नोटबंदीवर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या सरकारला त्यांच्याच नेत्याने घरचा अहेर दिला. वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री असलेले व ज्येष्ठ भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नोटबंदीवरुन थेट मोदी सरकारवर निशाना साधला.
ते म्हणतात, ‘तुम्ही म्हणताय नोटबंदीनं जनतेला आनंद झाला आहे, तर मग सरकार का आनंदोत्सव साजरा करत आहे?, जनतेनं आनंदोत्सव साजरा करायला हवा होता, पण ते तर वर्षश्राद्ध घालत आहेत.’
शत्रुघ्न सिन्हांच्या टीकेनं आनंद साजरा करणाऱ्या सरकारी नेत्यांचे चेहरे साफ उतरले. त्यांना उत्तर देण्यासाठी कुठलाही मंत्री किंवा पदाधिकारी मैदानात नव्हता. यावरुन सरकारचेच मंत्री व पदाधिकारी नोटबंदीनं नाराज असल्याचं स्पष्ट होतेय.

वाचा : नोटबदली आणि रांगेतला देशभक्त
बुधवारी देशभरात नोटबंदीचा वर्षश्राद्ध आंदोलन करण्यात येत होतं. पण संवेदनहीन सरकार व त्यांचे मंत्री मस्तवाल होऊन आनंदोत्सव साजरा करीत होते. आंदोलकांना नोटबंदीचे फायदे मोजून दाखवत होते, यावरुन भाजपची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते. देशातील जनता काळा दिवस पाळत होती, पण सरकार खोटारडे दावे पेश करत नोटबंदी किती चांगली, याची आकडेवारी देत फिरत होतं.
त्या काळाकुट्ट निर्णयाला वर्ष उलटला तरी सरकार फायदे मोजून दाखवत होते. संघ व भाजपवाले खोट्या गोष्टींना फुलवून सांगत आहेत, हे पुन्हा एकदा भारतीय मतदाराला कळत होतं. त्यामुळे वर्षश्राद्ध घालून जनता सरकारची खिल्ली उडवत होती.

नोटबदलीच्या वर्षपूर्तीचा फाजील आत्मविश्वास बघता सरकारची कीव कराविशी वाटते. दंडकशाहीने त्रस्त झालेले सरकारचे मंत्री व पदाधिकारी वर्षभरानंतरही पुन्हा म्हणत होती की, ‘नोटबंदीवर जनतेची माफी मागा’.
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या आकडेवारीनुसार नोटबंदीनंतरच्या चार महिन्यात 15 लाख लोकांना रोजगार गमवावा लागला होता. ताज्या आकडेवारीनुसार नोटबंदीमुळे देशातील दीड कोटी तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली.
शंभरपेक्षा जास्त लोकांचे जीव गेले. कितीतरी लघू व मध्यम उद्योग बंद पडले. कारागीर बेरोजगार झाला. असंघटित क्षेत्र ढासळले. कामगार व शेतकरी देशोधडीला लागला. इतकं होत असतानाही सरकार आंदोत्सव साजरा करत होतं. याचा अर्थ असा की नोटबंदीचा सरकारला व त्यांच्या मंत्र्यांनाच मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे ते सेलिब्रेट करत आहेत. नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारने सर्व वृत्तपत्रांमध्ये कोट्यवधींच्या जाहिराती दिल्या. यात नोटबंदीमुळे झालेले फायदे सांगण्यात आले.
दुसरीकडे नोटबंदीने उद्धवस्त झालेली जनता वर्षापूर्तीचा आनंद कसा साजरा करणार होती. नोटबंदीनं ज्यांच्या नोकऱ्या गेल्या ते आनंद कसं साजरा करतील? सरकारच्या निर्णयाने चलती-फिरती माणसं मेली तो घर वर्षश्राद्धच करणार, त्यांच्याकडून आनंद साजरा करण्याची अपेक्षा सरकार कसं काय करू शकतं.?

