मानवी ढालीचे ‘ट्रोल’ देशभक्त

काश्मीरी तरुणाचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचं केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी समर्थन केलंय. याविरोधात सध्या देशभरात परस्परविरोधी मते व्यक्त होताना दिसत आहेत. विरोधकांनी हा निर्णय अनैतिक आणि अयोग्य असल्याचं म्हंटलंय. लष्कराच्या या कृतीचे कदापी समर्थन करता येणार नसल्याचंही विरोधकांकडून सांगण्यात आलंय. तर काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही याच मुद्द्यावर केंद्राला धारेवर धरलंय. 
'एकिकडे मानवी ढाल करणार्‍या अधिकार्‍याला सन्मानित केलं जातंय तर दुसरीकडे याच संदर्भात लष्कराकडून तपास केला जातोय. हे केवळ एक ढोंग आहे' अशी टीका उमर अब्दुल्ला यांनी केलीय. फारुख अहमद डार याचा मानवी ढालीसारखा वापर करायला तो दहशतवादी होता का़? असा सूर एकंदरीत देशभरात पहायला मिळतोय. तर याउलट अभिनेते परेश रावल याचं याच अनुशंगानं केलेलं लेखिका अरुधंती रॉयविरोधात वादगस्त वक्तव्य बौद्धीक द्रारिद्याचं प्रदर्शन घडवणारं होतं..
परेश रावल यांनी वादग्रस्त ट्वीट हटवलं तसं सोशल कट्टयावरचं परेश यांच्याविरोधात सुरु असलेलं ट्रोेेल थोडसं शांत झालं.. मुळात आपली छी-थू होत आहे, हे लक्षात येताच त्यांनी सपेशल माघार घेतली.. मात्र हे परेश रावल मान्य करायला तयार नाहीयेत.. ज्या बातमीचा आधार घेऊन त्यांनी लेखिका आणि विचारवंत अरुंधती रॉयबद्दल मतप्रदर्शन केलं होतं, अशी कुठलीच चर्चा अरुधंती रॉय यांनी केली नव्हती हे स्पष्ट झालं.. खोट्या माहितीच्या आधारे परेश रावल यांनी रॉय यांच्याावर टीका केली होती. यावरुन अनेक वेबसाईटनं परेश रावल यांना धारेवर धरलं.. त्यानंतर त्यांनी वादग्रस्त ट्वीट डिलीट केलं.. ट्वीटरनं मला धमकी दिल्यानं मी माझं  स्टेटस हटवलं असं ते न विसरता बोलले... तुर्तास या वादावर पडदा पडला असला तरी परेश रावल यांच्या विधाानाला इतकं सहसा घेता येत नाही..
लेखिका अरुधंती रॉय यांना जगातल्या काही निवडक इंटेलेक्चुअलमध्ये स्थान आहे.. अरुंधती रॉय यांनी नव्वदच्या दशकात द गॉड ऑफ स्मॉल थिंग्सपुस्तक लिहलं.. आज या पुस्तकाला जगभरात सर्वोेच्च स्थान प्राप्त आहे. (या पुस्तकाला 1997 मध्ये प्रतिष्ठित बुकर सम्मान मिळालाय.) अरुंधती रॉय यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या पोखरण चाचणीवर प्रखर टीका केली होती.. 2002 पासून त्या नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रीय झाल्या आहेत.. अरुधंती रॉय यांच्याविरोेधात पहिली टीका 2001च्या संसद हल्ल्यासंदर्भात काही प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर झाली.. हल्लाचा आरोपी अफजल गुरु हा निर्दोष असल्याचं त्यांनी 'द हिंदूू'च्या एका लेखात म्हंटलं होतं. यानंतर त्या भाजप आणि त्यांच्या सहकारी संघटनेच्या रडारवर आल्या.. 
