
नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात टिपू सुलतान, डॉ. मुहंमद इकबाल, मौलाना आज़ाद आणि पंडित नेहरू चार थोर महामानवांचा जन्मदिवस आहे. (९ इकबाल, टिपू १०, आज़ाद ११ आणि १४ नेहरू) या चारही विभुती पुरुषांचे राष्ट्र निर्मितीतील योगदान अतुलनीय आहे. चौघेही आपल्या जाज्वल्य राष्ट्रवादासाठी भारतीय इतिहासात अजरामर ठरले. आज भाजपप्रणित कथित देशभक्तीच खरा राष्ट्रवाद आहे, अशी चर्चा मुख्य प्रवाही (?) माध्यमातून होत असताना वरील महापुरुषांनी मांडलेल्या नॅशनलिझमची नव्याने मांडणी करणे क्रमप्राप्त ठरते.
मोदींच्या सत्ताकाळात राष्ट्रभक्ती व राष्ट्रवाद या दोन शब्दांची चलती झालेली दिसते. हिंदू राष्ट्रवाद म्हणजेच खरा राष्ट्रभक्ती व म्हणजेच राष्ट्रवाद अशी मांडणी होत आहे. देशातील समन्वयी परंपरा, त्याचे बहुसांस्कृतिक वैविध्य, अल्पसंख्याकाच्या धर्मश्रद्धा, समान न्याय, नागरी हक्क, सांस्कृतिक स्वातंत्र्य इत्यादींना मूठमाती देऊन त्याविरोधातील मतप्रतणालींवर हा राष्ट्रवाद पोसला जात आहे. नोटबंदीला राष्ट्रीयता, हिंसेला देशप्रेम व झुंड हत्येला हिंदू धर्म मानला जात आहे. गायीला मारून खाणारा धर्म आज गायीचा संरंक्षक झालेला दिसतो. त्यासाठी मानवी सुरक्षा धोक्यात आणली गेली. मानवी जीवापेक्षा प्राण्यांच्या बेगडी ममत्वाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अशा स्थितीत राष्ट्रवाद या वादग्रस्त प्रणालीची समीक्षा क्रमप्राप्त ठरते.
१८व्या शतकाच्या शेवटी युरोपमध्ये लोकशाहीप्रणित राष्ट्रवादाचा उदय झाला. याच काळात युरोपमध्ये आधुनिक विचारंचे वारे वाहू लागले होते. त्याचं प्रतिबिंब भारतात पडणे स्वाभाविक होते. कारण त्यावेळी भारत युरोपीयनांची - ब्रिटिशांची राजकीय वसाहत होती. इंग्रजी सत्ते भारतात आधुनिक शिक्षण सुरू केलं होतं. त्यातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या पिढीने भारतातील पारंपरिक समाजरचना व धर्मश्रेष्टत्वाला आव्हान दिलं. त्यात राजा राम मोहन राय, ज्योतिराव फुले, सर सय्यद अहमद खान, रानडे, पुढे गोखले, टिळक, वि.रा. शिंदे इत्यादी मंडळी होती. तत्पूर्वी या मंडळीने आधुनिक शिक्षण घेऊन सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केलेली होती.
सामाजिक प्रबोधनाचा विचार हळूहळू राजकीय प्रबोधन व अंतिमत: राजकीय मुक्तीचा विचार म्हणून पुढे आला. त्यातून १८५७चा पहिला स्वातंत्र्य लढा झाला. या लढ्यातून अनेक विभूतीपुरुष व विरांगना पुढे आल्या. त्यांनी स्वराज्य ही संकल्पना मांडली. ईस्ट इंडिया कंपनीच्या रोषामुळे त्यातील काही पुढाऱ्यांना देशांतर करून मध्यपूर्व, मध्य आशिया व युरोपमध्ये आश्रय घ्यावा लागला. या मंडळीने परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. युरोपमधील आधुनिक विचारांचे निरुपण भारतीय परिप्रेक्ष्यात केले.
