वन वे तिकीट - घरदार सोडून स्वप्नांचा पाठलाग

र्षभरापूर्वी पुणे सोडलं आणि मुंबईला स्थायिक झालो. पुणे सोडायचं यासाठी मन धजत नव्हतं, तरीही मनावर नव्या 'संधीचं' दगड ठेवत पुन्हा एकदा स्थलांतर स्विकारलं. याआधीही सेफ झोन होताच मी शहरं सोडली आहेत. त्यामुळेच ८ वर्षापूर्वी वेल सेटल टेलरिंगचा बिझनेस बंद करत वयाच्या २३व्या वर्षी अंबाजोगाई सोडली. २००९ साली घर सोडलं त्यावेळी उद्देश आणि हेतू वेगळा होता. 
टेलरिंगचं काम सुरु करुन दहावं वर्ष ओलांडणार होतं. टेलरिंगमध्ये लेडीज आणि जेन्टस् दोन्हीचा उत्तम मास्टर होतो. स्वत:ची मालकी असणारं शॉप काढण्याच्या तयारीत असलेला मी, एकदम 'चिंध्यांच्या धंदा' त्याग करण्याचा विचार करतो. लेखन कौशल्य आत्मसात करुन चांगला लेखक होणं हाच हेतू डोळ्यासमोर होता. 
सगळं व्यवस्थित सुरु असताना उच्च शिक्षणासाठी शहर सोडलं. मात्र, स्थलांतराची भिती त्याहीवेळेस होती आणि आजही आहे. औरंगाबाद आणि पुणे सोडतानाही नव्या संधीच्या आड मी 'भिती' दडवून ठेवली होती. मुंबईच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मोहमयीनगरी सहजा-सहजी कोणालाही स्विकारत नाही. पण स्वत:ला कणखर बनवून थोडसं सावरलं की नवीन शहरं काय तर बहूभाषिक देशही तुम्हाला सहज स्विकारतात.
ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार स्थलांतराच्या बाबतीत म्हणतात 'स्थलांतरे नवीन शक्यतांना जन्म घालतात' रविश यांचं हे वाक्य पॉझिटीव्ह आहे. मात्र यातलं उदबोधन आतल्या मर्मावर प्रहार करणारा आहे. शिक्षण आणि रोजगारासाठी आमची पिढी सहज स्थलांतर स्विकारते. यातून आर्थिक स्थित्यंतरं मिळवण्याचा अट्टहास असतो. सर्व स्थलांतरित माणसांना शहरं स्विकारतात असं नाही, मात्र तो तग धरुन अखेरपर्यंत टिकाव धरतो. तोच शहराच्या भूगोलासह, अनोळखी चेहरेही आपलंसं करुन घेतो. अंबाजोगाई सोडून औरंगाबादला आलो, भौगोलिक आराखड्यानुसार मराठवाड्यात जरी असलो, तरीही बोलीभाषा आणि त्यांचा आत्मविश्वास माझ्यापेक्षा नक्कीच वेगळा होता.
बीड जिल्ह्यातला असल्यानं भाषेचा टोन वेगळाच होता. त्यातही उर्दू भाषेवर दख्खनी पगडा त्यामुळे हिंदीत बोलतानाही माझा लहेजा सर्वापेक्षा वेगळाच, त्यामुळे मी बोलत असताना मध्येच थांबवून श्रोते म्हणायचे 'तुम्ही बीडकडचे का?' शहर आणि परिसरात दलित-बौद्ध, मुस्लीम आणि मुळ मराठीभाषी समुदाय तुलनेत तेवढ्याच संख्येने त्यामुळे बौद्ध-दलितांची भाषा हिंदी असली तरी लक्षपुर्वक ऐकल्याशिवाय कळायची नाही, तर जुना बाजार, सिटी चौकातली उर्दू ऐकायला गोड, पण समजायला संभ्रमी, तर सिडको, औरंगपुरा, टिळकपथ इथली मराठी ग्रामीण प्लस मध्यम शहरी धाटणीची.. याहीपेक्षा वेगळी स्थिती बामू विद्यापीठाची, विदर्भ, खान्देश, मराठवाडा सर्व विभागीय भाषा आणि राहणीमानाचा ढंग.. याउपर पाहता बोलताना नेहमी संवादाचा रिसीव्हर अनार्थिक अर्थ काढू नये यासाठी स्पष्टीकरणाची टाचणं नेहमी जोडावी लागायची.

