ब्राझीलमध्ये महिला पत्रकारांना फिल्ड रिपोर्टींगस्थळी लैंगिक छळाला सामारं जावं लागत आहे. या ‘सेक्सुअल अॅब्यूज’ला महिलांनी सोशल मीडियातून #LetHerJob हे हॅशटॅग वापरून वाचा फोडलीय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीचे धक्कादायक व्हिडिओ फुटेज या पत्रकारांनी इंटरनेटवरून प्रसारित केले आहेत.
फिल्डवर काम करतेवेळी नाजूक अवयवांना स्पर्ष करणारे असंख्य हात या व्हिडिओतून दिसतात, एवढेच नव्हे तर काहींनी ऑन एअर असताना महिला पत्रकारांवर थेट लैंगिक हल्लेदेखील केले आहेत, ही किळस येणारी दृष्ये ट्विटरवर लाखोंच्या संख्येनं रिट्विट केले जात आहेत. या व्हिडिओ क्लीपवरुन ब्राझीलच्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली असून जगभरात ब्राझीलची या घटनेवरून छी-थू केली जात आहे.
अॅथलिट खेळात ब्राझीलचं नाव अव्वल स्थानी मानलं जातं, जगभरातील फूटबॉलप्रेमी दर्शक खेळाचा आनंद घेण्यासाठी ब्राझीलला कूच करतात. पण खेळाच्या या स्वप्ननगरीवर अलीकडे दहशती सावट पसरलं आहे. खेळ बघायला आलेले दर्शक खेळ भावना विसरून मीडियाकर्मीवर हल्ले करत आहेत.
या संदर्भात बीबीसीने 28 मार्चला ‘रेग्युलर बुलेटिन’मध्ये एक धक्कादायक स्टोरी प्रसारित केली. ब्राझीलमधील न्यूज चॅनलमध्ये काम करणाऱ्या स्पोर्ट्स जर्नलिस्ट असणाऱ्या काही मुलींच्या भयानक कथा बीबीसीने प्रसारित केल्या. सुरुवातीला डोळ्यांना विश्वास बसणार नाही अशी दृष्ये विनासेन्सार झळकली. जगविख्यात ‘रियो डी जनारिओ’ च्या स्पोर्ट्स स्टेडिअममधील या व्हिडिओ कटिंग्ज् होत्या.
27 आणि 28 मार्च रोजी, दी गार्डीयन, दी एक्सप्रेस ट्रीब्यून, दी डेली डॉट, बीबीसीसारख्या जगभरातील सर्व प्रतिष्ठित मीडिया संस्थांनी ही बातमी प्रामुख्याने प्रकाशित केली होती. तर भारतात बिझनेस स्टॅण्डर्ड या वृत्तपत्राने पहिल्या पानावर या बातमीला जागा दिली होती. दी गार्डियनच्या वृत्तानुसार एखाद्या खेळाडूचा खेळ वाईट होत असेल आणि दुसरा चांगला खेळत असेल तर स्टेडिअममधील दर्शक स्पोर्ट्स रिपोर्टरवर हा राग काढतात.
अनेकवेळा समोरचा ग्रहस्थ बूम माईक धरलेल्या महिला पत्रकाराला कीस करण्यासाठी सलगी करतो. काहीजण तर त्यांच्या शरीराला स्पर्श करतात. ब्राझीलच्या अनेक स्टेडिअममध्ये अशा घटना घडत असल्याचं पीडित ‘ब्रूना डेल्ट्री’ हीने म्हटलं आहे. 28 मार्चला लिहलेल्या फेसबूक पोस्टमध्ये तिनं या संदर्भात धक्कादायक खुलासे केले आहेत. फिल्डशिवाय अन्यत्रही आमच्याकडे बघणाऱ्यांच्या नजरा किळसवाण्या असतात, असं ब्रूना म्हणते. ब्रूनासारख्या अनेक महिला पत्रकारांनी ट्विटरवरून आपले धक्कादायक अनुभव मांडले आहेत.
वारंवार होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून ब्रूना डेल्ट्रीनं ही मोहीम सुरु केली आहे. #DeixaElaTrabalhar म्हणजे #LetHerJob (मला काम करू द्या) म्हणत तिने आपल्यासोबत झालेल्या मोलेस्टेशनच्या घटना एक-पाठोपाठ मांडल्या. यानंतर अनेक महिला सहकाऱ्यांनी तिला पाठींबा देत या मोहीमेत सहभाग घेतला.
तब्बल 52 महिला पत्रकारांनी एकत्र येऊन या सार्वजऩिक ठिकाणच्या छेडछाडीचा व्हिडिओ तयार करून ‘रियो डी जनारिओ’ स्टेडिअममध्ये मोठ्या स्क्रीनवर दाखवले, यानंतरही मोलेस्टेशनच्या घटना वाढत होत्या. त्यामुळे ब्रूना व तिच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरु केली. फील्ड व्यतिरिक्त इतर ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक छळ यातून पुढे आले आहेत.
बीबीसीने अशा काही महिला पत्रकारांच्या प्रतिक्रीया बुलेटिनमध्ये दाखवल्या होत्या, एका प्रतिक्रियेत इएसपीएनच्या ही एक महिला रिपोर्टर लैंगिक भेदभावाबद्दल बोलताना म्हणाली, आम्ही एखादी एक्सक्लुझीव्ह बातमी आणली की पुरूष सहकारी चारित्र्यावर शिंतोळे उडवत बदनामीचे गॉसीप्स पसरवतात, अशांना आम्हाला एकटच म्हणायचे आहे, महिलांना ‘सन्मान’ द्या व ‘आम्हाला काम करू द्या’.. जगभरात मीटूची मोहीम शिखरावर असताना उशीरा का होईना महिला पत्रकारांनीदेखील आपल्या लैंगिक छळाची तक्रार मांडण्यास सुरूवात केली आहे.
मार्च महिन्यात भारतात एका-पाठोपाठ तीन पत्रकारांच्या हत्या झाल्या, या घटनांवर संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली. मीडिया विश्लेषण करणाऱ्या ‘दी हूट’ या वेबसाईटच्या मते गेल्या तीन वर्षांत भारतात 200 पेक्षा जास्त पत्रकांरावर हल्ले झाले आहेत.
जगभरात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. इराक, सिरिया, अफगाण आणि आयसिसच्या हल्ल्यांत अनेक पत्रकारांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदे करण्याची मागणी होऊ लागली आहे. अशावेळी ब्राझीलच्या महिला पत्रकारांनी सन्मानासाठी सुरू केलेला लढा मैलाचा दगड ठरू शकतो.
(सदरील लेख 10 एप्रिल 2018च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com