फेब्रुवारीला देशाचं बजेट सादर झालं.. बजेट सादर करताना अरुण जेटलींनी महात्मा गांधींचा वारंवार उल्लेख केला. यातून योजनेचं महत्व कमी पण गांधीना बदलण्याच्या सरकारच्या खेळीवर स्पष्टीकरण जास्त दिसत होतं. तर आदल्या दिवशी म्हणजे ३० जानेवारी गांधी स्मरणदिनामित्त गांधी हत्येचं उदात्तीकरण सुरु होतं..
टीव्हीच्या प्राईम टाईममध्ये भाजपचे समर्थक गट गांधी हत्येचं वधात रुपातंर करुन शब्दछल करत होते. या दोन्ही घटनांना अलिकडचे गाजलेली दोन संदर्भ होती.. एक तर खादीच्या कैलेंडरमधून गांधींना हटवणं. दुसरं म्हणजे गांधी हत्येचं उदात्तीकरण करणाऱ्या शरद पोंक्षेच्या 'हे राम..' चा वाढता विरोध.. या दोन घटनांच्या निमित्तानं आपण काही गोंष्टींवर भाष्य करणार आहोत.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खादी आयोगाच्या कैलेंडरवरुन महात्मा गांधींच्या चरख्याऐवजी पंतप्रधानांचा चरखा आला. ही घटना कळताच देशभर निषेध नोंदवणं सुरु झालं. हे प्रकरण ताजं असताना या घटनेबद्दल हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी 15 जानेवारीला एक सुमार विधान केलं.. या वादग्रस्त वक्तव्यात 'चलनी नोटांवर असलेला महात्मा गाधींचा फोटो लवकरच हटवला जाईल' असा आशय होता.. यावर अनेक प्रतिक्रीया आल्या..
विषेश म्हणजे भाजपच्या प्रत्येक प्रतिक्रीयेतून विज यांचं विधान वैयक्तिक आहे.. याचा पक्षाशी काही संबध नाही असा ठरलेल्या नियोजित कार्यक्रमानुसार 'कांगावा' करण्यात आला.. याआधीही अनिल विज यांनी गाय राष्ट्रीय पशू घोषित करावा अशी मुक्ताफळे उधळली होती.. ही वादग्रस्त विधानं प्रथमदर्शनी बाळबोध वाटत असली तरी तितकी ती क्षुल्लक नाहीये.
वाचा : नोटबदली आणि रांगेतला देशभक्त
भाजप आणि त्यांच्या पितृसत्ताक संस्थेकडून वारंवार वेगवेगळ्या आशयाची वादग्रस्त विधानं केली जातात. कधी राजकीय तर कधी सामाजिकदृष्ट्या तेढ निर्माण करणारं विधान नेहमीच प्राईम टाईमची जागा बळकावतात. अशी विधानं मीडियाच्या चर्वणासाठी बरचसं खाद्य पुरवतात.. बहुतांश वेळा ऐतिहासिक लिखाणासंदर्भात अशी वाक्य दीनबुद्धीतून फेकली जातात.. या वाक्यांचा ठरवून आणि सोयीनुसार प्रचार-प्रसार केला जातो.. कोण कधी बोलेल यावरदेखील बारीकसा विचार केला जातो.. असं निरिक्षणही काहींनी मांडलं आहे..
या बाळबोध विधानावर खोलात जाऊन विचार केला तर अशी वादग्रस्त विधानं सहज बाहेर आलेली नाहीये असं लक्षात येतं.. ही विधानं म्हणजे त्यांना अपेक्षित त्या 'बदला'संदर्भात असेलेली 'लिटमस' टेस्ट असतात.. याच लिटमस टेस्टचा भाग म्हणून खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेडरमधून महात्मा गांधींचा फोटो हटवण्यात आला..
खादींच्या कॅलेडरमधून फोटो हटवल्याचा वाद ताजा असताना हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी थेट 'आता चलनी नोटांवरुनही महात्मा गांधी गायब होतील' असं धाडसी विधान केलं.. नोटांवरील 'गांधी हटवू' या अनिल विज यांच्या विधानावरुन वाद उत्पन्न करण्यात आता काही अर्थ नाही.. कारण नव्या नोटांवरुन सरकार आणि आरबीआयनं महात्मा गांधींचा फोटो आधीच हटवला आहे.. नव्या नोटांवरुन गांधींचा फोटा हटवण्याची लिटमस टेस्ट सरकारनं घेतली आहे.
5 जानेवारीला मध्यप्रदेशातील एका नेशनलाईज बँकेनं एका शेतकऱ्याला महात्मा गांधींचा फोटो नसलेल्या नोटा वितरीत केल्या.. त्यामुळे अनिल विज यांच्या वक्तव्याला काही आधार उरत नाही.. मुळात भाजप ही गांधी द्वेशावर आधारित असलेल्या RSSया संघटनेची एक राजकीय शाखा आहे.. गांधी हत्या आणि पाकिस्तानला कथित 55 कोटी भारतानं दिल्याचं भांडवल करुन RSSनं संघटन बांधणी केली आहे.. हे अघोषित सत्य नव्वदीनंतरच्या अनेक नॉन फिक्शन लिखाणातून मांडण्यात आलं आहे..
