकारांनी ही जबानी मोड-तोड करुन वेगळीच पेश केली आहे. पण मूळ बघा काय म्हणते, "....मी माझ्या भावासाठी स्वसंरक्षणार्थ २० पिस्तुलं पाठवली. त्यातली एक हरवली असेल आणि या खुनासाठी वापरली गेली असेल तर माझा काय दोष? मला काय विचारता? त्याला विचारा....". सख्ख्या भावाला सुळावर चढवायला मागे पुढे न पाहणारे, वाह रे बंधुप्रेम! आणि स्वसंरक्षणार्थ, २० पिस्तुलं? बंधू बाबाराव यांच्या कुटुंबाशी प्रेमळ जवळीकीच्या अनेक सुरस कथा आहेतच आणि.....
सावरकरांनी स्वतः केलेल्या एकाही कृत्याची कधीही जबाबदारी घेतली नाही. ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेल्या गुन्हयांबद्दल धिंग्रा, कान्हेरे, पिंगळे, गोडसेंना शिक्षा झाल्या. हे अलगद सुरक्षित राहिले!
४ जुलै १९११ला ते प्रथम अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात  ६ महिन्यांच्या अंधारकोठडीतील एकांतवासाची शिक्षा भोगण्यासाठी गेले. गेल्या गेल्या पहिल्या ५५ दिवसांत म्हणजे ३० ऑगस्ट १९११ ला त्यांनी सरकारला पहिला दयेचा अर्ज सादर केला. अंदमानातल्या ९ वर्षे १० महिन्यांच्या काळात त्यांनी स्वतः ६ वेळा आणि त्यांच्या पत्नी व भावाने ४ वेळा असे एकूण १० दयेचे अर्ज दाखल केलेत. त्यानंतर पुन्हा गांधींच्या खुनानंतर १९४७ मध्ये आणि नंतर १९५० मध्ये आणि सावरकरांनी दयाही अशा ब्रिटिशविरोधी क्रांतिकारी कृत्यांसाठी मागितली ज्यासाठी धिंग्रा, कान्हेरे फासावर चढले. धिंग्रा, कान्हेरे, पिंगळे, गोडसे यांना फासापर्यंत नेणाऱ्या एकाही कृत्याची जबाबदारी 'तात्यां'नी कधीच  घेतली नाही.
दया अर्ज स्वीकारला गेल्यावर आणि सुटका झाल्यावर त्यांनी पुन्हा म्हणून  इंग्रजांच्या विरोधात कोणतीच चळवळ केली नाही. इंग्रजांच्या प्रत्येक अटीसमोर त्यांनी साफ शरणागती पत्करली. त्यांच्यावर चालवला गेलेला खटला न्याय्य व उचित होता हेही त्यांनी लिहून दिलंय.  
वाचा : तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात इकबालीज्म
वाचा : प्रा. बेन्नूर : सहिष्णुतेचे महामेरू
अंदमानमधून त्यांची सुटका २ मे १९२१ रोजी झाली.  १९२४ ते १९३७ पर्यंत ते रत्नागिरीला त्यांच्या पत्नी समवेत राहिले. त्यानंतर २२ जून १९३९ रोजी ते सुभाषचंद्र बोस यांना भेटले. (सावरकर भक्त सांगतात की ते अंदमानहून निघाल्यावर लगोलाग सुभाषचंद्र बोस ह्यांना भेटायला गेलेत. साफ खोटं!) या भेटीची वास्तविकताही समोर येते ती अशी.... बोस नुकतेच जिंनांना भेटून आलेले होते. २४ जून, १९३९च्या टाइम्स ऑफ इंडियाची बातमी म्हणते "सावरकरांना भेटून सुभाषचंद्र यांचा पुरता भ्रमनिरास झाला. सावरकरांनी आपला द्विराष्ट्र  सिद्धान्त बाजूला ठेवावा  अशी बोस यांची मागणी होती. त्याला सावरकर बधले नाहीत.  बोसांची इतकी निराशा झाली की त्या संध्याकाळी ठरलेली त्यांची सभाही त्यांनी घेतली नाही. आणि निराश होऊन परत फिरले...." 
या भेटीनंतर बोस यांनी आपल्या भावाला पत्रात सावरकरांबद्दल  लिहिलय- "हा माणूस  अस्मितेच्या खोट्या कल्पना आणि न्यूनगंडानं इतका ग्रासलाय कि हा देशाचं विभाजन करून राहील पण देशाच्या एकात्मतेसाठी काहीही करणार नाही....."
सावरकर भक्त जो प्रचार करतात कि सावरकर हे सुभाषचंद्र बोसांचे गुरू आणि प्रेरणा स्थान होते, या दाव्याचा फोलपणा यावरुनच सिद्ध होतो कि बोसांनी आपल्या सैन्याच्या चार  तुकड्यांना नेहरू रेजिमेंट, गांधी रेजिमेंट, आझाद रेजिमेंट आणि हिंद रेजिमेंट अशी नावे दिलीत. बोसांनीच प्रथम गांधींना "राष्ट्र पिता" म्हणून संबोधले. गांधींच्या खुनाचा कट रचणाऱ्या सावरकरांचा त्यांच्यावर काही प्रभाव असता तर त्यांनी असे केले असते का
