तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात इकबालीज्म

आज राष्ट्रकवी मुहंमद इकबाल यांची १४१वी जयंती.. जाज्वल्य राष्ट्रभिमानाची बांधणी करत असताना त्यांनी भारतीय राजकारण व वैचारिक क्षेत्रात अतुलनीय असं कार्य केलं आहे. 'राष्ट्र आणि राज्य' हा विषय चर्चीला जात असताना त्यात त्यांनी सुरुवातीलाच राष्ट्रवादाची भूमिका स्वीकारली. परंतु त्यांचा वेगळ्या राष्ट्राच्या मागणीचा पुरस्कर्ता म्हणून अवमान करण्यात आला, मुहंमद इकबाल यांनी प्रा. थॉमसन यांना लिहिलेल्या पत्रात ते स्वतः पाकिस्तानच्या कल्पनेला जबाबदार नसल्याचे म्हटलेले होते. तांत्रिकदृष्ट्या ते बरोबर आहे. मुस्लिम बहुल प्रांताचे वेगळे घटक राज्य करून भारतात संघ शासन आणावे असे त्यांचेही प्रतिपादन होते. त्यामधूनच पाकिस्तानची कल्पना साकार झाली, हे नाकारता येणार नाही. आज  इकबाल डे निमित्तानं त्याच्या चिंतनावर भाष्य करणारा हा लेख सरफराज अहमद यांनी लिहिला आहे. सदर लेख आम्ही नजरिया वाचकांसाठी देत आहेत
स्वामी विवेकानंद, सर सय्यद, रविंद्रनाथ टागोर, शिबली नोमानी, अरविंद घोष, मौलाना आझाद हे आधुनिक भारतातील काही धर्मचिंतक आहेत. या पूर्वकालीन आणि समकालीन दार्शनिकात डॉ. मुहंमद इकबाल यांनी ते ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाह वलीउल्लाह यांच्यानंतर बुद्धी आणि तर्काच्या आधारे तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात इस्लामचा अर्थ सांगणारे इकबाल हे पहिले दार्शनिक आहेत. इकबाल स्वतः तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांनी इस्लामी तत्त्वज्ञानाचा अर्थ तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांच्या आणि दार्शनिकांच्या तुलनेत सादर करण्याचा प्रयत्न केला.
इकबाल मुलतः कवी म्हणून चर्चेत आहेत. मात्र त्यांच्या कविता या फक्त कल्पनेचा परिपोष नाहीत. त्यांच्या काव्याचा विषय देखील मुलतः तत्त्वज्ञान हाच आहे. ‘जावेदनामा’, ‘असरारे खुदी’, ‘अरसगाने खुदी’ ही त्यांची काही प्रख्यात महाकाव्ये आहेत. या पैकी जावेदनामा हे दार्शनिक पार्श्वभूमीवर आधारीत ‘संवादी’ फारसी महाकाव्य आहे. ३५ विभिन्न पात्रांशी संवाद साधत हे महाकाव्य पूर्ण होते. यात इकबाल यांनी १०० हून आधिक दार्शनिकांच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करताना त्यांच्या तत्त्वज्ञानाशी, मतांशी वाद घातला आहे. यासाठी त्यांनी महाकाव्यात आपले अध्यात्मिक गुरु रूमी यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत उभे केले आहे. त्यांच्या विचारांच्या आधारे इस्लामचे तत्त्वज्ञानीय स्वरुप स्पष्ट करत ते दार्शनिकांच्या कार्याची समिक्षा करतात.
दांते हे महान विचारवंत होते. ते इकबालांच्या अभ्यासाचा विषय. डिवाईन कॉमेडीही त्यांची लॅटीन साहित्यकृती आहे. त्यामध्ये दांतेने वर्जिनला आपला मार्गदर्शक म्हणून उभे केले आहे. तीच पद्धत इक्बाल यांनी जावेदनामात रूमींसाठी वापरली आहे. इकबालांच्या या महाकाव्यात ३५ मुख्य पात्रे आहेत. त्यापैकी १२ ही कवी, विचारवंत, तत्त्वज्ञांची आहेत. याच महाकाव्यात त्यांनी कार्ल मार्क्सलाविना जिबराईलचा पैगंबरसंबोधले आहे. त्यामध्ये इकबाल यांनी मार्क्सचे हृदय आस्तिक आणि बुद्धी नास्तिक होती असा उल्लेख केला आहे. (कल्बे ऊ मोमीन दिमगश काफीर) इकबाल हे मार्क्सचे कठोर टीकाकार होते. त्यांनी जमालुद्दीन अफगाणी या आपल्या काव्यातील पात्राच्या साहाय्याने मार्क्सच्या चिंतनाला टीकेचे लक्ष्य बनवले आहे.
इकबालांचे मार्क्सच्या शोषणविरहित समाजाच्या संकल्पनेशी मतैक्य होते. मात्र वर्गसंघर्षाचा सिद्धान्त मांडून माणसाला नैसर्गिक अवस्थेची समता स्थापित करता येणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते. ‘खुदीचा (self) विकास केल्याशिवाय माणूस शोषणाचा सामना करण्यासाठी सिद्ध हू शकत नाही, असे इकबालांचे चिंतन होते. समतेसाठी सांगितलेल्या मार्क्सच्या पाया, इमला सिद्धान्ताच्या पुढे जाऊन इकबा0ल अतिनिसर्गवादी भूमिका मांडत होते. मार्क्स इश्वराच्या अधिसत्तेला आव्हान देत असल्याची टीका देखील इकबाल यांनी त्यांच्या काव्यातून केली आहे. इकबाल यांनी मांडलेलीखुदीची संकल्पना नित्शेच्याअधिमानव’ (super man) संकल्पनेसारखी असल्याची टीका केली आहे. मात्र मोहम्मद शिस खान या आरोपात तथ्य नसल्याचे सांगतात.     
इकबाल यांनी इसा मसिह यांचा अनुयायी म्हणून टॉल्सटॉयचा गौरव करणारी एक दीर्घ कविता या महाकाव्यात सामाविष्ट केली आहे. टॉलस्टॉय है सैनिकी जीवन जगलेला तत्त्वज्ञ होता. त्याने आयुष्यभर इसा मसिह यांच्या समाजक्रांतीचा इतिहास चिंतनासाठी विषय म्हणून निवडलेला होता. त्यानंतर आपल्या महाकाव्यातील बहुतांश पाश्चात्य तत्त्वज्ञांना इशारा देताना ते एका शेर मध्ये म्हणतात,
‘‘तुम्हारी तहजीब अपने खंजर से आप ही खुदकुशी करेगी।
जो शाखे नाजुक पे आशियाना बनेगा, नापाएदार होगा ।।’’