पुण्यात दोन्ही पातळीवर यापेक्षा कैकपटीनं न्यूनगंड आणि संभ्रमीत अवस्था मनात कल्लोळ माजवत होती. स्वघोषित संस्कृतीरक्षित आणि भाषाविकासक प्रदेशात मराठवाड्याच्या स्वप्नातून खाडकन जागा होऊन आपटल्यासारखा पुण्यात आदळलो. इथं प्रमाणभाषेचा स्वैराचार शिकवणारे मास्तर मनात भाषिक धडकी भरवत. परिणामी सुरुवातीचे बरेच दिवस न्यूनगंडात होतो. आणि इथला दुसरा वेदनादाही झटका म्हणजे पेठीय ओठातून झळकणारा टोकाचा तुच्छतावाद, या दोहोच्या कचाट्यातून सुटायला बराच काळ जावा लागला. 
तत्कालिन पुणे विद्यापीठात विशिष्ट जात आणि वर्गाची कथित मक्तेदारी असलेला गट कार्यरत; यातून शोषित आणि वंचित घटक ग्रामीण आणि निम्नशहरी भाग सोडून यांच्याकडे शिक्षणासाठी आलेली ही पिढी. ओबडधोबड राहणीमान आणि जेमतेम टक्केवारीच्या जोरावर शिक्षणातून भविष्यातल्या संधी शोधणाऱ्या पिढीला आजही वेळोवेळी द्रोणाचार्य भेटतात. अजुनही ही पिढी द्रोणाचार्यांच्या परिक्षेला सामोरं जातेय. 
आमची आजची पिढी बोलीभाषेची अट्टाहासी; सोशल मीडियामुळे प्रमाणभाषेच्या ओघात हरवलेली 'आमची भाषा' आम्हाला सापडली. पण बोलीभाषेला हीन समजणाऱ्या पुण्यात स्थलांतराची दुसरी बाजू कळाली. त्यामुळे हा काळदेखील जगण्यातली दुसरी बाजू समजावून गेला. मात्र, हा द्रोणाचार्य वर्ग तुच्छतावादाच्या पलिकडे कधी पाहणार हा एक शाश्वत प्रश्न आहे. अशा भाषा आणि सुलभतेच्या प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत पिढी जगतेय. मीदेखील याच पिढीचा मूक साक्षीदार होतो.
स्थलांतराची दुसरी एक चांगली आणि महत्वाची बाजू म्हणजे दिवसागणिक वाढणारा लोकसंग्रह.. यातूनच नव्या शहरात टिकून राहणाची उर्मी वारंवार बळकट होते. स्थलांतर शक्यता, संधींसोबत आत्मविश्वास आणि नव्या लोकसंग्रह देतो. शहरे, गावं आणि घरातून तुटलेली नाते गरज म्हणून आधार शोधतो. त्यातून नवी नाती आणि भावनिक संबध तयार करतात. यामुळे तुटलेली घरं आणि नाती पुन्हा निर्मिले जातात. त्यामुळेच गाव आणि घरापासून दूर राहून पिढी अधिक सक्षम व स्वावलंबी होतेय. 
