पनगढिया : अ'नीती' राजकारणाचे बळी !



आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि आता नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांच्या राजीनाम्याने गुणवत्तेला भारतात टिकाव नसतो हे सिद्ध केलंय. मुळात भाजपला विद्वान आणि अभ्यासू लोकं पचनी पडत नाही, हे या दोन राजीनाम्यावरुन कळतं. ज्यांनी स्वकष्टाने आपला नावलौकीक जगभरात मिळवला. अशा व्यक्तींना आपल्या मूळ देशात सन्मान मिळत असेल तर ते येणारत, पण इथं येऊन दुय्यम वागणूक मिळत असेल तर याला काय म्हणावे. प्रधानसेवक भारताबाहेर जाऊन गुणवत्ता धारक भारतीयांना देशात परत येण्याचं आव्हान करतात, आणि इथं येणाऱ्यांना मातीमोल समजता, याला काय म्हणायचे. 
रबीआयचे गव्हर्नर असलेले रघुराम राजन यांनी काही महिन्यापूर्वी कायमचं भारत सोडलं. सध्या शिकागो विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून सन्मानाने विद्यार्थी घडवत आहेत. त्यापाठोपाठ आता 'नीती आयोगा'चे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया हेदेखील पदत्याग करुन कोलंबिया विद्यापीठात पुन्हा शिकवायला परत जात आहेत.
भाजप सरकारला विद्वान लोकं पचत नाहीत असा ढोबळ अर्थ काहीजण काढून मोकळे झाले. पण ही घटना जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करणारी आहे हे विसरुन चालणार नाही. वर्षभरात दोन विद्वान अर्थतज्ज्ञ भारतातून गेल्याने फारसा काही फरक पडेल अशी शक्यता नाही. याचं कारण असं की भारतात ‘जोहरी’ची कदर केली जात नाही, हे सर्व जगाला माहित आहे.
त्यामुळे भारताचं भविष्य नीती आयोगातून ‘तराशने’ आलेल्या अजून एका जोहरीने चक्क पदत्याग केला. भारतातील राजकीय पुढाऱ्यांकडून विदवत्ता आणि गुणवत्ता जोपासण्याची फारसी अपेक्षा न केलेली बरी. अन्यथा अपेक्षाभंग होऊन हे स्वत:चे केसं उपटण्यापेक्षा विरोधी विचारांच्या इतरांचे कपडे़ फाडून त्याची लक्तरे करतील. अशा वृत्तीमुळे जगाने भारतीय गुणवत्तेचे वेळोवेळी धिंडवडे काढल्याचे अनेक उदाहरणे आता दंतकथा झाल्या आहेत.

देशात 2014 साली भाजपनं सत्ता बदल घडवून आणले. खूर्ची ताब्यात घेताच भाजपने सत्तेला हपापल्यासारखे करत बदलांचे सपाटे सुरु केले. अनेक ठिकाणी प्रशासकीय पातळीवर प्रमुख बदल केले, समविचारांची लोकं ठिकठिकाणी भरले. सत्तांतरानंतर सर्वच पक्ष अशा कृती करतात. पण अपवादानेच कुणी महत्वाच्या पदावर किरकोळ व्यक्तींची भरती केली असेल. परंतु या सरकारने सपाटाच लावला होता, यामुळे भाजपला वादही ओढवून घ्यावा लागला.
भाजपनं यूपीए सरकारच्या अनेक योजनांचं नामकरण करुन नव्याने सादर केल्या. नोटबदलीनंतर दुसरा एक महत्वाचा निर्णय ऐतिहासिक म्हणून नोंद करायला हरकत नाही. हा बदल म्हणजे 65 वर्षापूर्वीचा नियोजन आयोग संपुष्टात आणून त्याजागी ‘नीती आयोग’ स्थापन केला. नीती आयोगाचं पूर्ण नाव ‘नॅशनल इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ असं आहे.
ही संस्था स्वायत्त असून महत्वाची ‘थिंक टँक’ मानली जाते. यात 8 जण म्हणजे एक अध्यक्ष आणि सात सदस्य असतात. पीएम याचे पदसिद्ध अघ्यक्ष असतात, तर उपाध्यक्षांना कैबिनेटचा दर्जा प्राप्त असतो. एका अर्थाने ‘प्लानिंग कमिशन’चंही भाजप सरकारने नाव बदललं. ‘नीती आयोग’ असं नामकरण करुन काही प्रमाणात रचना बदलून जुजबी बदल केले. कोलंबिया विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. अरविंद पानगढिया यांची नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अरविंद पानगढिया यांच्या निवडीचा निकष गुणवत्ता असली तरी अजून एक निकषाची इथं चर्चा हवीय. तो म्हणजे मा. प्रधानसेवकांचं कौतुक सोहळा.. 28 ऑक्टोबर 2013 साली अरविंद पानगढिया यांनी ‘बिझनेस स्टँडर्ड’ या अर्थविषयक दैनिकात मोदींच्या कथित ‘गुजरात मॉडेल’विषयी स्तृतीपर लेख लिहला होता.
