उद्धव-राज भेटीचं 'पीपली लाईव्ह'

शुक्रवारी २९ जुलै २०१६ला सकाळी साडे अकराच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले तसं न्यूज चॅनेलवर टीकर धावायला लागलं. काही क्षणातच सदरील ताजी बातमी ब्रेकिंग न्यूज आणि अन्य सर्व मराठी न्यूज चॅनेलनं त्याला फॉलो केलं.. 
क्षणार्धात मराठी इलेक्ट्रॉनिक माध्यमात नवचेतना निर्माण झाल्यानं दोन वाक्यावर सुमारे तीसएक मिनिटं विश्लेषण केलं गेलं. राज मातोश्रीवर का गेले, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. 
जयदेव ठाकरेंच्या संपत्ती वादापासून ते मनसेचं सेनेत विलय होईल का? इथपर्यंत अडाखे बांधले गेले. प्रिंटच्या न्यूजरुममध्ये म्यूट असलेल्या टीव्हीत वाल्यूम आला. पुणे-मुंबईचे सिटी एडिटर मनात मथळ्यांची जुळवा-जुळव करू लागले.
एव्हाना टीव्हीच्या ओबी मातोश्रीवर पोहोचल्या होत्या. स्टुडिओत असलेल्या अँकरनं फोनोच्या दरम्यान गुगलच्या सेकंडरी सोर्सकडून माहितीची बरीच जमवा-जमव केली होती. फोनो-लाइव्ह देऊन जनरल बीट बघणाऱ्यांचं उरलं-सुरलं कंटेटही संपलं होतं. 
वाचा : नोटबदली आणि रांगेतला देशभक्त
न्यूजरूममधील तथाकथित एक्सपर्ट स्टुडिओ लाइव्ह देऊन एव्हाना थकले होते. सिनियर पोलिटिकल रिपोटर्सला झोपेतून उठवून त्यांचं विश्लेषण सुरू करण्यात आलं होतं.
राज अमके, उद्धव तमके, मागच्या वर्षी असं झालं. महिनाभरापूर्वी तमकं झालं. तीन वर्षांपूर्वी ह्यो झालं, मागच्या वर्षी उद्धव-राज भेटीत त्यो झालं. महापालिका, इडी, सीबीआय़ पक्षफुटी, आजारपण इत्यादी.. 
फिल्डवर असलेले एक्सपर्ट बूमवाले रिपोर्टर उरलं-सुरलं अवसान जमा करुन तीच-ती माहिती आदळत होते. पुण्यातल्या बालेवाडीतली १० मजूर स्लॅब कोसळून गेल्याची बातमी माध्यमासाठी यावेळी दुय्यम ठरली. मात्र, ज्यात काहीच नव्हतं अशा फॉरवर्ड बातमीनं सेंगमेट संपत होती. याउलट, राज-उद्धव भेटीचं तत्कालीन रहस्य कोणीही खात्रीशीर सांगू शकलं नाही.
मातोश्रीबाहेरचे सुरक्षा रक्षकांचे लूप मारलेले व्हिज्युअल बघून दर्शक पुरते कंटाळले होते. मात्र माध्यमे हे लोकांना बघायला आवडतेया मिथकानुसार बातमीची बडबड सुरू होती. मला पत्रकारितेत ६ वर्ष झाली, पण लोकांना हेकसं आवडतं याचं गणित मला अजुनही उमजलेलं नाहीये. 
कुठतरी चंद्रपूरच्या किंवा गडचिरोलीच्या आदिवासी पाड्यावरच्या शेतमजूराला राज-उद्धव भेटीत स्वारस्य नाहीये, हे ऑफिसचा प्यूनही सांगेल. मेट्रो शहरात दुपारी एकटीनंच स्वंयपाक करणाऱ्या मोलकरणीला या पांडवभेटीचं खरंच काय पडलंय? असो.
तासभर झाला तरी बूमवाले मातोश्री बाहेर उभे होतेच. कुठल्याही रिपोर्टरला काहीच कळत नव्हते; अंदाजे-अडाखे सर्व बांधूनही बोलायला आता काहीच उरलं नव्हतं. तरीही बूम आणि चेहऱ्यांची मलमपट्टी करत तिष्ठत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.. 
इकडं प्रिंटवाले मथळे तयार करुन मनात ले-आऊटही करुन बसले होते. सिटी एडिटर कथित बातमीवर विशेष लक्ष ठेवून होते. सव्वा तास (टी.व्ही माध्यमांच्या बातमीतून उमजलं) उलटला तशी लगबग वाढली.
सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वार उघडताच वाहनांचा ताफा भुर्रकन निघून गेला. सगळं अचानक घडलं. आता पीपली लाईव्हसंपलं होतं, उरलं-सुरलं विश्लेषणाचे शब्द भाषेची वाटलावत फेकले गेले. 
आत्तापर्यंत वेबसाईट आणि व्हॉट्सअप मीडियानं भरीव योगदान देत बराच कंटेट अपलोड केला होता. ओबी कृष्णकुंजकडे पळवत जागा रीती केली गेली. रिपोर्टर-फोनर संपले होते. आता अपरिहार्यपणे इलेक्ट्रॉनिक माध्यमं बालेवाडी दुर्घटनेकडे वळाली.
राज-उद्धव भेटीच्या शोध वार्तांकनाला सुरुवात झाली होती. 
संपत्ती वाद, महापालिका निवडणूक, युती यातलं रहस्य शोधण्यास इनपूट आणि उपसंपादक तयारीला लागले. एव्हाना ग्राफिक्स आणि ले-आऊटची पेजेस तयार झाली होती.. आता या भेटीचं कुठून काही विकतवार्ता येतीय का, याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र, बराच काळ उलटून गेला तरी राज-उद्धवदिव्य भेटीचं कोणताच मागमूस मीडियाला लागलेला नव्हता. 
शेवटी प्रिंटवाल्यांनी डमीची झेरॉक्स पानंफाडून फेकून दिली. सिटी एडिटर आणि रिपोर्टर पुन्हा पोकेमॉनमध्ये व्यस्त झाले.. तर दोन्ही पक्षाचे इमानी कार्यकर्ते छ्या.. काही दम नाहीये बातमीतम्हणत पुन्हा आपल्या उद्योगाला लागले.
एव्हाना या अस्मिताधारी पक्षाच्या सोहळे आणि सभा लाईव्ह कव्हर करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियानं या दिव्य भेटीचंही राष्ट्रीय हैपनिंग लाईव्ह वार्तांकित केलं होतं. सुमारे दीड तासांचा महत्त्वाचा स्लॉट जाऊनही अखेर हाताला काहीच लागलं नाही. 
वाचा : पनगढिया : अ'नीती' राजकारणाचे बळी !
महिनाभरापासून कोपर्डी बलात्काराचा विषय गाजतोय. यात या अस्मिताधारी पक्षाचं एकही निषेधाचं वाक्य पक्षाच्या अधिकृत पत्रकामधून आलं नाही. तसंच एकाही लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात साधी लक्षवेधीदेखील मांडली नाही. 
विरोधक विधिमंडळात कामकाज रोखत होते. सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात येत होतं. मात्र, मीडियाच्या सहकार्य मोठे झालेली ही अस्मिताधारी पक्ष मात्र, चिडीचूप होते.
मुंबईच्या राणी बागेत आलेल्या आंतरराष्ट्रीय पेग्वीन पक्षासाठी युवानेते ट्विट-रिट्विट केलं जात होतं. मात्र, शिट्ट्याभरू आणि गर्दी जमवणारी भाषणं करणारी मंडळी मात्र, राज्यातल्या धडकी भरवणाऱ्या घटनेवर गप्प होती. एकूण घटनेनंतर ३ आठवड्यांनी परप्रांतियांना राज्याबाहेर काढणारे पक्षप्रमुख कोपर्डीला पोहचले. 
एरवी अरबी संस्कृती आणि कायद्यांवर टीका करणाऱ्यांनी लगेच बलात्काऱ्यांना अरब राष्ट्रासारखी शिक्षा द्यावी, अशी मागणी करुन मीडियाची टीआरपी खेचून घेतली. यावेळी पॅपराझी सारखे पळणारी माध्यमे असल्यानंच भिकारछाप वक्तव्याला प्रसिद्धी मिळाली. मात्र, एकाही मीडिया हाऊसनं याबद्दल साधा प्रश्नही या अस्मिताधारी पक्षाला विचारला नाही.. असो.
तर विषय असा की, या अस्मिताधारीक्षेत्रीय पक्षाला माध्यमं इतकी महत्व का देतात हा प्रश्न शेवटी उरतोच. कारण मराठी मीडिया अजुनही भिकारछाप टीआरपीच्या कचाट्यात अडकलीय. त्यामुळेच कदाचित किंवा माध्यमांना अशा बोलक्या बाहुल्यांची गरज असावी. 
माध्यमात काम करणाऱ्या काही सिनियर पत्रकारांच्या मते राज्यात ठोकशाहीची भाषा करणारे हे राजकीय पक्ष आहेत आणि आजच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना अशीच लोक हवी असतात.