उलट बोसांनी त्यांची आझाद हिंद सेना (INA) स्थापन केल्यावर  आणि वर उल्लेख केलेल्या बोस-सावरकर  भेटीनंतर केवळ चारच महिन्यात व्हाईस रॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या सोबत 'संपूर्ण सहकार्य' करत सावरकरांनी हिंदू महासभेसाठी सैन्य भरती सुरु केली. या सैन्यावर बोसांच्या INA विरुद्ध लढण्याची कामगिरी सोपवलेली होती. सावरकरांचे लहान बंधू नारायण हे इंग्रज सरकारच्या मध्यवर्ती सैन्य भरती बोर्डाचे एक सदस्य होते.
देशाचं विभाजन करण्यासाठी सावरकर इतके का उतावीळ होते? त्याचं कारण आहे. त्यांचे दयेचे अर्ज स्वीकारताना इंग्रजांनी त्यांच्याकडून तसा शब्द घेतला होता. २९ ऑक्टोबर १९३९ रोजी व्हाईसरॉय लिनलिथगो  यांच्यासोबत मुंबई  येथे सावरकरांनी तसा करारच करून टाकला.  त्यात हिंदू महासभा आणि ब्रिटिश यांच्या" समान शत्रू विरुद्ध एकदिलाने लढण्याचा निश्चय करण्यात आला. इंग्रजांना देऊ केलेल्या मदतीसाठीचे  पेन्शन तर त्यांना १९२४ साली रत्नागिरी वास्तव्यातच सुरू झालेले होते. भारतदेशाच्या स्वातंत्र्य चळवळीला खीळ घालून देशाचे विभाजन करण्याची सुपारी घेण्याच्या कामासाठी इंग्रजांकडून पेन्शन घेणारे ते एकमेव स्वातंत्र्य वीर (?) आहेत!
त्यांनी चालवलेली "शुद्धिकरणाची चळवळ" ही मुसलमान-दलितांना शुद्ध करवून घेण्यासाठी होती. म्हणजेच मुसलमान-दलित हे जन्मतः अशुद्ध  आहेत असा त्यांचा दृढ विश्वास होता. ज्यावेळी त्यांचे समकालीन डॉ. आंबेडकर हिंदूंच्या देवळांमध्ये दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी चळवळ करीत होते, तेव्हा सावरकरांनी दलितांसाठी वेगळं "पतित पावन" मंदिर उभारलं. कारण सावरकरांच्या लेखी दलित हे पतित होते! त्यांनी आताच्या स्वतंत्र-सार्वभौम भारताच्या संविधानाला विरोध केला आणि "मनुस्मृतीच आपले संविधान असायला हवे" असा आग्रह धरला. मात्र सवरकरभक्त त्यांना विज्ञान निष्ठ मानतात!
गांधींच्या खून खटल्याच्या निकालात सावरकरांविरुद्ध पुरावा नसल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले. परंतु नंतर खटला बंद झाल्यावर आणखी नवीन पुरावे समोर येऊ लागले होते. ते स्पष्टपणे सावरकरांच्या विरोधात जात होते.  टिळकांचे नातू गजानन विश्वनाथ केतकर यांनी पुण्यात "नथुराम गांधींचा खून करणार हे मला माहित होते", असे वक्तव्य केल्यावर त्याची प्रतिक्रिया देशभर उमटली. गांधी खुनाची पुन्हा एकदा संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली. तेव्हा भारत सरकारने मार्च १९६५ मध्ये पाठक कमिशनची स्थापना केली आणि २६ फेब्रुवारी १९६६ रोजी अन्नत्याग केल्यामुळे सावरकरांनी देहत्याग केला.
पुढे, गोपाल स्वरूप पाठक मैसूरचे राज्यपाल झाल्यावर मग कपूर १९६६ मध्ये कपूर कमिशन कडे चौकशीची सूत्रे गेली. गांधी खुनात सावरकरांचा हात असल्याचे पुरावे स्पष्टपणे कपूर कमिशन ने समोर आणले.  "कपूर कमिशनने सावरकरांना दोषमुक्त केले होते", अशी लोणकढी थाप आपण कधी न कधी ऐकलेली असतेच..

-प्रज्वला तट्टे
(सदर लेख वि. दा सावरकर यांनी पाठक कमिशनची स्थापना झाल्यावर प्राण का त्यागले?” या शीर्षकाखाली व्हायरल झालेला होता.)

फोटो सौजन्य-गुगल

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?
सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgjwdCYw5xmIvEc-oTmNI2OxJw-D-AKQ8ex3rbmTwbVmQBUUSlorarKyN6xrBlyfpWjzj5H_8Nj1m-OETEzElKh_lt4a9St1AaCbL52oLBwSMsdD-_gV4d-JMEExFQiqiUL8mdIF12ra6AU/s640/image-2.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgjwdCYw5xmIvEc-oTmNI2OxJw-D-AKQ8ex3rbmTwbVmQBUUSlorarKyN6xrBlyfpWjzj5H_8Nj1m-OETEzElKh_lt4a9St1AaCbL52oLBwSMsdD-_gV4d-JMEExFQiqiUL8mdIF12ra6AU/s72-c/image-2.png
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/02/blog-post_64.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/02/blog-post_64.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content