नोटबदली आणि रांगेतला देशभक्त



ल्या पहाटे घरातून निघताना बेगमनं डोस दिला, आज तुम्हाला देशभक्ती सिद्ध करायची आहे?”

उत्तरादाखल मी म्हणालो! म्हणजे?”

टिफीनचा पट्टा गळ्यात अडकवत बेगम म्हणाली, “मियाँजी आज एटीएमच्या रांगेत उभं राहायचंय..”

हे वाक्य ऐकताच माझं अवसान गळालं! तरीही धीर एकवटून तिला देखेंगेम्हणालो.. वारंवार देशभक्ती सिद्ध करायची संधी दिल्याबद्दल मी सरकार आणि बेगमचेही सॉक्स घालत आभार मानले.

निघताना पुन्हा एकदा टिफीनचा पट्टा खेचत बेगम म्हणाली, याद रखना मैं फिर फोन लगाऊंगी.” आज पुन्हा देशभक्ती सिद्ध करण्याची संधी मिळाल्यानं मी डुलतंच निघालो..

शिफ्ट संपता-संपता बेगम दोनदा फोनवरुन वंदे मातरम् म्हणून गेली.. रांगेत लागण्याशिवाय आज पर्याय नव्हता बेगमनं खासगीत धमकीच दिली होती.. नसता, पॉर्न व्हायरस एफबीवर पोस्ट करेन..!हे जुमला ऐकताच मी गर्भगळीत झालो.

पॉर्न से डर नही लगता बेगम, पर उसके व्हायरस से लगता हैं।हा डॉयलॉग मनोमन आठवला. ऑफीस सुटताच चहा कॉर्नरला कल्टी मारुन थेट चिंचपोकळी गाठलं. आठ-एक मिनिटात धक्के खात दादरला उतरलो.

वाचा : संसदेत नोटकोंडी आणि सामान्यांचा मनीकल्लोळ

वाचा : नोटबदलीचा वर्षश्राद्ध

ब्रीजवरुन एटीएम समोर आलो. रांगा अजूनही टवटवीत वाटत होत्या. नोटबदलीच्या चाळिशीनंतरही स्टैट बँकेच्या एटीएमसमोर देशभक्तांची भली मोठी रांग होती. चाळीशीतही रांगेला ताजातवाना बघून सच्चा देशभक्त असल्याचा फिल आला.

चारपैकी दोनच मशीनी सुरू होत्या. दोन्हीकडे रांगा मोठ्याच होत्या. एकात शंभर तर दुसरीकडे दोन हजारच्या नोटा होत्या. मी जास्त विचार न करता रांग व लोकल इंडिकेटरचं मोजमाप करुन एका रांगेला चिटकलो. तेवढ्यात एक जण मध्येच येऊन पोटाचा घेर आत घेत माझ्या पुढे अॅडजस्ट झाला.

भाई, आगेवाले को बताकर गयेला था।मी बळंच दातं विचकले. नोटबंदीच्या पन्नाशीत पदार्पण करणारे देशभक्त मेनॉपॉज आल्यासारखे एटीएमची बटनं दाबणाऱ्यावर खेकसत होते.

अबे कितनी देर लगायेगा बाहर आ जा!पलीकडे कोटेक्ससमोर काही अॅण्टीनॅशनल उभे होते. दोन हजार घेणाऱ्यांची रांग कमी असल्यानं, मीदेखील सोयीचा देशभक्त बनून कोटेक्सकडे कलंडलो. तर एसबीआयकडे कोटेक्सचे काहीजण शिफ्ट झाले.

गर्दी पुन्हा जैसे थे झाली. स्टैट बँकेसमोर शंभरच्या नोटा घेणारे देशभक्त उभ्यानंच ५:३५, ६:३६ कसारा, डोंबिवली, कल्याण फास्टची गणितं जुळवत होती. अधून-मधून मधेच शिरणाऱ्यांचा उद्धार करत होती. मी फुकटचं वॉय-फाय ऑन करुन अॅप्स अपडेट करत होतो.

नोटा मिळणार यापेक्षा फुकटचं वॉय-फाय वापरायला मिळतंय याचं सुख जास्त होतं. अखेर मीदेखील भारतीय होतोच ना! गर्दी वाढली होती, फायदा उचलत पाऊडी सेल्फी इंस्टाला चेपला.

अपडेटनंतर अपकमींगची ट्रेलर बघतली.. १२-१३ ऑफलाईन व्हिडिओ डॉऊनलोड केले. तीसएक ग्रुप्सला ठेवणीतले नवे व्हिडिओ चेपले. लगे हाथ ट्रिपल एक्सचे चारएक क्लीप वीडमैट केलं. एव्हाना तिसऱ्या नंबरपर्यंत येऊन ठेपलो होतो.