१९व्या शतकाच्या प्रारंभी राजकीय मुक्तीचा विचार प्रबळ होत गेला. मुहंमद इकबाल, मुहंमद अली, शौकत अली, मुख्तार अहमद अन्सारी, हुसैन अहमद दमनी, बॅ. मुहंमद अली जिना, टिळक, गोखले, मोहनदास करमचंद गांधी पुढे आली. तायंनी स्वराज्य व राजकीय मुक्तीचा विचार मोठ्या प्रमाणात मांडला. युरोपमधील आधुनिकतेचे वारे व राष्ट्रवादाची मांडणी ब्रिटिशांच्या निरंकुंश सत्तेला विरोध करण्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरली. त्यावेळी राष्ट्रीय सभा या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करीत होती. या राष्ट्रीय चळवळीत एक समान उद्दिष्ट घेऊन वेगेवेगळ्या विचारसरणी, मतप्रवाह, व्यक्ति-संघटना सामील झालेल्या होत्या. या चळवळीने भारतीय परिप्रेक्ष्यात समताधिष्ठित न्याय व राजकीय मुक्तीचा राष्ट्रवाद मांडला.
ब्रिटिशांची राजकीय गुलामगीरी झुगारणे, लोकांचे शासन निर्माण करणे, मागास घटकांचे सर्वहित जपणे, जात-वर्णश्रेष्ठात्वाची रचना नाकारणे, सामाजिक विषमतेचा विरोध करून समताधिष्ठित राष्ट्र निर्मिती, प्रत्येक नागरिकांना समान न्याय व हक्क प्रदान करणे इत्यादी घटक त्यात अंतर्भूत होते. याच काळात सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना निर्मिली गेली. त्यात वर्णश्रेष्ठता जपणे, सामाजिक भेदांना स्थान देणे, धर्मश्रेष्ठतेच्या अहंगंडांना कवटाळणे, पूर्व इतिहासाचे गौरवीकरण, मागास घटकांना समानता नाकारणे, बहुसांस्कृतिकता नाकारणे, विभिन्न धर्माचे अस्तित्व नाकारणे, हिंदू संस्कृतीला देशाची संस्कृती मानणे इत्यादी घटक त्याचा आधार होते.
लोकशाही स्वराज्याला धर्माधिष्ठित सत्ताकारणात परावर्तित करून हिंदू धर्मश्रेष्ठतेला राष्ट्रभक्तीचा मुलामा चढवण्यात आला. प्रसिद्धीमाध्यमांचा विपुल वापरू करून तो जनमाणसात रुजविण्याचे प्रयत्न झाले. त्यातून हिंदू धर्म, ब्राह्मण्य, वैदिक परंपरा हीच भारतीय संस्कृती पर्यायाने तोच राष्ट्रावाद अशी मांडीणी सुरू झाली. ही चर्चा किंवा मांडणी राष्ट्रीय सभेचा भाग असलेल्या व्यक्ती, संघटना व राजकीय विचारगट करीत होते. म्हणजेच काँग्रेसमध्ये राहून हिंदुत्व विचारप्रणालीचे जोपासण्याचं काम झालं.त्यामुळे अलीकडे याला पुरक व पर्यायी राष्ट्रवाद निर्मितीची चर्चा जोर धऱत आहे.
मौलाना आझाद, इकबाल आणि नेहरूंचा राष्ट्रवाद समाजहितावर आधारलेला होता. सर्वहारा वर्गाच्या मिश्र संस्कृतीतून व सहजीवनातून आकाराला आलेला समाज त्यावर हा राष्ट्रवाद उभा होता. पण दुर्दैवानं नेहरूंच्या निधनानंतर मतपेटीचं राजकारण सुरू झालं. सत्ता हस्तगत करणे ती मिळवण्यासाठी विविध पायंडे व प्रघातांची निर्मिती करणे, वेळेप्रसंगी प्रशासन व सरकारी अधिकारांचा दुरुपयोग करणे आदी प्रकार सुरू झाले. खरं पाहिलं तर आणीबाणी या विकृत राष्ट्रभक्तीला शह देऊन गेली. इंदिरा गांधींचे सत्तापतन करणे हाच खरा राष्ट्रवाद म्हणून प्रचारित करण्यात आला. राजकीय सत्ताबदलासाठी त्यावेळी एकत्र आलेली मंडळी विविध राजकीय विचारसरणीची होती. इंदिरा गांधीना पायउतार करणे हे उद्दीष्टे घेऊन ही मंडळी एका छत्रीखाली आली होती. ही घटना हिंदू राष्ट्रवादाची बीजारोपण करून गेली.