अर्थातच पीएम पदाचे उमेदवार घोषित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर उमेदवाराची चर्चा म्हणून हा लेख लिहून घेतल्याचं मोदींचे टीकाकार म्हणतात. या कौतुकामुळे पानगढिया यांना नीती आयोगासारखं महत्वाचं पद मिळालं गुणी माणूस भारतात परतल्याने देशाची छाती अभिमानाने फुगली होती.
मात्र, अडीच वर्षानंतर जागतिक किर्तीचा हा माणूस महत्वाचं असं पद सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. विषेश म्हणजे सरकारकडून कोणीही पानगढिया यांना रोखायचे प्रयत्न करताना दिसत नाही. या अडीच वर्षात नामांतर झालेल्या या आयोगातून सरकारने किती दिवे लावले हा शोधाचा विषय आहे, विषयानंतर होईल म्हणून ही चर्चा तुर्तास थांबवू या..
रघुराम राजन यांनी 2013च्या सप्टेबर मध्ये भारतीय रिझर्व बँकेचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. या नियुक्तीचं भाजपनं स्वागत केलं होतं. सत्तेत येताच राजन भाजपला खटकायला लागले. अखेर भाजपने राजन यांना गव्हर्नर पदाची दुसरी टर्म नाकारत उर्जीत पटेल यांची नियुक्ती आरबीआय गव्हर्नरपदी केली. पटेल यांच्यासंदर्भात कुठलिही अधिकृत माहिती विकीपीडियावर नाही.
पण ते एका खाजगी कंपनीने आर्थिक सल्लागार असल्याचं सांगण्यात आलं होतं. असो. मुळात भाजपला विद्वान आणि अभ्यासू लोकं पचनी पडत नाही, हे या दोन राजीनाम्यावरुन कळतं. ज्यांनी स्वकष्टाने आपला नावलौकीक जगभरात मिळवला.
अशा व्यक्तींना आपल्या मूळ देशात सन्मान मिळत असेल तर ते येतील, पण इथं येऊन दुय्यम वागणूक मिळत असेल तर याला काय म्हणावे. प्रधानसेवक भारताबाहेर जाऊन गुणवत्ताधारक भारतीयांना देशात परत येण्याचं आव्हान करतात, आणि इथं येणाऱ्यांना मातीमोल समजता, याला काय म्हणायचे.
अरविंद पानगढिया हे कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्रोफेसर होते. पद्मभूषण सन्मान प्राप्त पानगढ़िया काही काळ राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सल्लागार समितीचे ते प्रमुख होते. अमेरिकेच्या कोलंबिया यूनिवर्सिटीत इंडियन इकोनॉमिक्सचे प्रोफेसर असलेले पानगढ़िया वर्ल्ड बँक, आईएमएफ, डब्ल्यूटीओ, अंकटाड आणि एडीबी मध्ये मोठ्या हुद्यावर होते.
याव्यतिरिक्त ते मेरीलँड यूनिवर्सिटीच्या कॉलेज पार्क मध्ये इकोनॉमिक्सचे प्रोफेसर म्हणून सेवा दिली आहे. भारतीय-अमेरिकी अर्थशास्‍त्रज्ज्ञ अरविंद पानगढिया यांनी प्रतिष्ठित प्रिंसटन यूनिवर्सिटीमधून पीएचडी केली आहे. त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल आणि भारतातील इकोनॉमिक टाइम्स, फाइनेंशियल टाइम्स, दी हिंदू, इंडिया टुडे आणि आउटलुकमध्ये अनेक अर्थविषयक सदरे लिहली आहेत. अर्थशास्त्रावर त्यांची 15 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचं ‘इंडिया: इमरजिंग गैण्ट’ हे पुस्तक खूप गाजलं.
डॉ. अरविंद पानगढिया यांची 5 जानेवारी 2015 साली त्यांची नीती आयोगावर नियुक्ती झाली. कामात अतिशय शिस्तशीर अशी त्यांची ओळख होती. एप्रिलमध्ये नीती आयोगाच्या एका सदस्याने शेतकऱ्यांवर कर लादावा अशी सूचना केली होती, यावेळी पानगढिया यांनी त्या सदस्याची चांगलीच कानउघाडणी केली होती.
नोटबदली जनतेने पूर्णपणे स्वीकारेपर्यंत कोणतीही नवी बंधने व निर्णये त़्यांच्यावर लादू नका असंही ते म्हणाले होते. मात्र भाजप व प्रधानसेवकांनी त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं. जीएसटीसारखी नवी करप्रणाली सरकारने जनतेवर लादली. याचे परिणाम येण्यास जरा वेळ लागेल, त्यामुळे तुर्तास व्यापारी वगळता झळ बाहेर येत नाही.