नोटबदलीनं जनता हैरान झाली आहे. वर्षभरानंतर आजही ते आपली विस्कटलेली घडी पूर्ववत करू शकत नाहीत. अनेकजण आजही रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत. सरकारच्या घातकी निर्णयानं अनेकांची घर-संसार बरबाद झाली. अनेकजण उघड्यावर आले. पण सरकारला याचे काहीच देणं-घेणं नाहीये. उलट सरकारचा एक मंत्री नोटबंदीनं नक्षलवाद, देहव्यापारात मोठ्या प्रमामात घट झाल्याचं सांगतो. यावरुन सरकारच्या संवेदनशीलतेचं मोजमाप करता येऊ शकते.
नोटबंदीला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्यापर्यंत सरकारची मजल गेली होती. कुठलीही तक्रार न करता रांगेत थांबणारे सरकारसाठी देशभक्त होते. बँकेच्या रांगेत तासंतास थांबून अनेकांनी आपला जीव गमावला पण निष्ठूर सरकार देशासाठी सहन करा म्हणत होतं. काळ्या पैशासाठी सहकार्य करा म्हणत होतं. वर्षभरानंतर कितची काळा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा झाला याचा हिशोब कोण देणार?
‘नोटबंदीनं अमूक-तमूक हजार कोटी काळा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा झालाय’ हे वाक्य आहेत, देशाच्या जुमलेबाजी पंतप्रधानांची. 15 ऑगस्ट दिनी भारताचा पंतप्रधान राष्ट्रध्वजाखाली उभा राहून साफ खोटं बोलतो, पण कोणीही त्यांना उलट प्रश्न विचारत नाही की कुठे आहे तो पैसा?
प्रधानसेवकांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना 3 लाख कोटीचा काळा पैसा बँकेत परत आला असल्याचे सांगितलं होतं. पण अवघ्या 15 दिवसांत आरबीआयने 99 टक्के नोटा परत आल्याचं सांगून प्रधानसेवकांचा खोटारडेपणा उघड केला होता.
31 ऑगस्टला रिजर्व्ह बँकेने वार्षिक अहवाल जारी करत 99 टक्के पैसा बँकेत परत आल्याचं सांगितलं. यासह नोटबंदीमुळे मोठा तोटा झाल्याचंही आरबीआयने कबूल केलं. 30 जून रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रिजर्व्ह बँकेचे उत्पन्न 23.56 टक्क्यांनी घटलं होतं, असं स्पष्टीकरण खुद्द आरबीआयनं दिलं होतं.
आरबीआयला परदेशी स्रोत्रांपासून मिळणारे उत्पन्नही 35.3 टक्क्यांनी घटले, रुपयात घसरण झाल्यानं हे उत्पन्न घटल्याचं रिजर्व्ह बँकेनं मान्य केलं होतं.
जुन्या नोटा बंद झाल्यानं त्या बदलण्यासाठी बँकेत आल्या. भरमसाठ नोटा बँकेत आल्यानं रिजर्व्ह बँकेला 17 हजार 426 कोटींचं अतिरिक्त व्याज द्यावा लागला आहे. तसेच नव्या नोटा प्रिंटसाठी 7 हजार 965 कोटीचा खर्च झाला. नव्या नोटा विमानातून देशभरात पाठवण्यात आला यासाठी 13 हजार कोटींचा खर्च झाला, म्हणजे नोटंबदीच्या काळात विविध कारणांसाठी तब्बल आरबीआयचे 21 हजार कोटी खर्च झाले होते.
सरकारने रिझर्व्ह बँकेशी कोणतीही चर्चा न करता नोटबंदीचा निर्णय घेतला. कुठलंही नियोजन न करता नोटबंदी लादली. परिणामी जनतेला असह्य हाल या निर्णयाचे सोसावे लागले. हक्काचा पैसा मिळवण्यासाठी बँकेच्या बाहेर पाच-पाच तास लायनीत उभं राहावं लागलं.
घरातला ठेवणीतला पैसा बँकेत टाकून सामान्य माणूस निर्धन झाला. आपल्याच पैशासाठी बँकेच्या खेटा माराव्या लागल्या. जास्तीचे पैसे काढू नये म्हणून महिनाभरात 50 कडक नियम लादले. दररोज नियम बदलत राहिले. आपल्याच पैशाबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांच्या राष्ट्रभक्तीवर सरकारने शंका घेण्यात आली. लोकं नाराज असताना सरकारने धर्माचं राजकारण करुन लोकांची लक्ष वळविली.