भाजपचा राष्ट्रवाद हे त्यांच्या देशभक्तीचं प्रमाण असू शकते, पण ते बहुसंख्याकांचे नाही. त्यांचा हा राष्ट्रवाद बहुसंख्याकांना मान्य असावाच असं नाही. एका अर्थाने साडे तीन टक्क्याची संस्कृती बहुसंख्याकांची संस्कृती आहे, पर्यायाने मुसलमानांनी ते स्वीकारणे अपरिहार्य आहे, अशी मांडणी करण्यापर्यंत अलीकडे मजल गेली आहे. याचा दुसरा अर्थ असा की आम्ही जे सांगतो तोच राष्ट्रवाद असा प्रचार-प्रसार वाढला आहे. हाा कथित धर्मवादी राष्ट्रवाद बहुसंख्याकांच्या माथी मारण्याचं धोरण आखल जात आहे. या प्रक्रियेला चाप बसवण्यासाठी पर्यायी राष्ट्रवादाची मांडणी करणे गरजेचे झालंं आहे. याच दृष्टिकोनातून आज (रविवार, 11नोव्हेंबर) लातूरला पहिल्या ‘आझाद-इकबाल कॉन्फ्रेस’चं आयोजन करण्यात आलं आहे.
१९८०च्या दशकात भाजपने पर्यायी राष्ट्रवाद मांडून हिंदू हित म्हणजे राष्ट्रवाद अशी माडंणी केली, आज त्यालाच राष्ट्रवाद म्हणण्यात येत आहे. या हिंदू राष्ट्रवादाला पर्याय देण्यासाठी आझाद इकबाल कॉन्फ्रेसचे आयोजन 'गाजियोद्दीन रिसर्च सेंटर' तर्फे करण्यात आलं आहे. या परिषदेचं दुसरं उद्दिष्टे म्हणजे भारतातील मुस्लिम राष्ट्रपुरुषांना पुनर्जिवीत करणे होय.
फुले-शाहू-आंबेडकर ही विचारधारा गेल्या काही दशकांपासून पुरोगामी चळवळीची वाहक झाली आहे. मुस्लिमातही अनेक महापुरुष झालेले आहेत. काही फुलेंच्या समकालीन होते, तर काहींनी शाहूंसोबत समाज प्रबोधनाचा विचार मांडलेला होता. आधुनिक भारतात तर अनेक मुस्लिम महापुरुषांची नावे घेता येतील. पण त्यांची पुनर्मांडणी झाली नसल्यामुळे ते विस्मृतीत गेलेली आहेत. फुले-शाहू-आंबेडकरचे बोट धरून ही राष्ट्रपुरुष पुनर्जीवत करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. आधुनिक भारतातील मुस्लिम महापुरुषांची नव्यानं पुनर्मांडणी करण्याचे आव्हान आमच्या पिढीनं स्वीकारलेलं आहे.
भाजपच्या कथित राष्ट्रवादाला शह द्यायचा असेल तर महापुरुषांना पुनर्जिवीत करण्याच्या प्रक्रियेत सर्व विवेकवादी चळवळींनी हातभार लावायची गरज आहे.
भाजपच्या राष्ट्रवादाने मुस्लिमच नव्हे तर सर्वच जातीय व धार्मिक अल्पसंख्याकांच्या सामाजिक व सांस्कृतिक अस्मितेला हादरे दिले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे.
भाजपच्या या कथित राष्ट्रवादाच्या प्रवासाची प्रक्रिया पाहिली तर ९०च्या दशकात तो ज्या जोमाने पुढे आला त्याला पुरक अशी अनेक घटना त्याकाळी घडल्या होत्या. दुसरं म्हणजे काँग्रेसप्रणित भारतीय राष्ट्रवादाला प्रतिक्रिया म्हणून हो हिंदू राष्ट्रवाद मांडण्यात आला होता. राजकीय भाष्यकारांच्या मते हा पर्यायी राष्ट्रवाद नसून तो हिंदू जमातवाद होता. या जमातवादाला राष्ट्रभक्तीचे स्वरूप मिळून भाजप सांगेल तोच राष्ट्रवाद अशी भ्रामक कल्पना मांडली गेली.
थोडसं मागे जाऊन पाहिलं तर हिंदू जमातवादाची (राष्ट्रवादाची) मुळं वसाहतकाळात रुजलेली आढळतात. राजकीय विचारवंत यशवंत सुमंत यांच्या मते, '१९४७ पूर्वी काँग्रेसप्रणित राष्ट्रवाद हाच एकमेव राष्ट्रवाद होता असे नाही तर काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी, संमिश्र संस्कृतीवर आधारीत राष्ट्रवादास विरोध करणारा हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रवादही स्वातंत्र्यपूर्व वसाहतकाळातच उदयास आला होता.'