जून महिन्यात त्यांनी एअर इंडिया खाजगीकरणाला त्यांनी विरोध केला होता. एअर इंडियावर असलेलं 52 हजार कोटीचं कर्ज फेडून विलयाबाबत विचार करावा अशी सूचना त्यांनी दिल्या होत्या. कदाचित यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे.
भाजप सरकारची पितृसंघटना असलेल्या एका ‘शाखा संघटने’नं पानगढिया यांच्याविरोधात मे महिन्यात प्रधानसेवकांकडे तक्रार केली. ‘स्वदेशी जागरण मंचा’ने पानगढिया यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘पानगढिया आखून दिलेल्या नियमाविरोधात काम करत आहेत, जीएम पीक पद्धती ते लागू करु पाहत आहेत, औषध दर नियंत्रणाच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ घालत आहेत, असे करण्यात पानगढिया यांचे काही हितसंबंध आहेत’ असा आरोप या मंचने केला.
पानगढिया यांच्या विरोधासाठी कॉन्फ्रेंस घेतली होती. आरोपाचं कळताच पानगढिया यांनी नाराज होऊन राजीनामा देण्याचं बोलून दाखवलं होतं, असं वृत्त एनडीटीव्हीने दिलंय. अशावेळी प्रधानसेवकांनी पानगढिया यांच्या बाजूने उभं राहा़यला हवं होतं, पण तसं झालं नाही. प्रधानसेवकांनी नियोजितपणे मौन स्वीकारलं. बरोबर वर्षभरापूर्वी आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याविरोधात याच मंचने गंभीर आरोप केले होते.
आरोपात न जाता आपण या हेतूवर बोलूया, मंचसोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही राजन यांना काँग्रेसचे हस्तक म्हणून टीका केली होती. याचसाठी भाजपने राज्यसभेची उमेदवारी देवून स्वामींना राजन यांच्या मागावर ठेवलं होतं. स्वामीनंतर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजन यांचा विरोध केला होता.
दुसरीकडे माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी यांनी पानगढिया यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलंय. 'नोटबदलीचा मोठा घोटाळा उघड होण्यापूर्वी राजीनामा दिला हे बरं झालं' असं चिदंबरम म्हणाले. असं असलं तरी नीती आयोगाचं कैबिनेट दर्जाच्या पदावरुन निवृत्ती घेत सहज सन्मानाने जीवन जगता आलं असतं, पण पानगढिया परत कोलंबिया विद्यापीठात जावं लागेल असं कारण देतात, याचा अर्थ संशयाला जागा आहे. शहाण्या माणसासारखं ते आत्ता काही बोलणार नाही मात्र, निवृत्ती नंतर लिहलेल्या पुस्तकातून यांची कारणे ते देतील.
भारतात जागतिक किर्तीचे नामांकित तयार होत नाहीत. परदेशातून शिकून कौशल्य आणि गुणवत्ता काहीजण मिळवतात. ते परदेशात डॉलरमध्ये कमाई करतात, इथं भारतात येऊन आर्थिक तडजोड स्वीकारुनही पदानुरुप आदर सन्मान मिळेलच असं नाही.
परदेशांत जाऊन आलेले येथे टिकत नाहीत, त्यामुळे कौशल्य आणि उच्चतर गुणवत्ता परदेशात स्थायिक होतात. भारतीय पैशातून परदेशातलं उच्च घेवून ते भारतात काम करण्याऐवजी परदेशातच काम स्वीकारतात. मग अशा शिक्षणाचा भारताला काय फायदा.
अशाच अवस्तेतून गेल्यने पानगढिया यांनी अखेर पदत्याग करुन राजीनामा दिला. पानगढिया यांचा राजीनामा देण्याचा निर्णय शहाणपणाचा आहे. पण या राजीनाम्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

कलीम अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: पनगढिया : अ'नीती' राजकारणाचे बळी !
पनगढिया : अ'नीती' राजकारणाचे बळी !
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6Ux5V-5-cOjJQKtkDk12IKQC0WmCJSlK-pBkA0jq00E3Mq9YFfHV6TnKWyqx_RomFO5qSWKnuthO5ZUiF-PQNAYHXyWx5hyphenhyphenaDJV9oYMqcbxvob1WOZRUwXXcawsGI0EuWWbriAHmuUiV8/w640-h360/thequint_2017-08_70d84306-317d-41c1-9dba-329d39f0dc8b_04-March-2017+%25281%2529.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6Ux5V-5-cOjJQKtkDk12IKQC0WmCJSlK-pBkA0jq00E3Mq9YFfHV6TnKWyqx_RomFO5qSWKnuthO5ZUiF-PQNAYHXyWx5hyphenhyphenaDJV9oYMqcbxvob1WOZRUwXXcawsGI0EuWWbriAHmuUiV8/s72-w640-c-h360/thequint_2017-08_70d84306-317d-41c1-9dba-329d39f0dc8b_04-March-2017+%25281%2529.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2017/09/blog-post_3.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2017/09/blog-post_3.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content