याबाबतचं माझं आकलन असं की, राज असो वा उद्धव दोन्हीही राजकीय नेत्यांना मीडिया कसा फुकट वापरायचा हे चांगलं कळतं. सुरुवातीपासून आपल्याला हवी तशी शिस्त यांनी मीडियाला लावली आहे. कुणीही पत्रकार या दोघांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकत नाही. दुसरं म्हणजे राजच्या कथित दहशतीला पत्रकार नांगी टाकतात. 
वाचा : ओवेसींचा भावनिक व भडक राजकारणाचा फॉर्म्युला
वाचा : राम मंदिरासाठी मुस्लीम पाठिंब्याची ‘ब्लॅक प्रॅक्टिस’!
सुप्रीम कोर्ट असल्यासारखे राज पत्रकारांची उलटतपासणी घेतात. स्पष्ट बोलायचं झाल्यास पत्रकारानींच त्यांना आपली खोलून मारण्याची संधी देऊ केली आहे. त्यामुळे आता वाट्याला आलेले भोग भोगदल्याशिवाय पर्याय नाही. आठवा राजदिप सरदेसाई आणि राज इंटरव्यू.
राज ठाकरेंच्या ठोकशाहीला व व मनसेच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीला प्रसारमाध्यमांनी नैतिकता प्रदान करून दिली आहे. दादागिरीला स्टाईल म्हणून गौरवीकरण केलेलं आहे. तर दुसरीकडे रिपाई किंवा एमआयएमनं अशी कृती केली की ती भयंकर गुन्हा असून देशविरोधी कारवाई आहे, अशा पद्धतीने दोषारोप मीडियाकडून सुरू होतात. असो.  
अलीकडे टीव्ही चॅनेल उथळ मजकूर मोठ्या प्रमाणात प्रसारित करत आहेत. क्रिया, प्रतिक्रिया, टीका आणि उत्तरं यामुळे पोलिटिकल गॉसीप्सना सुरुवात होते आणि यातून बातम्या क्रियेट करता येतातया बावळट विधानावर किमान माझा तरी विश्वास नाहीये.. असो..
कोपर्डीच्या टुरीस्ट व्हिजिटनंतर क्षेत्रीय मेनस्ट्रीम माध्यमांनी शेवटी पॅनल बसवून थुकरट चर्चा केलीच. कायदा कसा असावा..वाक्यात तथ्य आहे का? राजकारण होतंय का? असे विषय घेऊन प्राईम टाईम काढला गेलाच.. 
अरबस्तानसारखे कायदे हवेतया चर्चेचं सम-अप करताना एका टीआरपीवाल्या अँकरनं एकाच वाक्यात सौ सुनार की लावलीच..’  त्यांच्यांच वाक्यात ही वाक्य अशा फालतू विधानावर प्राइमटाइमची चर्चा करण्यापूर्वी आम्ही यानंतर एकदा तरी विचार करूयावर पॅनल गेस्टही कुत्सीत हसले होते.. मात्र, दुसऱ्याच दिवशी दिव्य भेटीचं लाईव्ह वार्तांकन करूनही प्राइमटाइमला दिव्य चर्चा झालीच. 
या अँकरनंदेखील परत दोन दिवसांपूर्वीचं वाक्य विसरून या गौण भेटीची चर्चा केली.. असो... याबद्दल मी काही सांगण्याऐवजी या चर्चा वाचकांनी यू ट्यूब’  यासाठी करावं..
उथळ बातम्या पाहण्याची सवय स्वत:हून लावून घेतल्याने तुम्हाला तेच बघायला मिळणार... कारण जे खपतं तेच विकलं जातं हा बाजाराचा नियमच आहे व्बा... 

कलीम अजीम
मुंबई

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,25,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,302,व्यक्ती,23,संकलन,65,समाज,265,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,54,
ltr
item
नजरिया: उद्धव-राज भेटीचं 'पीपली लाईव्ह'
उद्धव-राज भेटीचं 'पीपली लाईव्ह'
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBFcOZN1pNMz0Tnn5H9jXFzRlDikvorbeFCNkw9UwUC_EJz4hf_4a3wpQB_ZTAnyPalJk_sOPD0NooG0fjR_zqxsidl8Ec4caqEDSvTCPW_16bGy1wSKJ67zyvmf2K2ySiJe12Ahq6nRBX/s640/Raj+Thackeray.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBFcOZN1pNMz0Tnn5H9jXFzRlDikvorbeFCNkw9UwUC_EJz4hf_4a3wpQB_ZTAnyPalJk_sOPD0NooG0fjR_zqxsidl8Ec4caqEDSvTCPW_16bGy1wSKJ67zyvmf2K2ySiJe12Ahq6nRBX/s72-c/Raj+Thackeray.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2016/07/blog-post_31.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2016/07/blog-post_31.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content