काश्मीर प्रश्‍नांवर त्यांंचे स्पवतंत्र विचार आहेत.. हेच विचार टाईम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक दिलीप पाडगांवकरांचे होते.. हे आता हयात नाहीत मात्र, पाडगांवकरांनी वेळोेवेळी काश्मीरच्या स्वायत्तेची भूमिका देश आणि जागतिक पातळीवर मांडली आहे.. यांच्यासह अनेक भारतातील बुद्धीजीवी वर्ग काश्मीर प्रश्‍नांवर आत्ताच्या सरकारला नको असलेली मते मांडतात, पण नेहमी टीका ही अरुधंती रॉय यांच्यांवरच केली जाते.. याचं एक कारण म्हणजे त्या महिला आहेत.. आणि दुसरं म्हणजे त्या अशा टीकांना जुमानत नाही... त्यामुळे वेळोवेळी काहींच्या नजरेत येतात..
परेश रावल यांचं विधान तर एक निमित्त होतं. याला कारणही तसं मजेदार आहे.. गजेंद्र चौहान नंतर #FTII च्या चेअरमन पदाच्या खुर्चीवर सर्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.. या सीटच्या मुकुटसाठी सरकारकडे भक्ती सिद्ध करण्याची चढाओढ लागली असल्याचं स्पष्ट आहे.. जो सरकारला आपली भक्ती सिद्ध करु शकेल, त्यालाच #FTIIचं हे मुकुट मिळणार हे नक्की आहे, त्यामुळेे परेश रावल, अभिजीत, सोनू निगम, बाबुल सुप्रिया, रुपा गांगुली यांची स्पर्धा लागली आहे..
परेश रावल यांंचं समर्थन करण्यासाठी अभिजीतनं महिलांबद्दल असभ्य आणि अभद्र ट्विप्पणी केली.. एक विद्यार्थी संघटनेची कार्यकर्ती वेश्याव्यवसाय करते, असा घाणेरडा आरोप त्यानं केला. यावरुन तो ट्रोल झाला.. याावर उत्तर देताना शेहला रशीद हिनं भाजपच्या कार्यकर्त्याचे पाकच्या आयआसआयशी लागेबांधे, चाईल्ड ट्रॅफिकिंग, दहशतवाद्यांना आर्थिक फंडींग, राजस्थान आणि गुजरातममधील सेक्स स्कँडलमध्ये सामावेश अशी उदाहरणे आपल्या प्रेस रिलीजमधून शेहला यांनी देऊन अभिजीत आणि भाजप सरकारच्या भक्त मंडळींचे तोंडे बंद केली.. या प्रेस' रिलीज मधून शेहला यांनी आभिजीतची विकृती चव्हाट्यावर आणली.. यानंतर लागलीच ट्वीटरनं अभिजीतचं खातं सस्पेंड करुन धडा शिकवला.. यानंतर दुसरा एक बेरोजगार सिंगर सोनू निगमनंही या वादात उडी घेतली.. अभिजीतच्या समर्थनार्थ सोनू निगमनं ट्वीटर सोडलं.. अभिजीत आणि सोनू निगमव्यतिरिक्त परेश रावल यांचं समर्थन करणासाठी बॉलीवूडमधून कोणीही आलं नाही... 
वाचा : मोहसिनच्या न्यायात अटकाव कुणाचा? 
हे सर्व सुरु असताना ज्या काश्मीरी युवकाला लष्करानं जीपवर मानवी ढाल म्हणून बांधून फिरवलं त्या लष्करी अधिकाराच्या सन्मान करण्यात आला.. मेजर नितीन गोगाई यांच्या या कृत्याचा केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही समर्थन केलं.. या घटनेनंतर इंडियन एक्सप्रेसया वृत्तपत्रानं फारुख अमहद डार याच्या भावाची प्रतिक्रीया छापली.. ज्यात तो म्हणतोय. 'मेजर गोगाई यांना सन्मानित करणं म्हणजे निदर्यी आहे.. यावरुन राजकराणातला नवशिकाही सांगू शकेल की या सत्काराचा काश्मीरच्या जनतेत काय संदेश जाईल' तर दुसरीकडे देशातील सामान्य जनतादेखील लष्कराच्या या कृत्याचा निषेध करत आहे.. 