समतेचा मार्ग खुदीच्या विकासात
कोणताही तत्त्वज्ञ चिंतनाच्या क्षेत्राकडे सामाजिक हिताच्या परिस्थितीच्या शोधासाठी वळतो. इकबालांचे चिंतन याहून वेगळे नव्हते. माणसाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी खुदीच्या विकासाची भूमिका घेतली. या संदर्भात त्यांनी जगातील अनेक तत्त्वज्ञांच्या विचारांचा आधार घेतला. ‘असरारे खुदीइकबालांची फारसी मसनवी आहे. त्यामध्ये त्यांनी प्लेटोच्यारिपब्लीकच्या मांडणीचे इकबालांनी कौतुक केले आहे. प्लेटोचा गौरव करताना ते आपल्यावर प्लेटोचा प्रभाव असल्याचे सांगतात,
‘‘बर तखय्युलहाए मा फर्मारिवास्त
 जामे ऊ ख्वाब आवरो गेतीरुबास्त’’

भावार्थ- आमच्या विचारांवर तो पसरलेला आहे. पेला आहे त्याचा निद्राकारक आणि इंद्रीय जगताचा याचक)
इक्बाल यांनीअसरारे खुदीमध्येमर्हलए दोम जब्ते नफ्सभोगीवृत्ती, वासना यांना वेसण घालून खुदीचा विकास कसा करायचा याचे विश्लेषण केले आहे.