स्वातंत्र्योत्तर काळा युरोपियन राष्ट्रवाद भारतीयांच्या माथी मारण्यात आला. भारताच्या भू-सांस्कृतिक, बहुधर्मीय व सामाजिक संरचनेनुसार राष्ट्रवादाची मांडणी अपेक्षित होती, पण तसं झालं नाही.
ब्रिटिशकाळात हिंदू राष्ट्रवादाचे धुरीण विविध प्रकारे सत्तेचा लाभ घेत होते. ब्रिटिश सत्तेच्या जवळ असणाऱ्या या वर्गाने राष्ट्रवादाच्या आधारे जमातवादाच्या (राष्ट्रवाद) मांडणीत केलेली प्रगती धोकादायक आहे.
काँग्रेसविरोध व मुस्लिमांचा अनुनय ही भाजपप्रणित राष्ट्रवादाचे विस्तारित स्वरुप होतं. मंडल कमिशनच्या शिफारशींच्या विरोधाला राम जन्मभूमी आंदोलनात रुपांतरीत करणे हे हिंदू जमातवादाचे नवं स्वरुप होतं. राम जन्मभूमूचं आंदोलन (बाबरीचा विरोध) मुस्लिमविरोधावर आधारित राहिला. त्यातूनच इतिहासातील अन्य मुस्लिम प्रतिकं नष्ट करणे, त्यांचे विकृतीकरण करणे त्याला हिंदू धर्म नष्ट करण्याची मोहिम म्हणत द्वेषभावना भडकावणे आदी अयाम जोडले गेले. बाबरी विध्वंसानंतर हिंदू हित, हिंदू संघटना, हिंदूंचे सैनिकीकरण, हिंदूंचे सामाजिक हीत हेच राष्ट्रवाद म्हणत तशी मांडणी सुरू झाली. हिंदू संस्कृती बहुसंख्याकाच्या माथी मारण्यातून असे विविध अयाम त्यास मिळत गेले. हिंदू संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती अशी मांडणी त्याचकाळापासून सुरू झाली. ही भारतीय संस्कृती हेच हिंदुत्व आणि तेच राष्ट्रीयत्व, अशी या राष्ट्रवादाची मुख्य मांडणी होती.
भाजपचा हा राष्ट्रवाद राष्ट्रवाद नसून तो जमातवाद आहे हे सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे. मोदीप्रणित भाजप सरकारमध्ये शोषित गटांची बाजू मांडणे म्हणजे देशद्रोह झालेला आहे. दलित, अल्पसंख्याकांच्या मानवी अधिकाराबद्दल बोलले की ते अनुनय मानला जात आहे, भाजप सरकारच्या जाचक धोरणाविरोधात बोलले की तो राष्ट्रद्रोह म्हणून प्रचारित केला जात आहे. वंदे मातरम, भारत माता की जय, मदरशांवर तिरंगा फडकावणे, सिनेमागृहात राष्ट्रगीतावेळी उभं राहणे देशभक्ती समजली जात आहे. जीवे मारण्याच्या धमक्या, महिलांविरोधात अश्लिल शेरेबाजी, माय-बहिणीला बलात्काराची धमकी देणे ही दुष्कृत्य देशप्रेमात बसवली जात आहेत.
गेल्या साडे चार वर्षांचा कालावधी पाहिला तर असं लक्षात येईल की गायींच्या संरक्षणार्थ माणसांवर हल्ले करणे, त्यांना जीवे मारणे हिंदू संस्कृतीचे जतन करणे असून तोच आमचा राष्ट्रवाद आहे, अशा प्रकारची मांडणी केली जात आहे. धर्मवाद पोसून त्याला राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याचा प्रघात पाडला जात आहे. सरकारचा वरदहस्त असल्यानं जमातवादाला राष्ट्रवाद म्हणून पोसण्यात यश आलं आहे. सरकारी अधिकाराचा गैरवापर करून हा जमातवादाचा दहशतवाद पसरवला जात आहे. या राष्ट्रवादाला पर्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन ही प्रक्रिया सुरु केली आहे. हा लढा आमच्या एकट्याचा नसून सर्वच विवेकशील भारतीयांंचा आहे. या लढ्यात सामील होऊन ऐकमेकांचे हात बळकट करू या..!
कलीम अज़ीम, पुणे
५ नोव्हेंबर २०१८
मेल : kalimazim2@gmail.com
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com