वाचा : पनगढिया : अ'नीती' राजकारणाचे बळी !

वाचा : नोटबदलीचा महाघोटाळा

तिकडे स्टैट बँकेच्या देशभक्तांची रांग वाढली होती. तर तिकडे लोकलची इंडिकेटर सतत बदलत होती. मी एक लोकल सिलेक्ट केली. दुसरा नंबर आल्यानं मी थोडसं आवरलं.. सेल स्टैडबाय करुन खिशात कोंबला, एटीएम रॅपर काढून हातात घेतलं.

चार-पाच मिनिटं झाली तरी तीबटनं दाबतच होती. लेडी असल्यानं भडकायचा आणि खेकसायचा लाग नव्हता!! मी निमूट उभाच.. डोक्यात नसते विचार घोंघावत होते. राहून-राहून बेगमची ओठ खाणारी दातं आठवत होती. निमुटपणे पोरीची हतबलता बघत होतो. तिच्यासोबत माझीही घालमेल होत होती. दीड-एक तास रांगेत उभं राहून शेर के मुँह सेनोटा जाणार असं दिसत होतं.. एटीएम अडकल्यानं तीदेखील हतबल झाली होती.

हा गोंधळ पाहता मागच्या सर्वांची चलबीचल वाढली. ऐवढ्यात काहीजण शंभरच्या रांगेत मुव्ह झाले.. तर काहीजण पटकन पुढे सरकले. मी सच्चा देशभक्त असल्यानं उभाच होतो. बेगम आणि एटीएम समोरची पोरगी एवढंच मला दिसत होतं. यानंतर माझी फेसबुकची वॉल आणि बेगमची धमकी..

नोटा संपल्या नव्हत्या, फक्त एटीएम अडकलं होतं.. त्यामुळे थोडी निश्चितता होती. इतक्यात टाय घातलेला एक माणूस आला, हाव-भावावरून तो बँकेवाला वाटत होता. त्यानं काहीतरी केलं.. बुडकन एटीएम बाहेर आलं. पोरीचा जिवात-जीव आला. तसा टायवाला म्हणाला , ये एटीएम अब नही चलेगा, डैमेज हुआ हैं।

हे ऐकताच पोरगी रडकुंडीला आली.. ऐसा कैसा नही चलेगा! ठिक तो है।’ ‘मैडम छोडीए भी न, पढी लिखी लगती हो, पिछे लोग वैट कर रहे है।पोरगी बुटबुट करत निघून गेली. तिची अवस्था माझ्याव्यतिरिक्त कोण चांगली समजू शकलं असतं. पण तिला सहानुभूतीपेक्षा मी जास्त काही देऊ शकत नव्हतो.

मी संधीसाधूपणा करत पुढे सरसावलो. ५० सेंकदात गुलाबी रंग पुढ्यात होता. फस्ट लव्ह लेटर मिळाल्यासारखा आनंद गुलाबी नोटा बघून झाला. इकडे-तिकडे न बघता थेट इंडिकेटरकडे बघितलं. ६:४५ची कल्याण फास्ट येणारच होती. वाऱ्यासारखा घसरतच खाली आलो.

जग जिंकल्यासारखं वाटत होतं. २ हजाराच्या दोन नोटा खिशात होत्या. वरून तेराएक ऑफलाईन व्हिडिओ. आज बेगममुळे लॉटरी लागली होती. एकदाची कल्याण आली. शिरताच सोय करुन हेडफोन कानात टाकला.. दंगलचा धाकड है धाकड हैं.. कानात वाजत होतं.

रांगेत उभा राहून पुन्हा एकदा देशभक्ती सिद्ध केली होती. याचा अभिमान बाळगला. छाती पुन्हा एकदा फुगली ५६ झाली. खिशातली गुलाबी नोट सोडली तर मला काहीच आठवत नव्हतं..

कोट्यवधींच्या नव्या आणि जुन्या नोटा छापेमारीत सापडताहेत. हे मी पूर्णपणे विसरलो होतो. कोट्यवधींचा नोटबदली घोटाळा विसरलो.. नोटबंदीवर टाहो करणारी ठप्प संसद आठवायची नाही हे आधीच ठरवलं होतं.