हळूहळू महात्मा गांधी हत्येचं 'वधा'त रुपांतर करुन राष्ट्रपित्यांच्या हत्येबाबत सिपंथी अर्थात सहानभूती तयार करुन जनतेच्या मनावर बिंबवून मतनिर्मिती तयार करण्यात संघ काहीअंशी यशस्वी ठरला आहे.. याचेदेखील अनेक संदर्भ सखोल वाचनासाठी मिळू शकतात.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 2011नंतरच्या आंदोलनानंतर देशातील जनतेत कृत्रीम राष्ट्रभक्ती ओसंडून वाहू लागली.. आंदोलनात तत्कालिन सरकार अर्थात काँग्रेसविरोधात बळ जमा करण्यासाठी विरोधकांनी जनाआंदोलनाचा वापर केल्याचं सांगण्यात आलं.. अण्णा यांच्या या आंदोलनाला तत्कालिन विरोधी पक्ष अर्थात भाजपचा पाठींबा असल्याचं सांगण्यात आलं.. नंतर काही लेखकमंडळींनी ते सिद्ध करुनही दाखवलं.. या आंदोलनात बाहेर आलेली तरुण पिढी भाजपनं वापरली आणि त्यांच्यात देशभक्तीचा स्तोम भरला..
ही बळकटी निवडणूकांपर्यंत तेवत ठेवली.. यानंतर देशात माध्यमांच्या मदतीनं पेरलेल्या दोन-तीन घटना घडल्या. यातून सोशल मीडिया वापरणाऱ्या अनमॅच्युअर्ड पिढीला राष्ट्रभक्तींची वारंवारता सिद्ध करायला बळकटी दिली. जेएनयूमधील कथित घोषणाबाजी, गोसेवक, रोहित वेमुलाची आत्महत्या, एफटीआयआयचं विद्यार्थी आंदोलन अशा गोष्टीतून फेसबुक-ट्वीटर फौजांनी कथित जाज्वल्य देशभक्ती सिद्ध केली. परिणामी या सोशल मीडियावर कमेंट करणाऱ्या फौजांनी डाव्या पक्षांसह सर्व विरोधी पक्षाच्या देशभक्तीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला..
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईच्या फौजांचं मतनिर्मीती करणं हादेखील भाजप आणि पितृसंघटनांचा छुपा अजेंडा होता.. आता हेदेखील अधिकृतरित्या समोर आलं आहे.. यासंदर्भात पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी लिहलेलं 'I am a troll' नावाचं नवं पुस्तक बाजारात आलं आहे..
या पुस्तकातून स्वाती चतुर्वेदी यांनी भाजप पुरस्कृत सोशल मीडिया ट्रोलचं नागडं सत्य बाहेर काढलं आहे.. विरोधक आणि सरकारविरुद्ध बोलणाऱ्याविरोधात भाजपनं 'सोशल मीडिया योद्धे' कसे तयार केले यावर धक्कादायक खुलासे या पुस्तकातून करण्यात आले आहेत.. सदर पुस्तकाचा उल्लेख केवळ एवढ्यापुरताच आहे की, भाजप आणि त्यांच्या पितृसत्ताक संस्थेचे तयार केलेली दुय्यम संदर्भावर आधारीत पिढी ' महात्मा गांधी आता नोटांवर खरंच नकोय' असे मते सर्रास देतील.. किंवा याआधी अनिल विज यांच्या 'गाय राष्ट्रीय पशू' घोषित करण्याच्या मागणीवरदेखील मते मांडली होती..
दुसरं म्हणजे असे बाष्कळ विधाने करुन मतप्रवाह तयार करणं आणि हळूहळू त्यावर चर्चा घडवून आणणे, हादेखील छुपा हेतू या बाष्कळ विधानामागे असतो... इतिहासात डोकावून पाहिलं तर असे अनेक उदाहरणं आपणास पहायला मिळतील. त्यामुळे विज यांचं विधान असो वा मोदींचं खादीच्या कॅलेंडरवर आकस्मिक येणं, हे इतक सहज घटलं नाहीे... त्यामुळेचं याचं त्यांना हवं असलेलं ऐच्छिक फलित लवकरच पहायला मिळतील..
हा वाद चालू असताना महाराष्ट्रात गांधी हत्येच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या एका नाटकावर वाद सुरु होता.. राज्यभर नाटकाला विरोध करुन प्रयोग हाणून पाडणं सुरु होतं. तसंच नाटकाच्या प्रमुख अभिनेत्याची 'सोशल मीडिया'वर खिल्ली उडवली जात होती.. याचं कारण गांधीबद्दलचा आदर तर होताच पण सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या नावानं अवडंबर माजवणाऱ्या शक्तीना प्रखर विरोध करणं हादेखील होता. विरोधामुळे नाटकाचे काही प्रयोग रद्द करावे लागले. असं सांगितलं जातं की गांधी हटवण्याची छुपी रणनिती या नाटकामागे होती. असो. पण समंध महिना गांधी चर्चेत राहीले. यातून सरकारला धारेवर धरण्यात आलं..
त्यामुळेच कदाचित पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयाला खादी आयोगाला नोटीस बजावण्याची नाटकीयता पार पाडावी लागली. असो. एकंदर पाहता सरकारनं विरोधाची दखल घेत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.. त्यामुळेच कदाचित सरकारला बजेट सत्रात गांधींना वारंवार उल्लेखित करावं लागलं.. गांधींच्या नावे काही नवीन योजना जाहीर कराव्या लागल्या..
जाता-जाता
महात्मा गांधींना भाजपनं विविध योजनातून हायजॅक केलं.. मात्र, भाजप आणि पितृसंघटनांनी गांधीचे विचारही हायजॅक करावेत... आणि दुसरी गोष्ट म्हणजे, गांधी नोटांवरुन हटवा (?) किंवा कॅलेंडरमधून गांधी आणि त्यांच्या विचारावर काही परिणाम होणार नाही... हेदेखील गांधींना हायजॅक करणाऱ्या संघटनांनी पुन्हा एकदा समजून घ्यावं..
कलीम अजीम, मुंबई
(लास्ट अपडे़ट 22 फेब्रुवारी 2017)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com