पुण्यात पीजीसाठी आलो असल्यानंच माझ्या प्रादेशिक अस्मिता बळकट झाल्या. विद्यापीठात शिक्षण घेत असताना मुंबई-पश्चिम विरुद्ध इतर असे आमचे ग्रुप्स तयार झाले. ग्रुप्स तयार होण्यामागे राजकीय आणि भौगोलिक कारणं होती. सतत विकासापासून वंचित ठेवल्याचा राग आणि मत्सर होता. रानडेच्या कॅण्टीनमध्ये तासंतास प्रादेशिक अस्मितांबाबत वाद-विवाद व्हायचा.
कदाचित पत्रकारितेत असल्यानं मी व माझ्या मित्रांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ झाल्या असाव्यात. त्यामुळे नेहमी ग्रुप्समधला वाद क्लासरुममधून विशेष सेमिनार आणि चर्चासत्रापर्यंत प्रवास करायचा. विकास, डावलेपण, सापत्न वागणूक, अनुशेष केंद्रस्थानी ठेवत शिक्षक आणि वक्त्यांची अनेकदा कोंडी केली आहे. आजही अशा अनेक मुद्द्यावर आमच्या पिढीचा लढा सुरुच आहे.
विदर्भ, मराठवाडा, खान्देश, शेतकरी आत्महत्या, सिंचन, पाटबंधारे, एमआयडीसी, शिक्षणसंस्था, राजकीय नेतृत्व अनेक गोष्टींत का डावललं असा सवाल आमची प्रादेशिक अस्मितांची बळकटी करत होता. स्थलांतर होऊन पश्चिम महाराष्ट्रात आल्यानं इथला सार्वभौम विकासाची तुलना वारंवार करण्यात येऊ लागली. ही आमची पिढी नाही तर दरपिढ्या हेच सुरु आहे.
सरकारचा अनुशेष बळकावल्यानं मराठवाडा असो वा विदर्भ यांच्या वाट्याला नेहमी स्थलांतरच आलं आहे. कधी-कधी प्रश्न पडतो की पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ, पाणीटंचाई का नाही? हे भोग विदर्भ- मराठवाड्यालाच का? या राजकीय प्रश्नांची उत्तरे आमची पिढी मिळवायचा प्रयत्न करते आहे.
कदाचित याची उत्तरे शोधण्याकरितादेखील मायग्रेशन होत असावं.. उद्योग, व्यवसाय आणि शिक्षण हे स्थलांतर होण्याचे प्रमुख कारणं असली तरी, पाणीटंचाई आणि दुष्काळ हेदेखील मायग्रेशनची मुख्य कारण गेल्या वीसएक वर्षापासून समोर येत आहेत.
गावं, घरे, वाडी-वस्ती सोडून शहरं आणि महानगरातलं प्रतिकुल वातावरण पिढ्या स्विकारतात. सहज न स्विकारणाऱ्या महानगरात रेल्वे स्टेशन, पब्लिक टॉयलेट, पाईपलाईन याव्यतिरिक्त स्लम एरियात खोपट्यांच्या घरात स्थलांतरीतांचे लोंढे स्थिरावतात. हे झालं निम्न मध्यमवर्गीयांच्या बाबतीत. मध्यमवर्गीय कुटुंबातील शिक्षणासाठी स्थलांतरित झालेल्या पोरांची शहरातली अवस्था पाहिल्यास कुठलेही पालक आपल्या मुलांना शहरात पाठवणार नाही..
पुण्यासारख्या शहरात वर्षाला कोट्यवधींचं उत्पन्न देणारे विद्यार्थ्यांचे लोंढे केवळ सहानभूती आणि प्रेमाचे भुकेलं असतात. मात्र या मुलांना केवळ भाडोत्री म्हणूनच ट्रीट केलं जातं. खोपट्यांचा महिनागणिक हजारोंचा पगार देऊ करतात, पण बदल्यात योग्य सुविधा तर सोडाच प्रेमाची दोन निघत शब्द नाहीत. उलट टोकाचा हिनकसपणा आणि तुच्छतावाद सोसावा लागतो. पुण्यात मध्यवर्ती भागात विद्यार्थ्यांचे अनेक रहिवास आहेत.. तिथलं त्यांचं राहणीमान हा संशोधनाचा विषय ठरु शकेल.
पुण्याला पूर्वेचं ऑक्सफोर्ड (?) म्हणून मार्केटींग करण्यात आलं.. देशाअंतर्गत दर्जेदार शिक्षणाच्या २००च्या यादीत पुणे आहे.. मग ऑक्सफोर्ड कस या प्रश्नाचा गुंता मला अजुनही तुटलेली नाहीये.. केवळ मुक्त जगण्याच्या पळवाटेतून अनेकजण पुण्यात येऊन स्थिरावले. इथल्या अनेक शिक्षणसंस्थाचा दर्जा हा इतर शहरातील शैक्षाणिक दर्जा हा काही प्रमाणात सारखाच असतो.
केवळ कॉम्पिटिशन असल्यानं विद्यार्थी सेल्फ स्टडीतून स्वत:ला सक्षम बनवतात. जे या कॉम्पिटिशनला सामोरं जावू शकत नाही असे अनेकजण पाचएक वर्षानंतर गावाकडं जावून स्थिरावतात.. तर उरले-सुरले काहीजण आपला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असतात..