या विद्रोही पिढीला शहरं सहजासहजी स्विकारत नाहीये, किंवा असं म्हणायला हरकत नसावी की शहरातल्या मुलनिवासींचा हेटनेस पिढींना दिवसागणिक स्थित्यंतरासाठी झटावं लागत आहे. अशा प्रतिकुल अवस्थेत तरुणाई स्थायिक होतेय. आणि मुलनिवासीत असलेला वर्चस्ववादाचा पगडा हाणून पाडली आहे. यश आणि मोठ्या संधी आत्मसात करतेय. मल्टिनेशनल कंपन्या मुलनिवासीऐवजी परगावातील नोकरदारांना सहज पेफ्रंन्स देतात.
स्थित्यंतरासाठी आजची पिढी झटतेय. गावं, राज्य, देस-परदेसच्या पलिकडे पिढी कुच करतेय. स्थलांतरानं अनेक संस्कृती लिप्त झाल्या आहेत. देशातल्या लाखो बोलीभाषा स्थलांतरानं नष्ट केल्या आहेत. अनेक तरुणांना स्थलांतरानं देशोधडीला लावलंय, अनेक पिढ्या बरबाद केल्या आहेत. स्थलांतरानं भाषा, साहित्य, बोली, संस्कृती, इतिहास बदलला, तसंच इतिहासही घडवला आहे. 
राजकीय आणि समाजाचे अर्थशास्त्र स्थलांतरानं बदललं आहे. संधीच्या शोधानं मनुष्यबळ वाढवलं तसं, गावं, शहरं भकास झालीय. स्थलांतरानं शहरावर अनेक सांस्कृतिक आक्रमणे झाली आहेत. हेदेखील विसरता येत नाही. एकूण पाहता स्थित्यंतराच्या शोधानं गावाची, शहरं, शहराची महानगरे निर्मिले आहेत.. मात्र महानगरातली भाषा आणि सौहार्दता अबाधित रहावी यासाठी पुन्हा स्थलांतरांचेच गट कामाला लागले आहेत. हादेखील महानगरांचा आधुनिक चेहरा झाला आहे. त्यामुळे 'स्थलांतरे' नवी संस्कृती आणि सामाजिक वातावरण तयार करायला बांधील झाली आहेत..

मीच नाही तर माझी, आजची पिढी स्थित्यंतरासाठी झटतेय. गावं, राज्य, देस-परदेसच्या पलीकडे पिढी कूच करतेय. काही या स्थलांतरात तरले, पुढे गेले. पण अनेक तरुणांना स्थलांतरानं देशोधडीला लावलंय, अनेक पिढ्या बरबाद केल्या हेदेखील खरंय.. त्यात माझ्यासारखे शोधत आहेत, स्थलांतराचे अनेक अर्थ.. 
(लेखक ‘महाराष्ट्र वन’ या वाहिनीत प्रोड्यूसर आहेत.)
kalimazim2@gmail.com
(सदरील लेख लोकमतच्या 18 जानेवारी 2017च्या 'वन वे तिकिट' या नव्या सदरात प्रकाशित झाला आहे.  हे ऑक्सीजनचे नवे सदर असून त्याची सुरुवात या लेखापासून झालेली आहे) 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: वन वे तिकीट - घरदार सोडून स्वप्नांचा पाठलाग
वन वे तिकीट - घरदार सोडून स्वप्नांचा पाठलाग
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_Z8H7NnXvKl9GRLNt4NPlcDUYDqkv9kevRm7uTfPQiS6I3nMJ21q0R-7sHQEu83hnMiIa4HlHlcPHzuIN3bXUc2-FHQLq90hJiYNovpkyDLIaShrPeH3jTwJk4adYSX7wfOFvpVEbcMku/d/Indian+Relway.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_Z8H7NnXvKl9GRLNt4NPlcDUYDqkv9kevRm7uTfPQiS6I3nMJ21q0R-7sHQEu83hnMiIa4HlHlcPHzuIN3bXUc2-FHQLq90hJiYNovpkyDLIaShrPeH3jTwJk4adYSX7wfOFvpVEbcMku/s72-c-d/Indian+Relway.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/01/blog-post_18.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/01/blog-post_18.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content