नोटबंदीनं बेरोजगारी आली, त्याचा राग लोकांच्या मनात होता. पण सरकारने यातून बचाव करण्यासाठी धार्मिक द्वेषाचे राजकारण केलं. लोकांच्या मनातील रागाचा सरकारने वापर केला. प्रत्येकाला देशविरोधी किंवा कर चुकवणारा ठरवून लोकशाही मूल्यांना धक्का दिला गेला.
नोटबदलीची घोषणा काळ्या पैशापासून सुरु झाली. नंतर दहशतवाद, नक्षलवाद करत कॅशलेस, डिजिटल पेमेंट, नेट बँकीग होत इन्कम टॅक्स पेअर वाढ असे फुगीर तर्कहीन तद्दन धुळफेक करणारे शब्द सरकारच्या तोंडी आले.
नोटबंदी करुन फसलोय, हे लक्षात येताच विविध शब्दांचे मुलामे चढविले जाऊ लागले. नोटंबदीच्या भाषणात कुठेच नसलेले शब्द नंतर सरकारचे ‘तकीया कलाम’बनले. वर्ष उलटला तसा ना नक्षलवाद संपला ना दहशतवादी कारवाया, तसेच ना ही काळा पैसा परत आला ना भ्रष्ट्राचार संपला. उलट मोठी नोट आल्याने भ्रष्ट्राचारात वाढ झाल्याचं निरिक्षण आहे.
नोटबंदीनं जनता त्रस्त असताना जीएसटी लादला. नव्या करांच्या बोजानं जनतेचं कंबरडं पार मोडलं. जीएसटीचंही सेम नोटबंदीसारखं झालं. कुठलंही नियोजन व यंत्रणा नसताना नवी करप्रणाली लागू करण्यात आली.
लघुउद्योजक व फुटकळ व्यावसायिकांचा नव्या कररचनेमुळे व्यापार मंदावला. त्यामुळे जनतेत क्षोभ आहे. जुलैपासून ते 10 नोव्हेबरपर्यंत सरकारने जीएसटीतही वेगवेगळेबदल केले. परवा शुक्रवारी जीएसटीत आणखी एक नवा बदल केला. जीवनावश्क वस्तूंच्या लिस्टमधून 22 वस्तूंवरील कर रचना कमी केली. अर्थात गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा बदल करण्यात आला आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर असं लक्षात येईल की नियोजनाचा अभाव असलेलं सरकार आपण खांद्यावर वाहतोय. अडीच लोकांचं सरकार भारतीय जनता सोसत आहे. साडेतीन वर्षात सरकारची उल्लेखनीय कामगिरी दिसून येत नाही.
समाजकारण थोड्या काळासाठी बाजुला ठेवूया. अर्थकारण, वित्तीय तूट, परकीय गुंतवणूक, परराष्ट्र संबध, दहशतवाद, भ्रष्ट्राचार, बाबूराज यात भाजप सरकार कमकवत ठरलंय. त्यामुळे धर्म व राष्ट्रवादाची चर्चा जोर धरु लागली आहे. भाजपने सत्ताकाळात धर्मालये स्वायत्त करुन त्यांना आर्थिक निधी देऊ केला आहे.
भाजपकृपेनं देशातील अनेक धर्मालयाच्या संपत्तीनं दुपटी व तिपटीनं वाढ झाली आहे. एका अर्थाने 2019च्या निवडणुकीसाठी खर्चासाठी भाजपनं बचत बँक तयार केली आहे.
भारताच्या सरकारी तिजोरीत खणखणाट आहे तर दुसरीकडे देवालयात भरभराट सुरु आहे. त्यामुळे नोटबंदी असो वा जीएसटी ही नेमकी कुण्याच्या फायद्यासाठी लागू करण्यात आली होती याची आपणच तटस्थ नागरिक म्हणून विचार करावा.
कलीम अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com