कवितेतून कामगार हिताचा एल्गार
कष्टार्जन हा भूमिपुत्रांचा राष्ट्रधर्म. पण वसाहतिक मूल्यांनी भांडवलदारी आसूयेने मजूरांना वेठीस धरलं. त्यांचं शोषण केलं. इकबालांनी त्या अन्यायाविरोधात आपल्या शब्दांची शस्त्र उगारली.  ‘‘बांगे दिरा’’  हा इकबालांचा काव्य संग्रह. इतिहास आणि कल्पनांचं मिश्रण त्यात आहे. भावना आणि बुद्धिवादाची सांगड घालून इकबालांनी आपल्या चिंतनाला त्यात शब्दबद्ध  केलंय. ‘‘सरमाया व मेहनत’’ म्हणजे भांडवल आणि मेहनत ही त्या काव्यसंग्रहातली इकबालांची एक कविता. सांप्रत भांडवलदारी मानसिकतेचा प्रत्यय त्यातून येतो. भांडवलदारी मानसिकतेला उघडे पाडून इकबालांनी मजूरांच्या जागृतीचा एल्गार त्यातून पुकारला आहे. त्यात इकबाल म्हणतात,
‘‘बंदाये मज्दूर को जाकर मेरा पैगाम दे
खिज्र का पैगाम क्या, है ये पयामे कायनात ।।१।।
अय्‌तुमको खा गया के सरमायादारे हीलागर
शाखे आहू पर रही  सदियोंतलक तेरी बरात ।।२।।’’

मजूरांचे दुःखी कष्टी जिणे इकबालांना पहावत नाही. त्यांच्या हळव्या मनाला त्यामुळे वेदना होतात. ते मजूराला संदेश देतात. म्हणतात, मजूराला या स्थितीतून सावरता यावं यासाठी हा माझा संदेश आहे. माझा हा संदेश त्यांना द्या. हा फक्त माझाच नाही तर साऱ्या सृष्टीचा संदेश आहे. (हे मजूरांनो, श्रमिकांनो) त्या धूर्त भांडवलदारांनी (सरमायादार)  तुम्हाला संपवले आहे. तुझ्या क्षमतांना गिळंकृत केले आहे. त्यांच्या इच्छेवर तुझी मजूरी ठरत आहे. कार्ल मार्क्सने श्रम मूल्य आणि वस्तुचे बाजार मूल्य यातील तफावत सांगितली. कोणत्याही वस्तूचे वरकड मूल्य (अतिरिक्त मुल्य / सरप्लस व्हॅल्यु) हे भांडवलदाराकडून श्रमिकांच्या होणाऱ्या शोषणाचे प्रतीक असल्याचे तत्त्व त्याने शोधून काढले. वरकड मूल्यात मजूरांनाही वाटा मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे हे मार्क्सचे स्वप्न म्हणता येईल.

‘‘दस्ते दौलत आफरी को मुज्दायौ मिलती रही
अहले सरवत जैसे देते है गरीबोंको जकात ।।३।।
साहीरे अल्मुतने तुझ को दिया बर्गे हशीश
और तु अय्‌बेखबर समझा उसे शाखे नबात ।।४।।’’

मजूर हा श्रीमंताची गरज असतो.  पण त्या गरजेचं प्रदर्शन मात्र श्रीमंत भांडवलदार कटाक्षानं टाळतात. मजूराला काम देऊन जणू काही ते मजूरावर उपकार करत आहेत. अशा अविर्भावात वागतात. श्रीमंतांनी गरीबाच्या तोंडावर जकात (आश्रित निधी) फेकावी त्या पद्धतीने श्रीमंतांची संपत्ती आपल्या कष्टातून उभी करणाऱ्या मजूरांना मजूरी मिळत असते. या अन्यायाची जाणीव कामगारांना होत नाही. जणू काही अल्मुत नावाच्या पर्वतावरील जादूगाराने त्यांना हशीशचे मादक द्रव्य देऊन गुंग केले आहे. त्यामूळेच ते हशीश सारख्या मादक द्रव्याला ते कल्पवृक्ष समजत आहेत. म्हणजे मजूर हे त्यांचे शोषण करणाऱ्या भांडवलदारांनाच आपला मुक्तीदाता मानत आहेत.