मंत्री आणि आमदार-खासदारांच्या घरातली नोटबंदीनंतरची कोट्यवधींची लग्ने आठवली नाही. २५ कोटींच्या नव्या नोटा बदलणारा कोलकाताचा उद्योजक पारसमल विसरलो. तामिळनाडूचा चीफ सेक्रेटरीकडून आयटीनं जप्त केलेल्या ३१ लाखांच्या नव्या करकरीत नोटांच्या आठवणी स्मृतीभंषात गेल्या.

सुभाष देशमुखांचे ९३ लाखाची बातमी मीडियाने गायब केली. अक्सिस बँकेचे छापे विसरलो. नोटा बदलणारे बँकेचे अधिकारी विसरलो. ४५ दिवसातले रोकडसंदर्भातले ६० नियम विसरलो. रिझर्व्ह बँकेची रिव्हर्स पॉलिसी विसरलो.

रांगेत प्रेगनंट झालेली ताई विसरलो. रांगेत हार्टअटॅकने मृत पावलेले १०० जण विसरलो. नोटबदलीनंतर काही मित्रांचे जॉब गेले हेदेखील विसरलो. पाचशे रुपयांसाठी रांगेत रडणारा स्वातंत्र्यसैनिक विसरलो. लग्न मोडलेल्या बहिणी विसरलो. भाव कोसळल्याने कोलमडलेला बळीराजा विसरलो.

नोटांच्या पुंगळ्या करुन बचत करणारी आई, तिचे पैसे रद्दी होताना, होणारा तिचा कासावीस चेहरा विसरलो.. वरच्या खिशात ठेवलेली नोट पटकन काढून बॅगमध्ये खोचली.

मला आता काहीच आठवायचं नव्हतं.. इतकच काय तर इथून पुढे यासंबधीचं काही च आठवायचं नाही असं मनोमन पक्क केलं. नोटांचे सुट्टे कसं करायचं हा प्रश्न होताच.. क्षणात दिमाग की बत्ती पेटवली. कुर्ला आला होता. मागच्यांच्या धक्क्यानं थेट फुट ब्रीजपर्यंत ढकलला गेलो.

एक नंबरवरुन हार्बरकडे निघालो. ब्रीज वर पथारीवाले होतेच. घाईत उलट-पालट करत बेल्ट उचलला. बेल्ट बॅगेत कोंबत हॉकरकडे गुलाबी रंग पुढे केला. क्या सर, छुट्टा कहा से लाऊ!

मी कट लपवून म्हणालो, भय्या देखो न होंगा छुट्टा..! तो बिचारा मरता क्या नही करता.. मावळतीला गिऱ्हाईक सोडायचं नव्हतं.. अखेर ना नुकर करत तोच शेजाऱ्याकडे गेला.

काही वेळात १ हजार नऊशेच्या तब्बल १९ शंभरच्या नोटा हातात आल्या. मी कुटनिती जिंकल्याचा अविर्भाव आणत सात नंबरवर उतरलो.

पनवेल आलीच होती. दामटा-दामटी करत आत घुसलो. पाच मिनिटात घरी पोहोचणार होतो. आज बेगम तर जिंकलीच होती पण मीदेखील सरकारी देशभक्त झालो होतो. त्यामुळे भक्ट्रोल मंडळीविषयी नकारात्मक भाव काही वेळापुरता का होईना मावळला होता.

तेवढ्यात सेल बाहेर काढून लाईक मोजली.. दीड तासात ५० लाईक कमावल्या होत्या. तर सातएक कुडोसच्या कमेंटी वाचून बरच पॉझिटीव्ह वाटलं...

कलीम अजीम, मुंबई

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,25,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,302,व्यक्ती,23,संकलन,65,समाज,265,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,54,
ltr
item
नजरिया: नोटबदली आणि रांगेतला देशभक्त
नोटबदली आणि रांगेतला देशभक्त
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfbBJJS1znEIEUHrOI28P1T_SFXhmIzVEwhBT73b_DlccSodhKAtT6JtzHj2sYuQw7qYtZ8AXQmDXFowu4ZdkHbFDYOxg5jbyZiWJjDvTGne4_B_PBpGc1QJmFtFV7qN1ukBsO9VLayvvU/s640/notbandi-1024x683+%25281%2529.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfbBJJS1znEIEUHrOI28P1T_SFXhmIzVEwhBT73b_DlccSodhKAtT6JtzHj2sYuQw7qYtZ8AXQmDXFowu4ZdkHbFDYOxg5jbyZiWJjDvTGne4_B_PBpGc1QJmFtFV7qN1ukBsO9VLayvvU/s72-c/notbandi-1024x683+%25281%2529.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2016/12/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2016/12/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content