अस्तित्वाच्या शोधातून काही जणांना सांस्कृतिक अवकाश सापडले आहेत. तुच्छतावाद आणि द्वेशभावनेला सामोरे जाणारे एकत्र येत आहेत. यातून सामाजिक चळवळी उभ्या राहत आहेत. एकत्र येऊन आपला आवाज शोधण्यासाठी पिढी प्रयत्नशिल आहे. विद्रोह करण्यासाठी तरुणाई पुढे सरसावत आहे.
राजकारण, समाजकारण, विद्यार्थी चळवळीत स्थलांतरीतांचे मोठं स्थान आहे. राज्य आणि देशपातळीवर विचार केला मुसनिवासींपेक्षा उत्तम कामगिरी मायग्रेटनी केली आहे. घरापासून दूर असल्यानं स्वावलंबी होण्याशिवाय पर्याय नसतो. स्वत:ला सिद्ध करणं हे उदिष्ट्ये असलं तरी राहणीमान आणि स्वत:ला बदलण्याचं आव्हानही असतं. तसंच शहरी अस्मितांचा गंध नसल्यानं पैशाच्या मागे न पळता मुल्यांच्या मागे धावतात. जाणिवा आणि नेणिवा प्रगल्भ असल्यानं तरुण पिढी चुझी झाली आहे. दुसरं असं की केवळ लक्ष्य समोर असल्यानं ते मिळवण्याची धडपड सुरु असते. यातून बहुतांश जणांना यश मिळतंय.
पुणे-मुंबईचं शैक्षाणिक आयुष्य संपल्यानंतर स्थलांतरित पिढीचा खरा लढा सुरु होतो. कौशल्य असून मेरीट नसल्यानं अनेकदा चांगल्या संधी हातातून निसटून जातात. तर काही बाबतीत मेरीट असूनही राहणीमान किंवा जेमतेम दिसणं हेदेखील संधी गमावण्याचं प्रमुख कारण समोर आलं आहे. तर संधी मिळवण्यासाठी वशिला नावाचं गाजर लागतं, ते नसल्यानं कौशल्याचं अवमुल्यन होतं.
काहीवेळा संधीसाठी वर्ष किंवा महिनो खर्च करावी लागतात. रानडे इंस्टिट्यूटमध्ये पीजीत असताना एका प्रतिष्ठीत इलेक्ट्रॉनिक चॅनलचं कैम्पस झालं. कँण्डीडेड निवडण्याचे निकष आमच्या पत्रकारितेच्या आदर्श अभ्यासक्रमात बसत नव्हते. पण पीजी संपल्यावर रोजगारीचा प्रश्न आ वासून उभा असतो. आई-बाबांनी शिक्षणावर केलेल्या गुंतवणूकीची परतफेड करायची म्हणून कैम्पसला बसलो. लेखीनंतर जीडी सुरु झाली. दिलेल्या विषयावर पाच मिनिटांत ५ जणांच्या ग्रुपमध्ये विचार मांडायचे. पाच मिनिटानंतर जो नुसतं बोलू शकेल (वायफळ) त्याची निवड, असे २५ जणांमधून केवळ ५ जणांची निवड झाली. जे उत्तम लिहते, आणि अभ्यासू केवळ बडबड करता आला नाही म्हणून बाहेर फेकले गेले. हा क्रूर स्पर्धेचा पहिला साक्षात्कार होता.
आज मी एका प्रतिष्ठीत चैनलमध्ये मोठ्या हुद्दयावर आहे. निर्णयक्षमतेच्या पदावर आहे. इथपर्यतचा प्रवास सोपा नव्हता.. पण दुख: एका गोष्टीचं वाटतं की इथपर्यंत येण्यास बराच वेळ लागला. अलिकडे जॉबसाठी केवळ कौशल्य हवं असतं, मेरीट ग्राह्य धरलं जातंच असं नाहीये. ही एक आश्वासक बाब एमएलसीच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे मोठ-मोठ्या कंपन्या तुम्हाला सहज जॉब ऑफर करतात. फक्त तिथपर्यंत जाण्याचे चोखाळता आले पाहीजे.
अनेक मायग्रेट तरुणांनी गुणवत्ता आणि स्किलच्या जोरावर अनोळखी शहरांना कवेत घेतलं आहे. केवळ आयटीनं क्षेत्राचा जर विचार केला तर ४०-४५ टक्के दक्षिण भारतीय तरुणांनी आयटी क्षेत्राचा ताबा मिळवला आहे. उत्तम जॉब आणि प्रतिष्ठा मिळत असल्यानं स्थलांतरित पिढींनी शहरं स्विकारली आहेत.. ज्या महानगर आणि शहरांची हेटाळणी व्हायची ती शहरे 'आपली' झाली आहेत. जन्म'भूमी' आणि कर्म'भूमी' वेगळी असली तरी शहराचं भूमिपुत्र होणं पिढींनी स्वीकारलं आहे.
(लेखक ‘महाराष्ट्र वन’ या वाहिनीत प्रोड्यूसर आहेत.)
(सदरील लेख लोकमतच्या 26 जानेवारी 2017च्या 'वन वे तिकिट' या नव्या सदरात प्रकाशित झाला आहे. हे ऑक्सीजनचे नवे सदर असून त्याची सुरुवात या लेखापासून झालेली आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com