‘‘नस्ल,कौमीयत, कलीसा, सल्तनत, तहजीब, रंग
‘‘खाजगी’’ ने खूब चुनचुनकर बनाये मुस्कीरात ।।५।।
कट मरा नादां खियाली देवतांओ के लिये
सुक्र कि लज्जत में तु लुटवागया लज्जते हयात ।।६।।’’

मजूरांना भूलवण्यासाठी त्यांना त्यांच्या कल्याणाच्या मार्गापासून भटकवण्यासाठी नेत्यांनी मोहमयी विषयांची निर्मिती केली आहे. वंश, राष्ट्रवाद, मठ, राज्य, संस्कृती, वर्ण ही सर्व त्या नेत्यांनी मजूरांसाठी बनवलेली मादक द्रव्ये आहेत. नादान मजूरा तु या खोट्या दैवतांच्या (मादक द्रव्यांच्या) व्यर्थ मागे पडला आहेस. त्यातूनच तुझं मरण ओढावलय. समाधिसुखासाठी तु ऐहीक जीवन मात्र गमावलंस. त्याला तुझ्या नादानपणामुळे उद्ध्वस्त करुन घेतलंस.

‘‘मक्र की चालों से बाजी ले गया सरमायादार
इंतिहाये सादगीसे खा गया मज्दूर मात ।।७।।
उठ के बज्में जहां का और ही अंदाज है
मशरीक व मगरीब में तेरे दौर का आगाज है ।।८।।’’

भावार्थ- भांडवलदार हे धुर्त आहेत. त्यांनी आपल्या धुर्तखेळीने विजय मिळवला. त्यांच्या धुर्तपणामुळेच श्रमिकांनी अत्यंत साधेपणाने पराभव स्वीकारला. पण  हे मज्दूरा आता उठ. ही पराभूत मानसिकता त्याग. पूर्व आणि पश्चीमेत तुझ्या युगाची नांदी सुरू झाली आहे.

‘‘हिंमते आली तो दरिया भी नहीं करती कुबूल
गुंचा सैं गाफील तरे दामन मे शभनम कबतलक ।।९।।
नग्मायें बेदारीये जमहूर है सामाने ऐश
किस्साये खाबआवरे इस्कंदारो जम कबतलक ।।१०।।’’

श्रमिक आहे म्हणून मजदूरांनी किती दिवस न्युनगंडात रहावे. त्यांनी क्रांतीची मशाल पेटवावी. मजूरांनी क्रांतीप्रवण व्हावं म्हणून इकबाल भांडवलदारांच्या विरोधात मजूरांना धैर्य देतात. इकबाल मजूरांना म्हणतात, दृढनिश्चय असेल तर कोणतीही बाब असाध्य नाही. किती दिवस फुलात दवबिंदू असावेत त्याप्रमाणे तु आसवांनी आपले कपडे भिजवत राहशील. बहूजनांमध्ये बेदारी (जागृती) निर्माण करणारे गीत आनंददायी आहे. तुला मोहीत करणाऱ्या सिकंदर आणि जमशेदच्या गोष्टी तु किती दिवस ऐकत बसणार आहेस. 
सरफराज अहमद, सोलापूर

जाता जाता वाचा : 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात इकबालीज्म
तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात इकबालीज्म
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5yy-0WLhvo0f4Eh3UzSib2UjIkp3sp7i0ibJjYt4EGe4qmhMMWsCLbzfnbcLuDd-nd7WU-xMZzEwHLS2g7eGV9-xuoZs_mH6o5zWx2GY-VDcxTmPa9E712sQsJv_8_CENqxs-C6F-J98Y/s640/Ekbal+day.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5yy-0WLhvo0f4Eh3UzSib2UjIkp3sp7i0ibJjYt4EGe4qmhMMWsCLbzfnbcLuDd-nd7WU-xMZzEwHLS2g7eGV9-xuoZs_mH6o5zWx2GY-VDcxTmPa9E712sQsJv_8_CENqxs-C6F-J98Y/s72-c/Ekbal+day.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/11/blog-post_9.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/11/blog-post_9.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content