जेटलींचं हे वाक्य या वादाला फोडणी देणारं होतं.. मात्र, जवान तेजबहादूरला बडतर्फ केलं त्याविरोधात कोणताही केंद्रीय मंत्री बोलला नाही.. तेजबहादूर एक चांगला नागरिक झाले म्हणून त्यांना बडतर्फीची शिक्षा मिळाली.. तर दुसरीकडे मानवी ढाल कराणार्‍या अधिकार्‍याचा सत्कार.. या सर्व प्रकरणावरुन काय चाललंय या देशात अशी प्रतिक्रीया सामान्य माणूस देत आहे. सहारणपूरमध्ये दलितांचं शिरकाण, झारखंडमध्ये झुंडीकडून 7 जणांची हत्या.. या विषयावर केंद्रातले कोणतेच मंत्री बोलत नाही.. याउलट हजारो मैल लांब ब्रिटनमध्ये हल्ला झाली की देशाचे प्रधानसेवक तात्काळ दुख व्यक्त करतात.. पण काही किलोमिटर दूरच्या झारखंड आणि सहारणपूरच्या घटनेवर प्रधानसेवकाकडून डोळेझाक केली जातेय.
सहारणपूर आणि झारखंडसारख्या घटना घडत असताना केंद्र पातऴीवरुन कोणतीच प्रतिक्रीया येत नाही.. तसंच सत्तेत सामील असलेला एकही दलित नेता या अत्याचारावर बोलत नाही, हे भारतात राहणार्‍या अल्पसंख्य समुदायाचं दुर्दैव म्हणावं लागेल.. या घटनेला #बीबीसी या आंतरराष्ट्रीय माध्यम समुहानं दुर्देवी म्हंटलंय. तसंच युपीत योगी सरकार आल्यापासून दलित अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचंही बीबीसीनं म्हंटलंय. या घटनेविरोधात रविवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर #भीम_आर्मीचा भव्य मोर्चा निघाला.. दलितांच्या या आवाजाला भारतीय मीडियानं प्रसिद्धी दिली नाही. मात्र, विदेशी माध्यमांनी केवळ या मोर्चाचं भव्य कव्हरेज केलं.. यासह भारतीय मीडियावर पक्षपातीपणाचा ठपकाही या इंटरनेशल मीडियानं ठेेवला.. सहारणपूर अजुनही पेटतंय. मात्र, या घटनेचं वृत्ताकंन पाहिजे त्याप्रमाणे मेनस्ट्रीम मीडियातून होताना दिसत नाही.. 

परेश रावल, अभिजीत आणि सोनू निगमचं समर्थन करताना मीडिया प्रत्येक एलिमेंट वापरताना दिसतोय. याउपर परेश रावलची बाष्कळ विधानांना प्रामुख्यानं जागा दिली जातेय. मीडिया सरकारी प्रवक्त्यांच्या भूमिकेत आला असून पीडित समुदायालाच दोषी ठरवण्यात मीडिया आपली सर्व शक्ती पणााला लावताना दिसत आहे.. या सर्व घटना पाहता हेच कळतं की, सरकारची संवेदनशीलताी क्षीण झालीय. प्रशासनाचा गाफीलपणाही या स्थितीला कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे.. मात्र, आत्तातरी दंगलीची स्थिती तात्काळ आटोक्यात आणावी लागेल. यासाठी जातीय तेढ कमी करुन सर्वच पक्षांना एकत्र यावं लागेल.

कलीम अजीम, पुणे
सदर लेख दैनिक 'प्रजापत्र'  च्या रविवार पुरवणीत प्रकाशित झाला आहे
http://dailyprajapatra.com/oldedition/p-5-m.php?i=28MAY2017

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मानवी ढालीचे ‘ट्रोल’ देशभक्त
मानवी ढालीचे ‘ट्रोल’ देशभक्त
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPLOIFaxj5vbYuXJoKF8vYV3jBJ784_yiW59O0Nwy0tUNKs2pFWb5Z38evBVXRT0b6quZM4o2XAg7v3mym3A7qp-4zbGTPjhUDr58ycIxbJFs0EFKUgl-6nabh7OtrUg4dGKnuomMibOxo/s640/kashmir-youth.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPLOIFaxj5vbYuXJoKF8vYV3jBJ784_yiW59O0Nwy0tUNKs2pFWb5Z38evBVXRT0b6quZM4o2XAg7v3mym3A7qp-4zbGTPjhUDr58ycIxbJFs0EFKUgl-6nabh7OtrUg4dGKnuomMibOxo/s72-c/kashmir-youth.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2017/05/blog-post_28.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2017/05/blog-post_28.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content